Floppy Disk ची माहिती

Advertisements

संगणकाच्या विविध फाइल्स आणि डेटा साठवण्यासाठी फ्लॉपी डिस्क चा उपयोग होतो. परंतु तुम्हाला फ्लॉपी डिस्क विषयी संपूर्ण माहिती माहित आहे का?

फ्लॉपी डिस्क च्या उत्तम उपयोगासाठी आपण या लेखाद्वारे फ्लॉपी डिस्क विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. 

ज्या द्वारे तुम्हाला फ्लॉपी डिस्क विषयी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच लेखात मिळतील व तुमचा बहुमूल्य वेळ वेगवेगळ्या वेबसाईट आणि रिसोर्स बघण्यात व्यर्थ जाणार नाही.

What is Floppy Disk in Marathi

फ्लॉपी डिस्क विषयी हा लेख बनवण्यासाठी विविध संकेतस्थळांची तसेच पुस्तकांची मदत घेण्यात आलेली आहे, त्यामुळे हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला या एकाच लेखात फ्लॉपी डिस्क विषयी संपूर्ण माहिती मिळेल.

अनुक्रमणिका ↕

फ्लॉपी डिस्क म्हणजे काय? Floppy Disk Information in Marathi 

फ्लॉपी डिस्क ला फ्लॉपी किंवा फ्लॉपी डिस्केट म्हणून देखील ओळखले जाते. फ्लॉपी डिस्क हे संगणकाचे हार्डवेअर स्टोरेज उपकरण आहे ज्याचा उपयोग इलेक्ट्रॉनिक डेटा जसे की संगणकाच्या फाइल्स, संगणक प्रोग्राम साठवण्याकरिता होतो. फ्लॉपी डिस्क चा उपयोग करण्यासाठी संगणकामध्ये फ्लॉपी डिस्क ड्राइव्ह असणे गरजेचे असते.

फ्लॉपी डिस्क चा शोध 1967 मध्ये आयबीएम कंपनी द्वारे लावण्यात आला. फ्लॉपी डिस्क ह्या हार्ड डिस्क ला उत्तम विकल्प होत्या कारण त्या काळात हार्ड डिस्क च्या किमती खूपच जास्त होत्या.

सुरवातीच्या काळात संगणकाची ऑपरेटिंग सिस्टीम साठवण्यासाठी देखील फ्लॉपी डिस्क चा उपयोग केला जात होता तसेच फ्लॉपी डिस्क च्या मदतीने विविध संगणकीय डेटा ट्रान्सफर केला जात होता.

फ्लॉपी डिस्क चे प्रकार 

बदलत्या काळानुसार फ्लॉपी डिस्क मध्ये देखील वेगवेगळे बदल केले गेले व त्या आधारे Floppy Disk चे मुख्यतः तीन प्रकार उदयास आले जे पुढील प्रमाणे 

8 – inch फ्लॉपी डिस्क

5.25 – inch फ्लॉपी डिस्क

3.5-inch फ्लॉपी डिस्क

8 – inch फ्लॉपी डिस्क

सन 1970 ते 1980 च्या दरम्यान 8 – inch डायमीटर असलेल्या फ्लॉपी डिस्क मार्केटमध्ये आल्या. या फ्लॉपी डिस्क ची क्षमता 1 MB होती. या प्रकारच्या फ्लॉपी डिस्क मध्ये एकदा साठवलेला डेटा परत बदलता येत नव्हता त्यामुळे या फ्लॉपी डिस्क च्या सुधारित आवृत्तीचा शोध लावण्यात आला.

5.25 – inch फ्लॉपी डिस्क

1980 च्या सुमारास 5.25 – inch फ्लॉपी डिस्क मार्केटमध्ये उपलब्ध झाल्या त्यावेळी या फ्लॉपी ची क्षमता फक्त 160kb होती जी पुढे वाढवून 1.2 MB पर्यंत करण्यात आली. 5.25 – inch फ्लॉपी डिस्क एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन जाण्यास सोप्या होत्या. या प्रकारच्या फ्लॉपी डिस्क मध्ये डिस्कच्या दोन्ही बाजूला साठवलेला डेटा read केला जाऊ शकत होता.

3.5-inch फ्लॉपी डिस्क

सन 1980 च्या सुरुवातीच्या काळात 3.5-inch floppy disk चे मार्केटमध्ये आगमन झाले.या फ्लॉपी डिस्क ची क्षमता 800 KB ते 2.8 MB पर्यंत होती. या फ्लॉपी डिस्क च्या लहान आकारमानामुळे यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला गेला. 1995 मध्ये पहिल्या high-density फ्लॉपी डिस्क उदयास आल्या.

फ्लॉपी डिस्क चे भाग

फ्लॉपी डिस्क चे मुख्य भाग पुढील प्रमाणे –

1. ड्राईव्ह मोटर

2. स्टेपर मोटर

3. Read / Write Head

4. सर्किट बोर्ड 

5. मेकॅनिक फ्रेम 

1. ड्राईव्ह मोटर

ड्राईव्ह मोटर चा उपयोग डिस्कच्या सेंटरला केला जातो ज्याच्या मदतीने ते डिस्क 300 ते 360 वेळा प्रति मिनिट फिरू शकते.

2. स्टेपर मोटर

स्टेपर मोटरच्या मदतीने Read / Write Head मॅग्नेटिक डिस्क वर योग्य ठिकाणी प्लेस केला जातो. पेपर मोटरच्या मदतीने योग्य प्रकारे डेटा प्रक्रिया शक्य होते.

3. Read / Write Head

Read / Write Head हे डिस्कच्या दोन्ही बाजूला उपस्थित असतात. Read / Write Head च्या मदतीने मॅग्नेटिक डिस्क वर उपस्थित असलेल्या डेटावर प्रक्रिया केली जाते.

4. सर्किट बोर्ड 

फ्लॉपी डिस्क वरील डेटावर प्रक्रिया करण्यासाठी काही इलेक्ट्रॉनिक्स ची गरज असते व या इलेक्ट्रॉनिक्स पार्ट चा समावेश सर्किट बोर्ड मध्ये केलेला असतो.

5. मेकॅनिक फ्रेम 

डिस्क ला बाह्य आघातापासून वाचवण्याकरिता मेकॅनिक फ्रेम चा उपयोग होतो. मेकॅनिक फ्रेम मध्ये Read / Write Head ला डिस्क बरोबर जोडण्याची सुविधा प्रदान केलेली असते.

फ्लॉपी डिस्क कसे काम करते

फ्लॉपी डिस्कच्या उपयोगासाठी फ्लॉपी डिस्क ड्राईव्ह चा संगणकामध्ये समावेश असणे गरजेचे आहे. संगणकाचे प्रोग्राम संगणकाच्या हार्डवेअर उपकरणांना निर्देश देऊन फ्लॉपी डिस्कवर डाटा साठवत असतात. फ्लॉपी डिस्क मध्ये मॅग्नेटिक मेडियम च्या साह्याने डेटा साठवला जातो.

जेव्हा फ्लॉपी डिस्क मध्ये साठवलेल्या डेटा वर प्रक्रिया करायची असते तेव्हा Read / Write Head हे ड्राईव्ह मोटरच्या साह्याने फिरणाऱ्या डिस्कवरील डेटा वर प्रक्रिया करत असते.Read / Write Head च्या movement साठी स्टेपर मोटरचा उपयोग होत असतो व या सर्व भागांना बाह्य घटकांपासून वाचवण्यासाठी मेकॅनिक फ्रेम कार्य करत असते.

फ्लॉपी डिस्क चे फायदे

1. फ्लॉपी डिस्कचे आकारमान लहान असते.

2. फ्लॉपी डिस्क च्या किंमती सामान्यता कमी असतात व  आपण फ्लॉपी डिस्क कुठेही घेऊन जाऊ शकतो.

3. लहान आकाराच्या संगणकाच्या फाईल ट्रान्सफर करण्यासाठी फ्लॉपी डिस्कचा उपयोग होतो.

4. काही फ्लॉपी डिस्क मध्ये डाटा साठवण्यासाठी सिक्युरिटी टॅब चा उपयोग होतो त्यामुळे डाटा लिकेज ची शक्यता कमी होते.

फ्लॉपी डिस्क चे तोटे

1. फ्लॉपी डिस्क चा आधुनिक संगणकामध्ये जास्त प्रमाणात उपयोग केला जात नाही.

2. फ्लॉपी डिस्क मध्ये डाटा ट्रान्सफर स्पीड खूपच कमी असते.

3. आधुनिक स्टोरेज माध्यमांच्या तुलनेत फ्लॉपी डिस्क मध्ये खूपच कमी संगणक मेमरी असते.

4. बाह्य घटक जसे की उष्णतेमुळे फ्लॉपी डिस्कवरील डेटा करप्ट होऊ शकतो.

5. जर फ्लॉपी डिस्क चा वापर काळजीपूर्वक केला नाही तर त्या लवकरच डॅमेज होतात.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न

फ्लॉपी डिस्क चा शोध कोणी लावला व कधी ?

उत्तर – फ्लॉपी डिस्कचा शोध आयबीएम कंपनीने 1967 सालि लावला व ही फ्लॉपी डिस्क 1972 मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध झाली.

आजच्या आधुनिक काळात फ्लॉपी डिस्क चा उपयोग होतो का ?

उत्तर – आधुनिक काळात फ्लॉपी डिस्क चा वापर मर्यादित झाला असला तरी विविध शासकीय संस्थांद्वारे फ्लॉपी डिस्क मधील सुरक्षा वैशिष्टांमुळे फ्लॉपी डिस्क चा वापर केला जातो.

फ्लॉपी डिस्क चे विकल्प कोणते आहे?

उत्तर – फ्लॉपी डिस्क चे विविध विकल्प उपलब्ध आहेत जसे की हार्ड डिस्क ड्राईव्ह, सीडी, मेमरी कार्ड इत्यादी.

फ्लॉपी डिस्क कोणत्या प्रकारची मेमरी आहे?

उत्तर – फ्लॉपी डिस्क ही मॅग्नेटिक स्टोरेज प्रकारची मेमरी आहे.

 फ्लॉपी डिस्कचे आयुष्यमान किती असते ?

उत्तर – फ्लॉपी डिस्कचे आयुष्यमान दहा ते वीस वर्षे असते.

फ्लॉपी डिस्क बनवताना कोणत्या मटेरियल चा उपयोग होतो?

उत्तर – फ्लॉपी डिस्क बनवताना फ्लेक्सिबल प्लास्टिक वर मॅग्नेटिक मटेरियल ची कोटिंग दिली जाते व ही डिस्क चौकोनी आकाराच्या कडक प्लास्टिक ने बनवलेल्या case मध्ये ठेवली जाते.

सारांश

फ्लॉपी डिस्क ला सुरुवातीच्या काळातील स्टोरेज उपकरण म्हणून ओळखले जाते. आज देखील काही शासकीय संस्था आणि काही व्यक्ती द्वारे फ्लॉपी डिस्क चा उपयोग केला जातो. 

मला आशा आहे तुम्हाला या लेखाद्वारे फ्लॉपी डिस्क विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला या लेखातील कोणताही भाग समजला नसेल किंवा या लेखात कोणतीही सुधारणा आवश्यक वाटत असेल तर तुम्ही कमेंट च्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता.

आपला दिवस शुभ असो, धन्यवाद…

Advertisements

Leave a Comment