संगणक माहिती – व्याख्या, प्रकार, इतिहास आणि फायदे व तोटे | computer information in Marathi

Advertisements

आपण सर्वानी लहानपणापासुन संगणक पाहिलेला असतो. संगणकाचे दैनंदिन जीवनात अत्यंत महत्वाचे स्थान आहे. संगणकाचा उपयोग हा shopping mall मध्ये bill बनवण्यापासून ते गणितातील किचकट गणिते सोडवन्यापर्यंत सर्व ठिकाणी होतो अशा या संगणकाची माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेऊया.

संगणकाने आपल्या आयुष्यात खूप मोलाचे योगदान दिले आहे त्यामुळे संगणक आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. संगणक हा खूप प्रकारे आपल्या अवतीभोवती असतो ज्यामध्ये मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट घड्याळ इत्यादी मध्ये संगणक कार्यरत असतो. हे सर्व संगणकाचेच प्रकार आहेत आणि यामध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर चा उपयोग केलेला असतो.

 संगणक वेगवेगळ्या भागांचा बनलेला असतो या मध्ये इनपुट उपकरणे, आउटपुट उपकरणे, स्टोरेज उपकरणे यांचा समावेश होतो. संगणकाचे भाग संगणकाला नावीन्य प्रदान करत असतात आणि संगणकाची कार्यक्षमता आणि गती संगणकाच्या भागांवर आधारित असते.

आपल्या मनात संगणकाविषयी खूप सारे प्रश्न असतात जसे की संगणक म्हणजे काय? संगणकाची व्याख्या काय असेल बर! संगणकाचे प्रकार कोणते? आणि संगणकाचे फायदे आणि तोटे कोणते? तसेच संगनाकाच्या इतिहासा विषयी आपल्याला जाणून घ्यायचे असते, आपल्या सर्वच शंका या लेखामुळे दूर होतील.

संगणक माहिती

अनुक्रमनिका

संगणकाची व्याख्या

संगणक काय आहे

संगणकाचा इतिहास

संगणकाचे प्रकार 

संगणकाचे भाग

संगणक कसे काम करतो

संगणकाचे फायदे

संगणकाचे तोटे

सारांश 

संगणकाची व्याख्या | computer definition in Marathi

संगणकाची व्याख्या अशा प्रकारे करता येईल कि “संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक मशीन आहे जे माहिती संगठीत करते, माहितीवर प्रक्रिया करते आणि माहितीचा शोध घेण्यासाठी मदत करते तसेच इतर मशीन वर नियंत्रण ठेवते “

संगणक हो मुख्यता माहितीवर प्रक्रिया करते आणि उपभोक्त्याच्या निर्देशानुसार आउटपुट प्रदान करते. संगणकाचा उपयोग इतर मशीन वर नियंत्रण ठेवण्यासाठी देखील होतो उदाहरणार्थ  औद्योकीक क्षेत्रात कार्यरत असलेले रोबोट्स.

 संगणक काय आहे | what is computer in Marathi

 संगणकाला इंग्रजीमध्ये कंप्यूटर असे म्हटले होते. कंप्यूटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे माहितीवर programme च्या मदतीने प्रक्रिया करते. संगणक हे programme शिवाय काहीच करू शकत नाही. संगणक हे युजर कडून इनपुट च्या स्वरूपात माहिती घेते ती माहिती विविध programme मधून जाते आणि माहितीवर प्रक्रिया होऊन माहिती प्रदर्शित केली जाते.

 कॉम्प्युटर या शब्दाचा उदय लॅटिन भाषेतील संज्ञा Computare पासून झाला ज्याचा अर्थ होतो calculate / programmable अर्थात  प्रोग्राम /  coding द्वारे चालणारा. संगणक चालवताना जेवढ्या पण गतीविधी होतात त्यासाठी programming / coding ची गरज पडते.

Charles Babbage यांना computer चे फादर असे संबोधले जाते कारण त्यांनी पहिला functional संगणकाची स्थापना केली तसेच Ada Lovelace यांना computer ची मदर असे संबोधले जाते कारण त्या जगातील पहिल्या प्रोग्रामर होत्या.

संगणकाचा इतिहास | History of computer in Marathi

मागच्या काही काळामध्ये संगणकाच्या क्षेत्रात खूप अमुलाग्र बदल झाला आहे. कोणत्याही गोष्टीची पुरेपूर माहिती हवी असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहिती असला पाहिजे. संगणकच्या क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे –

1943 – Mark I colossus ची स्थापना

Britishers कडून German सैन्याच्या संदेशाला decode करण्यासाठी संगणकाची स्थापना झाली.

1943- 1946 ENIAC ची स्थापना

Presper Eckert, John William Munchy यांनी ENIAC ची स्थापना केली.

1954 – पहिल्या इलेक्ट्रॉनिक calculator चा शोध

IBM या संगणक निर्मात्या कंपनीने पहिल्या इलेक्ट्रॉनिक calculator चा शोध लावला. या calculator मध्ये transistor चा उपयोग झाला.

21 January 1963

पहिल्या संगणक mouse चा शोध लागला

1969 – ARPANET ची स्थापना

अमेरिकन सैन्य दलाने computer चे एक छोटे नेटवर्क स्थापन केले ज्याला ARPANET असे नाव दिले. ARPANET 1989 मध्ये www/ web चा शोध 1989 मध्ये लागल्यावर बरखास्त करण्यात आले.

1971 – पहिला ई-मेल पाठवण्यात आला

Ray Tomlinson यांनी पहिला ई-मेल पाठवला ज्यामध्ये पहिल्यांदा @ या चिन्हाचा उपयोग झाला.

1981 – first IBM PC

1989-90 – First website

Tim berners lee यांनी पहिली वेबसाईट बनवली आणि web / www च्या युगाला सुरवात झाली.

1997 – IBM ने तयार केलेल्या संगणकाने पहिल्यांदा मानवाला बुद्धिबळात हरवले.

1998 – Google ची स्थापना

सन 1998 मध्ये स्थापना झालेली google ही कंपनी आज जगातील सर्वात मोठी माहिती प्रदाता कंपनी आहे. Google वर प्रति सेकंड जवळपास 74हजार searches केले जातात 

संगणकाचे प्रकार | types of computer in marathi

संगणकाचे वेगवेगळ्या घटकांवर आधारित खूप प्रकार पडतात त्यातील काही महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे –

आकारमान व शक्ती वर आधारित –

1. वैयक्तिक संगणक-

यांचा आकार हा लहान असतो व एकाच उपभोक्त्याला उपयुक्त 

2. Workstation संगणक-

या प्रकारचे संगणक देखील एकाच उपभोक्त्या ला उपयोगी असतात पण हे वैयक्तिक संगणकापेक्षा जास्त शक्तिशाली असतात.

3. मिनी संगणक

जास्त उपभोक्ते अशा प्रकारचा संगणक एकाच वेळी वापरू शकतात.

उदाहरण – Tablet, Pc, smartphone

4.Mainframe संगणक

हे संगणक जास्त शक्तिशाली असते व हजारो लोक एकाच वेळी या संगणकाचा उपयोग करू शकतात.

उदाहरण – Bank, Government office, insurance company मध्ये उपयोगी असलेले संगणक

5. महासंगणक

हा संगणक अत्यंत शक्तिशाली असतो व खूप मोठे गणिते पण सेकंदाच्या एका छोट्या भागात सोडवू शकतो.

उदाहरण – परम महासंगणक, टायटन महासंगणक

Data / माहिती प्रक्रिया वर आधारित

1.Analog संगणक

हे संगणक भौतिक घटकांवर आधारित काम करते व यामध्ये binary number वापरत नाहीत.

उदाहरण – planimeter, nomogram, operational आम्प्लिफाइर्स, डिजिटल तापमानक 

2. डिजिटल संगणक

या संगणकामध्ये binary number चा उपयोग होतो व हे संगणक औद्योगिक क्षेत्रात वापरले जाते.

उदाहरण – डिजिटल कॅमेरा, डिजिटल घड्याळ, डिजिटल फोन

3. Hybrid संगणक

हे संगणक डिजिटल आणि analog संगणकाचे मिश्रण आहे.

उदाहरण – पेट्रोलपम्प वर उपस्थित system ज्यामध्ये तापमान सीमित रेषेच्या वर गेले कि ऑटोमॅटिक तापमान नियंत्रित करण्यासाठी गॅस सोडला जातो,  ultrasound मशीन

 उपभोक्ताच्या संख्येवर आधारीत

एक उपभोक्ता संगणक

हा संगणक एक व्यक्ती एका वेळेस वापरू शकतात

उदाहरण – वैयक्तिक संगणक, workstation संगणक

बहुउपभोक्ता संगणक

या प्रकारचे संगणक एकाच वेळेस एका पेक्षा जास्त व्यक्ती उपयोग करू शकतात

उदाहरण – mini संगणक, Mainframe संगणक 

हेतू वर आधारीत

सामान्य हेतू संगणक

या संगणकांच्या उपयोगाचा हेतू हा सामान्य असतो

उदाहरण – मिनी संगणक, मेन फ्रेम संगणक.

 विशेष हेतू संगणक –

 काही विशिष्ट गतिविधी साठी या संगणकाचा उपयोग होतो

उदाहरण – महासंगणक 

संगणकाचे विविध भाग

संगणकामध्ये खूप भाग असतात जे इनपुट भाग व output भागात विभागलेले असतात. ज्यांचे कार्य हे भिन्न भिन्न असते व त्यांच्या उपयोग हा विविध कार्यासाठी होतो.

इनपुट भाग हे असे भाग असतात ज्यांच्याद्वारे computer च्या अंतर्गत भागात माहिती पाठवली जाते व computer सुरळीत चालतो. इनपुट भागात बाह्य गतिविधि अंतर्गत कार्यासाठी वापरल्या जातात . इनपुट भागांचे कार्य आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही व त्या कार्याचा अनुभव घेऊ शकत नाही.

Output भाग हे आपल्याला माहिती दाखवत असतात. आपण त्या माहितीचा अनुभव देखील घेऊ शकतो.आणि output भागामध्ये अंतर्गत गतिविधि या बाह्य घडामोडी साठी वापरल्या जातात त्याद्वारे संगणकाचा आपल्याला उपयोग होतो.

 उदाहरणार्थ – आपण monitor च्या screen वर picture बघू शकतो म्हणून तो output पार्ट आहे या उलट mouse चा उपयोग करून cursor फिरवू शकतो म्हणून तो आउटपुट भाग आहे.

Input भाग –

Keyboard, mouse, joystick, digital camera, microphone, touchpad,, scanner इत्यादी

Output भाग –

Printer, projector, plotter, monitor, speaker, headphones इत्यादी

(महत्वाचे) संगणकाच्या सर्व भागांची विषयी माहिती आणि उपयोग 

संगणक कसे काम करतो

संगणकाची कार्यप्रणाली एकदम सोपी आहे ज्यामध्ये संगणक वापरकर्त्या कडून माहिती घेतो नंतर ती माहिती programme च्या संचातून पाठवतो आणि वापरकर्त्याला शेवटी हवी असलेली माहिती दाखवतो. ही सर्व प्रक्रिया मात्र काही मिनी सेकंदात होते 

संगणकच्या कार्यप्रणाली मध्ये काही भाग अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतात त्यांचे नाव आणि कार्य पुढीलप्रमाणे-

-=CPU – CPU हा माहितीच्या हाताळणी मध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो तसेच cpu मुळे संगणकाचे सर्व कार्य सुरळीत चालतात.

-=रॅम – संगणक उपयोगात असताना काही माहिती ही अल्प काळासाठी साठवली जाते त्यासाठी रॅम चा उपयोग होतो.

-=HDD /SDD – संगणकावर उपलब्ध असलेले photo, video हे जास्त काळ साठवले जातात त्यासाठी HDD(Hard Disc Drive ) किंवा SDD (solid state drive ) चा उपयोग होतो.

-=Motherboard – संगणकामध्ये सर्व गतीविधीच्या घराला Motherboard असे संबोधले जाते.

संगणकाचे फायदे –

संगणकाने मानवी जीवनात अमुलाग्र बदल घडवून आणला आहे आणि आजच्या काळात संगणकाशिवाय जीवनाची कल्पना करणे अवघड झाले आहे. संगणक हा मानवी जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. संगणकाचे खूप सारे फायदे आहेत पण काही महत्वाचे फायदे पुढीलप्रमाणे

  •  संगणकमुळे मानवी कार्यक्षमता वाढीस लागली आहे. जे काम करायला कित्येक तास लागत होते ते आता काही मिनिटात होत आहे याचे छान उदाहरण हे shopping mall मधील bill बनवण्याची प्रक्रिया

  • संगणकमुळे आपल्या वेळेची बचत होते. जी माहिती शोधायला कित्येक पुस्तकं वाचायला लागायची तीच माहिती आता काही सेकंदात internet मुळे आपल्या पुढे उभी राहते.
  • काही काळा पूर्वी photo हे photo अल्बम मध्ये असायचे आणि ते मर्यादित असायचे आता हजारो photo तसेच video आणि गाणे आपण संगणकाच्या मदतीने संगठीत करू शकतो.

  • संगणकाने सर्व प्रक्रियेत अचूकता आणली आहे जे काम करताना मानवाकडून शेकडो चुका होत होत्या तेच काम संगणक अत्यंत अचूकतेने करत आहे.

  •  संगणकामुळे माहितीचा शोध घेणे अत्यंत सोपे झाले आहे.
  • संगणकमुळे आपण खूप अनोळखी लोकांला घरी बसल्या भेटू शकतो आणि आपले चांगले संपर्क वाढू शकतो.

  • आजकाल वाढलेले माहितीचे ज्ञान ही संगणकाचीच देणगी आहे आणि या माहितीचा आपण जीवनात खूप ठिकाणी उपयोग करू शकतो.

  • संगणक हे एक मनोरंजन साधन बनले आहे आपण नवनवीन मनोरंजक कार्यक्रम संगणकमुळे घर बसल्या बघू शकतो.

  • आपण संगणकाला तसेच मोबाईल ला टीव्ही ला जोडू शकतो आणि मोठ्या screen वर आपले मनपसंद कार्यक्रम पाहू शकतो.

  • आपण pocket computer चा उपयोगी करून संगणकाला कुठेही नेऊ शकतो उदाहरणार्थ Raspberry pi 4

  • संगणकमुळे घर बसल्या काम करण्याच्या संधी वाढतच आहेत आणि त्यामुळे कुशल लोकांना रोजगार मिळत आहे

संगणकाचे तोटे

 प्रत्येक गोष्टीचा जसा फायदा असतो तसाच तोटा देखील असतो. त्याचप्रमाणे संगणकाचे देखील काही तोटे आहेत ज्यामुळे संगणक हा घातक होत आहे आणि यामुळे मानवी जीवनावर त्याचे काही दुष्परिणाम देखील झाले आहेत. संगणकाचे काही मोठे तोटे पुढीलप्रमाणे –

  •  संगणकामुळे माहितीची गोपनीयता राखण्यासाठी अडचणी येत आहे आणि खूप वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता वाढली आहे.

  • संगणकमुळे सायबर घोटाळे वाढले आहे आपण दररोज बातम्यांना बघत असतो की खूप लोकांचे बँक detail लीक झाली आहे त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याचे प्रमाण वाढले आहे.

  •  संगणकामुळे लोकांच्या रोजगारात प्रचंड कमतरता आली आहे आणि जे काम हजारो लोक मिळून करायचे तेच काम आता एक रोबोट संगणकाच्या मदतीने करतो.

  • काही संगणक हे औद्योगिक क्षेत्रात उपयोगी पडतात आणि अशा प्रकारचे संगणक खूप महागडे असतात जर अशा संगणकामध्ये काही बिघाड झाला तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
  • संगणकाच्या जास्त उपयोगामुळे एकाग्रतेत खंड पडतो परिणामी मानवी एकाग्रता लोप पावते ज्याचा दैनंदिन जीवनात मोठा परिणाम पडतो तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य बिघडते.
  • संगणकमुळे मानवी स्वास्थ्यला धक्का बसतो आणि मानवी स्वास्थ बिघडते.
  • खराब संगणकामुळे निसर्गाचा र्‍हास होतो आणि पर्यावरणात मोठ्या प्रमाणात कचरा साठतो.
  • संगणकामुळे तसेच social media मुळे वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे अवघड झाले आहे.
  • Internet वर खूप सारे असे ठिकाणे आहेत ज्यामुळे आपला किमती वेळ खर्ची पडतो आणि जीवनात आपल्याला अपयश देखील येऊ सहते.
  • संगणकामुळे खूप लोकांना मनोविकार जडले आहेत त्यामुळे संगणकाचा उपयोग हा मर्यादित केला तर संगणक हे वरदान आहे नाही तर अभिशाप.

सारांश / conclusion

आज आपण संगणकाविषयी खूप महत्त्वाची माहिती पाहिली ज्यामध्ये आपण संगणकाचे कार्यक्षमता तसेच कार्य प्रणाली समजून घेतली. संगणकचा मानवी जीवनावर होणारा उपयुक्त परिणाम बघितला तसेच आपण संगणकाचे तोटे देखील समजावून घेतले. संगणक हा जीवनात जितका उपयुक्त आहे तितकाच तो घातक देखील आहे. संगणकाचा मर्यादित वापर जीवन सुयोग्य बनवू शको.

आपण संगणकाविषयीं जाणून घेतले की संगणकाची व्याख्या काय आहे, संगणक काय आहे तसेच आपण संगणकाचा इतिहास देखील जाणून घेतला. संगणकाची अंतर्गत प्रणाली जाणून घेण्यासाठी आपण संगणकाच्या विविध भागांचा अभ्यास केला. तसेच संगणक कसे काम करतो ये देखील जाणून घेतले त्याचा जोडीला आपण जाणून घेतले कि संगणकाचे फायदे काय आहे आणि संगणकाचे तोटे काय आहे. आपण संगणकाची इतरही माहिती जाणून घेतली.

तुमच्या मनात संगणकाविषयीं कोणतीही शंका असेल तर तुम्ही कंमेंट द्वारे आपली शंका विचारू शकतात तसेच जर तुम्हाला लेख आवडला तर नक्की तुमच्या मित्रांमद्ये हा लेख share करा ज्यामुळे आम्हाला लिहण्याची प्रेरणा भेटते.

Advertisements

Leave a Comment