Computer memory विषयी माहिती | computer memory in marathi

Advertisements

 जेव्हा आपण संगणकाचा उपयोग करत असतो तेव्हा आपल्याला कॉम्प्युटर मेमरी हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो त्यामुळेच या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया computer memory विषयी माहिती ● computer memory in marathi

संगणकाला जलद गतीने कार्य करण्यासाठी संगणकाच्या मेमरी ची गरज असते त्यामुळेच वेगवेगळ्या संगणक निर्माता कंपनी जास्त मेमरीचे संगणक बनवत आहेत. आपल्याला जर संगणक खरेदी करायचा असेल किंवा संगणका बद्दल संपूर्ण माहिती द्यायची असेल तर आपल्याला संगणकाच्या मेमरी ची माहिती असणे गरजेचे आहे.

Computer memory हा संगणकाचा अविभाज्य भाग आहे व संगणकाचा सर्व डेटा संगणकाच्या मेमरीमध्ये साठवलेला असतो चला तर मग जाणून घेऊया कॉम्प्युटर मेमरी बद्दल संपूर्ण माहिती 

अनुक्रमणिका ↕
Computer memory विषयी माहिती

कॉम्प्युटर मेमरी म्हणजे काय computer memory in Marathi

संगणकामध्ये कॉम्पुटर मेमरी हि एक सिस्टीम किंवा उपकरण असते ज्याचा उपयोग संगणकामध्ये किंवा संगणकाच्या विविध भागांमध्ये तात्काळ उपयोगात येणाऱ्या माहितीचा साठा करण्यासाठी होतो.

संगणकामध्ये कॉम्प्युटर मेमरी चा उपयोग संगणकाचे वेगवेगळे निर्देश आणि प्रक्रिया करण्यासाठी चा डेटा साठवण्यासाठी होतो संगणकाची मेमरी लहान-लहान भागांची बनलेली असते ज्याला सेल असे म्हणतात.

प्रत्येक सेल चा ऍड्रेस वेगवेगळा असतो ज्यामध्ये ऍड्रेस शून्यापासून ते मेमरी साईज च्या एक डिजिट कमी असतो. म्हणजेच एखाद्या संगणकामध्ये जर दहा हजार शब्द असतील तर मेमरी युनिटमध्ये 10*1024 = 10240 सेल असतील व सेलचा ऍड्रेस 0 पासून 10239 पर्यंत असेल.

संगणकाच्या मेमरी चा इतिहास 

वर्ष घटना
1932 Gustav Tauschek यांनी ड्रम मेमरी चा शोध लावला
1936 Konrad Zuse यांनी मेकॅनिकल कॉम्बिनेशन मेमरी चे पेटंट घेतले
1939 John Atanasoff आणि Clifford Berry इलेक्ट्रॉनिक 50 बिट वर्ड डिजिटल मेमरी चा शोध लावला
1942 ABC संगणकामध्ये John Atanasoff यांनी regenerative कॅपॅसिटर ड्रम मेमरी चा उपयोग केला व यशस्वी चाचणी केली
1946 CRT कॉम्प्युटर च्या पेटंट साठी Freddie Williams यांनी आवेदन दाखल केले. या संगणकामध्ये व्यवसायिक स्वरूपाच्या रॅम चा उपयोग केला गेला.
1949 Maurice Vincent Wilkes यांनी पहिल्यांदा व्यावहारिकदृष्ट्या प्रोग्रॅम पाठवलेला संगणक बनवला व यासाठी त्यांनी व्याक्युम ट्यूब मेमरीचा उपयोग केला
1951 Jay Forrester यांनी मॅट्रिक्स कोर मेमरी साठी पेटंट प्राप्त केले.
1968 Robert Dennard यांनी डायनामिक रॅम चा शोध घेतला व त्यासाठी पेटंट प्राप्त केले
1971 EPROM ( Erasable And Programmable Read Only Memory ) चा शोध लागला.
1984 NOR and NAND फ्लॅश मेमरी चा तोशिबा यांनी शोध लावला.

संगणकाच्या मेमरीचे वैशिष्ट्य

संगणकाच्या मेमरीचे काही मुख्य वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे –

• क्षमता

• संगणकामध्ये स्थान

• कार्यप्रणाली पध्दत

• भौतिक स्वरूप

• भौतिक वैशिष्ट्ये

• कार्यक्षमता

क्षमता

कोणत्याही प्रकारच्या मेमरीची क्षमता दोन प्रकारे मोजली जाते जे आहेत वर्ड साइज आणि नंबर ऑफ वर्ड. वर्ड साईज ही बाईट मध्ये मोजली जाते तर नंबर ऑफ वर्ड मेमरी डिवाइस मध्ये उपस्थित असलेल्या वर्डची संख्या दर्शवते. उदाहरणार्थ जर एखादि मेमरी 1k×16 असेल तर त्या मेमरी मध्ये 16 बिट्स ची वर्ड साइज असेल व 1024 नंबर ऑफ वर्ड असतील.

संगणकामध्ये स्थान 

संगणकामध्ये मेमरी ही मुख्यता तीन ठिकाणी उपस्थित असते ज्यामध्ये सीपीयू, अंतर्गत मेमरी आणि बाह्य मेमरी चा समावेश होतो. सीपीयू मध्ये छोट्या प्रमाणात कॅचे मेमरी साठवली जाते. अंतर्गत मेमरी मध्ये रॅम आणि रॉम चा समावेश होतो त्यामुळे अंतर्गत मेमरी ला मुख्य मेमरी देखील म्हटले जाते.बाह्य मेमरी मध्ये द्वितीय स्वरूपाच्या मेमरी उपकरण चा समावेश होतो जसे की हार्ड डिस्क, मेमरी कार्ड इत्यादी

कार्यप्रणाली पद्धत 

कार्यप्रणाली पद्धत हे संगणकाच्या मेमरी चे मुख्य वैशिष्ट्य आहे कार्यप्रणाली पद्धत मध्ये रँडम एक्सेस, सिरीयल एक्सेस आणि सेमी रँडम एक्सेस चा समावेश होतो. रॅम आणि ICs मध्ये रैंडम एक्सेस प्रणालीचा उपयोग केला जातो. मॅग्नेटिक टेप आणि CD-ROM मध्ये सिरीयल एक्सेस कार्यपद्धती चा उपयोग केला जातो. मॅग्नेटिक हार्ड डिस्क मध्ये सेमी रँडम कार्य प्रणालीचा उपयोग केला जातो.

भौतिक स्वरूप

संगणकाच्या मेमरीचे सेमीकंडक्टर किंवा मॅग्नेटिक सरफेस मेमरी च्या स्वरूपात भौतिक स्वरूप असू शकते. सेमीकंडक्टर मेमरी चा उपयोग रॅम मध्ये होतो तर मॅग्नेटिक सरफेस मेमरी चा उपयोग मॅग्नेटिक टेप मध्ये होतो.

भौतिक वैशिष्ट्य –

जेव्हा संगणकाला दिला जाणारा वीज पुरवठा खंडित केल्यानंतर मेमरी मिटवली जात नाही त्या प्रकारच्या मेमरीला non volatile मेमरी म्हणतात याउलट जी मेमरी वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मिटवली जाते तिला volatile मेमरी म्हणतात.

कार्यक्षमता

संगणकाच्या मेमरी ची कार्यक्षमता मुख्यता तीन निकषांच्या आधारावर मोजली जाते – एक्सेस टाईम, मेमरी सायकल टाईम आणि ट्रान्सफर रेट. संगणकाच्या मेमरीमध्ये रीड किंवा राईट ऑपरेशन साठी लागणाऱ्या टाईमला एक्सेस टाईम म्हणतात. मेमरी सायकल टाईम म्हणजे एक्सेस टाईम अधिक दुसऱ्या सायकल साठी लागणाऱ्या टाइम मधील अंतर. संगणकाच्या मेमरी मधील डेटा च्या प्रसारणासाठी लागणाऱ्या वेळेला ट्रान्सफर रेट म्हणतात.

कॉम्पुटर मेमरी चे प्रकार ◆ computer memory types in marathi

जेव्हा आपल्याला संगणकाच्या मेमरी बद्दल संपूर्ण माहिती घ्यायची असेल तेव्हा आपल्याला संगणकाच्या मेमरीचे प्रकार माहित असणे गरजेचे असते. संगणकाच्या मेमरी चे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व आपण आपल्या सोयीनुसार त्यांचा उपयोग करु शकतो परंतु संगणकाच्या मेमरी चे दोन मुख्य प्रकार आहेत –

1. प्रायमरी मेमरी

2. सेकंडरी मेमरी

प्रायमरी मेमरी आणि सेकंडरी मेमरी व्यतिरिक्त एक अतिरिक्त मेमरी संगणकामध्ये उपस्थित असते जिला कॅचे मेमरी असे म्हटले जाते.

types of computer memory in marathi


प्रायमरी मेमरी

प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रॉम चा समावेश होतो प्रायमरी मेमरी ही संगणकाच्या सीपीयू शेजारी मदरबोर्ड मध्ये स्थित असते. सीपीयू च्या माध्यमातून प्रायमरी मेमरी च्या डेटावर प्रक्रिया केली जाते प्रायमरी मेमरी मध्ये संगणकाचा वारंवार उपयोगात येणारा डेटा साठवलेला असतो.

रॅम

रॅम चे पूर्ण स्वरूप आहे रँडम ऍक्सेस मेमरी. रॅम मेमरी ची कार्य क्षमता जास्त असते व ही मेमरी volatile मेमरी आहे म्हणजेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर या मेमरी मध्ये सर्व डेटा मिटवला जातो. जो डेटा तात्काळ प्रोसेसिंग साठी आवश्यक असतो तो डेटा रॅम मध्ये अल्पकाळासाठी साठवला जातो ज्यामुळे सीपीयू वरील लोड कमी होतो व संगणकाची कार्यक्षमता सुधारते. डायनॅमिक रॅम आणि स्टॅटिक रॅम हे रॅम चे मुख्य प्रकार आहेत.

रॉम

रॉम चे पूर्ण स्वरूप आहे रीड ओनली मेमोरी. रॉम हा नॉन volatile मेमरी चा प्रकार आहे म्हणजे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रॉम मधील डेटा मिटवला जात नाहि. जेव्हा संगणक On केला जातो तेव्हा सीपीयू कोणत्याही प्रकारच्या ड्रायव्हर किंवा सॉफ्टवेअर शिवाय रोममधील माहितीचा वापर करून ऑपरेटिंग सिस्टीम ला लोड करण्यास मदत करतो.रॉम चे मुख्य प्रकार आहेत – PROM , EPROM आणि EEPROM.

सेकंडरी मेमरी

सेकंडरी मेमरी ला बाह्य मेमरी असेदेखील म्हटले जाते, म्हणजेच जेव्हा विविध मेमरी उपकरणे केबल किंवा पोर्ट च्या माध्यमातून संगणकाला जोडले जातात व संगणकामध्ये अतिरिक्त मेमरीचे निर्माण करतात तेव्हा त्या प्रकारच्या मेमरी ला सेकंडरी मेमरी असे म्हटले जाते. सेकंडरी मेमरी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेणे सोपे असते.

सेकंडरी मेमरी मधील डेटा डायरेक्ट सीपीयू कडून नियंत्रित केला जात नाही त्यासाठी सेकंडरी मेमरी मधील डेटा पहिल्यांदा प्रायमरी मेमरी मध्ये लोड केला जातो व त्यानंतर तो डेटा सीपीयू कडे रीड आणि प्रोसेस करण्यासाठी पाठवला जातो. सेकंडरी मेमरी मधील डेटा गिगाबाइट , टेट्राबाइट आणि मेगाबाइट मध्ये साठवला जातो.

सेकंडरी मेमरी ची उदाहरणे – पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, ऑप्टिकल ड्राईव्ह, मॅग्नेटिक टेप, फ्लॅश ड्राईव्ह, CD इत्यादी.

कॅचे मेमरी

कॅचे मेमरी ही एक सेमीकंडक्टर मेमरी आहे जिचा उपयोग सी.पी.यु. द्वारे वारंवार उपयोगात येणाऱ्या प्रोग्रॅमला साठवण्यासाठी होतो.कॅचे मेमरी द्वारे सीपीयू साठी वेगवान डेटा स्टोरेज ची व्यवस्था केली जाते त्यामुळे सीपीयू ला वारंवार उपयोगात येणाऱ्या प्रोग्रामसाठी मेमरी किंवा सेकंडरी मेमरी ची गरज राहत नाही.

कॅचे मेमरी रॅम आणि सीपीयू मध्ये उपस्थित असते व buffer ची भूमिका पार पाडते. कॅचे मेमरी ची किंमत प्रायमरी मेमरी पेक्षा जास्त असते परंतु या मेमरी मुळे संगणकाची कार्यक्षमता सुधारते व वेळेत देखील बचत होते.

कॅचे मेमरी चे काही प्रकार पुढीलप्रमाणे –

1. रजिस्टर कॅचे

2. कॅचे

3. मेन मेमरी कॅचे

4. सेकंडरी मेमरी कॅचे 

Computer memory कशाप्रकारे काम करते

संगणकाच्या मेमरीची कार्यप्रणाली एकदम सरळ आणि स्टेप बाय स्टेप आहे. संगणकाच्या मेमरी चा उपयोग संगणक सुरू करण्यापासून विविध सॉफ्टवेअर चा उपयोग करण्यासाठी आणि संगणक बंद होईपर्यंत होतो. संगणकाची मेमरी पुढील प्रकारे काम करते – 

1. आपण संगणक सुरू केला

2. ROM मधील डेटा च्या आधारावर संगणक ने power on self test केली व संगणकाच्या विविध भाग चांगल्या प्रकारे कार्य करत आहे याची खात्री केली त्याचबरोबर मेमरी मधील एरर चा शोध घेतला

3. ROM च्या आधारावर संगणकाने BIOS लोड केले. BIOS ने मेमरी उपकरणे, संगणकाची सुरक्षा प्रक्रिया इत्यादी विषयी बेसिक माहिती प्रदान केली.

4. आता संगणकाने हार्ड ड्राइव्ह मधून रॅम मध्ये ऑपरेटिंग सिस्टिम लोड केली यामुळे सीपीयू ला ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर कार्य करणे सोपे झाले.

5. जेव्हा आपण कोणतेही एप्लीकेशन उघडतो तेव्हा ते रॅम मध्ये लोड केले जाते. रॅम चे कार्य सोपे करण्यासाठी काही ॲप्लिकेशन पहिल्यांदा गरजेपुरता प्रोग्रॅम रॅम वर लोड करतात व त्यानंतर जशी गरज लागेल तसा प्रोग्रॅम रॅम वर लोड करत राहतात.

6. जेव्हा आपण संगणकामध्ये कोणतीही फाइल सेव्ह करतो तेव्हा ती फाईल संगणकाच्या अंतर्गत हार्ड डिस्क मध्ये सेव केली जाते.

संगणकाच्या मेमरीचे युनिट्स » computer memory units in marathi

संगणकाच्या स्टोरेज युनिट मध्ये पाठवल्या जाणाऱ्या डेटा च्या क्षमतेला मेमरी युनिट्स असे म्हणतात. मेमरी युनिट मुख्यतः बाईट्स या मूलभूत एककात मोजले जातात व त्याचबरोबर संगणकाच्या मेमरी ची स्टोरेज क्षमता मोजण्यासाठी उपयोगात येणारे काही युनिट्स पुढील प्रमाणे- 

मेमरी युनिट च्या बरोबर आहे
बिट बिट लॉजिकल 0 आणि 1 असतात ज्याचा उपयोग इलेक्ट्रिक सर्किट मधील ऍक्टिव्ह किंवा passive स्थिती दर्शवण्यासाठी होतो
Nibble 4 bit चा ग्रुप
bytes बाईट हा 8 बिट चा ग्रुप आहे तसेच बाईट ला डेटा कॅरेक्टर दर्शवणारा सर्वात छोटे युनिट म्हणून संबोधले जाते .
Word बाइट्स प्रमाणे वर्ड हा देखील बिट्स चा समूह आहे परंतु वर्ल्ड मधील बीट ची संख्या प्रत्येक संगणकानुसार वेगवेगळी असते. एका वर्ड ची साइज 8 bit पासून 96 bit पर्यंत असू शकते.
किलोबाईट (KB) 1 KB = 1024 बाईट्स
मेगाबाइट (MB) 1 MB = 1024 किलोबाईट
गिगाबाईट (GB) 1 GB = 1024 मेगाबाइट
टेराबाइट (TB) 1TB = 1024 गिगाबाईट
पेटबाईट 1PB = 1024 टेराबाइट

कॉम्पुटर मेमरी चा उपयोग 

• संगणकाला चालू किंवा बंद करण्यासाठी

• संगणकाची कार्यक्षमता वाढवने

• अल्प काळासाठी प्रोग्रॅम साठवणे

• दिर्घ काळासाठी वेगवेगळी माहिती साठवून ठेवणे

• ऑपरेटिंग सिस्टिम लोड करणे

• जलद गतीने रॅम च्या मदतीने वेगवेगळे प्रोग्राम उघडणे

• संगणकाच्या विविध हार्डवेअर भागांमध्ये संतुलन ठेवण्यासाठी कॉम्पुटर मेमरी चा उपयोग होतो

• वारंवार उपयोगात येणारे प्रोग्राम अल्प काळासाठी साठवून ठेवणे

• बेसिक इनपुट आणि आउटपुट ऑपरेशन लोड करणे

• संगणकाचा वेगवेगळा डेटा आणि निर्देश साठवून ठेवणे 

याचप्रमाणे संगणकामध्ये जवळपास सर्व कार्य करण्यासाठी कम्प्युटर मेमरी ची गरज असते.

रॅम आणि हार्ड डिस्क मधील फरक

parameter रॅम हार्ड डिस्क
पूर्ण स्वरूप रँडम ऍक्सेस मेमरी हार्ड डिस्क ड्राइव्ह
मेमरी चे प्रकार प्रायमरी मेमरी सेकंडरी मेमरी
read/write time रॅम साठी read/write time कमी लागतो. हार्ड डिस्क साठी read /write time जास्त लागतो
भाग रॅम मध्ये कोणत्याही प्रकारचे मुविंग मेकॅनिकल भाग नसतात व रॅम ट्रांजिस्टर चे बनलेले असते हार्ड डिस्क मध्ये मुविंग मेकॅनिकल भाग असतात जसे की आर्म,पिन, प्लॉटर इत्यादी
कॅपॅसिटी रॅम ची कॅपॅसिटी कमी असते म्हणजे 1GB ते 8 gb पर्यंत असू शकते. हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता जास्त असते म्हणजे काही संगणकामध्ये 500GB ते 4TB क्षमता चे हार्ड डिस्क असू शकतात
सीपीयू कडून एक्सेस रॅम चा सीपीयू कडून डायरेक्ट एक्सेस घेतला जातो. हार्ड डिस्क चा सीपीयू कडून रॅम किंवा रॉम च्या माध्यमातून एक्सेस घेतला जातो

मुख्य कॉम्प्युटर मेमरी निर्माता कंपनी

  • सॅमसंग
  • मायक्रोन टेक्नॉलॉजी
  • किंगस्टन
  • सीनोलॉजी
  • सुपरमायक्रो
  • Hynix

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न – FAQ

कॉम्प्युटर मेमरी कोणत्या मटेरियल ची बनलेली असते?

उत्तर – कम्प्युटर मेमरी मुख्यता सिलिकॉन या मटेरियल ची बनलेली असते व सिलिकॉन बनवण्यासाठी सँड चा उपयोग केला जातो. सिलिकॉन ला प्रेस करून त्याचा integrated circuit मध्ये उपयोग केला जातो.

मेमरी कशाची बनलेली असते ?

उत्तर – मेमरी ही बिट्स ची बनलेली असते जे 2-D मध्ये अरेंज केलेले असतात. मेमरी सेल हा मेमरी चा सर्वात मुख्य भाग आहे. मेमरी सेल हे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ज्यामध्ये एका बिट ची बायनरी माहिती साठवलेली असते. मेमरी मध्ये मोठ्या प्रमाणात मेमरी सेल उपस्थित असतात.

मेमरी चे सर्वात मोठे युनिट कोणते आहे? 

उत्तर – मेमरी चे सर्वात मोठे युनिट Yotta Byte आहे. एक म्हणजे 10^24 बाईट्स असतात. Yotta Byte चे संक्षिप्त रूप YB आहे.

मेमरीचे सर्वात छोटे युनिट कोणते आहे?

उत्तर – मेमरीचे सर्वात छोटे युनिट बाईट आहे, ज्यामध्ये 8-bit चा समावेश होतो. बाईट चा उपयोग सिंगल नंबर, अक्षर किंवा सिम्बॉल ला इनकोड करण्यासाठी होतो.

Simm आणि dimm म्हणजे काय ?

उत्तर – Simm आणि dimm हे रँडम ऍक्सेस मेमरी चे दोन प्रकार आहेत. Simm चे पूर्ण स्वरूप आहे सिंगल इनलाइन मेमरी module व Dimm ड्युअल ऑनलाईन मेमरी module. Simm आणि dimm हे प्रकार मेमरी पॅकिंग च्या पद्धतीनुसार करण्यात आलेले आहेत.

सारांश Conclusion

Computer memory हा संगणकाचा महत्वाचा भाग आहे ज्याचा उपयोग संगणक सुरू करण्यापासून ते बंद करण्यापर्यंत होतो. मला आशा आहे तुम्हाला Computer memory विषयी माहिती | computer memory in marathi या लेखाद्वारे संगणकाच्या मेमरी बद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.

जर तुम्हाला संगणक मेमरी विषयी माहिती चा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेअर करा व या लेखात काही त्रुटी आढळल्या असतील तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Comment