Advertisements

SSD (Solid State Drive) विषयी संपूर्ण माहिती

Advertisements

संगणकामध्ये डेटा साठविण्याकरिता सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) चा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळेच, आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया Solid State Drive (SSD) विषयी संपूर्ण माहिती.

विविध संगणकांमध्ये डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क ड्राइव्ह चा उपयोग केला जातो परंतु मागील काही वर्षांपासून हार्डडिस्क ची जागा सॉलिड स्टेट ड्राईव्ह घेत आहे. विविध संगणक तज्ञ संगणकाच्या अधिक चांगल्या कार्यक्षमतेसाठी सॉलिड स्टेट ड्राईव्ह चा उपयोग करण्याचा सल्ला देतात.

अनुक्रमणिका ↕

सॉलिड स्टेट ड्राईव्ह हा संगणकाच्या जलद गतीचा महत्त्वाचा हिस्सा आहे चला तर मग जाणून घेऊया सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) विषयी माहिती –

Advertisements
SSD Information in Marathi

Solid State Drive (SSD) म्हणजे काय? 

सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) हा सेकंडरी मेमरी चा प्रकार आहे. SSD मध्ये फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानाच्या मदतीने डेटा साठवला जातो. SSD मधील डेटा non volatile असतो म्हणजेच संगणकाचा पावर सप्लाय बंद केल्यानंतर SSD मधील डेटा मिटवला जात नाही.

SSD हे हार्ड डिस्क ड्राइव्ह प्रमाणेच कार्य करते परंतु SSD हे हार्ड डिस्क च्या तुलनेत जास्त जलद असते. SSD च्या मदतीने ऑपरेटिंग सिस्टिम लवकर बुट अप होते, संगणकातील सॉफ्टवेअर लवकर लोड होतात व फाइल्स जलद गतीने सेव्ह केल्या जातात.

SSD हे इंटिग्रेटेड सर्किट मध्ये permanent डेटा साठवत असते. SSD मधील इंटिग्रेटेड सर्किट हा इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे जे सिलिकॉन सेमीकंडक्टर सेल मध्ये साठवलेला असते. त्यामुळे सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) ला सेमीकंडक्टर स्टोरेज डिवाइस म्हणून देखील ओळखले जाते.

Solid State Drives चे मुख्य भाग

SSD मते हार्ड डिस्क प्रमाणे कोणतेही moving part नसतात त्यामुळेच या मेमरी उपकरणाला सॉलिड स्टेट ड्राईव्ह असे नाव देण्यात आले परंतु SSD च्या कार्य प्रणाली मध्ये काही भागांचा समावेश होतो ते पुढीलप्रमाणे –

1. डिव्हाईस ड्रायव्हर

2. SSD interface

3. फ्लॅश मेमरी

4. SSD controller

1. डिव्हाईस ड्रायव्हर

कोणत्याही हार्डवेअर उपकरणाला संगणकाबरोबर सोडण्यासाठी तसेच संगणकाबरोबर कार्य करण्यासाठी डिव्हाईस ड्रायव्हर ची गरज असते. डिव्हाईस ड्रायव्हर च्या मदतीने संगणकाचे विविध भाग संगणकाबरोबर कार्य करतात.डिव्हाईस ड्रायव्हर हा संगणकाच्या सॉफ्टवेअरचा हिस्सा आहे ज्याच्या मदतीने संगणकाचे हार्डवेअर उपकरण संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिम आणि सी.पी.यु. बरोबर जोडले जाऊ शकतात.

Device Driver म्हणजे काय?

2. Interface

SSD आणि प्रोसेसर मधील इलेक्ट्रिकल संरचनेला SSD interface म्हणून ओळखले जाते. SATA (various),SAS, IDE, FC हे काहि SSD interface आहेत.

3. फ्लॅश मेमरी

NAND किंवा NOR तंत्रज्ञानाच्या आधारे फ्लॅश मेमरी कार्य करत असते. फ्लॅश मेमरी क्षमता. फ्लॅश मेमरी मध्ये बाईट लेवल वर डेटा साठवला जातो. फ्लॅश मेमरी ही non volatile मेमरी आहे. आधुनिक संगणकांमध्ये फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो.

4. SSD controller

SSD controller हे SSD ला संगणकाबरोबर जोडण्यासाठी आणि खाते करण्यासाठी मदत करत असतात. SSD मध्ये रॅम, रॉम, Error Correction Code आणि सुरक्षाविषयक वैशिष्ट्यांचा समावेश होतो

SSD च्या NAND Flash मध्ये ट्रांजिस्टर च्या shrinkage चा उपयोग केलेला असतो ज्यामुळे स्पीड आणि कॅपॅसिटी मध्ये वाढ होत असते.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD चे प्रकार 

SSD च्या तंत्रज्ञानानुसार SSD चे पाच मुख्य प्रकार आहेत –

PCI

SATA

M.2 SSD

NVMe

SSHD

PCI 

PCI चे पूर्ण स्वरूप आहे Peripheral Component Interconnect. PCI स्लॉटच्या मदतीने SSD ला आपण संगणकाच्या पेरिफेरल उपकरणांबरोबर जोडू शकतो.Bidirectional Lanes च्या संख्येच्या आधारे PCI स्लॉट चे आकारमान निर्धारित होते.

जेव्हा आपल्याला संगणकामध्ये उच्च गुणवत्तेच्या इमेज संबधित कार्य करायचे असते तसेच चांगली कार्यक्षमता आणि कमी Lag होणे आवश्यक असेल तर आपण PCI स्लॉट चा उपयोग करू शकतो. PCI मध्ये जास्त bandwidth चा उपयोग केलेला असतो त्यामुळे PCI SSD हे SSD च्या इतर प्रकारांपेक्षा चांगली गुणवत्ता प्रदान करतात.

SATA

SATA SSD चे पूर्ण स्वरूप आहे Serial Advanced Technology Attachment SSD. SATA SSD ची रचना हार्ड डिस्क ड्राइव्ह प्रमाणे असते. SATA SSD ची ग्रेड कमी असली तरी ते संगणकाला हार्ड ड्राईव्ह पेक्षा चार ते पाच पटीने जास्त वेगवान बनवू शकतात.

SATA SSD चा मुख्य प्रकार 2.5 inch SATA SSD आहे कारण हे SSD आपण जुन्या संगणक सिस्टीम मध्ये देखील वापरू शकतो. SATA ची साधारण गती 500 ते 600 mbps असते.

M.2 SSD

M.2 SSD हे लहान आयताकृती आकारातील SSD आहेत ज्यांचा उपयोग मुख्यतः मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये होतो. संगणकामध्ये M.2 SSD चा उपयोग करण्यासाठी संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये आवश्यक स्लॉट असणे गरजेचे आहे. M.2 SSD च्या काही कॉमन साइज आहेत – 2242, 2260, 2280, and 22110. 

उदाहरणार्थ – M.2 2260 म्हणजे 22 mm लांबी आणि 60 mm ची रुंदी.

NVME

NVME म्हणजे ­­Non Volatile Memory Express. NVME चा उपयोग आधुनिक जनरेशन च्या SSD साठी स्टोरेज एक्सेस आणि ट्रान्सफर प्रोटोकॉल प्रदान करण्यासाठी होतो. NVME हे PCI च्या मदतीने प्रोसेसर ला जोडलेले असतात त्यामुळे ते जास्त गुणवत्तेची सेवा प्रदान करू शकतात. NVME चा उपयोग सेकंडरी स्टोरेज उपकरण म्हणून केला जातो ज्याच्या मदतीने जास्त काळासाठी डेटा साठवण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

SSHD

SSHD चे पूर्ण स्वरूप Solid-State Hybrid Drive आहे. SSHD चा उपयोग फ्लॅश मेमरी स्टोरेज आणि HDD स्टोरेज ला एकाच उपकरणांमध्ये वापरण्यासाठी होतो. SSHD हे वारंवार उपयोगात येणाऱ्या फाईल ला Cache करून ठेवते व इतर फाइल्स ला Spinning media मध्ये साठवून ठेवते. SSHD च्या मदतीने संगणकाची ची कार्यक्षमता वाढत असते.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) कसे कार्य करते 

SSD हे हार्ड ड्राईव प्रमाणेच कार्य करत असतात परंतु SSD मध्ये वेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो, म्हणजेच हार्ड ड्राईव्ह मध्ये प्लॅटर आणि आर्म च्या मदतीने डेटा रीड केला जातो तर SSD मध्ये यूएसबी तंत्रज्ञानाप्रमाणे फ्लॅश मेमरी तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला असतो.

SSD मध्ये कोणत्याही प्रकारचे moving पार्ट नसतात त्यामुळे SSD हे हार्ड दहावी पेक्षा अधिक गतिमान आणि कार्यक्षम असतात. SSD मध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डेटा साठवला जातो जसे की गाणे, व्हिडिओ, फोटो, ऑपरेटिंग सिस्टिम, सॉफ्टवेअर, इत्यादी.

उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड चा उपयोग करायचा असतो तेव्हा संगणकामध्ये पुढील क्रिया होतात – 

1. आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड च्या आयकॉन वर क्लिक करतो तेव्हा ते रिक्वेस्ट प्रोसेसर कडे पाठवले जाते.

2. मायक्रोसोफ्ट वर्ड त्वरित ओपन करण्यासाठी प्रोसेसर रॅम कडे ती रिक्वेस्ट पास करतो व SSD च्या गतिमानतेमुळे data ट्रान्सफरची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होते.

3. त्यानंतर प्रोसेसर मेमरी कडून आवश्यक असलेला डेटा घेऊन आपल्या रिक्वेस्ट ची प्रक्रिया पूर्ण करतो.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह चे फायदे

1. SSD मध्ये Mechanical Components नसतात त्यामुळे SSD हार्डडिस्क पेक्षा अधिक जलद गतीने कार्य करते.

2. SSD चे हार्ड ड्राइव्ह पेक्षा जास्त टिकाऊ असते.

3. SSD हे impact resistant आहेत म्हणजेच जर कधी SSD आपल्या हातातून खाली पडली तर डेटा पेमेंट होण्याचे प्रमाण कमी असते.

4. SSD मध्ये कोणत्याही प्रकारचे moving पार्ट नसतात त्यामुळे SSD काम करत असताना आवाज होत नाही.

5. SSD च्या उपयोगासाठी कमी विजेची खपत होते.

6. SSD चा जास्त वेळ उपयोग केला तरी ती जास्त गरम होत नाही.

7. SSD च्या मदतीने संगणकाची कार्यक्षमता वाढते.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह चे तोटे  

1. SSD ची जर प्रत्येक GB साठी किंमत काढली तर ती हार्ड ड्राईव्ह पेक्षा जास्त होते.

2. SSD मध्ये हार्ड ड्राईव्ह प्रमाणे स्टोरेज ची विविधता आढळत नाही.

3. काही SSD मध्ये आपण काही लिमिटेड वेळाच डेटा प्रक्रिया पूर्ण करू शकतो.

4. SSD च्या मदतीने त्वरित डेटा उपलब्ध करून दिला जातो परंतु कधीकधी SSD मध्ये डेटा साठवण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.

सॉलिड स्टेट ड्राईव्ह निर्माता कंपनी

SSD च्या वाढत्या मागणीमुळे SSD श्याम मार्केटमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झाले आहे परंतु या स्पर्धात्मक युगात काही ब्रँड ने आपली विशेष ओळख निर्माण केली आहे जे पुढील प्रमाणे –

• Intel

• Kingston

• Samsung

• Seagate

• Western Digital

• ADATA

• Crucial

• Sabrent

• Corsair

• Plextor

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न

SSD चा फुल फॉर्म काय आहे ?

उत्तर – SSD चा फुल फॉर्म आहे सॉलिड स्टेट ड्राईव्ह (Solid State Drive)

SSD चा शोध कोणी लावला?

उत्तर – StorageTeK ने 1978 मध्ये रॅम आधारित SSD च्या पहिल्या आवृत्तीचा शोध लावला.

संगणक किंवा लॅपटॉप मध्ये SSD चा उपयोग करणे अनिवार्य आहे का ?

उत्तर – संगणक किंवा लॅपटॉप मध्ये SSD चा उपयोग करणे अनिवार्य नसते. SSD म्हणजे हार्ड ड्राईव्ह चा एक विकल्प आहे.

Gaming साठी SSD आवश्यक आहे का?

उत्तर – Gaming साठी जास्त जलदगतीने प्रोग्राम लोड होणे आवश्यक असते व यासाठी SSD मदत करत असतो.

आपण रॅम ऐवजी SSD चा उपयोग करू शकतो का ?

उत्तर – रॅम हे संगणकाचे प्रायमरी मेमरी आहे ज्याचा उपयोग वारंवार उपयोगात येणाऱ्या प्रोग्राम ला स्टोअर करून जलद गतीने लोड करण्यासाठी होतो याउलट SSD हे सेकंडरी मेमरी उपकरण आहे ज्याचा उपयोग हार्ड ड्राइव्हला विकल्प म्हणून केला जातो.

त्यामुळे रॅम ऐवजी SSD चा उपयोग करणे फायदेशीर ठरत नाही.

सारांश –

SSD हे संगणक मेमरी म्हणून कार्य करते. SSD हार्ड ड्राईव्हचा एक चांगला विकल्प आहे त्यामुळेच या लेखामध्ये आपण सॉलिड स्टेट ड्राईव्ह SSD विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली.

आम्ही आजच्या या लेखाद्वारे SSD विषयी संपूर्ण माहिती प्रदान करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला दुसरे रिसोर्स बघण्याची गरज पडणार नाही. परंतु तरीही काही अनावधानाने काही त्रुटी आढळल्यास किंवा SSD संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकता.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा.

आपला दिवस शुभ असो, धन्यवाद…..

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *