Advertisements

ROM म्हणजे काय | रोम चे प्रकार

Advertisements

 जेव्हा आपण संगणकाच्या मेमरी विषयी बोलत असतो तेव्हा आपण रोम हा शब्द नक्की ऐकलेला असेल कारण संगणकामध्ये रोम चे महत्त्वाचे योगदान आहे त्यामुळे ROM म्हणजे काय हा प्रश्न आपल्या मनात येणे स्वाभाविक आहे.

 संगणकाचे विविध भाग मिळून संगणक बनलेला असतो त्यामध्ये हार्डवेअर उपकरणे, सॉफ्टवेअर उपकरणे आणि स्टोरेज उपकरणे यांचा समावेश होतो. स्टोरेज उपकरणांमध्ये रॅम आणि रोम चा समावेश होतो.

what is rom in marathi

Advertisements

 आपण संगणक खरेदी करत असताना आपल्याला इतर भागांप्रमाणेच संगणकाच्या रोम विषयी माहिती असणे गरजेचे आहे कारण रोम च्या मदतीने संगणकामधील विविध भाग एकमेकांशी संपर्क साधत असतात.

अनुक्रमणिका ↕

 रॉम म्हणजे काय » what is ROM in Marathi

ROM संगणकामधील Non-volatile मेमरी आहे म्हणजेच ROM मधील माहिती आपण बदलू शकत नाहि. ROM हि permanent मेमरी आहे. रोमचे मुख्यता चार प्रकार आहेत – MROM, PROM, EPROM, EEPROM.

ROM चा फुल फॉर्म आहे Read Only Memory. ROM चा उपयोग स्टोरेज तसेच साधारण BIOS मध्ये केला जातो. तसेच रोम च्या मदतीने डाटा मॅनेजमेंट देखील केले जाते.

 रोम चे निर्माता रोम चे निर्मितीच्या वेळेस रोम मध्ये काही प्रोग्राम ऍड करत असतात त्यानंतर आपण त्या प्रोग्राम मध्ये काही सुधारणा करू शकत नाही, त्याला बदलू शकत नाही तसेच तो प्रोग्राम डिलिट देखील करू शकत नाही. परंतु काही रोम मध्ये ही सुविधा दिलेली असते.

 रोम चे प्रकार » types of ROM in Marathi 

 रोम मध्ये बदलत्या तंत्रज्ञानानुसार वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच रोम चे वेगवेगळे प्रकार आहेत, ज्यांची वेगवेगळी विशेषता आहे. रोम चे आधुनिक तंत्रज्ञानात पुढील प्रकार आहेत  –

  •  MROM ( Masked Read Only Memory )
  •  PROM ( Programmable Read Only Memory )
  •  EPROM ( Erasable And Programmable Read Only Memory )
  •  EEPROM ( Electrically Erasable And Programmable Read Only Memory )
  •  flash ROM ( flash Read Only Memory )

MROM – Masked Read Only Memory

M ROM हि रोम चा प्रकार आहे ज्यामध्ये इंटिग्रेटेड सर्किट निर्माता द्वारे रोम ची निर्मिती करताना काही कोड Add केलेला असतो . M ROM चा उपयोग मुख्यतः त्याच्या कमी किमतीमुळे केला जातो कारण M ROM चे आकारमान इंटिग्रेटेड सर्किट ची किंमत ठरवत असते.

M ROM वापरण्याचा सर्वात मुख्य तोटा असा आहे की जेव्हा या रोम मध्ये काही त्रुटी आढळतात तेव्हा संपूर्ण रोम ही निकामी होते व आपल्याला ती रोम बदलावी लागते. तसेच M ROM बनवण्याची सुरुवाती प्रक्रिया खर्चिक असते. 

PROM – Programmable Read Only Memory 

P ROM कम्प्युटर मेमरी चिप चा एक प्रकार आहे ज्यामध्ये मेमरी चिप तयार केल्यानंतर आपण त्यामध्ये एकदा प्रोग्राम करू शकतो.जेव्हा PROM प्रोग्राम केले जातात तेव्हा त्या मधील डाटा कायमस्वरूपी साठवला जातो ज्याला आपण बदलू किंवा मिटवू शकत नाही. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये PROM यांची जागा EEPROM यांनी घेतली आहे.

 डेटा स्टोअर करण्यासाठी बायनरी नंबर ची मदत घेतली जाते. जेव्हा PROM चे निर्माण केले जाते तेव्हा सर्व डेटा 1 ला assigned केलेला असतो परंतु जेव्हा त्या डेटामध्ये काही बदल करायचा असतो तेव्हा gang programmer च्या मदतीने डेटा ला 0 assigned केला जातो.जेव्हा एक PROM निकामी होते तेव्हा त्या जागी नवीन PROM चा उपयोग केला जातो.

EPROM ( Erasable And Programmable Read Only Memory )

EPROM हा PROM चा प्रकार आहे ज्यामध्ये विजेचा पुरवठा खंडित झाल्यानंतर रोम मधील डेटा मिटवला जात नाही परंतु या रोम मधील प्रोग्रॅम आपण मिटवून किंवा बदलू शकतो.

EPROM मध्ये अशा प्रोग्राम चा समावेश केलेला असतो ज्यांचा आपण वारंवार उपयोग करतो व गरज लागल्यावर त्यांना आपण अपडेट देखील करू शकतो. UV light च्या मदतीने EPROM मधील डेटा मिटवला जातो.

EEPROM ( Electrically Erasable And Programmable Read Only Memory )

EEPROM उपभोक्ता ने नियंत्रित केलेल्या रोम असतात म्हणजेच या ROM मधील डेटा उपभोक्ता अतिरिक्त होल्टेज द्वारे बदलू किंवा मिटवू  शकतो. EEPROM मधील प्रोग्राम बदलण्यासाठी या रोम ला EPROM प्रमाणे संगणका मधून बाहेर काढण्याची गरज नसते.

EEPROM ला मर्यादेत आयुष्यमान असते. EEPROM चे आयुष्यमान प्रोग्राम बदलण्याच्या किंवा मिटवण्याच्या वारंवारीते वर आधारित असते. EEPROM चे आयुष्यमान काही हजार वेळा प्रोग्राम बदलण्याच्या किंवा मिटवण्याचा संख्या इतके असू शकते.

Flash ROM

 फ्लॅश रोम ही इलेक्ट्रिक नॉन volatile मेमरीचा प्रकार आहे जी इलेक्ट्रिसिटी च्या मदतीने प्रोग्रॅम किंवा मिटवली जाऊ शकते. फ्लॅश रोम चा शोध 1980 सालि तोशिबा येथे लागला.

लॉजिक गेट च्या आधारावर फ्लॅश रोमचे NOR flash रोम आणि NAND flash रोम हे दोन प्रकार आहेत. NOR आणि NAND फ्लॅश रोम मध्ये सेल डिझाईन सारखेच असते परंतु याच्या सर्किट लेवल मध्ये बदल असतो. बीट लाइन आणि वर्ल्ड लाइन ची स्थिती फ्लॅश चे दोन प्रकार पाडत असतात

 रोम काय काम करते

 रोम मध्ये अशा प्रोग्राम चा समावेश केलेला असतो ज्यांच्या मदतीने संगणकावर स्टार्ट होण्यास मदत होते. तसेच संगणकामध्ये उपस्थित असणाऱ्या, संगणकाला कार्य करण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या सॉफ्टवेअर ची माहिती संगणक च्या रोम मध्ये स्टोअर केलेली असते.

जवळपास सर्वच संगणकामध्ये रोम च्या मदतीने संगणक सुरू करण्याच्या firmware चा समावेश होतो त्या firmware ला basic input / output system (BIOS) देखील म्हटले जाते. BIOS च्या मदतीने ऑपरेटिंग सिस्टिम ला रॅम मध्ये लोड केले जाते तसेच हार्डवेअर diagnostic केले जाते.

 संगणकाप्रमाणे रोम चा उपयोग optical storage मध्ये देखील केला जातो उदाहरणार्थ – CD ROM त्याच प्रमाणे रोमचा उपयोग कॅल्क्युलेटर,लेझर प्रिंटर इत्यादी ठिकाणी केला जातो.

 रोम ची वैशिष्ट्ये » features of Rom in Marathi 

• रोम संगणकाची non volatile मेमरी आहे म्हणजेच संगणक बंद केल्यानंतर ROM मधील मेमरी मिटवली जात नाही.

• आधुनिक संगणकामध्ये रोम चा उपयोग संगणकाला start करण्यासाठी होतो. 

• रोममधील प्रोग्रॅम आपण एकदाच लिहू शकतो परंतु आपण त्याला वारंवार वाचू शकतो.

• ROM संगणकाची long term memory आहे.

• रोम मध्ये संगणकाला सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व एप्लीकेशन ची माहिती साठवलेली असते. 

• संगणकाच्या विविध ब्रँड मध्ये आपण संगणकाच्या रोम ची आदलाबदल करू शकतो.

 रोम ची अंतर्गत रचना » ROM internal structure

 रोमच्या अंतर्गत रचनेमध्ये decoder आणि OR gate या दोन मुख्य भागांचा समावेश होतो. डिकोडर च्या मदतीने इनकोड केलेल्या binary चे रूपांतर डेसिमल रूपात केले जाते ज्यामुळे रोम मध्ये इनपुट च्या स्वरूपात बायनरी चा उपयोग होतो तर आउटपुट च्या स्वरूपात डेसिमल चा उपयोग होतो.

 डिकोडर ला आपण | × 2^ | च्या स्वरूपात लिहू शकतो. म्हणजेच तो | च्या स्वरूपात इनपुट घेईल आणि 2^  स्वरूपात आउटपुट देईल. रोम मध्ये उपस्थित OR gate इनपुट च्या स्वरूपात डिकोडर ने दिलेले आउटपुट दाखवत असतात.

 रोम चे फायदे

  •  रोम ची किंमत रॅम पेक्षा कमी असते.
  •  रोम मधील मेमरी विजेचा पुरवठा खंडित झाल्यानंतर मिटवली जात नाही.
  •  रोम स्टॅटिक स्वरूपातील असते त्यामुळे रोम ला रिफ्रेश करण्याची गरज नसते.
  •  रोम मधील माहिती verified असते.
  •  रोम चा उपयोग संगणकाला सुरू करण्यासाठी व ऑपरेटिंग सिस्टीम ला लोड करण्यासाठी होतो.
  •  इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये जे प्रोग्रॅम वारंवार run करावे लागतात ते प्रोग्रॅम रोम मध्ये साठवले जातात 
  • रोम मधील सर्किट ची रचना सोपी असते.

 रोम चे तोटे

  •  आपण रोम मधील माहिती वाचू शकतो परंतु ती बदलू शकत नाही.
  • रोम मेमरीचा स्लोवर टाईप आहे.
  •  रोम मधील माहिती जर चुकीच्या पद्धतीने मिटवली गेली तर रोम निकामी होते.
  •  जर एकदा रोम मध्ये डेटा साठवला गेला तर आपण त्याला बदलू, मिटवू किंवा overwrite करू शकत नाही.
  •  रोमच्या काही विशिष्ट प्रकारांमध्ये वापर करता स्वतः वापरकर्ता रोम ला modify करू शकतो परंतु या प्रक्रियेमध्ये काही चूक झाली तर संगणकाची कार्यप्रणाली बिघडू शकते.

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न » FAQ

 रोम चा उपयोग कुठे केला जातो

उत्तर – रोम चा उपयोग संगणकामध्ये डेटा स्टोर करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे रोम चा उपयोग मोबाईल, लॅपटॉप,  टॅबलेट, AC, TV इत्यादी इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो.

 रोम कोणत्या मेमरीचा प्रकार आहे

उत्तर – रोम primary non volatile मेमरीचा प्रकार आहे.

 काय हार्ड डिस्क हे रोम चे प्रकार आहे 

उत्तर –hard disc हा रोम चा प्रकार नाही ,तो प्रायमरी स्टोरेज मीडिया आहे.

 कॉम्प्युटरमध्ये रोम कुठे आहे

उत्तर – कॉम्प्युटरमध्ये रोम मदरबोर्ड मध्ये स्थित आहे.

रोम BIOS म्हणजे काय?

उत्तर – रोम मध्ये उपस्थित असणाऱ्या firmware ला BIOS असे संबोधले जाते. रोम BIOS चा उपयोग संगणकाला सुरु करण्याच्या वेळेस हार्डवेअर ला initialise करण्यासाठी होतो.

 सारांश » conclusion

 रोम संगणकामधील तसेच इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा मधील महत्त्वाचा भाग आहे. रोम च्या मदतीने संगणक सुरू करण्यास मदत होते तसेच वारंवार उपयोगात येणारे प्रोग्रॅम रोम मध्ये साठवले जातात. रोम चे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची माहिती आपण या लेखामध्ये बघितली.

 मला आशा आहे या लेखाद्वारे ROM म्हणजे काय » what is Rom in Marathi हा प्रश्न सुटला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि जर काही त्रुटी वाटत असेल तर कमेंट द्वारे आम्हाला कळवा.

 तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छांसह, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *