Software म्हणजे काय – What is Software in Marathi

Advertisements

 संगणक हा सॉफ्टवेअर तसेच हार्डवेअर चा बनलेला असतो. हार्डवेअर उपकरणांमध्ये इनपुट आणि आऊटपुट उपकरणे जसे की कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू तसेच संगणकाच्या भागांचा समावेश होतो. परंतु सॉफ्टवेअर विविध प्रोग्राम चा संच असतो  व त्या द्वारे संगणकामधील विविध कार्य पार पाडले जातात.कधी कधी आपल्याला सॉफ्टवेअर विषयी जास्त माहित नसते त्यामुळे आपल्या मनात सॉफ्टवेअर म्हणजे काय ? what is software in marathi हा प्रश्न अवश्य येऊ शकतो.

 ज्याप्रमाणे सीपीयू हा संगणकाचा मेंदू असतो त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर हा संगणकाचा आत्मा असतो. ज्या प्रमाणे आपण आत्मा बघू शकत नाही त्याचप्रमाणे आपण सॉफ्टवेअर हे उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही किंवा त्याला स्पर्श करू शकत नाही. सॉफ्टवेअर हे एक आभासी वस्तू आहे.

 जेव्हा आपण संगणकाच्या भागांच्या मदतीने संगणकाला निर्देश देत असतो तेव्हा त्या निर्देशांच्या मदतीने संगणकामधील कार्य पूर्ण होण्यासाठी काही प्रोग्रॅम ची गरज असते व त्या प्रोग्रॅमला सॉफ्टवेअर असे देखील म्हटले जाते.

Table of content ↕

 आजच्या काळात सॉफ्टवेअरचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे आपल्या मनात सॉफ्टवेअर विषयी खूप सारे प्रश्न असतात व त्या सर्व प्रश्नांच्या समाधानासाठी आपण या लेखामध्ये संगणकाच्या सॉफ्टवेअर विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ .

What is software in Marathi

 सॉफ्टवेअर म्हणजे काय ? what is software in marathi

 सॉफ्टवेअर संगणक प्रणालीशी जोडला गेलेला प्रोग्राम चा संच आहे. सॉफ्टवेअर हा संगणकाला अंतर्गत सूचना देऊन संगणकाला कार्य करण्यासाठी मदत करतो. सॉफ्टवेअर चे सिस्टिम सॉफ्टवेअर आणि एप्लीकेशन सॉफ्टवेअर हे मुख्य प्रकार आहेत 

 सॉफ्टवेअर हे आभासी असतात आपण सॉफ्टवेअरला स्पर्श करू शकत नाही. आपण हा लेख वाचताना मोबाईलच्या किंवा संगणकाच्या Screen ला स्पर्श करू शकतो, परंतु आपण screen च्या आत उपस्थित असलेल्या अक्षरांना किंवा चित्रांना direct स्पर्श करू शकत नाही. जसे की आपण पुस्तकामध्ये अक्षरांना किंवा चित्रांना direct स्पर्श करतो तसे आपण मोबाईल किंवा संगणकाच्या स्क्रीनवर करू शकत नाही.

 सॉफ्टवेअर च्या उपयोगाशिवाय बहुतांशी संगणक निकामी असतात. उदाहरणार्थ गुगल चे क्रोम ब्राउजर हे एक सॉफ्टवेअर आहे आणि जर या सॉफ्टवेअरचा उपयोग आपल्या मोबाईल किंवा संगणक मध्ये केलेला नसेल तर आपण हा लेख वाचू शकला नसता.

 सॉफ्टवेअर ची व्याख्या

 सॉफ्टवेअर हा विविध निर्देश, डाटा किंवा प्रोग्राम चा संच आहे ज्या द्वारे संगणक कार्यान्वित होतो आणि वापरकर्त्याने दिलेले विशिष्ट कार्य पूर्ण करू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सॉफ्टवेअर वापरकर्त्याने दिलेल्या निर्देशानुसार संगणकामध्ये कार्य घडवून आणतो.

 उदाहरणार्थ जेव्हा आपण मोबाईल / संगणक ची पावर ऑन करतो आणि गुगल किंवा इतर कोणताही ॲप उघडतो आणि त्यामध्ये कोणतेही कार्य करतो, तेव्हा या सर्व प्रक्रियेमध्ये सॉफ्टवेअर तुम्ही दिलेल्या निर्देशानुसार मोबाईलच्या किंवा संगणकाच्या स्क्रीनवर किंवा इतर उपकरणांमध्ये कार्य घडवून आणत असतो.

 सॉफ्टवेअर चा इतिहास / history of software in Marathi

 सॉफ्टवेअर मध्ये काळानुसार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत. सॉफ्टवेअर चा इतिहास जाणून घेताना आपण सॉफ्टवेअर मध्ये काळानुसार झालेल्या बदलांची माहिती घेऊ तसेच नजीकच्या काळात सॉफ्टवेअर मध्ये झालेल्या महत्त्वाच्या बदलांची देखील माहिती घेऊ.

1948 – 1948 साली सर्वप्रथम जगातील पहिल्या संगणकीय सॉफ्टवेअरची निर्मिती झाली. हा सॉफ्टवेअर Tom Kilburn यांनी त्यांचा सहकारी Freddie Williams यांच्यासोबत बनवला. या सॉफ्टवेअरचा उपयोग गणितीय क्रियांसाठी केला गेला.

1960-1970 – 1960-1970 च्या काळात  विश्वप्रसिद्ध कंपनी IBM ने सॉफ्टवेअर विकण्यास सुरुवात केली यामुळेच सॉफ्टवेअर सामान्य वापरकर्त्यांसाठी उपलब्ध झाले आणि या कल्पनेमुळे सामान्य वापरकर्त्याच्या संगणकाची कार्यक्षमता वाढली.

1979 – 1977 साली ॲपल कंपनीने त्यांचा प्रसिद्ध मोबाईल Apple-II मार्केटमध्ये आणला आणि 1979 साली यामध्ये VisiCalc या प्रसिद्ध app चा समावेश केला गेला आणि हा ॲप जगातील पहिला spreadsheet सॉफ्टवेअर होता.

1991 – 1991 सालि लिनक्स कर्नल हा मुक्तस्त्रोत सॉफ्टवेअरसामान्य लोकांसमोर आणला गेला.

1996 – 1996 या वर्षी Palm OS या सॉफ्टवेअर ने जगाच्या मार्केट मध्ये प्रवेश केला.

 सॉफ्टवेअर चे प्रकार / types of software in Marathi

 सॉफ्टवेअरचे कार्यपद्धती आणि उपयोगानुसार सॉफ्टवेअर चे प्रकार आहेत ते आहेत –

1. सिस्टिम सॉफ्टवेअर –

 सिस्टिम सॉफ्टवेअर चे काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे-

  •  Firmware

  •  Language translator

 2. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर –

 ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे काही मुख्य प्रकार पुढीलप्रमाणे 

  •  Word processor

  •  Database software

  •  Multimedia software

  •  Education and reference software 

  •  Graphics software

3. Utility सॉफ्टवेअर

4. Freeware

5. Open source software ( मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर )

1. सिस्टिम सॉफ्टवेअर –

 सिस्टीम सॉफ्टवेअरच्या मदतीने वापरकर्ता आणि हार्डवेअर उपकरणे एकमेकांसोबत सांगड घालू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर सॉफ्टवेअर हे उपभोक्ता आणि हार्डवेअर उपकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पडतात. सिस्टिम सॉफ्टवेअर हे बॅकग्राऊंड ला कार्य करतात त्यामुळे त्यांना ” low-level software ” देखील म्हटले जाते.

• ऑपरेटिंग सिस्टिम –

 ऑपरेटिंग सिस्टिम ही संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये उपस्थित असते. ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने विविध ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग आपण संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये करू शकतो. ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने मोबाईल किंवा संगणकामधील संसाधनांचे जतन किंवा संसाधनामध्ये बदल केला जातो.

 प्रत्येक संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये ऑपरेटिंग सिस्टिम चा उपयोग केला जातो कारण ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने वापरकर्ता system शी interact करू शकतो.

 ऑपरेटिंग सिस्टम ची काही उदाहरणे –

  • Android 

  • iOS 

  • CentOS

  • Linux

  • Mac OS
  • Unix
  • Ubuntu
  • MS Windows 

• Device driver –

 या प्रकारचे सॉफ्टवेअर संगणकाच्या सिस्टीमची जोडले गेलेल्या बाहेरच्या हार्डवेअर उपकरणांवर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करतात. विविध हार्डवेअर उपकरणे ड्रायव्हर च्या मदतीने संगणक सिस्टिम शी जोडलेले असतात.

Device driver software चे प्रकार –

• USB Drivers

• VGA Driver

• Display Drivers

• Motherboard Drivers

• Printer Drivers

• ROM Drivers

• Sound card driver

• Virtual Device Drivers

• BIOS Driver

• फर्मवेयर सॉफ्टवेयर –

 फर्मवेयर सॉफ्टवेयर हे कायमस्वरूपी चे सॉफ्टवेअर असून ते संगणकाच्या ROM ( read only memory ) मध्ये उपस्थित असतात. फर्मवेयर सॉफ्टवेयर द्वारे संगणकाच्या एका उपकरणाला दुसऱ्या उपकरणाशी interact करण्यासाठी मदत होते.

फर्मवेयर सॉफ्टवेयर ला आपण Semi-Permanent ( अस्थाई कायमस्वरूपी ) सॉफ्टवेअर देखील म्हणू शकतो कारण आपण फर्मवेयर सॉफ्टवेयर ला फर्मवेयर सॉफ्टवेयर अपडेटर च्या मदतीने अपडेट देखील करू शकतो.फर्मवेयर सॉफ्टवेयर चे काही उदाहरणे पुढील प्रमाणे  –

  • UEFI

  • Consumer Applications

  • BIOS

  • Embedded Systems

  • Computer Peripherals

• Programming language translator –

 या सॉफ्टवेअरच्या मदतीने उच्च कोडिंग भाषा चे रूपांतर सोप्या मशीन भाषेत होते. याव्यतिरिक्त या सॉफ्टवेअरच्या मदतीने इतर देखील कार्य केले जातात जसे कि डेटा ला संग्रहित करणे, सोर्स कोड ची माहिती ठेवणे, कोडींग मध्ये कोड रण करताना errors ची माहिती ठेवणे.

 या सॉफ्टवेअरचे काही महत्त्वाची उदाहरणे आहेत – interpreter, compiler आणि assembler.

2. एप्लीकेशन सॉफ्टवेअर

एप्लीकेशन सॉफ्टवेअर किंवा app चा उपयोग विशिष्ट कार्य करण्यासाठी केला जातो व यांचा उपयोग डायरेक्ट वापरकर्त्या कडून केला जातो.

 जेव्हा वापरकर्त्या कडून कोणत्याही सॉफ्टवेअरचा डायरेक्ट उपयोग केला जातो तेव्हा त्याला एप्लीकेशन सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. एप्लीकेशन सॉफ्टवेअरची काही उदाहरणे आहे गुगल chrome, फेसबुक, व्हाट्सअप, टेलिग्राम, युट्युब तसेच मोबाईल किंवा संगणकावरील उपस्थित सर्व ॲप .

एप्लीकेशन सॉफ्टवेअर चे काही महत्त्वाचे प्रकार आहेत –

• word प्रोससर –

 या सॉफ्टवेअरच्या मदतीने शब्दांमध्ये किंवा अक्षरांमध्ये बदल केला जातो, ते संग्रहित केले जातात किंवा त्या शब्दांच्या किंवा अक्षरांच्या documents ची प्रिंट काढण्यासाठी मदत होते.

उदाहरण – MS Word, Google docs, apple iWork इत्यादी.

•  डेटाबेस सॉफ्टवेअर

 डेटाबेस सॉफ्टवेअरच्या मदतीने नवीन डेटाबेस तयार केला जातो तसेच डाटाबेस वर नियंत्रण ठेवले जाते. या सॉफ्टवेअरच्या प्रणाली लाच DBMS असे देखील संबोधले जाते. या सॉफ्टवेअरचा मुख्य उपयोग संगणकामधील माहितीची योग्य रचना करण्यासाठी होतो.

उदाहरण – FileMaker, MySql, dBase इत्यादी

• मल्टिमीडिया सॉफ्टवेअर –

 मल्टिमीडिया सॉफ्टवेअरचा उपयोग मुख्यता व्हिडिओ, फोटो आणि ऑडिओ संबंधित कार्य करण्यासाठी होतो, जसे की व्हिडिओ किंवा फोटो click करणे, ऑडिओ किंवा व्हिडीओ प्ले करणे,  ग्राफिक्स डिझाईन करणे, फोटो एडिटिंग करणे इत्यादी साठी मल्टीमीडिया सॉफ्टवेअरचा उपयोग होतो.

उदाहरण – Adobe Photoshop,Windows Media Player,Picasa, kinemaster, PicsArt इत्यादी.

• शैक्षणिक सॉफ्टवेअर-

शैक्षणिक सॉफ्टवेअर चा उपयोग वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी होतो.शैक्षणिक सॉफ्टवेअर मध्ये वेगवेगळ्या tutorial सॉफ्टवेअर चा समावेश होतो. शैक्षणिक सॉफ्टवेअर चा उपयोग विद्यार्थ्यांद्वारे तसेच शिक्षकांद्वारे मोठ्या प्रमाणावर केला जातो.

उदाहरण – KidPix,  khan academy, Udemy, unacademy, byju’s इत्यादी.

• वेब ब्राउजर

 वेब ब्राउजर चा उपयोग मुख्यतः इंटरनेट चा उपयोग करण्यासाठी केला जातो. वेब ब्राउजर च्या मदतीने इंटरनेट वरील माहिती आपल्याला मिळते.

उदाहरण – गुगल क्रोम, ऑपेरा ब्राउजर, सफारी, फायरफॉक्स, यूसी ब्राउजर, इंटरनेट एक्सप्लोरर, इत्यादी 

 3.Utility software –

 युटिलिटी सॉफ्टवेअरचा उपयोग संगणकाला पायाभूत सुविधा देण्यासाठी होतो. Utility सॉफ्टवेअरचा अप्लिकेशन सॉफ्टवेअर प्रमाणे वापरकर्त्या साठी डायरेक्ट उपयोग होतो. युटिलिटी सॉफ्टवेअर चे मुख्य कार्य संगणकाला सुरळीत उपयोगात आणणे आहे.

 युटिलिटी सॉफ्टवेअर महत्वाचे कार्य पार पाडतात जसे कि व्हायरसचा शोध लावणे, डाटा मॅनेजमेंटमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ला मदत करणे,नको असलेल्या फाइल्स डिलीट करणे, मोठ्या आकारमानाच्या फाइल्स चे कॉम्प्रेशन करणे, इत्यादी.

 युटीलिटी सॉफ्टवेअरची महत्त्वाची उदाहरणे आहेत –

•  अँटिव्हायरस

•  फाईल बॅकअप

•  फाईल मॅनेजमेंट 

•  कॉम्प्रेशन टूल्स

 • डिस्क मॅनेजमेंट टूल्स

•  डिस्क Defragmenter

4. Freeware software

 Freeware सॉफ्टवेअरमध्ये freeware हा शब्द फ्री आणि सॉफ्टवेअर या दोन शब्दांचे मिश्रण आहे.जरी freeware हा शब्द फ्री आणि सॉफ्टवेअर या शब्दांचे मिश्रण असेल तरीही freeware सॉफ्टवेअर आणि फ्री सॉफ्टवेअर मध्ये फरक आहे. Freeware सॉफ्टवेअर म्हणजे शुल्क रहित सॉफ्टवेअर तसेच फ्री सॉफ्टवेअर म्हणजे कॉपीराईट फ्री सॉफ्टवेअर.

Freeware सॉफ्टवेअर वापरकर्त्यांसाठी मोफत उपलब्ध असतात म्हणजेच या सॉफ्टवेअरचा उपयोग कोणीही,कशाही प्रकारे करू शकतो. परंतु या सॉफ्टवेअरच्या वापरामध्ये काही प्रमाणात बंधने असू शकतात जसे कि या सॉफ्टवेअर चा प्रोग्राम आपण बदलू शकत नाही तसेच या सॉफ्टवेअरचे रूपांतर नवीन सॉफ्टवेअर मध्ये करू शकत नाही.

 उदाहरण – Adobe Reader, kinemaster free plan, wps office free plan, Recuva, facebook, इत्यादी.

5. Open source software / मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर –

 ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा कोणीही उपयोग करू शकतो तसेच त्यामध्ये बदल करू शकतो आणि त्याला अधिक उत्कृष्ट बनवू शकतो. ओपन सोर्स सॉफ्टवेअर एकत्रित बदलाचा परिणाम आहे.ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरण्यासाठी एकच मूलभूत सिद्धांत आहे “या सॉफ्टवेअर मध्ये केलेले सर्व बदल जनतेला मोफत पुरवणे”.

 ओपन सोर्स सॉफ्टवेअर मुख्यतः Public repository द्वारे संचलित केले जातात आणि यांचा उपयोग सामान्य जनता करू शकते. बहुतेकदा ओपन सोर्स सॉफ्टवेअर संचलित करण्याच्या नियमावली सोबत ओपन सोर्स सॉफ्टवेअर मध्ये बदल करण्याचे अधिकार प्रदान करतात.

 ओपन सोर्स सॉफ्टवेअरचे महत्त्वाची उदाहरणे पुढीलप्रमाणे -jQuery, LibreOffice, GIMP, SugarCRM, Mozilla Firefox, GNU/Linux.

 सॉफ्टवेअर कसे कार्य करतो / how software work in Marathi

 संगणकामध्ये सॉफ्टवेअर हे संगणकाच्या मेमरी मध्ये स्टोअर केलेले असतात. सॉफ्टवेअर हे प्रोग्राम्स चा संच असतो आणि संगणक हा सॉफ्टवेअर द्वारे कार्यान्वित होतो. जेव्हा अप्लिकेशन सॉफ्टवेअर ला काही निर्देश दिले जातात तेव्हा ते निर्देश सिस्टिम सॉफ्टवेअर कडे जातात आणि तेथून ते निर्देश मशीन कोड द्वारे हार्डवेअर उपकारणाला पाठवले जातात.

 संगणकाला कार्य करण्यासाठी सॉफ्टवेअर बरोबर हार्डवेअर उपकरणांची गरज असते. सॉफ्टवेअर वापरकर्त्याने दिलेले संगणकाचे अंतर्गत निर्देश पूर्ण करतात तर हार्डवेअर उपकरणांद्वारे वापरकर्त्याने दिलेल्या निर्देश मधून वापरकर्त्याला आवश्यक परिणाम दाखवले जातात.

 सॉफ्टवेअर कसे तयार करतात / how to create software in Marathi

 सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्याची गरज असते. सिस्टिम सॉफ्टवेअर बनवण्यासाठी व अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज ची गरज असते.आपण आपल्या उद्देशानुसार प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकू शकता व प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या सहाय्याने सॉफ्टवेअर तयार करू शकता.

सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी आपल्याला संगणकाचे basic ज्ञान असणे आवश्यक आहे. कोणीही संगणकाचे सॉफ्टवेअर निर्माण करू शकतात यासाठी तुम्हाला पुढे दिलेल्या काही स्टेप्स ला फॉलो करायचे आहे –

1. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टिम सॉफ्टवेअर पैकी  तुम्हाला कोणते सॉफ्टवेअर आवडतात ते निश्चित करा.

 एप्लीकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग संगणक किंवा मोबाईल मध्ये वापरकर्त्यांची डायरेक्ट गरज पूर्ण करण्यासाठी होतो. अप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये मोबाईल पासून संगणक पर्यंत असलेल्या सर्व ॲप्स चा समावेश होतो.

 सिस्टिम सॉफ्टवेअर चा उपयोग ऑपरेटिंग सिस्टिम चे निर्माण करण्यासाठी तसेच संगणकाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी होतो.

2. निवडलेल्या सॉफ्टवेअर प्रकारानुसार प्रोग्रामिंग लैंग्वेज शिका, काही महत्त्वाच्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत –

C – ही सर्वात जुन्या प्रोग्रामिंग लैंग्वेज पैकी एक आहे जी आज देखील उपयोगात आहे. ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज हार्डवेअर उपकरणं बरोबर अधिक चांगल्या प्रकारे कार्य करते.

C++ – हि प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज c प्रोग्रामिंग लैंग्वेज चे सुधारित रूप आहे . या प्रोग्रॅमिंग लँग्वेज च्या मदतीने वेगवेगळ्या ॲप्लीकेशन सॉफ्टवेअरचे निर्माण केले जाते जसे की क्रोम, फायरफॉक्स, फोटोशॉप. तसेच या लॅंग्वेज च्या मदतीने वेगवेगळ्या व्हिडिओ गेम्स चे देखील निर्माण केले जाते

Java – बिजनेस सॉफ्टवेअर तसेच व्हिडिओ गेम्स निर्माण करण्यासाठी जावा लैंग्वेज चा उपयोग होतो.

Python – या प्रोग्रामिंग लैंग्वेज ला जगातील सर्वात सोप्पी प्रोग्रॅमिंग लँग्वेज असे संबोधले जाते. या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या मदतीने वेबसाईट देखील निर्माण केल्या जातात.

3. निवडलेली प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकण्यासाठी आवश्यक संसाधने शोधा  –

 प्रोग्रॅम लैंग्वेज शिकण्यासाठी ॲमेझॉन वर तसेच इतर शॉपिंग वेबसाईट वर वेगवेगळी पुस्तके उपलब्ध आहे व या पुस्तकांच्या पलीकडे इंटरनेट वर देखील प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकण्यासाठी वेगवेगळे कोर्सचे निर्माण केले गेलेले आहे ज्याद्वारे आपण प्रोग्रामिंग लैंग्वेज सोप्या पद्धतीने शिकू शकता.

 प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्वाच्या वेबसाईट आहेत-

CodeAcademy, 

Code.org,

W3Schools,

Khan Academy,

Udemy

सराव करा –

 जेव्हा तुम्ही आवश्यक असलेले प्रोग्राम language शिकाल तेव्हा त्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या सहाय्याने काही छोटे छोटे प्रोजेक्ट तयार करण्याचा प्रयत्न करा व त्यानंतर त्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज चा उपयोग वास्तविक जगात करून त्याद्वारे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचे निर्माण करा.

 सॉफ्टवेअरची गरज

 संगणकामध्ये सॉफ्टवेअर च्या उपयोगा शिवाय हार्डवेअर उपकरणे निरुपयोगी असतात.सॉफ्टवेअरच्या मदतीने वापरकर्त्या कडून दिले गेलेले गेलेले निर्देश पूर्ण केले जातात. जर आजच्या जगात सॉफ्टवेअर अस्तित्वात नसते तर आजचे प्रगत तंत्रज्ञान निर्माण झाले नसते.

 जर सॉफ्टवेअर अस्तित्वात नसते तर फेसबुक एप्पल मायक्रोसोफ्ट यांसारख्या अब्जावधी रुपयांच्या कंपनी निर्माण झाल्या नसत्या व जगामध्ये प्रगत तंत्रज्ञान अस्तित्वात आले नसतेव हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला नसता.

 आज मोबाईल तसेच संगणक आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत व यामुळे माणसाचे जीवन सुखकर झाले आहे. संगणकामध्ये लाखो ट्रांजिस्टर चा उपयोग करून सॉफ्टवेअरची कार्यक्षमता वाढली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने या उपकरणांच्या माध्यमातून माणसाची कार्यक्षमता वाढली आहे.

 सॉफ्टवेअर चे फायदे

 सॉफ्टवेअरच्या मदतीने विविध किचकट कामे करणे सोपे झाले आहे व माणसाची कार्यक्षमता वाढली आहे. सॉफ्टवेअरच्या मदतीने विविध मशीनच्या सहाय्याने कामांमध्ये अचुकता आली आहे व बहुतेक कामे मानवरहित करणे सोपे झाले आहे.

 सॉफ्टवेअरचा उपयोग विविध मशीन मध्ये केला जातो व या मशीनच्या सहाय्याने उत्पादकता वाढली आहे. सॉफ्टवेअरच्या साह्याने माहिती प्राप्त करून उत्पादनांची बाजारांमधील गरज ओळखली जाते.

 सॉफ्टवेअरचा उपयोग करून डिजिटल पेमेंट केली जातात त्यामुळे माणसाचा वेळ वाचतो व माणसाला तो वेळ अन्य उपयुक्त ठिकाणी उपयोगात आणता येतो तसेच बँक व इतर ठिकाणी होणारी गर्दी टाळता येते.ATM मशीनच्या साहाय्याने कधीही बँक रहित पैसे काढता येतात.

 सॉफ्टवेअरच्या उपयोगा आधी बस स्टेशन, रेल्वे काउंटर तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी तिकीट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती तीच गर्दी आता सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिकीट काढता आल्यामुळे कमी होते व आपला प्रवास सुखकर होतो.

 जर सॉफ्टवेअरचा उपयोग मोबाईल आणि संगणकांमध्ये केलेला नसता तर ही उपकरणे निरुपयोगी झाले असते व आपण कदाचित हे लेख वाचू शकला नसता थोडक्यात सांगायचे झाले तर सॉफ्टवेअरने मानवी जीवनात आमूलाग्र बदल केला आहे.

 सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधील फरक 

 सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर मधील एक मूलभूत फरक आहे की सॉफ्टवेअर संगणकाला कार्य करण्यासाठी निर्देश प्रदान करतात तर हार्डवेअर त्या निर्देशांनुसार वापरकर्त्याला परिणाम दाखवत असतात.

सॉफ्टवेअर हे आभासी आहेत आपण त्यांना बघू शकतो त्यांचे निर्माण करू शकतो परंतु आपण त्यांना स्पर्श करू शकत नाही याउलट हार्डवेअर भौतिक उपकरणे आहेत व आपण या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना स्पर्श करू शकतो.

 सॉफ्टवेअर चे सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर हे मुख्य भाग आहेत तर हार्डवेअर चे इनपुट उपकरणे, आउटपुट उपकरणे, स्टोरेज उपकरणे आणि संगणकाचे विविध भाग हे प्रकार आहेत.

 सॉफ्टवेअर संगणकाच्या व्हायरस नुसार प्रभावित होऊ शकतात परंतु हार्डवेअर वरती संगणकाच्या व्हायरसचा परिणाम होत नाही.

 जेव्हा सॉफ्टवेअर खराब होतो तेव्हा आपण आपण सॉफ्टवेअर च्या बॅकअप कॉपी नुसार त्याचा उपयोग करू शकतो परंतु जेव्हा हार्डवेअर खराब होते तेव्हा आपल्याला त्या जागी नवीन हार्डवेअरचा उपयोग करावा लागतो.

 सॉफ्टवेअरची उदाहरणे – Ms Word,  Photoshop, Power Point, MySQL, Excel, WhatsApp, Instagram, telegram इत्यादी

 हार्डवेअरची उदाहरणे – मॉनिटर, माऊस, कीबोर्ड,प्रिंटर, RAM, ROM इत्यादी

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न / FAQ

 सॉफ्टवेअर लायसन्स म्हणजे काय?

उत्तर – सॉफ्टवेअरचा उपयोग खूप कारणांसाठी केला जातो व सॉफ्टवेअरचा उपयोग करताना काही नियमावली जाहीर केलेली असते त्यामध्ये सॉफ्टवेअर संबंधी मार्गदर्शन व बंधने यांचा समावेश असतो याला सॉफ्टवेअर लायसन्स असे म्हटले आहे

 सॉफ्टवेअर लायसन्स चे मुख्यता तीन प्रकार आहेत –

1.  फ्रीवेअर सॉफ्टवेअर –

 या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा उपयोग कोणीही मोफत करू शकतो परंतु या सॉफ्टवेअर मध्ये सॉफ्टवेअरचा सोर्स कोड प्रदान केलेला नसतो.

2. Proprietary सॉफ्टवेअर –

 जेव्हा आपल्याला एखाद्या सॉफ्टवेअरचा उपयोग करण्यासाठी फी द्यावी लागत असेल किंवा सॉफ्टवेअर खरेदी करावे लागत असेल तेव्हा त्याला प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर असे म्हणतात.

3. Open सोर्स सॉफ्टवेअर –

 या प्रकारच्या सॉफ्टवेअरचे लायसन्स सार्वजनिक असते व या प्रकारच्या सॉफ्टवेअरचा सोर्स कोड देखील सार्वजनिक केलेला असतो ज्याद्वारे वापरकर्ता सोर्स कोडमध्ये बदल करून अधिक प्रगत सॉफ्टवेअरचे निर्माण करू शकतो.

सॉफ्टवेअर चे किती प्रकार आहे

उत्तर – सॉफ्टवेअर चे मुख्य दोन प्रकार असतात जे आहेत सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टिम सॉफ्टवेअर चा उपयोग संगणकाला किंवा मोबाईल ला संचलित करण्यासाठी होतो तर एप्लीकेशन सॉफ्टवेअरचा उपयोग वापरकर्ता कडून विविध संगणकीय कार्य पूर्ण करण्यासाठी होतो.

 सॉफ्टवेअर म्हणजे काय

उत्तर – विविध संगणकीय प्रोग्रॅम्स च्या संचाला सॉफ्टवेअर असे म्हटले जाते. सॉफ्टवेअर द्वारे दिल्या गेलेल्या अंतर्गत निर्देशांमुळे संगणक कार्य करतो. सॉफ्टवेअर चे सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर हे मुख्य प्रकार आहेत.

 सिस्टिम सॉफ्टवेअर म्हणजे काय?

उत्तर – संगणकाला संचालित होण्यासाठी काही अंतर्गत प्रोग्रॅम ची गरज असते व या प्रोग्रॅमच्या संचाला सिस्टिम सॉफ्टवेअर असे म्हणतात.

 सिस्टिम सॉफ्टवेअर ची उदाहरणे – ऑपरेटिंग सिस्टिम, device driver, language translator, firmware

 अप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय

उत्तर – काही सॉफ्टवेअरचा उपयोग वापरकर्त्या कडून विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी केला जातो त्या सॉफ्टवेअर अप्लिकेशन सॉफ्टवेअर असे म्हणतात

उदाहरण – युट्युब, फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्राम, गुगल क्रोम इत्यादी 

 मोबाईल ला सॉफ्टवेअर कसे मारावे

उत्तर – मोबाईलला सॉफ्टवेअर मारण्यासाठी आपल्याला संगणक किंवा लॅपटॉप, यूएसबी केबल, इंटरनेट, फ्लॅश tool फाईल यांची गरज असते.

 सर्व सामग्री एकत्र केल्यानंतर गुगल वर तुमच्या मोबाईल साठीच्या stock ROM firmware flash file चा शोध घ्या व ती फाईल unzip करून डाऊनलोड करा.

 आता संगणकामध्ये किंवा लॅपटॉप मध्ये यूएसबी ड्रायव्हर इंस्टॉल करा

 आता संगणक मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये usb ड्रायव्हर इंस्टॉल झाला असेल तर संगणकामध्ये किंवा लॅपटॉप मध्ये sp फ्लॅश tool इंस्टॉल करा.

 फ्लॅश tool install केल्यानंतर त्याला unzip करा व flash_tool.exe फाईल open करा व डाउनलोड बटणावर क्लिक करा.

 आता यु एस बी केबल द्वारे संगणकाला किंवा लॅपटॉप ला मोबाईल कनेक्ट करा.

 डाउनलोड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला हिरव्या कलरची mark दिसेल. अशाप्रकारे तुम्ही मोबाईल ला सॉफ्टवेअर मारू शकता.

 सारांश –

 सॉफ्टवेअर हे संगणकामध्ये किंवा मोबाइल मध्ये उपस्थित असलेल्या विविध प्रोग्रॅम संच आहे व सॉफ्टवेअरमुळे मोबाईल किंवा संगणक कार्यान्वित होतो. सॉफ्टवेअर चे अप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर हे मुख्य प्रकार आहेत तसेच आपण प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या साह्याने सॉफ्टवेअर बनवू शकतो.

 सॉफ्टवेअरचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोग होतो त्यामुळे.आपण या लेखांमध्ये सॉफ्टवेअर बद्दल माहिती what is software in marathi जाणून घेतली.

 सॉफ्टवेअर म्हणजे काय या लेखामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही Comments द्वारे जरूर सूचित करू शकता व ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवून आम्हाला मदत करू शकता.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद…!


Advertisements

Leave a Comment