आपण जेव्हा आपण संगणकाचे नाव घेतो तेव्हा आपल्या डोळ्यांपुढे संगणकाचा एक भाग कायम येतो ज्याला आपण सीपीयू असे म्हणतो. लहानपणापासून आपण सीपीयू ला संगणकाचा एक मुख्य भाग म्हणून ओळखला आलो आहे. त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेऊ संगणकाचा सीपीयु म्हणजे काय? सी पी यु ची माहिती मराठीत cpu information in marathi.
सीपीयु चा उपयोग संगणक मध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. सीपीयू च्या मदतीने संगणकातील सर्व हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर उपक्रमांच्या निर्देशांना सांभाळण्याचे काम केले जाते तसेच सीपीयू मुळेच उपभोक्त्याला त्याचा आवश्यक परिणाम मिळतो. उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा आपण संगणकामध्ये इंटरनेटवर गुगल क्रोम उघडण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या पुढे गुगल चे मुख्यपान येते तेव्हा त्या कार्यामागे सीपीयू काम करत असतो.
CPU याचे कार्य खूपच सोपे आहे सीपीयू उपभोक्त्या कडून इनपुट घेऊन त्यावर कार्य करतो आणि उपभोक्त्याला त्यावर आऊटपुट देतो. त्यासाठी संगणकाचे विविध भाग सीपीयू ला मदत करतात व त्या उपकरणांना नियंत्रित ठेवण्याचे काम cpu करतो.
अनुक्रमणिका
सीपीयू काय आहे | what is CPU in Marathi
सीपीयू चा इतिहास
सीपीयू चे कार्य
सीपीयू चे विविध घटक
CPU cores
सीपीयू कसे काम करतो
सीपीयू चे काही महत्त्वाचे मॉडेल
सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न
सारांश
सी.पी.यु ची माहिती मराठी मध्ये » cpu information in marathi
सीपीयू संगणकाचा महत्वाचा भाग आहे ज्याला प्रोसेसर मायक्रोप्रोसेसर किंवा केवळ सीपीयू देखील म्हटले जाते. सीपीयू संगणकाशी निगडीत सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर, उपभोक्ता आणि इनपुट आणि आऊटपुट उपकरणांद्वारे प्राप्त माहिती आणि निर्देशांकाचे संचालन करतो. तसेच सीपीयू च्या द्वारे ऑपरेटिंग सिस्टीम आणि अन्य प्रोग्राम यांचे संचलन पण होते. CPU हा संगणकाचा मेंदू आहे.
सीपीयू चा फुल फॉर्म ( विस्तारित रूप ) आहे Central Processing Unit. सीपीयू चा उपयोग हा मदरबोर्ड च्या सहाय्याने होतो. म्हणजे मदरबोर्ड मध्ये सीपीयू साठी Socket असते त्यामध्ये सीपीयू किंवा प्रोसेसर किंवा मायक्रोप्रोसेसर बसवलेला असतो. सीपीयू मध्ये अन्य घटक देखील आहेत जसे की मेमरी, कंट्रोल युनिट.
जेव्हा आपल्याला संगणकामध्ये multitasking करायची असते तेव्हा आपल्याला सीपीयू कोर ची मदत होते. CPU कोर लहान लहान ट्रांजिस्टर चे बनलेले असतात त्या ट्रांजिस्टर ची संख्या काही लाख असू शकते. संगणकामध्ये multitasking करण्यासाठी कमीत कमी दोन कोर चा सीपीयू असणे गरजेचे असते.
सी.पी.यू. चा इतिहास | history of CPU in Marathi
कोणत्याही गोष्टीचे संपूर्ण माहिती होण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे सीपीयू चा इतिहास अत्यंत मनोरंजक राहिला आहे.
सी.पी.यु ची माहिती मराठी मध्ये जाणून घेताना आपल्याला समजते वेळेनुसार सीपीयू मध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले गेले आहे आणि मागच्या काही काळात सीपीयू च्या रचनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे तो पुढील प्रमाणे
ETL Mark III-
याची निर्मिती सन 1954 ला सुरुवात झाली आणि 1956 ला पूर्ण झाली. हा एक transistor च्या आधारित संगणक होता जो असे मानले जाते की जगातील असा पहिला संगणक होता ज्यामध्ये ट्रांजिस्टर चा उपयोग चांगल्या प्रकारे केला गेला होता आणि विविध प्रोग्राम स्टोअर केले केले होते.
1960- Electronic clock and calculator
जेव्हा दुसऱ्या महायुद्धाला काही काळ संपला होता आणि जगातील अनेक देश विकासाच्या दिशेने पाऊल टाकत होते तेव्हा जपान च्या एका शोधाने संपूर्ण विश्वच बदलून टाकले जपान ने 1960 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॅल्क्युलेटर आणि इलेक्ट्रॉनिक घड्याळ यांचा शोध लावला जो पुढे जगाच्या दृष्टीने अत्यंत कल्याणकारी शोध ठरला आहे.
1971 -intel 4004
1971 मध्ये या जगातील पहिला सीपीयू बनवण्याची घोषणा केली केली जो होता intel 4004 या सीपीयू मध्ये 92000 सूचना एका वेळेस पूर्ण करण्याची क्षमता होती. या प्रोसेसर मध्ये जवळपास 4kb program memory आणि 640 byte RAM मेमरी ची व्यवस्था होती. या प्रोसेसरचा मुख्य उद्देश हा याचा उपयोग कॅल्क्युलेटर आणि एटीएम मशीन मध्ये करण्यासाठी केला गेला होता.
Note- 1kb = 1024 bytes(in binary)
1972- iAPX 8008-
यामध्ये iPAX चा अर्थ होतो intel Advanced Performance Architecture. हा जगातील पहिला 16-bit असलेला प्रोसेसर किंवा सीपीयू होता.
1974 – iAPX 8080 –
हा पहिला सीपीयू होता ज्याचा उपयोग संगणकामध्ये करण्यात आला. या सीपीयु चा उपयोग IBM 5150 संगणकामध्ये करण्यात आला. हा 8 बीटचा प्रोसेसर होता. या प्रोसेसर मध्ये एक त्रुटी होती की हा प्रोसेसर फक्त कमी पॉवर वाल्या device मध्ये उपयोगी होता . नंतर या प्रोसेसर मध्ये त्रुटी कमी करून iAPX 8080A ह्या प्रोसेसर चे निर्माण करण्यात आले.
1981 iAPX 432-
हा इंटेल कंपनीद्वारे निर्माण करण्यात आलेला पहिला 32-bit चा प्रोसेसर होता. यामध्ये तीन चिप चा उपयोग केला गेला होता. या प्रोसेसर मध्ये ट्रांजिस्टर आणि vocume tube चा उपयोग केला गेला होता. या प्रोसेसरचा जास्त उपयोग झाला नाही हा processor फेल गेला .
सीपीयू चे कार्य | function of cpu information in marathi
सी.पी.यु ची माहिती मराठी मध्ये जाणून घेताना आपल्याला सीपीयू चे कार्य माहित असणे गरजेचे आहे.जसे की मी पहिले पण सांगितले आहे सीपीयू हा संगणकाचा मेंदू आहे. संगणकाचे सर्व कार्य हे सीपीयू च्या मदतीने होतात. जेव्हा उपभोक्ता हा संगणकाला input स्वरूपात काही निर्देश देतो ती माहिती सीपीयु मधून पास होतात आणि त्या वरती सीपीयू प्रक्रिया करून उपभोक्त्याला आवश्यक असलेला परिणाम दाखवतो.
सीपीयू मधील सर्व कार्य आहे Binary number च्या सहाय्याने होतात. उदाहरण द्यायचे झाले तर जेव्हा आपल्याला काही अंकांमध्ये बेरीज करायची असते तेव्हा त्याचे निर्देश सीपीयू कडे पाठवले जातात cpu ते निर्देश Arithmetic Logic Unit(ALU) कडे पाठवतो.
ALU हा सर्व गणिताचे कार्य करण्यासाठी उपयुक्त असतो. ALU मिळालेला binary number चे रूपांतर उत्तराच्या Binary नंबर मध्ये करतो आणि ते उत्तर cpu कडे पाठवतो. सीपीयू त्याचे रूपांतर उपभोक्त्याला वाचता येईल अशा सोप्या भाषेत करून उपभोक्त्याला दाखवतो.
- सीपीयू ला संगणकाचा मेंदू असे संबोधले जाते. CPU हा संगणकाचे सर्व कार्य करण्यासाठी उपयुक्त आहे.
- सीपीयू हा संगणकामधील सर्व प्रकारच्या माहितीवर प्रक्रिया करण्याचे कार्य करतो.
- सीपीयू हा माहितीचे जतन करतो आणि उपभोक्त्याच्या निर्देशानुसार परिणाम दाखवतो
- सीपीयू हा संगणकाच्या सर्व भागांच्या क्रियेवर नियंत्रण ठेवतो
CPU चे विविध घटक | components of cpu information in marathi –
सीपीयु चे तीन मुख्य घटक आहे जे आहेत मेमरी युनिट, Arithmetic Logic युनिट आणि Control युनिट. यामध्ये प्रत्येक घटकाचे कार्य हे वेगवेगळे आहे. उदाहरणार्थ मेमरी युनिट चे कार्य आहे माहितीची साठवणूक करणे.आणि या सर्व घटकांच्या आधारावर सीपीयू हा संगणकाला अधिक कार्यक्षम बनवत असतो.
Memory unit –
या घटकाचे मुख्य कार्य आहे माहितीची साठवणूक करणे आणि आवश्यक वेळेस त्या माहितीचा उपयोग सीपीयू साठी करून देणे. या मध्ये दोन प्रकारची मेमरी असते एक आहे Primary Memory जे कि सीपीयू मध्ये असते आणि दुसरी आहे External memory – अशी मेमरी जी चा उपयोग बाह्य उपकरणांद्वारे केला जातो.
Internal memory( अंतर्गत मेमरी ) लाच प्राथमिक मेमरी असे संबोधले जाते. Internal memory मध्ये RAM आणि ROM चा समावेश होतो. मेमरी च्या आकारमानानुसार संगणकाची गती प्रभावित होते. संगणकाची ताकद आणि क्षमता देखील मेमरी युनिटच ठरवत असते.
मेमरी युनिट चे कार्य –
1. मेमरी युनिट चा उपयोग संगणकामधील सर्व माहिती आणि निर्देशांना साठवण्यासाठी होतो.
2. मेमरी युनिट चा उपयोग अल्पकाळासाठी माहितीचा साठवणूक करण्यासाठी होतो ज्यासाठी RAM memory चा उपयोग होतो. ही माहिती संगणक बंद झाल्यानंतर आपोआप मिटवली जाते.
3. मेमरी युनिटचा उपयोग कायमस्वरूपी माहिती साठवण्यासाठी देखील होतो यासाठी ROM चा उपयोग होतो.
4. संगणका मधील सर्व इनपुट आणि आऊटपुट उपकरणांना दिले जाणारे निर्देश हे मुख्य मेमरी मधूनच पास होतात.
Control unit –
या युनिट चे कार्य आहे संगणकामधील क्रियांवरती नियंत्रण ठेवणे. या unit चे मुख्य कार्य आहे मेमरी युनिट आणि Arithmetic Logic Unit तसेच इनपुट आणि आऊटपुट उपकरणांच्या कार्यावर लक्ष ठेवून उपभोगत्याच्या संदेशानुसार संगणकाचे कार्य घडून आणणे.
कंट्रोल युनिट चे कार्य असे आहे की तो उपभोगत्याकडून सिग्नल प्राप्त करून central processors कडे पाठवतो आणि सेंट्रल प्रोसेसर त्यावरती action घेऊन हार्डवेअर उपकरणांना निर्देश देतो .control unit चे दोन मुख्य प्रकार आहेत – Hardwired control unit आणि micro-programmable control unit.
Control unit चे कार्य –
- कंट्रोल युनिट च्या मदतीने संगणकामधील माहितीचे योग्य प्रकारे नियोजन केले जाते आणि संगणकामधील विविध भागांना निर्देश दिले जातात.
- हे प्रोसेसर मधील data flow चे नियंत्रण करतो.
- याच्या मदतीने संगणका मधील विविध विभागांमध्ये समन्वय साधला जातो.
- कंट्रोल युनिट चा उपयोगाने संगणकाचे सर्व कामे केली जातात याच्या मदतीने Fetch, decode आणि execution चे कार्य केले जाते .
- कंट्रोल युनिट हे उपभोक्त्या कडून इनपुट उपकरणांद्वारे माहिती घेते त्यावर ती प्रक्रिया करते व आउटपुट उपकरणांद्वारे उपयुक्त माहिती प्रदान करते.
- Control unit हे माहितीवर प्रक्रिया करते पण माहिती साठवण्याचे कार्य करत नाही तर माहिती साठवण्याचे कार्य मेमरी unit द्वारे केले जाते.
- कंट्रोल युनिट हे बाहेरच्या निर्देशकाकडून निर्देश स्वीकारते आणि त्याचे रूपांतर Series of computer signals मध्ये करते.
- थोडक्यात सांगायचे झाले तर कंट्रोल युनिट च्या मदतीने संगणकातील सर्व भागांना नियंत्रित केले जाते व संगणकाकडून कार्य करून घेतले जाते
Arithmetic Logic Unit (ALU)-
हा कोणताही एक भाग नसून दोन भागांचे मिश्रण आहे जे आहेत * Arithmetic unit आणि Logic unit. या युनिटमध्ये Arithmetic भाग हा गणिताचे कार्य जसे कि बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी उपयुक्त आहे तर Logic unit हे And, Or, Not इत्यादी Logic operations करण्यासाठी उपयुक्त आहे .
ALU चे कार्य –
Arithmetic operations –
ALU चा उपयोग मुख्यतः बेरीज आणि वजाबाकी करण्यासाठी होतो. याद्वारे गुणाकार आणि भागाकार देखील केला जाऊ शकतो पण ते जरा अवघड काम आहे त्यासाठी आपण repeated बेरीज / वजाबाकी चा देखील उपयोग करू शकतो. याच्या मदतीने काही complex operations देखील केले जातात.
Logic operations –
संगणकामध्ये् तर्क आणि वितर्क लावून विविध संगणकीय कार्य केले जातात. ज्यामध्ये And, Or आणि Not चा समावेश होतो. सोप्या भाषेत सांगायचेेेेेेेेेेेेेे झाले तर And चा उपयोग जेव्हा सर्व test pass होतील तेव्हाच होतो आणि और चा उपयोग जर-तर च्या क्रिया करण्यासाठी होतो रण्यासाठी होतो.
Bit shift –
Bit shift चा उपयोग bit ला डावीकडे किंवा उजवीकडे सरकावण्या साठी होतो याचे मुख्य कार्य हे गुणाकार आणि भागाकार मध्ये होते.
System bus-
जेव्हा उपभोक्ता संगणकाला काही निर्देश देतो तेव्हा ते निर्देश मेमरी पर्यंत येणे खूप गरजेचे असते व जेवढ्या स्पीडने ते मेमरी पर्यंत येतील तेवढ्या स्पीडने पुढे संगणक उपभोक्त्याला परिणाम दाखविल. व या महत्त्वाच्या कार्यासाठी System bus चा उपयोग केला जातो.
System bus हे वायर आणि कनेक्टर चे मिश्रण असते ज्याद्वारे संगणकाच्या इनपुट आणि आऊटपुट उपकराना मधील माहिती सीपीयू पर्यंत पाठवले जाते आणि cpu चे निर्देश या उपकरणावर पाठविले जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर system bus हे data च्या दळणवळणाचे काम करते.
System bus चे कार्यानुसार तीन प्रकार पडतात जे आहेत –
1. Adress bus- याचा उपयोग निर्देश संगणकाच्या इनपुट आणि आऊटपुट परिणाम पासून सीपीयू पर्यंत पाठवण्यासाठी व परत नेण्यासाठी होतो
2. Data bus- Data bus चा उपयोग संगणकामध्ये माहितीचे दळणवळण करण्यासाठी होतो.
3. Central bus –
याचा उपयोग संगणकामधील नियंत्रण संदेश सीपीयू पासून संगणकाच्या इतर भागांत पर्यंत नेण्यासाठी होतो
CPU cores काय असतात? —
आजच्या आधुनिक सीपीयू मध्ये hyper thread चा उपयोग केला जातो म्हणजेच virtual cores निर्माण करून संगणकाच्या कार्यक्षमता वाढवली जाते. उदाहरण द्यायचे झाले तर AMD ज्या सीपीयू मध्ये 4 cores असतील तर तो virtually 8 cores निर्माण करून संगणकाची कार्यक्षमता वाढवतो.
Single core-
जुन्याकाळी या प्रकारचे सीपीयू मोठ्या प्रमाणात आढळत होते. या सीपीयू मध्ये एकाच कोर चा वापर केला जात होता त्यामुळे ते जास्त कार्य एकावेळेस करण्यास सक्षम नव्हते.या core करून बनवले गेलेल्या संगणकाची गती खूप कमी होती कारण यामध्येेेेेेेेेेेेेेेेेेे एका वेळेस एकच केले जात होते आणि multitasking ability चा अभाव होता.हे cpu 1970 च्या काळात वापरले जात होते.
Dual core cpu-
जेव्हा एकाच प्रोसेसरचा उपयोगामुळे संगणकाच्या गतीमध्ये खूप प्रभाव पडला होतात तेव्हा संगणकाची गती वाढविण्यासाठी आणि संगणकाचे कार्य जलद गतीने व्हावे यासाठी दोन प्रोसेसरचा एका चीप मध्ये उपयोग करण्याचे ठरविण्यात आले आणि त्यालाच dual core सीपीयू म्हटले जाते. या dual core सीपीयू मध्ये दोन प्रोसेसरची ताकद असते.
यामध्ये प्रत्येक प्रोसेसर चे घटक वेगळे असतात प्रत्येक प्रोसेसर चे कार्य वेगवेगळे असते परंतु ते एकमेकांना जोडले गेले असल्यामुळे ते एकत्रितपणे संगणकाची गती वाढवतात आणि एकाच वेळेस जास्त कार्य करण्याची क्षमता ठेवतात.
उदाहरण –AMD X2, intel core duo, AMD athlon 64, A4-3300, intel Pentium dual इत्यादी
Quad core प्रोसेसर-
या प्रकारच्या प्रोसेसर मध्ये चार प्रोसेसर एकाच chip मध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे याला quad core processor म्हणतात . याची multitasking ability हि dual core प्रोसेसर पेक्षा चांगली असते. यामध्ये चार प्रोसेसर हे एकाच वेळेस काम करतात .
उदाहरण – intel nehalam, Intel core 2 quad, AMD phenom X4 इत्यादी
Hexa core processor –
या प्रकारच्या processor मध्ये 6 प्रोसेसर हे एकाच chip मध्ये बसवलेले असतात म्हणून याला hexa core processor असे संबोधले जाते.
उदाहरण-intel Xeon W2135, intel processor
Octa core –
यामध्ये आठ प्रोसेसर चा उपयोग एकाच वेळी मध्ये केला जातो ज्यामुळे संगणक अधिक कार्यक्षम बनतो आणि आठ प्रोसेसर एका वेळेस वेगवेगळे कार्य करत असल्यामुळे संगणकाची कार्यक्षमता वाढते.
उदाहरण – AMD Pro-1700X, intel i7-9800X, AMD 2700 इत्यादी .
सीपीयू कसा काम करतो =
सीपीयू चे मुख्य कार्य आहे उपभोक्ता कडून निर्देश किंवा सूचना घेऊन त्यावरती अंमलबजावणी करून संगणकाच्या विविध भागांना उपभोक्त्याच्या निर्देशानुसार काम करायला लावणे. हे काम सीपीयू 3 Phases मध्ये करतो ज्या आहेत
1. Fetch-
उपभोक्ताने सांगितलेले निर्देशन वर काम करण्यासाठी सीपीयू हा RAM memory कडून माहिती घेतो त्याला fetch असे म्हणतात
2. Decode –
जेव्हा input data प्रोसेस ला तयार होतो तेव्हा त्याचे छोट्या छोट्या भागात रूपांतर केले जाते यासाठी बाइनरी नंबर ची व्यवस्था असते आणि नंतर ती माहिती लॉजिक युनिट कडे पाठवली जाते.
3. Execute-
यामध्ये सीपीयू चा कंट्रोल युनिट माहितीचे रूपांतर signal chain मध्ये करतो आणि ते सिग्नल उपभोक्त्याच्या आवश्यकतेनुसार आउटपुट उपकरण कडे पाठवले जातात आणि संगणक त्यावर कार्य करून उपयोग त्याला आवश्यक असलेला परिणाम दाखवतो.
सीपीयू चे विविध लोकप्रिय मॉडेल –
सीपीयू मध्ये काळानुसार खूप बदल झाला आहे आधी cpu चे कार्य खूप तोडके आणि छोट्या रूपात होते परंतु आता सीपीयू हा multifunctional झाला आहे त्यामुळे त्याच्या मॉडेल मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे हे मॉडेल आवश्यक असलेल्या मदरबोर्ड ला सपोर्ट करणारे असतात. आपण मुख्यता जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या दोन सीपीयू निर्माता कंपनीच्या model ची माहिती बघू –
Intel core प्रोसेसर्स –
या प्रोसेसरची सुरुवात 2006 साधी इंटेल कंपनीद्वारे करण्यात आली नंतर Intel द्वारे core i series ची सुरुवात करण्यात आली. याच्या आधी इंटेलचे Core duo आणि solo cpu होते.
1. Core i3-
यामध्ये 2/4 cores असतात तसेच याचे स्पीड दीड ते साडेतीन GHz असते. यामध्ये 3MB ते 4MB catch मेमरी असते. हे प्रोसेसर मदरबोर्ड ला फिट बसण्यासाठी LGA 1150 किंवा LGA 1155 चे socket योग्य असते.
उदाहरण – Intel core 2105 intel core 2125
2. Core i5-
या प्रोसेसर मध्ये 6 cores असतात. सर्वात पहिल्या core i5 प्रोसेसर ची रचना 2009 मध्ये इंटेल कंपनी द्वारे करण्यात आली. याचे speed 1.90 ते 3.80 GHz असते. यामध्ये काही. DDR3 1333 किंवा DDR3 1600 हि RAM सर्वात जास्त या प्रोसेसर मध्ये वापरली जाते .
उदाहरण – intel core i5 9400F, Intel Core i5-7500 LGA 1151 7th Gen Core Desktop Processor इत्यादी.
3. Core i7-
याच्या एकूण 8 generation आहेत. याचे speed 2.6 ते 3.7 GHz आहे. यामध्ये 4 किंवा 6 cores असतात. हा एक multi functioning processor आहे. याचा उपयोग खूप साऱ्या संगणकांमध्ये होतो.
उदाहरण – intel core i7-11370H, intel core i7-11375H इत्यादी
4. Core i9 –
या प्रोसेसर मध्ये Hyper thread तंत्रज्ञानाचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला गेला आहे यामध्ये एक core हा virtually 2 core निर्माण करत असतो. याची सुरुवात सन 2017 पासून झाली. यामध्ये 3.3 ते 4.5 GHz speed प्रधान केले केले आहे. ह्याचा उपयोग नवनवीन संगणकाच्या तंत्रज्ञानामध्ये केला गेला आहे.
AMD processor’s series –
यामध्ये AMD चे विस्तारित रूप आहे Advanced Micro Devices. याची स्थापना सन 1969 मध्ये करण्यात आली व त्यांनी पहिला प्रोसेसर 1991 मध्ये दुनिया पुढे आणला. AMD जगातील दुसरी सर्वात मोठी सीपीयू निर्माता कंपनी आहे
1991 मध्ये दुनिया पुढे आणला गेलेला यांच्या प्रोसेसर चे नाव होते AM386
सन 2000 मध्ये AMD या कंपनीने NextGen कंपनी हस्तगत केली . AMD जगातील पहिली कंपनी ठरली जिने 1GHz गतीचा सीपीयू बनवला.
सण 2003 मध्ये कंपनी ने Opteron chip चे निर्माण करून जगाला पुन्हा आपली उपयोगिता दाखवून दिली.
24 जुलै 2006 ला एमडी कंपनीने घोषणा केली की तिने ATI ही graphics card निर्माता कंपनी हस्तगत केली आहे.
AMD ची zen2, zen 3 तसेच zen + core series मुळे AMD चा आज जगामध्ये बोलबाला आहे.
Intel आणि AMD व्यतिरिक्त देखील या जगामध्ये खूप साऱ्या चांगल्या सीपीयू निर्माता कंपन्या आहेत परंतु आपण present trend आणि कार्यक्षेत्राच्या आधारावर फक्त Intel आणि AMD सीपीयू चे कार्य बघितले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार दररोज सीपीयू मध्ये नवनवीन शोध लागत आहे आणि ज्यामुळे संगणकाचे कार्य सुधारत आहे तसेच चांगले सीपीयू देखील आता कमी किमतीमध्ये मिळणे शक्य झाले आहे जे आधी फक्त कल्पनामात्र होते.
खूप जास्त वेळा विचारले गेलेले प्रश्न | FAQ-
CPU father म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर – Charles babbage यांना cpu father म्हणून ओळखले जाते.
सीपीयू कसे कार्य करते?
उत्तर – सीपीयू संगणकाद्वारे उपभोक्त्या ने दिलेल्या निर्देशांचे पालन करून उपभोक्त्याला आवश्यक असलेला परिणाम दाखवण्याचे कार्य करते
सीपीयू चा आविष्कार कोणी केला ?
उत्तर – सीपीयू चे basic architecture “Ted Hoff” यांनी केले तर सीपीयू चे निर्माण Federico Feggin यांनी केले.
सीपीयु म्हणजे काय?
उत्तर – सीपीयू लाच प्रोसेसर असे देखील म्हटले जाते. सीपीयू हा संगणकाचा मेंदू आहे. तो इनपुट उपकरणांद्वारे उपभोक्त्या ने दिलेले निर्देश, सूचनांचे पालन करून उपभोक्त्याला आवश्यक परिणाम दाखवण्यासाठी उपयुक्त आहे.
एकाच सीपीयू ला अनेक संगणक कसे जोडावेत?
उत्तर – एकाच सीपीयू ला अनेक संगणक जोडण्यासाठी ASTER multimonitor software चा उपयोग केला जातो .
हे पण नक्की वाचा 🙄
(IMP)कीबोर्ड विषयी संपूर्ण माहिती | कि-बोर्ड वरील विविध keys आणि आणखी बरेच
कीबोर्ड वरील फंक्शन की चे कार्य | माहिती
सारांश/ conclusion –
संगणकाचा सीपीयू हा संगणकाचा मेंदू म्हणून ओळखला जातो. सीपीयू च्या मदतीने सर्व इनपुट आणि आऊटपुट उपकरणांचे कार्य सुरळीत चालतात. सीपीयू च्या मदतीने संगणक कार्यक्षम होतो आणि उपभोक्त्याला आवश्यक असलेले परिणाम दाखवतो. आपण या लेखात जाणून घेतले की सीपीयू काय आहे? सी.पी.यु ची माहिती मराठी मध्ये / cpu information in marathi? सीपीयू चा इतिहास, सीपीयू चे कार्य, cores, घटक आणि विविध models.
जर तुम्हाला या संगणकाच्या सी.पी.यु ची माहिती मराठी मध्ये » cpu information in marathi या लेखामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा या लेखामध्ये काही बदलाव इच्छित असेल तर तुम्ही टिपणी द्वारे आम्हाला सांगू शकता. तसेच हा लेख तुम्हाला कसा वाटला हे देखील टिपणी द्वारे आम्हाला कळवा.
आपला दिवस शुभ असो ! धन्यवाद….