Advertisements

मदरबोर्ड म्हणजे काय | what is motherboard in Marathi

Advertisements

 मदरबोर्ड ला संगणकाच्या पाठीचा कणा असे देखील संबोधले जाते. मदरबोर्ड च्या मदतीने संगणकाचे सर्व hardware components एकमेकांना जोडले जातात. मदरबोर्ड चे खूप सारे प्रकार पडतात हे प्रकार किमतीच्या आधारावर , उपयोगाच्या आधारावर आणि गती च्या आधारावर आहेत. मदरबोर्ड विषयी माहिती साठी या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया मदरबोर्ड म्हणजे काय ( what is motherboard in Marathi )

 मदरबोर्ड हा एक PCB(Printed Circuit Board ) आहे आणि हा संगणकाचा आधारस्तंभ समजला जातो. PCB च्या मदतीने संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडून संगणक हा कार्यक्षम बनवला जातो. मदरबोर्ड च्या साह्याने संगणकाचे विविध भाग एकमेकांसोबत चांगल्या balance ने काम करतात .

मदरबोर्ड काय आहे | what is motherboard in marathi

 अनुक्रमणिका

 मदरबोर्ड काय आहे
 मदरबोर्ड मधील विविध प्रकार
 मदरबोर्ड चे विविध Ports
 मदरबोर्ड चे विविध घटक
 मदरबोर्ड चे कार्य
 सर्वोत्तम मदरबोर्ड कसा निवडावा
 मदरबोर्ड निर्माण करणाऱ्या सर्वोत्तम कंपनी 

Advertisements

 मदरबोर्ड म्हणजे काय ◆ motherboard information in marathi

 मदरबोर्ड हे एक connecting device आहे. पहिल्या मदरबोर्ड चे निर्माण 1981 मध्ये IBM संगणक निर्मिती कंपनी द्वारे करण्यात आले. मदरबोर्ड च्या मदतीने विविध Hardware उपकरणांमध्ये संबंध प्रस्थापित केला जातो या हार्डवेयर उपकरणांमध्ये सीपीयू, हार्ड डिस्क तसेच इतर इनपुट आणि आऊटपुट उपकरणांचा समावेश होतो. मदरबोर्ड च्या मदतीनेच संगणकाचे व्यवस्थित कार्यक्षम पद्धतीने कार्य पार पडते.

 प्रत्येक प्रकारचा मदरबोर्ड हा वेगवेगळ्या प्रोसेसर आणि मेमरी बरोबर कार्य करण्यासाठी बनवलेला असतो म्हणजेच एकाच प्रकारचा मदरबोर्ड सर्व प्रकारच्या मेमरी आणि प्रोसेसर बरोबर कार्य करू शकत नाही आणि त्या मुळे मदरबोर्ड चे विविध प्रकार देखील पडतात.

 मदरबोर्ड चे प्रकार | types of motherboard in Marathi

 जरी प्रत्येक मदरबोर्ड चे आकारमान, वैशिष्ट आणि वापर करण्याची विधी वेगवेगळी असली तरी मुख्यतः मदरबोर्ड चे प्रकार हे फॉर्म फॅक्टर वरून पडतात. प्रत्येेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेक मदरबोर्ड चा निर्माता फॉर्म फॅक्टर च्या आधारावर संगणकाशी suit होणारे मदरबोर्ड बनवत असतात.ATX या फॉर्म फॅक्टर च्या आधारावर बनवलेली मदरबोर्ड  सन 2005 पर्यंत सर्वात जास्त संगणकांमध्ये वापरला गेला होता.

 खाली फार्म फॅक्टर च्या आधारावर बनवलेल्या काही लोकप्रिय मदरबोर्ड ची माहिती दिले गेलेली आहे त्यांची नावे पुढील प्रमाणे

1. AT मदरबोर्ड  

2. ATX मदरबोर्ड

3. Baby AT मदरबोर्ड

4. Mini ITX मदरबोर्ड  

5. BTX मदरबोर्ड

6. Pico BTX मदरबोर्ड 

7. LPX मदरबोर्ड 

8. XT मदरबोर्ड

1. AT मदरबोर्ड विषयी माहिती-

AT मदरबोर्ड चा फुल फॉर्म होतो Advanced Technology मदरबोर्ड. ह्या मदरबोर्ड चा शोध IBM  नेे सन 1984 मध्ये लावला या प्रकारचा मदरबोर्ड फक्त AT casing मध्ये फिट बसतो. याची रचना ही  IBM च्या ओरिजिनल संगणका प्रमाणे होती म्हणजेच 12× 13″ चा Form factor. या प्रकारच्या मदर बोर्ड मध्ये  Sleep mode नव्हता त्यामुळे लाईटीची खपत जास्त होत होती.12 pin  plug च्या साह्याने या मदरबोर्ड ला Electricity चे कनेक्शन दिले जाते 

2. ATX मदरबोर्ड –

ATX मदरबोर्ड चा फुल फॉर्म आहे advanced technology extended मदरबोर्ड. ह्या मदरबोर्ड्ड्ड चा शोध Intel या कंपनीने सन 1995 मध्ये लावला. या मदरबोर्डचेेे आकारमान आहे 12×9.6 inch(305×244MM). हा मदरबोर्ड मदरबोर्ड च्या इतिहासामधील अशी पहिली रचना होती ज्यामध्येे connector चा उपयोग मदरबोर्ड बरोबर केला गेला होता. या प्रकारच्या मदरबोर्ड मध्ये 20-24 plug pin चा उपयोग मदरबोर्ड ला Electricity प्रधान करण्यासाठी होतो ज्यासाठी ATX switch board चा उपयोग केलाा जातो.

3. Baby AT मदरबोर्ड -(BAT मदरबोर्ड )

 या मदर बोर्ड ला Original AT मदरबोर्ड चे छोटे रूप मानले गेलेले आहे. याचा पहिल्यांदा उपयोग 1987 मध्ये आयबीएम द्वारा केला गेला. या मदर बोर्डचे आकारमान आहे 12×8.5 ” ज्यामध्येेेेेेेेेेेे याची जास्‍तीत जास्‍त लांबी 13 इंच आहे. या प्रकारचेेेे मदरबोर्ड सर्वात जास्त 386, 486 आणि Pentium संगणकामध्ये उपयोग केले गेले. पुढे या मदरबोर्ड ची जागा ATX मदरबोर्ड ने घेतली.

4. Mini ITX-

 या मदरबोर्डचे निर्माण मार्च 2001 मध्ये VIA या संगणक चिप बनवणाऱ्या कंपनीद्वारे केली गेली.  या मदर बोर्डचे आकारमान आहे 17×17 सेंटीमीटर. या मदरबोर्ड च्या उपयोगासाठी खूप कमी Electricity ची गरज असते त्यामुळे हे छोट्या संगणकाच्या सिस्टीम मध्ये वापरले जातात. यामध्ये Electricity ची गरज कमी असते त्यामुळे यासाठी कमी Power वाला प्रोसेसर वापरला जातो. हे मदरबोर्ड सर्वात जास्त होम थेटर मध्ये वापरले जातात. काही मदरबोर्ड मध्ये Embedded CPU देखील असतो.

5. BTX-(Balanced Technology Extended)-=

 या मदर बोर्डचे निर्मिती सन 2005 मध्ये Gateway Inc या कंपनीद्वारे केली. या मदर बोर्डचे मुख्य वैशिष्ट्य आहे की याला कमी Power लागते आणि यामध्ये कमी heat जनरेट होते. ह्याचे वैशिष्ट्य हे देखील आहे की या मध्ये पहिल्यांदा  ATA आणि USB slots चा उपयोग केला गेला होता. यामध्ये विविध भागांना जोडण्यासाठी slot दिले गेले होते.  याचे काही मुख्य वैशिष्ट्य आहेत Slots ची वाढलेली संख्या, वेगवेगळ्या आकारमानात उपलब्ध, Cooling system मध्ये आधुनिकता तसेच हे चांगल्या प्रकारे नियंत्रित केले जाऊ शकते.

6. Pico BTX –

 ह्या मदरबोर्ड चे निर्मिती Jan., 2007 मध्ये VIA technology द्वारे करण्यात आली. या मदर बोर्डचे साधारण आकारमान 12× 10.5 inch असते ज्यामध्ये लहान Pico BTX मदरबोर्ड चे आकारमान 10.5 × 10.4 inch असते. यामध्ये half of Nano ITX तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला. या मदरबोर्ड च्या उपयोगासाठी 24 पिन Board चा उपयोग करण्यात येतो. यामध्ये मदरबोर्ड वरच USB port आढळून येतो.

7. LPX (Low profile Extension)-

 या मदर बोर्डचे निर्माण 1987 मध्ये Western Digital या संगणकाच्या ची बनवणाऱ्या कंपनीद्वारे करण्यात आली यामध्ये मदरबोर्ड हे 9 इंच रुंद आणि 13 इंच खोलीचे होते.

 या मदर बोर्ड मध्ये Rised card चा उपयोग मध्यभागी करण्यात आला होता. या मदर बोर्डचे उपयोगासाठी जटील Power source चा उपयोग करण्यात आला हे मदर्बॉर्ड 1990 च्या सुमारास खूप प्रसिद्ध होते.

XT (eXtended) मदरबोर्ड –

 हे मदर्बॉर्ड खूप जुन्या प्रकारच्या आहे.  यामध्ये खूप जुन्या प्रोसेसरचा उपयोग केला जातो हे Slot type प्रोसेसर चा उपयोग करून चालविण्यात येणारे मदरबोर्ड आहे. यामध्ये  ports ची कोणतीही व्यवस्था नव्हती त्यामुळे कनेक्टर आणि Addon कार्डचा उपयोग port म्हणून केला जात होता.  या प्रकारच्या मदरबोर्ड मध्ये Pentium I, Pentium II या प्रोसेसर चा उपयोग केला जायचा.

 मदर बोर्ड मध्ये उपयोगात येणारे विविध Ports-

 मदर बोर्ड मध्ये ports चे कार्य खूप महत्त्वाचे आहे यांचा उपयोग बाहेरील इनपुट आणि आऊटपुट उपकरणे संगणकाशी जोडण्यासाठी होतो. सर्वात आधीच्या मदरबोर्ड मध्ये अशा प्रकारचे ports आढळत नव्हते तेव्हा Addon आणि slot card च्या मदतीने Ports चे कार्य केले जात होते. जे खूप जिकिरीचे काम होते.

आजच्या आधुनिक मदर बोर्ड मध्ये उपयोगात येणारे काही महत्त्वाचे ports पुढीलप्रमाणे –

 • Parallel ports- प्रिंटर ला संगणकाचे जोडण्यासाठी उपयुक्त

 • PS/2 port– माऊस आणि कीबोर्ड ला संगणकाशी जोडण्यासाठी

 • HDMI port – मोबाईल ला संगणकाशी जोडण्यासाठी तसेच गाणे आणि  video च्या जलद Transfer साठी.
 • RJ47 port – संगणकाला इंटरनेट जोडण्यासाठी

 • North bridge – संगणकाच्या विविध भागांचे सीपीयू बरोबर चांगले संबंध प्रस्थापित होण्यासाठी.

 • VGA port – मॉनिटरला संगणकाशी जोडण्यासाठी 

 • Serial port

 • USB port

 • Power connector

 • Modem port

 • Game port

 • Divi port

 मदरबोर्ड चे विविध घटक –

 मदर बोर्ड मध्ये काळानुसार खूप बदल होत गेला आहे. यामध्ये काही भाग वगळले गेले आहे तसेच काही नवीन भाग देखील यामध्ये टाकण्यात आले. याच्या आकारमानात देखील मोठ्या प्रमाणावर बदल होत गेला आहे. काही विशिष्ट कार्यासाठी नवनवीन प्रकारचे मदरबोर्ड बनवले गेले आहे तसेच उपयोगीतेनुसार यामध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट करण्यात आलेले आहेत तसेच नवनवीन घटकांचा तंत्रज्ञ शोध लावत आहेत आणि त्यांच्या उपयोगाने अत्यंत कार्यक्षम मदरबोर्ड चे निर्माण होत आहे.

 Older model च्या मदरबोर्ड मध्ये असलेले घटक –

 जुन्या मॉडेल च्या मदरबोर्ड मध्ये देखील खूप त्यातील घटकांचा समावेश केला गेला होता आणि ते त्या काळातील सर्वात उत्कृष्ट तंत्रज्ञान होते आपण जाणून घेऊया त्या Model मधील मदर बोर्डचे विविध घटक-

 1. BIOS
 2. Electrolytic
 3.  Resistor 
 4. BUS
 5.  Cache memory
 6.  Dip switches 
 7.  Chipset
 8.  Diode
 9.  Oosolete memory slot – SIMM
 10.  Floppy connection – keyboard controller
 11. obsolete expansion slot – AMR, CMR, ISA

 आधुनिक मदरबोर्ड चे घटक 

 आधुनिक मदर बोर्ड मध्ये खूप सार्‍या नवनवीन घटकांचा समावेश केला गेला आहे त्यातील काही महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे

 1.  Expansion slots
 2.  3 pin case fan connector
 3.  Heat sink
 4.  Memory slot
 5.  Back panel connector
 6.  Inductor
 7.  Capacitor
 8.  4 pin(p4) power connector 
 9.  CPU socket
 10.  Serial ATA
 11.  Super  I/10
 12.  Screw hole
 13.  North bridge
 14.  South bridge

 मदरबोर्ड चे कार्य-

 मदरबोर्ड हा संगणकाचा एक मुख्य भाग म्हणून ओळखला जातो ज्याच्या द्वारे संगणकाचे सर्व कार्य सुरळीतपणे पार पडतात. मदरबोर्ड हा कशाप्रकारे काम करतो हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची कार्य प्रणाली समजून घेणे खूप गरजेचे आहे. मदरबोर्ड हा विविध कार्यासाठी वापरला जातो त्यातील काही महत्वाची कार्ये पुढीलप्रमाणे

Power distribution –

 मदरबोर्ड च्या मदतीने संगणकाच्या विविध घटकांना आवश्यक असलेल्या Power ची विभागणी केली जाते व त्याद्वारे संगणकाच्या प्रत्येक कार्याचे कार्य व्यवस्थित व सुरळीतपणे चालते व परिणामी संगणक अधिक कार्यक्षम बनतो.

Component hub-

 संगणकाच्या व्यवस्थित कार्यप्रणाली साठी संगणकाचे सर्व भाग एकमेकांशी समन्वय साधत कार्य करणे गरजेचे असते व या सर्वांना एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य मदरबोर्ड च्या साहाय्याने होते. मदरबोर्ड च्या साह्याने विविध हार्डवेअर उपकरणे जसे की मॉनिटर, सीपीयू आणि इतर सर्व भाग यांची एकमेकात चांगली सांगड घातली जाते व संगणकाची कार्यक्षमता सुधारते.

Slot for external devices –

 विविध बाह्य भाग संगणकाशी जोडण्यासाठी मदरबोर्ड वर वेगवेगळे slot आणि port प्रदान केलेले असतात जसे की VGA Port च्या मदतीने मॉनिटर हा संगणकाचा जोडला जातो.

BIOS

 मदरबोर्ड मध्ये  BIOS च्या मदतीने विविध महत्त्वाची कार्य केले जातात जसे की संगणकाला boot up करणे.आणि मदरबोर्ड च्या मदतीने ROM चा चांगला उपयोग केला जातो.

Memory slot-

 संगणकामध्ये मेमरी चा उपयोग करण्यासाठी या Slot चे अत्यंत महत्त्व आहे या स्लॉट द्वारे मेमरी कार्ड, पेन ड्राईव्ह यांना संगणकाची जोडनि करतात येते व संगणकाची स्टोरेज करण्याची क्षमता वाढवता येते. तसेच विविध बाह्य माहितीचा उपयोग संगणकामध्ये करता येतो.

Data flow-

 संगणकाच्या मदतीने विविध Peripherals एकमेकांना जोडले गेलेले असतात त्यामुळे मदरबोर्ड हा त्या मधील संवाद साधणारा मध्यस्थी बनतो. आणि या सर्वामुळे मदरबोर्ड हा डाटा flow चे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त असतो.

 सर्वोत्तम मदरबोर्ड कसा निवडावा| how to choose best motherboard information in Marathi.

 संगणक हे एक स्वतंत्र उपकरण नसून हे अनेक उपकरणांचा संगम आहेत व या सर्व उपकरणांना एकत्र ठेवण्याचे काम मदरबोर्ड मार्फत केले जाते मदरबोर्ड हा संगणकाचा performance वाढवतो आणि सर्व perifferals ला एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतो. मदरबोर्ड च्या या कार्यामुळे संगणकाची कार्यक्षमता वाढते.

 मदरबोर्ड हे विशिष्ट प्रोसेसर साठी बनवलेली असतात म्हणजेच एकच मदरबोर्ड सर्व प्रोसेसर साठी आणि सर्व संगणकांसाठी उपयुक्त ठरत नाही. त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात जे कि आकारमान व लेआउट वर आधारित आहे ज्याला आपण फॉर्म फॅक्टर असे देखील म्हणतो.  म्हणून मदरबोर्ड खरेदी करताना पुढील बाबी ध्यानात ठेवल्या पाहिजेत.

1. प्रोसेसर –

 मदरबोर्ड मध्ये प्रोसेसर कनेक्ट करण्यासाठी सॉकेट ची व्यवस्था केलेली असते परंतु प्रत्येक प्रोसेसर च्या वेगवेगळ्या  प्रकारासाठी वेगवेगळे मदरबोर्ड ची आवश्यकता असते. एकच मदरबोर्ड सर्व प्रकारच्या प्रोसेसर ला कनेक्ट केला जाऊ शकत नाही म्हणून विशिष्ट मदरबोर्ड चा उपयोग विशिष्ट प्रोसेसर साठी केला जातो  जेणेकरून प्रोसेसर हा मदर बोर्ड मध्ये fit बसला पाहिजे.

2. फॉर्म फॅक्टर –

 मदर बोर्ड मध्ये वेगवेगळी रचना आणि आकारमान असते त्यानुसार मदरबोर्ड चे प्रकार पडतात. वेगवेगळ्या प्रकारचे मदरबोर्ड हे वेगवेगळ्या कार्यासाठी वापरले जातात तसेच त्यांच्या size मध्ये फरक असल्यामुळे त्यांच्या वैशिष्ट्य मध्ये देखील फरक पडतो म्हणून मदरबोर्ड निवडताना फॉर्म फॅक्टर चा विचार करणे अत्यंत गरजेचे असते.

3. मेमरी –

 संगणक व्यवस्थितरीत्या कार्य होण्यासाठी मेमरीची अत्यंत आवश्यकता असते. मदरबोर्ड मध्ये मेमरी स्लॉट असतात जे वेगवेगळ्या size च्या मेमरी ला सपोर्ट करत असतात त्यामुळे मेमरी slot विषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. तसेच मदरबोर्ड मध्ये मेमरी किती रॅम पर्यंत सपोर्ट करते हे पण बघणे गरजेचे असते.

4. BUS-

 संगणकामध्ये BUS चा अर्थ होतो असा रस्ता ज्याद्वारे संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडले गेले आहेत. BUS ची गणना Megahertz (MHz) मध्ये केली जाते. जितके चांगले BUS असेल तितके चांगले संगणकाचे डाटा ट्रान्सफर करण्याची स्पीड असेल व तितका संगणक कार्यशील असेल.

5. Chipset-

 मदर बोर्ड मध्ये चिपसेट हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असते त्याला मदर बोर्ड मध्ये Middle man म्हणून देखील ओळखले जाते ज्याच्या मदतीने संगणकातील विविध भागांमध्ये डाटा ट्रान्सफर ची प्रक्रिया पूर्ण केली जाते. या द्वारे मायक्रोप्रोसेसर विभाग एकमेकांना जोडले गेलेले असतात. Chipset चे दोन प्रकार आहेत North ब्रिज आणि South bridge ब्रिज. Chipset च्या माध्यमातून संगणकातील विविध भागांचा CPU बरोबर connection होते .

6. Expansion slot and connectors –

 कोणत्याही मदरबोर्ड ची खरेदी करीत असताना त्यामध्ये उपलब्ध असलेले Expansion स्लॉट आणि Connector ची माहिती आपल्याला असणे अत्यंत गरजेचे असते या connector च्या माध्यमातूनच विविध संगणकाचे भाग एकमेकांना जोडले जातात आणि संगणक कार्यरत होतो Expansion slot मध्ये जर कमी असेल तर आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो म्हणून कोणताही मदरबोर्ड खरेदी करताना Expansion स्लॉट विषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.

 सर्वोत्तम मदरबोर्ड निर्माता कंपनी |Best computer motherboard manufacturers in marathi 

 आजचे जग हे तंत्रज्ञानाचे जग आहे. माहिती ही प्रत्येक क्षणाला बदलत असते आणि या बदलत्या माहितीच्या अनुसरून मदरबोर्ड मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक कंपनी आपले सर्वोत्तम मदरबोर्ड कमीत कमी खर्चात बनवण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. या सर्वांमध्ये देखील काही सर्वोत्तम मदरबोर्ड निर्माता कंपनी आहेत त्या पुढील प्रमाणे –

 Intel

 ASUS

 Acer

 ASI

 Aopen 

 Gigabyte

 AMD

 Biostar

 ABIT

 सर्वात जास्त विचार गेलेले प्रश्न | FAQ ?

 संगनका मधील मदरबोर्ड काय आहे?

उत्तर – संगणकामध्ये मदरबोर्ड ला संगणकाचा पाठीचा कणा असे संबोधले जाते. मदरबोर्ड द्वारे संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडले गेलेले असतात. संगणक मधील विविध भागांचे एकमेकांसोबत चांगल्या interaction साठी मदरबोर्ड महत्त्वाची भूमिका पार पाडतो तसेच जर संगणकामध्ये मदरबोर्ड उपस्थित नसेल तर संगणकातील विविध भागांचे एकमेकांसोबत चे कार्यप्रणाली चे व्यवस्थापन बिघडेल आणि परिणामी संगणक अकार्यशील होईल. म्हणून संगणकाचे सर्व भागांचे एकत्रितपणे चे कार्य व्यवस्थित पार पडावे यासाठी मदरबोर्ड हा खूप गरजेचा आहे.

 मदरबोर्ड चे मुख्य कार्य काय आहे?

उत्तर – मदरबोर्ड चे मुख्य कार्य आहे संगणकाच्या सर्व भागांना एकत्रित पणे जोडणे आणि त्यामध्ये व्यवस्थापन करून संगणकाचे कार्यक्षमता सुधारणे. मदरबोर्ड मुळे संगणकाचे वेगवेगळे कार्य होण्यास मदत होते कारण मदरबोर्ड हा संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना जोडण्याचे काम करतो आणि त्यामुळे त्या भागांमध्ये डाटा ट्रान्सफर च्या प्रक्रियेला हा मदत करतो . तसेच मदरबोर्ड मुळे संगणकाचे सर्व भाग एकत्रितपणे आणि व्यवस्थितपणे कार्य पार पाडतात.

 मदरबोर्ड आणि सीपीयू सारखेच आहेत का?

उत्तर – मदरबोर्ड आणि सीपीयू हे सारखे नाहीत कारण मदरबोर्ड हा संगणकाच्या विविध भागांना जोडण्याचे काम करतो तर सीपीयू किंवा प्रोसेसर हा संगणकामधील विविध माहितीचे व्यवस्थापन करतो व माहितीचे प्रक्रिया करण्याचे काम करतो.

 मदरबोर्ड चा शोध कोणी लावला?

उत्तर – मदरबोर्ड चा शोध सन 1981 मध्ये आयबीएम या संगणक निर्मिती करणाऱ्या कंपनीने लावला.

 मदरबोर्ड चे प्रकार कोणकोणते आहेत?

उत्तर – मदरबोर्ड च्या आकारमान व रचनेनुसार मदरबोर्ड चे वेगवेगळे प्रकार पडतात त्यामध्ये मुख्य आहेत AT motherboard, ATX motherboard, baby AT motherboard, Mini ITX motherbord, BTX मदरबोर्ड, Pico BTX मदरबोर्ड., LPX मदरबोर्ड, XT मदरबोर्ड 

 मदरबोर्ड चे दुसरे नाव काय आहे?

उत्तर – मदरबोर्डलाच Main board असे संबोधले जाते.

  हे देखील वाचा🙄

{IMP}WWW / वेब विषयी संपूर्ण माहिती.

 संगणकामध्ये फंक्शन keys काय आहेत आणि त्यांचे कार्य 

 सारांश/ conclusion

 मदरबोर्ड चा उपयोग संगणकाचे सर्व भाग एकमेकांना जोडणे साठी होतो. मदरबोर्ड च्या मदतीने संगणकाचे सर्व भाग एकमेकांसोबत Intract होतात आणि त्यामुळे संगणक अधिक कार्यशील बनतो. जर मदरबोर्ड नसता तर संगणकाचे कार्य करण्याची क्षमता खूप कमी झाली असती त्यामुळे संगणकामध्ये मदरबोर्ड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे.

 आपण या लेखामध्ये संगणकाच्या मदरबोर्ड विषयी अत्यंत महत्वाची माहिती बघितली आपण बघितले की संगणका मध्ये मदरबोर्ड म्हणजे काय ( what is motherboard in Marathi ) . आपण मदरबोर्ड च्या विविध प्रकारांविषयी माहिती बघितली तसेच आपण मदरबोर्ड चे विविध घटक देखील जाणून घेतले आपल्याला मदरबोर्ड च्या कार्याविषयी माहिती मिळाली तसेच आपण उत्तम मदरबोर्ड कसा निवडायचा हे देखील शिकलो. आपण सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न तसेच आपल्या मनातील काही उपस्थित प्रश्नदेखील दूर केले.

 हा लेख वाचून तुम्हाला कसे वाटले हे टिपणी द्वारे आम्हाला नक्की कळवा तसेच या लेखामध्ये काही भाग चुकीचा असेल किंवा काही भागांमध्ये बदल करायचा असेल तर तुमची प्रत्येक टिप्पणीही स्वीकारली जाईल.

आपला दिवस शुभ असो ! धन्यवाद…

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *