आज आपण जाणून घेणार आहोत फायरवॉल म्हणजे काय ? फायरवॉल चे प्रकार आणि उपयोग. ज्या प्रकारे आपण आपल्या घराचे रक्षण करण्यासाठी घराला कुंपण घालत असतो त्याचप्रमाणे आपण संगणकामधील माहिती चुकीच्या हातात जाण्यापासून वाचवण्यासाठी फायरवॉल चा उपयोग करतो.
आपण मनुष्य कोणतेही कार्य करत असताना सुरक्षेचा विचार करत असतो त्यामुळेच आपण भविष्यासाठी पैसा साठवत असतो, थोडे आजारी पडलो की लगेच डॉक्टरकडे जातो अगदी तशाच प्रकारे संगणकावर व्हायरस आणि मालवेअर चा धोका असतो त्यापासून संगणकाचे सुरक्षा करण्याकरिता फायरवॉल चा उपयोग होतो.
चला तर मग जाणून घेऊया फायरवॉल कशाप्रकारे काम करते व संगणकाचे विविध भाग सुरक्षित ठेवते व या फायरवॉल चा उपयोग आहे तरी काय ?
अनुक्रमणिका
फायरवॉल म्हणजे काय ? What is firewall in Marathi
संगणकामध्ये फायरवॉल हे एक नेटवर्क सिक्युरिटी उपकरण आहे, जे संगणकामध्ये येणार्या आणि संगणका मधून बाहेर जाणार्या नेटवर्क ट्रॅफिक वर लक्ष ठेवून संगणकाच्या सुरक्षेसाठी धोकादायक नेटवर्क ट्रॅफिकला ब्लॉक करते.
फायरवॉल चा मुख्य उपयोग संगणकाला धोकादायक नेटवर्क ट्रॅफिक पासून वाचवण्यासाठी होतो व त्यामुळे हॅकर्स आणि कॉम्प्युटर व्हायरस संगणकापासून दूर ठेवण्यास मदत होते. फायरवॉल च्या मदतीने अंतर्गत आणि बाह्य धोकादायक नेटवर्क ट्राफिक पासून संगणकाचे संरक्षण केले जाते.
उदाहरणार्थ – जेव्हा आपण संगणकामध्ये इंटरनेटच्या मदतीने काही वेबसाईटला भेट देतो किंवा काही फाइल इंटरनेटवरून डाऊनलोड करतो तेव्हा धोकादायक नेटवर ट्राफिक संगणकाकडे येण्याचा धोका असतो व अशी धोकादायक नेटवर्क ट्रॅफिक संगणकापासून दूर ठेवण्याचे काम फायरवॉल करत असते.
तसेच कधीकधी आपण दोन पेक्षा जास्त संगणक एकमेकांना जोडत असतो, तेव्हा एका संगणकामधील कंप्यूटर व्हायरस दुसऱ्या संगणकांमध्ये जाण्याचा धोका असतो तेव्हा अशा अंतर्गत जोडनीतील संगणकामधील व्हायरस पासून संगणकाचा बचाव करण्याचे काम फायरवॉल करत असते
फायरवॉल चा उपयोग / कार्य
फायरवॉल हे सुरक्षा उपकरण आहे जे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर चे बनलेले असते. फायरवॉल च्या मदतीने संगणकाला हानीकारक नेटवर्क ट्रॅफिक पासून दूर ठेवले जाते फायरवाल चा संगणका मध्ये महत्त्वाचा रोल आहे त्यामुळेच अनेक ऑपरेटिंग सिस्टम मध्ये फायरवॉल चा समावेश केलेला असतो चला तर मग जाणून घेऊया फायरवॉल चे उपयोग काही महत्त्वाचे उपयोग पुढीलप्रमाणे –
अनधिकृत रिमोट ऍक्सेस पासून संगणकाला संरक्षण
संगणकाच्या बाबतीत सर्वात वाईट गोष्ट म्हणजे संगणक हॅकर्सच्या ताब्यात जाणे. जर आपल्या संगणकावर हॅकर्सनी ताबा मिळवला तर हॅकर्स आपल्या संगणकाच्या मदतीने कोणत्याही सामाजिक घडामोडी करू शकतात त्यामुळे संगणकाला हॅकर्स पासून दूर ठेवणे गरजेचे असते.
संगणकाला हॅकर्सच्या ताब्यात जाण्यापासून रोखणारा महत्त्वाचा घटक आहे – फायरवॉल. फायरवॉल च्या मदतीने अनधिकृत रिमोट ऍक्सेस पासून संगणकाला संरक्षण प्राप्त होते.
सुरक्षित ऑनलाईन गेम
ऑनलाइन गेम खेळण्यासाठी इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो त्यामुळे या गेमर च्या संगणकाला अटॅक करण्यासाठी वेगवेगळ्या मालवेअर चे निर्माण केले जाते व अशा मालवेअर पासून संगणकाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी फायरवॉल ची असते.
फायरवॉल च्या मदतीने विविध संगणकामध्ये ऑनलाइन गेम गेम खेळण्यासाठी आपोआप सेफ गेमिंग मोड किंवा या समान तंत्रज्ञान ऑन केले जाते. विविध गेमर्स ऑनलाइन गेम खेळत असताना हार्डवेअर फायरवॉल किंवा रुटर चा उपयोग करत असतात.
अनुपयुक्त किंवा अनैतिक कंटेंट पासून सुटका
आपण आत्तापर्यंत जाणून घेतले की फायरवाल च्या मदतीने हॅकर्स, कॉम्प्युटर व्हायरस , मालवेअर इत्यादींपासून संगणकाला दूर ठेवले जाते , परंतु फायरवॉल फक्त एवढेच कार्य नाही. फायरवाल च्या मदतीने आपण अनुपयुक्त किंवा अनैतिक कंटेंट पासून संगणक वापरकर्त्याला दूर ठेवू शकतो.
जर आपल्याकडे असलेल्या संगणकाला विविध व्यक्ती वापरत असतील तर आपण फायरवाल च्या मदतीने त्या सर्व व्यक्तींना अडल्ट वेबसाइट तसेच इंटरनेटवर उपस्थित हानीकारक वेबसाईट पासून दूर ठेवू शकतो व संगणकाचा गैरवापर टाळू शकतो.
हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर फायरवॉल
फायरवॉल हे फक्त सॉफ्टवेअर नसून काही घरांमध्ये हार्डवेअर उपकरणांमध्ये देखील फायरवॉल आढळून येते जसे की काही व्यक्ती रुटर मध्ये उपस्थित फायरवॉल च्या मदतीने संगणक सुरक्षित ठेवत असतात. रुटर मधील फायरवॉल च्या उपयोगासाठी तुम्ही त्याचा पासवर्ड बदलणे गरजेचे असते.
फायरवॉल चे प्रकार
फायरवॉल चा संगणकामध्ये खूप महत्त्वाचा उपयोग आहे हे एक साधारण परंतु महत्वपूर्ण नेटवर्क बैरियर आहे जे तुमच्या नेटवर्क ला बाहेरच्या दुनियेपासून दूर ठेवते .त्यामुळे फायरवाल चे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या प्रत्येक प्रकाराची वेगवेगळे विशिष्ट आहे त्यामुळे आपल्याला फायरवॉल संबंधी संपूर्ण माहितीसाठी फायरवॉल चे प्रकार माहीत असणे गरजेचे आहे .
फायरवॉल चे प्रचलित सहा प्रकार पुढील प्रमाणे
Packet filtering firewall
Circuit level firewall
Proxy firewall
Stateful inspection firewall
Next generation firewall
UTM firewall
फायरवॉल चे रचनेनुसार मुख्य दोन प्रकार आहेत जे आहेत सॉफ्टवेअर फायरवॉल आणि हार्डवेअर फायरवॉल.
Packet filtering फायरवॉल
Packet filtering फायरवॉल हा फायरवॉल चा सर्वात जुना व साधारण प्रकार आहे. जेव्हा हे फायरवॉल नेटवर्क लेयर मध्ये काम करत असतात तेव्हा ते डेटा पॅकेट चे स्त्रोत आणि गंतव्य स्थानाचा आयपी ऍड्रेस ,प्रोटोकॉल वर लक्ष ठेवतात व नेटवर्क कनेक्शन नियंत्रीत करतात यामुळे या प्रकारच्या फायरवॉल जास्त कार्यक्षम नसतात व यावर अटॅक करणे हॅकर्स ला तुलनेने सोपे असते.
पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल हे वेगवान गतीने कार्य करतात, याची किंमत कमी असते परंतु यांच्याबरोबर असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे याद्वारे मिळणारी सुरक्षा. हे फायरवॉल मुख्यता डेटा पॅकेटवर लक्ष ठेवतात त्यामुळे हे फायरवॉल सुरक्षित आयपी ऍड्रेस पासून येणाऱ्या मालवेअर किंवा व्हायरस पासून संगणकाचा बचाव करू शकत नाहीत.
Circuit level gateway फायरवॉल
Circuit level gateway फायरवॉल open system interconnection ( OSI ) आणि एप्लीकेशन लेयर च्या दरम्यान कार्य करते व user datagram protocol आणि transmission control protocol कनेक्शन सेक्युरिटी प्रदान करते. या firewall च्या मदतीने संगणकाला सेशन लेवल कंट्रोल प्रदान केले जाते.
सर्किट लेवल गेटवे हे फायरवॉल नेटवर्कमध्ये प्रस्थापित केलेले असतात व याचा उपयोग मुख्यता इतर फायरवॉल बरोबर केलेला असतो जसे की प्रॉक्सी फायरवाल त्यामुळे सर्किट लेवल गेटवे फायरवॉल चा उपयोग क्वचितच स्वतंत्रपणे केला जातो.
प्रॉक्सी फायरवॉल
प्रॉक्सी फायरवॉल हे एक नेटवर्क सिक्युरिटी सिस्टम आहे जे ॲप्लीकेशन लेयर मध्ये हानिकारक फाइल्स आणि नेटवर्क ला फिल्टर करून संगणकाच्या डेटा चे रक्षण करते. प्रॉक्सी फायरवॉल ला गेटवे फायरवॉल किंवा ॲप्लिकेशन फायरवॉल असे देखील म्हटले जाते.
प्रॉक्सी फायरवॉल हे प्रॉक्सी सर्वर असते परंतु सर्व प्रॉक्सी सर्वर हे प्रॉक्सी फायरवॉल असणे गरजेचे नाही. प्रॉक्सी फायरवॉल क्लाइंट आणि सर्वर मध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडत असतात. प्रॉक्सी फायरवॉल ऑर्गनायझेशन नेटवर्क किंवा रिमोट सर्व्हरवर प्रस्थापित केल्या जाऊ शकतात.
प्रॉक्सी फायरवाल वेगवेगळे कार्य पार पाडतात जसे की वेबसाइट कॅचे करणे जेणेकरून बँडविड्थ कमी होईल, वायरस आणि मालवेअर फाईल चा शोध घेणे, डेटा कॉम्प्रेस करणे,ट्राफिक फिल्टर करणे इत्यादी. प्रॉक्सी फायरवॉल च्या मदतीने यूजर ची माहिती लपवता येते यामुळे इंटरनेट वर युजरची डेटा सुरक्षा पार पाडली जाते.
Stateful inspection फायरवॉल
Stateful inspection फायरवॉल ला डायनॅमिक पॅकेट फिल्टरिंग फायरवॉल असे देखील म्हटले जाते. Stateful inspection फायरवाल च्या मदतीने ॲक्टिव कनेक्शन वर लक्ष ठेवून फायरवाल मधून पार होणारे नेटवर्क पॅकेट निर्धारित केले जातात. हे फायरवॉल Transmission Control Protocol (TCP) आणि या समान प्रोटॉकल साठी मुख्यतः उपयोगात येतात.
Stateful inspection फायरवॉल हे स्थिती आणि संदर्भाच्या आधारावर डाटा पॅकेट्स फिल्टर करतात. Stateful inspection फायरवॉल ला स्टॅंडर्ड म्हणून ओळखले जाते आणि या फायरवॉल चा आजच्या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.
Stateful inspection फायरवॉल हे Open Systems Interconnection (OSI) च्या ट्रान्सपोर्ट आणि नेटवर्क लेयर मध्ये मुख्यता कार्यरत असतात. स्थिती आणि संदर्भाच्या आधारावर प्राप्त माहितीच्या मदतीने हे फायरवॉल अधिक अचूकपणे कार्य करू शकतात.
नेक्स्ट जनरेशन फायरवॉल (NGFW) ची माहिती
नेक्स्ट जनरेशन फायरवॉल हे फायरवॉल चे सुधारित स्वरूप आहे. हि फायरवाल स्थिती, संदर्भ, पोर्ट, प्रोटोकॉल इत्यादी मानकांचा अभ्यास करून नेटवर्क ट्रॅफिकला परवानगी देते किंवा ब्लॉक करते.या सर्वांच्या व्यतिरिक्त नेक्स्ट जनरेशन फायरवॉल अनेक महत्त्वाचे कार्य करते जसे की-
• एकात्मिक घुसखोरीला संगणकामध्ये प्रतिबंध
• स्टॅंडर्ड फायरवॉल क्षमता जसे की stateful inspection
• संगणकाच्या ॲप्लिकेशन वर लक्ष व हानिकारक एप्लीकेशन ब्लॉक करणे
• सुधारित सुरक्षा प्रणाली
• आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर काम करण्यासाठी उपयोग
Unified threat management (UTM) फायरवाल म्हणजे काय
काळानुसार फायरवॉल मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि त्यामुळे फायरवॉल अधिक चांगल्या प्रकारे कार्यक्षम झाली परंतु त्याच प्रकारे कॉम्प्युटर व्हायरस आणि मालवेअर देखील अधिक सक्षम होत गेले त्यामुळे अधिकाधिक चांगल्या फायरवॉल ची गरज निर्माण झालीव यामधून UTM फायरवॉल चा जन्म झाला.
UTM फायरवॉल एक ऑल-इन-वन फायरवाल आहे ज्यामुळे ही फायरवाल सर्व संभाव्य मालवेअर किंवा व्हायरस अटॅक पासून संगणकाचे संरक्षण करू शकते. यामध्ये उपस्थित असलेल्या ईमेल फिल्टरिंग सुविधेमुळे स्पॅम ई-मेल आणि सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ई-मेल ब्लॉक केले जातात.
फायरवॉल कसे काम करते
फायरवॉल एक प्रकारचे फिल्टर सिस्टीम असून ती नेटवर्क आणि संगणकांमध्ये येणाऱ्या डेटा ला फिल्टर करण्याचे काम करते. फायरवॉल हानिकारक कोड ला स्कॅन करते आणि आवश्यकता पडल्यावर अटॅक देखील करते. जर डेटा पॅकेट संगणकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारक असतील तर फायरवॉल त्याला संगणक किंवा नेटवर्क पासून ब्लॉक करते.
फायरवॉल वेगवेगळ्या प्रकारे संगणकाचे सुरक्षा निर्धारित करत असते त्यासाठी फायरवॉल वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करते त्यातील काही लोकप्रिय पद्धती पुढीलप्रमाणे –
पॅकेट फिल्टरिंग – पॅकेट हे छोटा स्वरूपातील डेटा ला म्हटले गेले आहे.जेव्हा फायरवॉल मध्ये पॅकेट फिल्टरिंग चा उपयोग केलेला असतो तेव्हा हे पॅकेट फिल्टर्स ग्रुप मधून पास केले जातात व फिल्टर नोंदणी केलेल्या हानिकारक पॅकेट ला संगणकापासून दूर ठेवले जाते व इतर पॅकेट ला निर्धारित स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी परवानगी दिली जाते.
स्टेटफूल इन्स्पेक्शन– ज्याप्रकारे स्टॅटिक फिल्टरिंग मध्ये पॅकेट चे हेडर बघितले जाते त्याचप्रमाणे स्टेटफुल इन्स्पेक्शन मध्ये डेटा पॅकेट चे विविध भाग बघितले जातात त्याचे डेटाबेसमधील माहितीबरोबर आकलन केले जाते. स्टेटस फुल इन्स्पेक्शन मध्ये डेटा पॅकेट चे स्त्रोत, गंतव्यस्थान, पोर्ट आणि उपयोगा संबंधी माहिती घेतली जाते .
डेटा पॅकेट ला संगणक बरोबर कनेक्ट होण्यासाठी फायरवॉल मधील माहिती बरोबर मॅचिंग होणे गरजेचे असते परंतु स्टेट फूल इन्फेक्शन हे कधीही पॅकेट फिल्टरिंग पद्धती नसते.
प्रॉक्सी फायरवॉल– प्रॉक्सी फायरवॉल मध्ये डेटा पॅकेट डायरेक्ट संगणकाबरोबर कनेक्ट होऊ शकत नाही यामध्ये प्रॉक्सी फायरवाल मध्यस्थाची भूमिका निभावत असते, त्यामुळे ही फायरवॉल इतर फायरवॉल च्या तुलनेत अधिक सुरक्षित मानली जाते. प्रॉक्सी फायरवाल च्या मदतीने नेटवर्क लोकेशन हॅकर्स तसेच हानीकारक कोड पासून दूर ठेवले जाते.
प्रॉक्सी फायरवाल अत्यंत सुरक्षित असतात परंतु याचे काही तोटे देखील आहे जसे की या फायरवाल इतर फायरवॉलच्या तुलनेत जास्त स्लो असतात तसेच या फायरवॉल बहुउद्देशीय उपयोगाच्या दृष्टीने कमी कार्यशील असतात.
फायरवॉल ची वैशिष्ट्ये
फायरवॉल मध्ये काळानुसार मोठ्या प्रमाणात झाले आहे त्यामुळे आजच्या तंत्रज्ञानाला अनुरूप फायरवॉल निवडण्यासाठी आपल्याला फायरवॉल चे सर्व वैशिष्ट्ये माहित असणे गरजेचे असते . फायरवॉल ची वैशिष्ट्ये आपल्याला चांगली फायरवाल खरेदी करण्यासाठी मदत करतात व तंत्रज्ञानाची माहिती देतात फायरवॉल ची काही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
• बँडविड्थ कंट्रोल आणि मॉनिटरिंग –
• वेब फिल्टरिंग
• वर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क
• व्हायरस आणि मालवेअर फाईल फिल्टरिंग
• वायरलेस कंट्रोलर
• डीप पॅकेट इन्स्पेक्शन
• लॉगिंग
फायरवॉल चे फायदे
1. फायरवॉल च्या मदतीने नेटवर्क ट्रॅफिक वर लक्ष ठेवता येते
2. फायरवॉल मुळे हानीकारक मालवेअर आणि कोडींग च्या फाईल ब्लॉक केल्या जातात.
3. फायरवॉल हानीकारक सॉफ्टवेअर पासून संगणकाचे संरक्षण करत असते.
4. फायरवॉल हॅकर्स पासून संगणकाला संरक्षण प्रदान करते.
5. कॉम्प्युटर व्हायरस पासून संगणकाला सुरक्षितता प्रदान करण्याचे काम फायरवॉल करते.
फायरवॉल चे तोटे
• जर जास्त व्यक्ती कंपनी किंवा ऑर्गनायझेशन मध्ये फायरवॉल चा उपयोग करत असतील तर काही व्यक्तींना फायरवॉल संगणकाचे विशिष्ट कार्य करण्यापासून रोखू शकते.
• हार्डवेअर फायरवॉल ची जास्त किंमत
• कधीकधी सॉफ्टवेअर फायरवॉल संगणकाची कार्यक्षमता निर्धारित करू शकते.
• काही काही हानिकारक मालवेअर फाइल्स trusted डेटा म्हणून संगणकामध्ये प्रवेश करू शकतात व संगणकाला नुकसान पोहोचू शकतात.
• लहान बिजनेस मध्ये फायरवॉल ला कार्यरत ठेवणे सोपे असते या उलट मोठ्या organization मध्ये फायरवॉल मोठी समस्या बनू शकते.
सर्वोत्तम फायरवॉल कंपनी > best firewall companies in marathi
फायरवॉल संबंधी आपण सर्व माहिती जाणून घेतली आता आपण भारतातील सर्वोत्तम फायरवॉल कंपनी संबंधी माहिती जाणून घेऊया जेथुन तुम्ही फायरवॉल खरेदी करू शकाल. सर्वोत्तम फायरवॉल कंपनी ची यादि पुढीलप्रमाणे –
• Check Point Virtual Systems
• Sophos XG
• Fortinet FortiGate
• Palo Alto Networks NG Firewalls
• Juniper SRX
• Cisco Firepower NGFW
सारांश /conclusion
आज आपण firewall म्हणजे काय या लेखाद्वारे फायरवाल विषयी माहिती जाणून घेतली. आपण फायरवॉल चे प्रकार जाणून घेतले तसेच फायरवॉल च्या वेगवेगळ्या कंपनी आणि सर्वोत्तम फायरवॉल ची वैशिष्ट्ये देखील जाणून घेतले. याच बरोबर आपण फायरवॉल चे फायदे आणि तोटे देखील जाणून घेतले.
मला आशा आहे तुम्हाला फायरवॉल विषयीचा हा लेख नक्कीच आवडलेला असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेअर करा आणि या लेखामध्ये काही सुधारणा आवश्यक असेल तर कमेंट करा.
तुमचा दिवस शुभ असो , धन्यवाद…. !!!