Computer virus म्हणजे काय | computer virus in marathi

Advertisements

 तुम्हाला माहित आहे का कॉम्प्युटर व्हायरस म्हणजे काय ( what is computer virus in marathi ). आपण सर्वांनी संगणकाचा उपयोग करतांना कॉम्प्युटर व्हायरस विषयी नक्की ऐकले असेल व कॉम्प्युटर व्हायरस विषयी कुतूहल देखील आपल्या मनात असते.

विविध हॅकर्स कॉम्प्युटर व्हायरस च्या मदतीने संगणकामधील वेगवेगळी माहिती चोरत असतात व संगणकाला नुकसान करत असतात. संगणक व्हायरस विविध प्रोग्रॅम चे बनलेली असतात जे संगणकासाठी धोकादायक असतात .

ज्याप्रकारे एखादा व्हायरस मानवी शरीराला धोकादायक असतो त्याचप्रमाणे संगणक व्हायरस संगणकासाठी धोकादायक असतात जे संगणकाच्या सिस्टम मध्ये घुसून संगणकाचे विविध भाग जसे की सी.पि.यु. , रॅम ,रोम तसेच इत्यादी भागांना प्रभावित करत असतात.

कॉम्प्युटर व्हायरस मुळे आपल्या वैयक्तिक तसेच सामाजिक माहितीला धोका असतो परंतु आपल्याला माहीत नसते की कॉम्प्युटर व्हायरस आपल्या संगणकामध्ये कशाप्रकारे प्रवेश करतो व कॉम्प्युटर व्हायरस संगणकामध्ये कशाप्रकारे पसरतो.

त्यामुळेच आजच्या लेखात आपण कॉम्प्युटर व्हायरस विषयी माहिती जाणून घेऊया. मला आशा आहे तुम्हाला या लेखाद्वारे कॉम्प्युटर व्हायरस विषयी अधिक माहिती जाणून घ्यायला मिळेल.

अनुक्रमणिका ↕
Computer virus म्हणजे काय

कॉम्प्युटर व्हायरस म्हणजे काय ( what is computer virus in marathi )

कॉम्प्युटर व्हायरस हे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतात जे संगणक वापरकर्त्याच्या अनुमती विना संगणकामध्ये प्रवेश करतात आणि संगणकाच्या डेटा किंवा कार्यक्षमतेला हानी पोहोचवतात.

 कॉम्प्युटर व्हायरस चा उद्देश संगणकाच्या कार्यक्षमते मध्ये व्यत्यय आणणे असतो जेणेकरून संगणकामधील डेटा loss होईल किंवा डेटा चे नुकसान होईल. कॉम्पुटर virus हे विविध संगणक सिस्टिम बरोबर अनुरूप असतात जेणेकरून ते सहज विविध संगणकामध्ये पसरू शकतील.

 कॉम्प्युटर व्हायरस डॉक्युमेंट किंवा सॉफ्टवेअरच्या च्या मदतीने ई-मेल, ड्राईव्ह, नेटवर्क, तसेच फाईल शेअर च्या माध्यमातून पसरू शकतात. कॉम्प्युटर व्हायरस मुख्यता कार्यान्वयीत करण्यायोग्य होस्ट फाईल बरोबर जोडलेले असतात त्यामुळे होस्ट फाईल ओपन केल्यावर संगणक कॉम्प्युटर वायरस ने संक्रमित होतात .

संगणक व्हायरस चा इतिहास

जगातील पहिल्या कम्प्युटर व्हायरसचा शोध 1971 मध्ये BBN technology या अमेरिकन कंपनीने लावला या वायरस चे नाव Creeper system असे ठेवले गेले हा व्हायरस हार्ड डिक्स मधील डेटा क्षमतेपेक्षा जास्त भरून संगणकाला अकार्यक्षम बनवत होता.

Brain हा MS-DOS साठी बनवलेला जगातील पहिला  virus होता. हा व्हायरस 1986 साली रिलीज केला गेला. हा व्हायरस फ्लॉपी डिस्कच्या बूट सेक्टर ला overwrite करून संगणकाला बुटींग पासून थांबवत होता. या वायरस ची निर्मिती पाकिस्तानच्या दोन भावांद्वारे करण्यात आली.

जगात पहिल्यांदा सर्वात जास्त प्रसार झालेल्या व्हायरसचे नाव The Morris आहे व हा वायरस 1988 साली रिलीज केला गेला. या व्हायरस चे निर्माण रॉबर्ट मॉरीस या Cornel university च्या विद्यार्थ्याद्वारे करण्यात आले. या वायरस ने 15 तासात 15 हजार पेक्षा जास्त संगणकांना संक्रमित केले.

सन 1998 मध्ये तैवान च्या विद्यार्थ्या द्वारे या CIH वायरस चे निर्माण करण्यात आले. या वायरस ने 60 मिलियन पेक्षा जास्त संगणकांना संक्रमित केले. हा व्हायरस संगणकामधील महत्त्वाच्या सिस्टिम फाईल overwrite करून संगणकाच्या कार्यक्षमतेमध्ये अडथळा आणत होता.

आजच्या तंत्रज्ञानामध्ये दररोज नवनवीन व्हायरस चा शोध लागत आहे व संगणक व्हायरस ची संख्या दरवर्षी वाढत चालली आहे.

कॉम्पुटर व्हायरस चे प्रकार

कॉम्प्युटर व्हायरस मधील तंत्रज्ञानानुसार व कार्यप्रणाली नुसार कॉम्प्युटर व्हायरस चे 12 प्रकार पुढील प्रमाणे –

Boot sector virus

Stealth virus

Macro virus

Direct action virus

Polymorphic virus

Resident and non resident virus

Browser highjacker virus 

File infector virus 

Overwrite virus

Cavity virus 

CMOS virus 

Encrypt virus

Boot sector virus

बूट सेक्टर वायरस हार्ड डिस्क मधील मास्टर बुट रेकॉर्ड ला हानी पोहोचवून संगणकाच्या कार्य प्रणाली मध्ये अडथळा आणतो. बूट सेक्टर व्हायरस मुळे संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम सुरू होण्यास अडथळा निर्माण होतो. एकदा हार्ड डिस्क वर अटॅक केल्या नंतर बूट सेक्टर व्हायरस संगणकाशी निगडीत सर्व हार्डवेयर डिस्क प्रभावित करत असतो.

Stealth virus

Stealth व्हायरस संगणकाला वेगवेगळ्या प्रकारे संक्रमित करत असतो जसे की डाऊनलोड केलेल्या फाईल मार्फत, धोकादायक ई-मेल मार्फत , इंटरनेटवर उपस्थित वेगवेगळ्या वेबसाईट मार्फत तसेच वेगवेगळ्या सॉफ्टवेअर मार्फत हा व्हायरस संगणकामध्ये प्रवेश करतो. हा व्हायरस संगणकाची कार्यक्षमता प्रभावित करतो व त्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा अँटीव्हायरस पासून लपून राहण्यायोग्य कोडींग केलेला असतो.

Macro virus

Macro virus हा मॅक्रो कोडींग लैंग्वेज मध्ये बनवलेला असतो व त्याचे मुख्य लक्ष विविध सॉफ्टवेअर असतात तसेच काही मॅक्रो वायरस संगणकाला देखील संक्रमित करतात. मॅक्रो व्हायरस विविध फाईल किंवा डॉक्युमेंट मध्ये लपवून पाठवले जातात व अशा फाइल्स उघडल्यानंतर हा व्हायरस ऍक्टिव्ह होऊन संगणकाला नुकसान पोहोचवतो.

Direct action virus

जेव्हा एखाद्या धोकादायक वायरस ने संक्रमित असलेली फाइल एखाद्या संगणक वापरकर्त्या कडून उघडली जाते तेव्हा लगेचच संगणकाची कार्यक्षमता प्रभावित होते व संगणकाचे विविध भाग काही विशिष्ट ॲक्शन पर्यंत व्हायरस ने संक्रमित राहतात या व्हायरस ला डायरेक्ट ऍक्शन व्हायरस म्हणतात.

Polymorphic virus

पोलिमोर्फिक व्हायरस हा एक complicated व्हायरस आहे जो संगणकाच्या फंक्शन आणि डेटा टाइप ला प्रभावित करतो. हा व्हायरस स्कॅनर पासून वाचण्यासाठी स्वतःच्या प्रति निर्माण करतो. हा व्हायरस स्कॅनर द्वारे शोधण्यासाठी किचकट संगणक कोडींग करावी लागते.

Resident and non resident virus

जो व्हायरस संगणकाच्या रॅम मध्ये डिप्लोय होतो आणि रॅम  ला प्रभावित करून संगणकाची कार्यक्षमता बिघडवतो त्याला Resistant virus असे म्हणतात. Resistant व्हायरस चे मुख्य कार्यक्षेत्र रॅम असते. या उलट जे कॉम्प्युटर व्हायरस रॅम व्यतिरिक्त इतर कार्यक्षेत्रात कार्य करतात त्या व्हायरस ला non resident virus म्हणतात.

Browser highjacker virus

ब्राउजर हायजॅकर व्हायरस संगणकाच्या ब्राउझर ची सेटिंग संगणक वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय बदलत असतात आणि संगणक वापरकर्त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध विविध वेब वरील  वेबसाईटला पाठवत असतात. ब्राउजर हायजॅकर ला browser redirect virus असे देखील म्हटले जाते.

File infector virus

File infector virus हा संगणकाच्या मालवेअर चा प्रकार आहे जो संगणकाच्या विविध फाइल्स ला हानी पोहोचवून त्यांना निरोपयोगी बनवतो या व्हायरसमुळे मोठ्या प्रमाणावर डेटाचे नुकसान होते. फाईल इनफेक्टर व्हायरस विविध फाइल्स मधील कोडींग ला ओवर राईट करतो किंवा त्या फाइल्स मध्ये हानीकारक कोड इन्सर्ट करतो.

Overwrite virus

Overwrite virus हा एक हानिकारक कोडिंग प्रोग्राम असतो जो संगणकामध्ये उपस्थित असलेल्या फाइल्स च्या सॉफ्टवेअरमध्ये छेडछाड करून डेटा लीक करतो किंवा डेटा चे नुकसान करतो.

Cavity virus

काही कॉम्प्युटर व्हायरस हे फाइल्स ची साईज न वाढवता किंवा फाइल्स ला हानी न पोहोचवता कार्य करतात त्यांना के कॅव्हिटी वायरस म्हणतात. या व्हायरस मध्ये फाइल्स मधील निरुपयोगी असलेल्या भागाला बदलवून तेथे वायरस ची धोकादायक कोडींग इन्सर्ट केली जाते. उदाहरण – CIH virus 

CMOS virus

CMOS virus हे संगणकाचे virus आहे ज्यामध्ये CMOS मध्ये बदल घडवण्याची किंवा CMOS ला संक्रमित करण्याची क्षमता असते. जर संगणकाची हार्ड ड्राईव्ह मधील माहिती मिटवली गेली तरी हा व्हायरस संगणकामध्ये उपस्थित असू शकतो..

Encrypted virus

Encrypted virus हा व्हायरसचा प्रकार सर्वात धोकादायक वायरस मानला जातो कारण जेव्हा या वायरस ने संगणक प्रभावित होतो तेव्हा संगणकामधील सर्व माहिती encrypt केली जाते जाते. ज्यामुळे संगणक वापरकर्ता संगणकामधील महत्वाच्या माहिती चा उपयोग करू शकत नाही. या कॉम्प्युटर व्हायरस मुळे संगणकामधील उपस्थित असलेल्या सर्व पासवर्ड, फाइल्स, अकाउंट इत्यादी महत्त्वाच्या डेटा चे नुकसान होते. उदाहरण – Cryprn आणि Ransomware 

Computer virus कशाप्रकारे पसरतो

कॉम्प्युटर व्हायरस मुख्यतः हानिकारक ई-मेल,इंटरनेटवरून डाऊनलोड केलेल्या फाईल किंवा   बाहेरून जोडण्यायोग्य मेडिया उपकरण च्या माध्यमातून पसरतो. जरी इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरसचा प्रभाव संगणकावर होत असला तरी विविध अँटिव्हायरस च्या माध्यमातून आपण कॉम्प्युटर व्हायरसचा प्रादुर्भाव रोखू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्प्युटर व्हायरस चा संगणकावर अटॅक होत असतो.

ई-मेलच्या माध्यमातून कॉम्प्युटर व्हायरस चा प्रसार होतो परंतु कॉम्प्युटर व्हायरस चा प्रसार plain text द्वारे होणे अशक्य असते त्यामुळे कॉम्प्युटर वायरस च्या प्रसारासाठी इमेल सोबत फाईल अटॅचमेंट च्या माध्यमातून बाहेरच ने संक्रमित असलेली फाईल जोडून कॉम्प्युटर व्हायरस चा प्रसार केला जातो.

जेव्हा आपण इंटरनेटवरून वेगवेगळ्या फाईल डाऊनलोड करत असतो तेव्हा आपण त्या फाईल्स सोबत असलेली कोडींग अप्रत्यक्षरीत्या संगणकामध्ये इन्स्टॉल करत असतो. कधीकधी या फाईल्स मधील कोडींग ही धोकादायक व्हायरस ने संक्रमित असते व त्यामुळे आपल्या संगणकामध्ये संगणक विषाणूंचा प्रादुर्भाव होतो. 

कधी कधी आपण पेन ड्राईव्ह किंवा मेमरी कार्ड च्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओझ फोटो तसेच फाइल्स शेअर करत असतो त्यामुळे देखील वायरस ने संक्रमित असलेली फाईल एका संगणका मधून दुसऱ्या संगणकामध्ये प्रसारित होते व त्यामुळे चांगला संगणक व्हायरस ने संक्रमित होतो.

कॉम्प्युटर व्हायरस कशाप्रकारे काम करतो ◆ computer virus working in marathi

जेव्हा एखाद्या प्रोग्रॅम फाईल किंवा डॉक्युमेंट ला कॉम्प्युटर व्हायरस जोडला जातो तेव्हा संबंधित फाईल किंवा डॉक्युमेंट उघडेपर्यंत कॉम्प्युटर व्हायरस अकार्यक्षम असतो. कॉम्प्युटर व्हायरस ने संगणकाला संक्रमित करण्यासाठी आपण कॉम्प्युटर वायरस ने संक्रमित असलेली फाईल, प्रोग्रॅम किंवा डॉक्युमेंट उघडणे / रन करणे गरजेचे असते.

जेव्हा कॉम्प्युटर व्हायरस संगणकामध्ये अकार्यक्षम अवस्थेत असतो तेव्हा त्यापासून संगणकाला कोणतीही हानी नसते परंतु जर कॉम्प्युटर व्हायरस ने संगणक संक्रमित झाला तर पासवर्ड चोरणे, माहिती चोरणे,माहिती मिटवणे, संक्रमित केलेल्या संगणकाला जोडलेली इतर संगणक संक्रमित करणे इत्यादी तोटे होतात.

संगणकामधील कॉम्पुटर व्हायरस चा शोध कसा घ्यावा

जर तुम्हाला खाली दिलेला कोणताही प्रॉब्लेम संगणकामध्ये आढळत असेल तर तुमचा संगणक, संगणक विषाणूने संक्रमित असू शकतो.

• महत्त्वाच्या फाईल्स आपोआप हरवने

• संगणकाची कार्यक्षमता कमी होणे

• संगणक चालू किंवा बंद होण्यास अडचणी येणे

• error messages येणे

• नको असलेले नोटिफिकेशन आपोआप येणे

फायरवॉल बरोबर छेडछाड होणे

• ब्राउझर redirect किंवा lag होणे

• system crash होणे

कॉम्प्युटर व्हायरस पासून कसे वाचाल?

कॉम्प्युटर व्हायरस पासून वाचण्यासाठी तुम्हाला पुढील उपाययोजना करणे गरजेचे असेल –

• कोणत्याही असुरक्षित संकेतस्थळावरून काहीही डाउनलोड करू नका.

• कोणतेही धोकादायक ईमेल उघडू नका व त्या मधील जोडलेल्या फाईल्स वर क्लिक करू नका.

• पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, डिस्क इत्यादि स्कॅन केल्यानंतरच संगणकाला जोडा.

• संगणकाच्या सिस्टीम मध्ये सदैव चांगला अँटिव्हायरस इन्स्टॉल करा व त्याला अपडेटेड ठेवा.

• वेगवेगळ्या प्रकारचे पायरेटेड सॉफ्टवेअर वापरणे टाळा.

संगणकामधील व्हायरस कसा काढायचा? 

संगणकामधील व्हायरस काढायचा असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या steps चा अवलंब करू शकता –

1. सर्वात प्रथम एक चांगला अँटिव्हायरस इन्स्टॉल करा व त्याद्वारे व्हायरस स्कॅन करा

2. संगणकाचे इंटरनेट कनेक्शन बंद करा

3. संगणकाला सेफ मोड मध्ये reboot करा

4. संगणकामध्ये उपस्थित असलेले कॅचे आणि टेम्पररी फाईल डिलीट करा

5. संगणकामधील व्हायरस स्कॅन करा

6. अँटिव्हायरस प्रणाली द्वारे वायरस डिलीट करा किंवा कधीकधी manually वायरस ने संक्रमित files डिलीट करावे लागतात.

7. संगणक रिबूट करा व त्याला सेफ मोड मधून काढा

8. संगणकामधील सर्व पासवर्ड बदला

9. संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टम आणि सॉफ्टवेअर अपडेट करा.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न

वायरस चा फुल फॉर्म काय आहे?

उत्तर – वायरस चा फुल फॉर्म आहे Vital Information Resources Under Siege.

अँटिव्हायरस चा जनक कोण आहे?

उत्तर – अँटिव्हायरस चा जनक John David McAfee आहे.

वायरस आणि मालवेयर मध्ये काय फरक आहे? 

 – संगणकामध्ये व्हायरस हे इतर फाइल्स च्या मदतीने प्रसारित होतात व ते संगणकाच्या डेटामध्ये छेडछाड करतात. त्याउलट मालवेयर हे स्पेशल कम्प्युटर प्रोग्राम असतात ज्या द्वारे संगणक वापरकर्त्याच्या परवानगी शिवाय त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड इत्यादी third party कडे पाठवले जातात. 

काही फेमस कॉम्प्युटर व्हायरस ची नावे काय आहेत?

उत्तर – काही फेमस कंप्यूटर वायरस चे नावे आहेत > Stuxnet, ILOVEYOU, Conficker, Melissa, Code Red, SQL Slammer, Zeus, Storm Worm, Nimda.

Trojan horse म्हणजे काय ?

उत्तर – Trojan horse किंवा Trojan हे हानीकारक कोड किंवा सॉफ्टवेअर असतात जे प्रथम दर्शनी विश्वासु वाटतात परंतु ते तुमच्या संगणकाचे नियंत्रण घेऊ शकतात. Trojan हे अशा प्रकारे बनवलेले असतात की त्याद्वारे एकच तुमच्या संगणकामधील विविध माहिती चोरू किंवा नष्ट करू शकतात.

सारांश 

मला आशा आहे तुम्हाला Computer virus म्हणजे काय | computer virus in marathi हा लेख जरूर आवडला असेल. या लेखाद्वारे आपण कॉम्प्युटर व्हायरस विषयी माहिती जाणून घेतली व कॉम्प्युटर व्हायरस विषयी विविध संकल्पना जाणून घेतल्या.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख जरूर शेअर करा व या लेखात जर काही त्रुटी आढळली असेल तर कमेंट द्वारे सूचित करा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Comment