जेव्हा आपण संगणकाकडे बघतो तेव्हा आपल्याला संगणकाचे विविध भाग दिसतात त्यामध्ये टीव्ही सारखी दिसणारी एक screen दिसते तिला आपण मॉनिटर असे म्हणतो. मॉनिटर शिवाय संगणक अपूर्ण आहे त्यामुळे आपण या लेखात जाणून घेणार आहोत मॉनिटर ची माहिती | information about computer monitor in marathi .
संगणकामध्ये मॉनिटर हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील चित्र दाखवण्यासाठी होतो. मॉनिटर हे जवळपास टीव्ही सारखेच असते परंतु टीव्ही आणि मॉनिटर मध्ये एक मुख्य फरक आहे की टीव्हीचा tuner ज्याच्या मदतीने चैनल बदलता येतात.मॉनिटर मदरबोर्ड च्या सहाय्याने संगणकाशी जोडलेला असतो.
कीबोर्ड आणि माउस कडून सीपियू ला निर्देश पाठवले जातात आणि त्यानुसार मॉनिटरवर आपल्याला आवश्यक परिणाम दिसतात. आपल्याला मॉनिटरवर जे काही दिसते त्यामागे सॉफ्टवेअर कार्य करत असतात म्हणजेच आपल्याला सॉफ्टवेअरचा आउटपुट मॉनिटरवर दिसतो.
संगणकाच्या मॉनिटर मध्ये काळानुसार खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे त्यामुळे आपण या लेखात जाणून घेणार आहोत मॉनिटर चा इतिहास, मॉनिटर चे प्रकार तसेच मॉनिटर चे अत्याधुनिक कोण कोणते Models आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर आपण मॉनिटर ची माहिती सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
Table of content ↕
मॉनिटर काय आहे | information about what is computer monitor in marathi
मॉनिटर हे एक संगणकाचे आऊटपुट उपकरण आहे यालाच video display terminal (vdt) किंवा video display unit (vdu) असे देखील संबोधले जाते. संगणकामध्ये मॉनिटरचा उपयोग हा विविध चित्र, अक्षरे तसेच video graphics उपभोक्त्याला दाखवण्यासाठी होतो मॉनिटर चा संगणकाच्या हार्डवेअर उपकरणांमध्ये समावेश होतो.
मॉनिटर हे एक tv सारखे दिसणारे संगणकाचे उपकरण आहे ज्यामध्ये संगणकाच्या मदरबोर्ड मधील graphics card मधून मिळणाऱ्या संदेशांचे रूपांतर फोटो, विविध अक्षरांच्या स्वरूपात करून उपभोक्त्याला screen वर output च्या स्वरुपात दर्शवले जाते.
सर्वात पहिल्या मॉनिटर चा शोध हा 1 मार्च 1973 रोजी लागला. ह्या मॉनिटर चा उपयोग Xerox alto computer system या संगणकाच्या सिस्टिम मध्ये केला गेला. हा मॉनिटर cathod ray tube या मॉनिटर चे model होते.
मॉनिटर चा शोध कोणी लावला?
मॉनिटर चा सर्वप्रथम शोध एका जर्मन शास्त्रज्ञाने लावला ज्याचे नाव आहे karl ferdinand brown यांनी लावला. सन 1897 साली त्यांनी CRT मॉनिटरचा शोध लावला ज्यामध्ये त्यांनी Fluorescent screen चा उपयोग केला होता. यामुळे मॉनिटरला त्यावेळी नाव ठेवले गेले Cathode Ray Oscillator.
मॉनिटर चे पूर्ण रूप (full form) काय आहे?
मॉनिटर चे पूर्ण रूप आहे
M – Mass
O – On
N – Newton
I – Is
T – Train
O – On
R – Rat
मॉनिटर चा इतिहास | history of monitor in Marathi
मॉनिटरच्या रचनेमध्ये काळानुसार मोठ्या प्रमाणात बदल केला गेला आहे आधीच्या काळात ब्लॅक अँड व्हाईट असणारे मॉनिटर आता विविध रंग दर्शवण्यात सक्षम झाले आहे तसेच त्यामुळे डोळ्यांना होणारे अपाय देखील कमी झाले आहे.
कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणे अत्यंत गरजेचे असते म्हणून या लेखात आपण जाणून घेणार आहोत मॉनिटर चा इतिहास | history of monitor in Marathi –
1965 – touchscreen
E. A. Johnson द्वारे touchscreen या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आला.
1 मार्च 1974 – पहिला मॉनिटर
जगातील सर्वात पहिल्या मॉनिटर चा शोध लागला हा मॉनिटर cathod ray तंत्रज्ञानावर आधारित होता.
1976 – video port
1977 – LED
Late 1980 – CRT support
1987 – VGA monitor –
2006 – Touched monitor –
मॉनिटर चे प्रकार | Types of monitor in marathi
मॉनिटर ची माहिती घेताना आपल्याला हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे की मॉनिटर चे कोण कोणते महत्त्वाचे प्रकार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानानुसार मॉनिटर मध्ये काळानुरूप मोठ्या प्रमाणावर बदल केले गेले आहे जे मॉनिटर आधी खूप मोठ्या आकारमानात उपलब्ध होते तेच मॉनिटर चे प्रकार आता लहान आकारात आणि अत्याधुनिक पद्धतीने उपलब्ध आहेत.
तंत्रज्ञानाचा उपयोग आणि आजच्या घडीला उपलब्ध साधनांच्या मदतीने देखील मॉनिटर मध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत. मॉनिटर मधील त्रुटी दूर करून अत्याधुनिक मॉनिटर चे प्रकार बनवण्याचे कार्य जलद गतीने सुरू आहे. मॉनिटरच्या अत्याधुनिक तसेच काळाच्या पडद्याआड गेलेल्या काही महत्त्वाच्या प्रकारांची माहिती पुढील प्रमाणे –
कॅथोड रे ट्यूब मॉनिटर (cathode ray tube monitor ) CRT –
या प्रकारचे मॉनिटर चे प्रकार हे जुन्या काळातील मॉनिटर आहेत असे मानले जाते. ही मॉनिटर ची सर्वात जुनी आवृत्ती आहे. हे मॉनिटर 2500 × 2000 pixels च्या resolution साठी उपयुक्त होते. या मॉनिटरला 20,000 ते 30,000 तासांचे lifespan ( आयुष्य ) होते.
या मॉनिटरचे कार्य खूप सोप्या तत्वावर काम करते यामध्ये cathod ray tube ही हवेच्या निर्वात पोकळी पासून बनवलेली tube आहे या मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त electron guns असतात ज्याद्वारे electrons चा phosphorescent screen वर मारा करून चित्र (image) निर्मिती केली जाते. TV मध्ये देखील cathode ray tube असते जीला photo tube असे संबोधले जाते.
जेव्हा electron द्वारे चित्रनिर्मिती केली जाते तेव्हा फक्त तीनच प्रकारचे रंग तयार होतात जे आहे – लाल, निळा आणि हिरवा. परंतु यामुळे जास्त रंग निर्मिती करण्यासाठी हे तीन रंग मिसळून नवीन रंग तयार करण्यात येत होते जसे की लाल आणि हिरवा रंग मिसळला की पिवळा रंग तयार होतो.
या प्रकारच्या मॉनिटर मध्ये खूप त्रुटी होत्या जसे की याचे मोठे आकारमान, चांगले रंग न निर्माण करण्याची क्षमता, जास्त electricity ची खपत इत्यादी सर्व कारणांमुळे पुढे हे मॉनिटर कालबाह्य झाले व त्यांची जागा इतर अत्याधूनिक मॉनिटरने घेतली.
SED monitor –
यामध्ये SED चे पूर्ण रूप आहे surface-conduction electron-emitter display. यापूर्वीच्या सीआरटी प्रकारच्या मॉनिटर मध्ये इलेक्ट्रॉन गन चा उपयोग केला जात होता परंतु या मॉनिटरने सीआरटी मॉनिटर मधील एका इलेक्ट्रॉनिक गन च्या जागी nanoscopic emitter grid चा उपयोग केला गेला.
SED मॉनिटर मध्ये मुख्यतः दोन स्क्रीन चा उपयोग केला जातो ज्यामध्ये पुढील स्क्रीन वरती फॉस्फरस चा उपयोग केला जातो आणि मागील बाजूच्या screen मध्ये emitter चा उपयोग केला जातो. या दोन्ही स्क्रीनची काही मिलिमीटर च्या अंतराने एकमेकांपासून विभागणी केली जाते.
SED मॉनिटर मधील प्रत्येक phosphorus dot च्या मागे एक एक emitter जोडला जातो. जेव्हा या monitor ला लाईट कनेक्शन जोडले जाते तेव्हा emitter मधील electron हे phosphorus dot वर आदळतात व त्यामुळे मॉनिटरवर चित्रनिर्मिती केली जाते.
फ्लॅट पॅनल मॉनिटर ( Flat panel monitor ) –
फ्लॅट पॅनल मॉनिटर चा उपयोग खूप ठिकाणी केला जातो जसे की मोबाईल, laptop, संगणक तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी. याच्या मदतीने अत्याधुनिक प्रकारची photo निर्मिती केली जाते. याचे आकारमान cathode ray tube मॉनिटरच्या आकारमानापेक्षा खूपच कमी असते तसेच यामुळे electricity ची खपत देखील खूप कमी होते.
सर्वात प्रथम Gene Slottow यांनी सन 1964 या मॉनिटरच्या प्रकाराचा शोध लावला.
या प्रकारच्या मॉनिटर मध्ये तुलनेने कमी वजन असते तसेच या मॉनिटर साठी कमी जागेची गरज असते. हा मॉनिटर cathode ray tube मॉनिटर पेक्षा कमी पॉवर वर चालू शकतो. या मॉनिटर मधून जास्त घातक Radiation निघत नाहीत त्यामुळे हा मॉनिटर तुलनेने जास्त सुरक्षित आहे परंतु याचा एक तोटा देखील आहे की हा मॉनिटर cathode ray tube मॉनिटर पेक्षा जास्त किमतीत उपलब्ध आहे.
या मॉनिटरच्या प्रकारामध्ये दोन मुख्य तंत्रज्ञानांचा समावेश होतो जे आहेत –
1. Liquid crystal display (LCD)
2. Gas plasma
1. Liquid Crystal Display (LCD) –
LCD मॉनिटर हा एक अशा प्रकारचा मॉनिटर आहे जो LCD तंत्रज्ञानाचा उपयोग करून clear image’s ची निर्मिती करतो. या मॉनिटरचे आणखी एक वैशिष्ट्य आहे की हे मॉनिटर CRT मॉनिटर पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत.
या monitor कार्यपद्धती मध्ये एक घटक वापरला जातो ज्याला म्हणतात liquid crystal ज्याच्या पाठीमागून लाईटचा उपयोग करून विविध रंगसंगती निर्माण करून image ची निर्मिती केली जाते. यामुळे हा मॉनिटर Cathode ray tube monitor च्या तुलनेत कमी रेडिएशनची निर्मिती करतो.
LCD मध्ये उपयोगात येणारे विविध तंत्रज्ञान-
LCD मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो त्यामधील 4 महत्वाचे तंत्रज्ञान पुढील प्रमाणे
1. In plane switching (IPS) panel technology – या तंत्रज्ञानाच्या मदतीने अचूक आणि सुबक चित्रनिर्मिती होते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने मॉनिटर मध्ये चांगले angle आणि चांगल्या image quality ने LCD मॉनिटर चा लाभ घेता येतो.
2. Vertical alignment (VA) panel technology – या पॅनल ला IPS panel आणि TN panel चा मध्यबिंदू समजले जाते. याचा उपयोग हा wide angel ने चित्रनिर्मिती करण्यासाठी होतो परंतु याचा एक तोटा देखील आहे की हे तंत्रज्ञान खूप slow काम करते.
3. Super plane to line switching –
याची निर्मिती Samsung कंपनीद्वारे करण्यात आली. हे तंत्रज्ञान जवळपास IPS तंत्रज्ञांना सारखेच आहे परंतु यामध्ये 10% जास्त brightness असतो आणि याची किंमत थोडीशी कमी असते.
4. Twisted Nematic (TN) panel technology – हे पॅनल LCD मध्ये सर्वात जास्त उपयोगात येणारे पॅनल आहेत. याचा response time खूपच कमी आहे परंतु याचा viewing angle हा कमी असतो. या तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार केलेले मॉनिटर हे Gamer’s ची पहिली पसंत असतात.
कमी किमतीत सर्वोत्तम LCD मॉनिटर ॲमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी येथे ▶️ क्लिक करा
Gas plasma monitor | Gas discharge monitor –
हे मॉनिटर Flat panel monitor एक महत्वपूर्ण प्रकार आहे छोट्या छोट्या सेल्समध्ये ionized गॅस चा उपयोग करून चित्रनिर्मिती केली जाते. सन 2007 पर्यंत या मॉनिटरचे जगामध्ये एकाधिकार होता परंतु LCD monitor बरोबरच या स्पर्धेमध्ये मात खाल्ल्यामुळे या मॉनिटरची संख्या कमी कमी होत गेली. यामुळे सन 2014 सालापर्यंत अमेरिकेमधील यांचे सर्व अस्तित्व संपत आले तर 2016 सालापर्यंत यांनी चीनमधील आपली जागा कमावली.
विचार वर दिलेले चित्र हे स्वतंत्र मॉनिटर आहे. या मॉनिटरच्या कार्यप्रणाली मध्ये दोन plates च्या मध्ये एखादा ionized gas (येथे प्लाझ्मा या अर्थाने) संबोधले आहे जसे कि neon चा उपयोग केला गेला. या दोन plates मधील एक plate ही Vertical conducting line चा उपयोग करते तर दुसरी ही horizontal conducting line चा उपयोग करते. या दोन्ही plates एकत्र मिळून grid जे निर्माण करतात.
जेव्हा Electricity ही गॅस मधून जाते तेव्हा गॅस चमकतो आणि त्यामुळे pixel ची निर्मिती होते व असे लाखो pixels एकत्र आले तर यांमधून होणाऱ्या रंगसंगतीमुळे संगणकामध्ये चित्रनिर्मिती होते.
हे मॉनिटर वापरण्याचा एक खूप मोठा तोटा होता की यांना LCD पेक्षा मोठ्या प्रमाणावर लाईट ची गरज लागत होती ज्यामुळे छोटीशी देखील चित्रनिर्मिती करायचे असेल तर मोठ्या प्रमाणावर Electricity चा अपव्यय होत होता.
विविध प्रसिद्ध gas plasma models :: px-42xm4g , px-42xr4g, pd-5050, px-42xm5g, px-50xm4g इत्यादी.
LED Monitor – एलईडी मॉनिटर
LED मध्ये LED चा फुल फॉर्म होतो light emitting diode. हे मॉनिटर जागतिक बाजारपेठेमध्ये LCD मॉनिटरला मोठ्या प्रमाणावर टक्कर देत आहेत. या display चा उपयोग cold cathode fluorescent ऐवजी backlight साठी केला जातो.
आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये LED मॉनिटर्स ने आपली वेगळी छाप सोडली आहे. LED मॉनिटर मध्ये मुख्यता LED चा उपयोग होतो आणि सर्वात प्रथम LED चा शोध Nick Holonyak यांनी सन 1962 मध्ये लावला. तसेच LED चा वापर करून पहिला कार्यरत असलेला display सन 1968 Hewlett -Packard(HP) येथे बनवला गेला.
LED monitor मध्ये कुठल्याही प्रकारचे incandescent bulb चा उपयोग केला जात नाही त्यामुळे यांना cold light असे देखील संबोधले जाते. या प्रकारचे मॉनिटर जास्त bright असतात त्याच्यामुळे त्यांचा उपयोग हा सूर्यप्रकाशात देखील केला जातो.
LED मॉनिटर मध्ये विविध light emitting diode (LED) च्या मदतीने रंग निर्मिती केली जाते. हे मॉनिटर मुख्यतः gamers द्वारे वापरले जातात त्याचे कारण आहे या मध्ये असलेला जास्त contrast आणि vivid colour’s. हे मॉनिटर 4k resolution बरोबर येतात.
या मॉनिटर चे आयुष्यमान हे जास्त असते आणि यांच्या मुळे पर्यावरणावर कमी दुष्परिणाम होतो. या मॉनिटर चा उपयोग केल्यावर light ची खपत कमी होते. या मॉनिटर मध्ये lags होण्याचे प्रमाण खूप कमी असते आणि तसेच कलर हे चांगल्या quality चे दिसतात. याप्रकारचे मॉनिटर हे खूप slim असतात. या मॉनिटर मते जास्त प्रमाणावर heating problem चा सामना करावा लागत नाही.
OLED (Organic Light Emitting Diode) monitor –
OLED मॉनिटर हे एक flat light emitting तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये दोन कंडक्टर मध्ये पातळ film चा उपयोग केला जातो. हे एक emissive display (electric energy चे रूपांतर लाईट मध्ये करणारे) तंत्रज्ञान आहे. या प्रकारच्या मॉनिटरला backlight ची गरज लागत नाही. त्यामुळे हे मॉनिटर LCD मॉनिटर पेक्षा खूप पातळ आणि जास्त कार्यक्षम असतात.
येथे organic चा अर्थ नैसर्गिक असा होत नाही तर याचा अर्थ असा होतो की हे मॉनिटर कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेले असतात याचा ऑरगॅनिक फूड आणि शेती बरोबर कोणताही संबंध नाही परंतु यामध्ये कोणत्याही प्रकारचे धोकादायक धातू वापरले जात नाहीत त्यामुळे यांचा पर्यावरणा वरती कमी आघात होतो.
2009-10 साली LED ने CFL backlight ची जागा घेतली परंतु OLED मॉनिटर मध्ये पूर्णता backlight ला च वगळले गेले. OLED monitor मध्ये याचा प्रत्येक pixel (लाखो pixel एकत्र येऊन चित्रनिर्मिती होते) हा स्वतंत्रपणे कार्य करतो आणि स्वतः light उत्पन्न करतो.
या मॉनिटर मधील प्रगत तंत्रज्ञानामुळे या म्हणून त्याची किंमत बाकी मॉनिटर पेक्षा जास्त असते परंतु जर तुम्ही सर्वोत्तम gaming monitor कडे जाऊ इच्छिता तर तुमच्यासाठी हा मॉनिटर बेस्ट आहे. या मॉनिटरचा response time हा फक्त 0.1 milliseconds आहे.
TFT LCD ( thin film transistor liquid crystal display ) monitor –
या मॉनिटर च्या तंत्रज्ञानामध्ये पातळ transistor च्या मदतीने LCD मॉनिटर ला अत्यंत कार्यरत बनवले जाते. आजच्या घडीला जवळपास सर्वच LCD मॉनिटर मध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो.
या तंत्रज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की यामध्ये प्रत्येक pixel ला वेगळा ट्रांजिस्टर उपलब्ध केला जातो ज्यामुळे screen चा per second चा Refresh rate वाढतो व मॉनिटर अधिक कार्यरत होतो.
यामध्ये असलेल्या प्रगत Refresh rate तंत्रज्ञानामुळे या मॉनिटर चा उपयोग fast moving object साठी केला जातो जे व्हिडिओ, गेमिंग तसेच इत्यादी महत्वाच्या तंत्रज्ञान मध्ये उपयुक्त आहे.
Touch screen monitor –
या मॉनिटर मध्ये मुख्यता हाताच्या किंवा बोटांच्या सहाय्याने मॉनिटर कंट्रोल केला जातो. जेव्हा हाताच्या किंवा बोटाच्या साहाय्याने स्क्रीन वर pressure टाकला जातो तेव्हा त्या pressure च्या सहाय्याने मॉनिटरवर विविध कार्य घडवून आणले जातात. या प्रकारच्या मॉनिटर चा उपयोग physical keyboard तसेच बिना कीबोर्डचा देखील केला जाऊ शकतो.
हा मॉनिटर अत्यंत साध्या कार्यप्रणालीवर चालतो या मॉनिटरवर सर्वात वरच्या भागात sensors लावलेले असतात जेव्हा आपण स्क्रीन वरती आपण थोडासा दबाव आणतो तेव्हा त्या sensors द्वारे voltage मध्ये बदल घडवून मॉनिटरला आपण केलेली क्रिया समजते आणि त्या नुसार मॉनिटर कार्य करतो.
Touch screen मॉनिटर हे एकाच वेळेस इनपुट उपकरण आणि आउटपुट उपकरण यांचे कार्य करत असतात. म्हणजेच ते इनपुट च्या स्वरूपात आपण मॉनिटर ला touch द्वारे दिलेले निर्देश विचारात घेऊन आपल्याला आउटपुटच्या स्वरूपात आवश्यक असलेली माहिती प्रदान करतो.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात या मॉनिटर चे खूप सारे प्रकार आहेत परंतु त्यातील काही मुख्य प्रकार हे पुढीलप्रमाणे –
1. Resistive touch screen.
2. SurfaceWave touch screen.
3. Capacitive touch screen.
4. Infrared touch screen.
जर तुम्ही ॲमेझॉन वर सर्वोतम touch screen मॉनिटर बघत असाल तर येथे 🙄 click करा
रंगांच्या आधारे मॉनिटर चे प्रकार –
रंगांच्या आधारे मॉनिटरचे मुख्यतः तीन प्रकार पडतात –
1.Monochrome monitor मोनोक्रोम्स मॉनिटर –
या प्रकारच्या मॉनिटर मध्ये फक्त दोन प्रकारच्या रंगांचा उपयोग केला जातो ज्या मधील एक रंग हे background म्हणून वापरला जातो तर दुसरा रंग हा चित्र दाखवण्यासाठी foreground म्हणून वापरला जातो. हे कलर काळा (background) आणि सफेद (foreground) किंवा काळा (background) आणि हिरवा (foreground) असू शकतात.
2.Gray scale monitor –
जेव्हा काळा आणि सफेद रंग एकमेकांमध्ये मिसळतात तेव्हा करडा रंग निर्माण होतो.gray scale मॉनिटर हा करड्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा वापरून रंग निर्मिती करत असतो व त्याद्वारे मॉनिटरवर picture तयार होत असते.या मॉनिटर मध्ये करडा रंग हा सफेद पार्श्वभूमीवर वापरला जातो.
3. Colour monitor –
या प्रकारच्या मॉनिटर मध्ये एका रंगापासून ते लक्षावधी रंगापर्यंतच्या छटा निर्माण केल्या जातात. या प्रकारच्या मॉनिटरला कधीकधी RGB ( red, green, blue ) मॉनिटर असे देखील संबोधले जाते. याप्रकारच्या मॉनिटर मध्ये लाल हिरवा आणि निळा रंग हे मुख्य रंग म्हणून वापरले जातात आणि या रंगांच्या मदतीने वेगवेगळ्या रंगांच्या छटा निर्माण केल्या जातात.
संगणकाच्या मॉनिटर चे विविध भाग | parts of computer monitor in Marathi –
संगणकाच्या प्रत्येक मॉनिटरच्या प्रकारानुसार संगणकाच्या मॉनिटर चे विविध भाग असतात. संगणकाच्या मॉनिटर चे विविध भाग संगणकामध्ये वैशिष्ट आणत असतात. संगणकाच्या मॉनिटर चे विविध भाग पुढीलप्रमाणे –
1.LCD screen –
LCD मॉनिटर मध्ये मुख्यता या स्क्रिन चा उपयोग केला जातो. हे स्क्रीन thin film transistor ची बनलेली असते. यामध्ये LCD चे पूर्ण स्वरूप आहे liquid crystal display
2. Layered glass –
खूप सारे मॉनिटर हे Layered glass चे बनलेले असतात त्याद्वारे संगणकामधील light मॉनिटर च्या स्क्रीन वर दाखवली जाते.
3. power connector –
मॉनिटर चे कार्य व्यवस्थित चालावे यासाठी मॉनिटरला लाईटची गरज असते व सुविधा प्रदान करण्याचे कार्य Power connector करत असतात.
4. Interface board-
या Board च्या माध्यमातून मॉनिटर वरील सर्व कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवले जाते.
संगणकाकडून येणारे सर्व व्हिडिओ सिग्नल amplify करणे गरजेचे असते व त्यासाठी या circuit ची मदत होते.
6. Reflector and light source –
हे एक संगणकाच्या मॉनिटर चे महत्त्वपूर्ण भाग आहे. ह्याचा उपयोग लाईट ला Screen वर हाताळणीसाठी होतो.
विविध मॉनिटर कनेक्टर | types of monitor connector in marathi –
मॉनिटर मधील विविध कनेक्टर च्या सहाय्याने मॉनिटरला संगणकाशी जोडले जाते. विविध मॉनिटर साठी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर उपलब्ध असतात त्यातील काही महत्त्वाचे कनेक्टर चे प्रकार पुढील प्रमाणे –
HDMI connector –
या कनेक्टर च्या माध्यमातून audio आणि video चे संगणक आणि मॉनिटर दरम्यान आदान प्रदान होते.
DVI connector –
या कंडक्टर च्या माध्यमातून फक्त व्हिडीओ चे transfer होते . हे कंडक्टर जुन्या प्रकारच्या मॉनिटर सिस्टीम मध्ये वापरले जात होते.
DisplayPort (DP) connector –
या कनेक्टर ला ऑडिओ आणि व्हिडिओ च्या ट्रान्सफर साठी बेस्ट कनेक्टर असे मानले जाते. या कलेक्टर च्या माध्यमातून तुम्ही 144hz ला 4k पर्यंत ट्रान्सफर करू शकता.
VGA connector –
हे जुन्या प्रकारचे व्हिडीओ कनेक्टर आहेत त्यांचा उपयोग जेव्हा कुठलाही पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा केला जातो.
USB connector –
या प्रकारच्या कनेक्टर ला मुख्यता USB type C कनेक्टर असे देखील समजले जाते. आजच्या घडीला या कनेक्टर ने अनेक मुख्य कनेक्टर ची जागा घेतली आहे.
NDI (network device interface) connector –
या कनेक्टर च्या माध्यमातून Ethernets द्वारे ऑडिओ आणि व्हिडिओ चे ट्रान्सफर केले जाते.
Thunderbolt connector –
या कनेक्टर से निर्माण Apple आणि intel कंपनी द्वारे करण्यात आले. ह्या कनेक्टर च्या माध्यमातून संगणकाचे अनेक बाह्य उपकरणे मॉनिटरला जोडता येतात.
मॉनिटर ची वैशिष्ट्ये | Characteristics of monitor in marathi
प्रत्येक मॉनिटर चा प्रकार हा त्याच्या वेगवेगळ्या वैशिष्ट नुसार पडत असतो. चांगला मॉनिटर निवडण्यासाठी मॉनिटर ची वैशिष्टे माहित असणे गरजेचे असते.मॉनिटर मधील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे-
1.size
2.resolution
3.Refresh rate
4.dot pitch
1. Size / आकारमान-
मॉनिटर चे पहिले वैशिष्ट्य आहे त्याचे आकारमान. आकारमान हे लांबी आणि रुंदी च्या स्वरूपात मोजले जाते. कोणत्याही मॉनिटरच्या आकारमाना मध्ये मॉनिटर ची size हि विरुद्ध बाजूंच्या Angle मधील अंतर मोजले जाते.
2. Resolution –
जर एखाद्या मॉनिटर मध्ये 640×480 चे resolution असेल तर यामध्ये 640 हे horizontal (आडवी बाजू) आणि 480 हे vertical (उभी बाजू) pixel असतात. जेवढ्या जास्त resolution चा मॉनिटर असेल तेवढेच चांगले quality चे picture आपल्याला बघायला भेटतात.
3.Refresh rate –
Monitor चा Refresh rate म्हणजे प्रति सेकंद मॉनिटर ची स्क्रीन किती वेळा रिफ्रेश होऊ शकते . जेव्हा आपण मॉनिटरचा रिफ्रेश रेट हा मिनिटात काढत असतो तेव्हा त्याच्या unit ला Hertz असे संबोधले जाते. मॉनिटर चा Refresh rate जेवढा जास्त असेल तेवढेच मॉनिटर चे Lag होण्याचे प्रमाण कमी होते.
4.Dot pitch –
संगणकाच्या मॉनिटर मध्ये उपस्थित असलेल्या दोन pixel मधील अंतराला dot pitch असे संबोधले जाते. हे अंतर मिली मीटर मध्ये मोजली जाते आणि याचा प्रभाव image च्या quality वर होत असतो.
मॉनिटर कसे कार्य करतो | working of monitor in marathi
मॉनिटर चे कार्य हे ग्राफिक्स कार्ड वरती आधारित असते. ग्राफिक्स कार्ड ठरवत असतो की स्क्रीन वरती किती पिक्सल ची image दाखवायची. ग्राफिक्स कार्ड ला च video card किंवा display card देखील संबोधले जाते. ग्राफिक कार्ड ची व्याख्या अशा प्रकारे करता येईल की हे एक hardware उपकरण आहे ज्याच्या मदतीने monitor वर चित्रनिर्मिती ( image formation ) होत असते.
जेव्हा आपण संगणकाला इनपुट च्या स्वरूपात काही सूचना देत असतो तेव्हा त्या सूचना cpu पर्यंत जातात आणि सीपीयू त्यावरती action घेतो. जेव्हा आपल्याला मॉनिटरवर काही बघायचे असेल तर यासंबंधीच्या सूचना सीपीयू ग्राफिक्स कार्ड ला देतो आणि ग्राफिक्स कार्ड त्या सूचनांचे रूपांतर सिग्नलमध्ये करून मॉनिटर पर्यंत पाठवतो ज्याद्वारे मॉनिटरवर image formation होत असते.
मॉनिटरने चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी ग्राफिक कार्ड हा मॉनिटरला fit होणारा असावा. उदाहरण द्यायचे झाले तर आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानाच्या मॉनिटर बरोबर जर आपण जुन्या प्रकारच्या ग्राफिक कार्ड चा उपयोग केला तर मॉनिटर वर होणारे image formation मोठ्या प्रमाणावर बिघडेल.
विविध व्हिडीओ मानक | information about video standard in Marathi
विविध व्हिडीओ मानक म्हणजे मॉनिटरवर video adapters च्या मदतीने कशा प्रकारे Image formation झाले पाहिजे. विविध व्हिडिओ मानकांमध्ये स्क्रीन वर दाखवल्या जाणाऱ्या पिक्सल ची संख्या बदलते ज्यामुळे चित्रनिर्मिती करताना इमेज क्वालिटी मध्ये कमी-जास्त पणा बघायला मिळतो.
विविध ग्राफिक्स कार्ड च्या मदतीने वेगवेगळ्या प्रकारची रंग निर्मिती होत असते परंतु प्रत्येक ग्राफिक्स कार्ड हे वेगवेगळे मॉनिटर साठी बनवलेले असते त्यामुळे ते आपल्या मॉनिटरला fit झाले पाहिजे जेणेकरून ग्राफिक्स कार्ड कडून येणारे सिग्नल चांगल्या प्रकारे मॉनिटरवर दर्शवता येतील.
विविध ग्राफिक्स कार्ड विक्रेते चांगल्या चांगल्या प्रकारच्या ग्राफिक्स कार्ड ची निर्मिती करत असतात जेणेकरून मॉनिटरवर चांगल्या प्रकारे रंगनिर्मिती होत असते येथे काही महत्त्वाच्या ग्राफिक कार्ड च्या प्रकारांची व ते support करत असलेल्या resolution ची माहिती देण्यात आली आहे –
XGA – 1024×768 resolution
SXGA – 1280 × 1024 resolution
UXGA – 1600×1200 resolution
VGA – 640×480 resolution
SVGA – 800×600 resolution
चांगला मॉनिटर कशा प्रकारे निवडवा | how to choose good monitor in marathi
आजच्या काळात बदलत्या तंत्रज्ञानानुसार चांगल्या प्रकारच्या मॉनिटरची निर्मिती होत असते. आपल्या कानावर नेहमी चांगल्या चांगल्या प्रकारच्या मॉनिटरची माहिती पडत असते त्यामुळे आपल्याला चांगला मॉनिटर कशाप्रकारे निवडावा याबाबत कधी कधी शंका उत्पन्न होऊ शकते या शंकेचे निरसन होण्यासाठी आपण पुढील टिप्स ध्यानात घेतल्या पाहिजे –
मॉनिटर घेण्याचा उद्देश –
प्रत्येकाचा मॉनिटर घेण्याचा उद्देश वेगळा असू शकतो काही जणांना मॉनिटर हा दररोज उपयोगासाठी घ्यायचा असतो तर काही जणांना हा गेम खेळण्यासाठी घ्यायचा असतो. त्यामुळे मॉनिटर खरेदी करताना आपण आपला उद्देश ध्यानात घेतला पाहिजे उदाहरणार्थ जर आपल्याला गेम खेळण्यासाठी मॉनिटर घ्यायचा असेल तर त्याचा Response rate कमी असला पाहिजे व Refresh rate जास्त असला पाहिजे .
Refresh rate –
आपण जेव्हा पण मॉनिटर खरेदी करू तेव्हा त्याचा रिफ्रेश रेट बघणे अत्यंत गरजेचे असते खास करून जेव्हा आपण गेम खेळण्यासाठी किंवा व्हिडिओ वगैरे एडिट करण्यासाठी मॉनिटर घेत असतो तेव्हा त्याच्या Refresh rate बघणे अत्यंत गरजेचे होते. जितका जास्त Refresh rate असेल तितके जास्त मॉनिटर कार्यरत असते.
उदाहरणार्थ जर आपल्याला गेम खेळण्यासाठी monitor घ्यायचा असेल तर त्याचा Refresh rate जास्त असला पाहिजे जो कमीत कमी 120hz आहे आणि जर आपल्याला इतर कार्यासाठी मॉनिटर खरेदी करायचं असेल तर त्याचा Refresh rate 60-70 असला तरी चालतो.
Response time –
संगणकाच्या मॉनिटर मध्ये एका पिक्सेल ला कलर बदलण्यासाठी जितका वेळ लागतो त्याला Response टाईम असे म्हटले जाते हा रेट जितका कमी असेल तितका मॉनिटर चांगल्या प्रकारे रंगनिर्मिती करतो व चांगल्या प्रकारे आपल्याला परिणाम दाखवत असतो.
जेव्हा आपण गेम खेळण्यासाठी मॉनिटर खरेदी करत असतो तेव्हा त्याचा रिस्पॉन्स टाईम हा जास्तीत जास्त 5 ms असला पाहिजे व हा टाईम कमीत कमी 0.5ms पण नोंदवला गेला आहे. जेव्हा आपण इतर कार्यांसाठी मॉनिटर खरेदी करत असतो तेव्हा फक्त हा कमी आहे की नाही हे बघणे गरजेचे ठरते. Response time हा gaming मॉनिटर ला वगळता जास्त प्राधान्य देण्याची गोष्ट नाही.
मॉनिटर चे Resolution –
Monitor खरेदी करत असताना मॉनिटर चे Resolution बघणे अत्यंत गरजेचे असते कारण त्यावरच मॉनिटर ची इमेज quality ठरत असते जेव्हा मॉनिटर मध्ये जास्त pixel असतात तेव्हा चांगल्या प्रकारे image तयार होऊ शकते आणि जेव्हा कमी प्रमाणात pixels असतात तेव्हा जास्त चांगल्या quality ची इमेज तयार होत नाही .
मॉनिटर चे Resolution बघत असतानाच संगणकामधील graphics कार्डची माहिती असणे देखील अत्यंत गरजेचे असते. जेवढे जास्त resolution चा मॉनिटर असेल तेवढ्याच प्रमाणात चांगल्या क्वालिटीचे ग्राफिक कार्ड असणे अत्यंत गरजेचे असते नाहीतर अतिरिक्त pixel चा चांगल्या प्रकारे उपयोग न होता इमेज क्वालिटी खराब होते.
मॉनिटर मधील तंत्रज्ञान –
मॉनिटर च्या निर्मितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो जसे की TN, IPS किंवा VA तंत्रज्ञान. या सर्वांमध्ये TN तंत्रज्ञानाने निर्माण केलेले मॉनिटर हे स्वस्त असतात तसेच जलद देखील असतात परंतु यामध्ये Image quality ही खराब असते.
TN तंत्रज्ञानाने तयार केलेले मॉनिटर हे मुख्यतः गेम खेळण्यासाठी वापरले जातात तर VA प्रकारचे मॉनिटर हे दैनंदिन वापरासाठी निर्माण केले गेले आहेत याच प्रमाणे IPS तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या मॉनीटर हे मुख्यता प्रोफेशनल उपयोगासाठी निर्माण केलेले आहेत.
मॉनिटर आणि टीव्ही मधील फरक –
Monitor आणि टीव्ही चा उपयोग हा आउटपुट उपकरण म्हणून केला जातो ज्याद्वारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची चित्र निर्मिती होऊन सुरेख pictures बघता येतात. जरी मॉनिटर आणि टीव्ही एक सारखे दिसत असले तरी त्यांचे कार्य हे खूप वेगवेगळे आहे.
आपण युट्युब किंवा इतर ठिकाणी बघितले असेल की टीव्हीचा उपयोग मॉनिटर प्रमाणे देखील करता येतो परंतु हे साफ खोटे आहे जर आपण टीव्हीचा उपयोग मॉनिटर प्रमाणे केला तर Response rate मध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होते तसेच pixels मधील संख्यांमध्ये कमी-जास्त पण आल्यामुळे Image quality देखील बिघडते.
जेव्हा आपण टीव्ही किंवा मॉनिटर विषयी बोलत असतो तेव्हा त्या निगडीत खूप सारे मुद्दे आपण विचारात घेतले पाहिजे. आपण टीव्ही आणि मॉनिटर मधला फरक जाणून घेण्यासाठी पुढील मुद्यांवर ध्यान दिले तर आपल्याला टीव्ही आणि मॉनिटर ओळखताना कोणत्याही समस्येला भविष्यात तोंड द्यावे लागणार नाही.
आकारमान –
जेव्हा प्रश्न हा TV आणि मॉनिटर मधील आकारमानाचा येतो तेव्हा टीव्हीचे आकारमान हे मॉनिटर पेक्षा निश्चितच जास्त असते आपण जेव्हा टीव्ही खरेदी करतो तेव्हा जास्त मोठा टीव्ही खरेदी करण्याकडे आपला भर असतो. आपल्याला जेव्हा काही विशिष्ट उद्दिष्टासाठी मॉनिटर घ्यायचा असतो तेव्हा त्याचे आकारमान जास्त असू शकते जसे की गेम खेळण्यासाठी मोठ्या आकारमानाच्या मॉनिटर ची गरज लागते .
2.Resolution –
आपण वरच्या point मध्ये बघितले की monitor याचे आकारमान साधारणता टीव्ही पेक्षा कमी असते त्यामुळेच मॉनिटर मध्ये pixels ची संख्या जास्त असते परिणामी Resolution ही जास्त असते याउलट टीव्ही मध्ये pixel संख्याही कमी असते कारण त्याचे आकारमान जास्त असते.
3. Tuner –
आपण जेव्हा टीव्ही खरेदी करतो तेव्हा टीव्ही मध्ये चैनल बदलण्यासाठी Tuner ची गरज लागते त्यामुळे टीव्ही मध्ये Tuner उपस्थित असतो या उलट Monitor मध्ये Tuner उपस्थित नसतो.
4. Input jack –
मॉनिटर हे संगणकाचे आऊटपुट उपकरण म्हणून कार्य करते. मॉनिटर ला वेगवेगळे उपकरण जोडण्यासाठी विविध port ची गरज असते त्यामुळे मॉनिटर मध्ये जास्त प्रमाणात Input jack असतात याउलट टीव्ही ला कमी उपकरण जोडण्याची गरज लागते त्यामुळे टीव्ही मधील input jack ची संख्या कमी असते.
5. Image quality –
संगणकामध्ये रॅम चा उपयोग केलेला असतो त्यामुळे Monitor मधील इमेज ची quality हि जास्त sharp आणि Clear दिसते तसेच टीव्ही मधील Image ची कॉलिटी हि smooth आणि एकदम खरी वाटणारी असते.
6. Aspect ratio –
मॉनिटर मधील लांबी आणि रुंदी चे प्रमाण हे साधारणता 4:3 असते तर टीव्ही मधील जुन्या काळच्या टीव्ही चे आकारमानाचे प्रमाण हे देखील 4:3 होते परंतु आजच्या आधुनिक टीव्हीमधील आकारमानाचे प्रमाण हे 16:9 हे आहे व आज-काल जास्त प्रमाणात आयताकृती टीव्ही बनवण्याचे प्रमाण वाढले आहे.
7. Frame rate आणि Refresh rate-
मॉनिटर मधील frame रेट आणि Refresh rate चे प्रमाण हे जास्त असते याउलट टीव्ही मधील Frame रेट आणि refresh Rate चे प्रमाण हे कमी असते त्यामुळे टीव्हीमधील इमेज lag होण्याचे प्रमाण मॉनिटर पेक्षा थोड्या जास्त प्रमाणात वाढते.
मॉनिटर चा उपयोग | use of monitor in Marathi –
जेव्हा आपण विविध उपकरणांच्या मदतीने (कीबोर्ड माऊस) संगणकाला सूचना देत असतो तेव्हा त्या सूचना आपल्याला आउटपुट च्या स्वरूपात भेटणे अपेक्षित असते. आउटपुट च्या स्वरूपात मिळणाऱ्या सूचना कधीकधी image format मध्ये असतात व हे format दाखवण्यासाठी आपल्याला मॉनिटर चा उपयोग होतो.
आपण मॉनिटर वर विविध फाइल्स संबंधी माहिती बघू शकतो. कीबोर्ड वर उपलब्ध विविध फंक्शन की चा उपयोग करून आपण मॉनिटर मध्ये वेगवेगळे function करू शकतो जसे की आपण f2 चा उपयोग करून सिलेक्ट केलेल्या फाईल चे नाव बदलू शकतो.
ग्राफिक्स कार्ड करून मिळणाऱ्या सिग्नलचे रूपांतर आपल्याला सहजपणे समजता येईल वाचता येईल अशा स्वरूपात करून देण्याचे कार्य मॉनिटर करत असतो. मॉनिटर च्या साह्याने आपण विविध चित्र बघू शकतो तसेच Video बघू शकतो. अशाप्रकारे मॉनिटरच्या सहाय्याने आपण graphical information चे रूपांतर सोप्या स्वरूपात करून संगणकाच्या माहितीचा उपयोग करून घेऊ शकतो.
आपल्याला संगणकावर करता येणाऱ्या विविध कार्यांसाठी मॉनिटर ची गरज लागते जसे की गेम खेळणे, व्हिडिओला edit करणे वेगवेगळ्या प्रकारच्या सॉफ्टवेअर आणि विविध ॲपचा उपयोग करणे इत्यादी. वेगवेगळ्या उद्देशानुसार आपल्याला मॉनिटर ची गरज वेगवेगळ्या प्रकारे भासू शकते जसे की गेम खेळण्यासाठी कमी response rate चा मॉनिटर गरजेचा असतो.
सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ –
मॉनिटर काय असतो आणि मॉनिटर चे प्रकार?
उत्तर – मॉनिटर हे एक संगणकाचे आऊटपुट उपकरण म्हणून ओळखले जाते याचा उपयोग उपभोगत्याला वेगवेगळ्या प्रकारचे Picture अक्षरे आणि व्हिडिओ दाखवण्यासाठी होतो. मॉनिटर हा कीबोर्ड आणि माउस च्या साह्याने चालतो तसेच अत्याधुनिक मॉनिटर मध्ये टच स्क्रीन ची देखील सुविधा उपलब्ध आहे.
मॉनिटर चे त्याच्या रंगानुसार तीन प्रकार पडतात –
1. Monochrome monitor.
2.Gray scale monitor.
3. RGB (Colour) monitor.
मॉनिटरचे त्याच्या तंत्रज्ञानानुसार पुढील प्रकार पडतात –
1. CRT monitor
2. Flat panel monitor
3. LED monitor
4. LCD monitor
5. Touch screen monitor
6. SED monitor
इत्यादी.
मॉनिटर चे दुसरे नाव काय आहे?
उत्तर – संगणकाच्या मॉनिटर ला video display unit किंवा video display terminal असे संबोधले जाते.
मॉनिटर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे?
उत्तर – मॉनिटर हे संगणकाचे आऊटपुट प्रकारचे उपकरण आहे. ज्या उपकरणांचा उपयोग उपभोक्त्याला संगणकामधील माहिती दाखवण्यासाठी होतो त्यांना आउटपुट उपकरण असे म्हटले जाते.
मॉनिटर चा शोध कोणी लावला आणि कोणत्या सालि लावला?
उत्तर – मॉनिटर चा शोध एका जर्मन शास्त्रज्ञ karl ferdinand brown यांनी लावला. सन 1897 साली त्यांनी जगातल्या पहिल्या CRT मॉनिटर चा शोध लावला.
मॉनिटर आणि टीव्ही मधील मुख्य फरक काय आहे?
उत्तर – सामान्यपणे टीव्हीचे आकारमान हे मॉनिटर पेक्षा जास्त असते आणि टीव्हीमध्ये Tuner चा उपयोग केला जात असतो ज्याचा उपयोग चैनल बदलण्यासाठी होतो. मॉनिटरला ट्यूनर ची गरज नसते.
मॉनिटर मध्ये किती कलर असतात?
उत्तर – मॉनिटर वरील रंगानुसार मॉनिटर चे मुख्य तीन प्रकार पडतात –
1. Monochrome monitor – या प्रकारच्या मॉनिटर मध्ये फक्त दोन रंगांचा उपयोग केलेला असतो ज्यामध्ये एक रंग पार्श्वभूमीवर दाखवण्यासाठी असतो व एक रंग विविध अक्षरे व चित्र दाखवण्यासाठी असतो.
2. ग्रे स्केल मॉनिटर – काळा आणि सफेत रंग एकत्र झाल्यावर करडा रंग निर्माण होतो व याच करड्या रंगाच्या विविध छटांचा उपयोग जेव्हा मॉनिटर मध्ये केला जातो तेव्हा त्याला Gray scale monitor असे संबोधले जाते.
3. Colour monitor – या मॉनिटर लाच RGB मॉनिटर असे देखील संबोधले जाते कारण यामधील तीन रंग मुख्य स्थान चे आहेत – लाल, हिरवा आणि निळा . मॉनिटरवर दाखवण्यात येणार्या विविध रंगांच्या छटा या याच तीन रंगांच्या मिळून बनलेल्या असतात. या प्रकारच्या मॉनिटर मध्ये लक्षावधी रंगांच्या छटा निर्माण केल्या जातात.
मॉनिटर मध्ये उपयोगात येणारे कनेक्टर कोणकोणते आहेत?
उत्तर – मॉनिटर मध्ये वेगवेगळ्या कनेक्टर चा उपयोग केला जातो हे कनेक्टर मॉनिटर च्या तंत्रज्ञानानुसार उपयोगात येतात. मॉनिटर मध्ये उपयोगात येणारे काही कनेक्टर आहेत –
- HDMI connector
- VGA connector
- Display port connector
- USB connector
- NDI connector
- Thunderbolt connector
सारांश /Conclusion –
मॉनिटर हे संगणकाचे आऊटपुट उपकरन म्हणून ओळखले जाते. मॉनिटर च्या मदतीने संगणकावरील विविध प्रक्रियांचा उपयोग उपभोक्त्याला दाखवण्यासाठी होतो. मॉनिटर च्या मदतीने संगणकावरील विविध प्रोग्राम, चित्र, अक्षरे तसेच व्हिडिओ उपभोक्त्याला दाखवण्यासाठी मदत होते . मॉनिटर ला video display unit video किंवा display terminal असे देखील संबोधले जाते.
आपण या लेखामध्ये जाणून घेतले की मॉनिटर काय आहे ( information about what is monitor in Marathi ), मॉनिटर चे तंत्रज्ञानानुसार तसेच रंगानुसार असलेले विविध प्रकार, मॉनिटर चे कार्य आणि उपयोग, मॉनिटर ची विशेषता, तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबर आपण मॉनिटरचा इतिहास देखील जाणून घेतला आहे.
या लेखामध्ये आपण मॉनिटर बद्दल परिपूर्ण माहिती मिळवली आहे. हा लेख लिहिताना पूर्ण खबरदारी घेतली गेली आहे की कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये परंतु तुमच्या निदर्शनात असे एखादे fault किंवा त्रुटी आढळून आली तर तुम्ही टिपणी द्वारे आम्हाला सूचित करू शकता. तुमच्या टिपणी द्वारे येणाऱ्या सर्व उपयोगी सूचना स्वीकारल्या जातील.
तुमच्या उज्वल भविष्याच्या शुभेच्छांसह, धन्यवाद.