Advertisements

Programming म्हणजे काय

Advertisements

तुम्हाला माहित आहे का प्रोग्रामिंग म्हणजे काय (what is programming in marathi) ? जर नाही तर याचे उत्तर आहे प्रोग्रामिंग म्हणजे एक अशी प्रक्रिया असते जिच्या द्वारे संगणक व संगणकीय उपकरणांना कार्य करण्यासाठी निर्देश दिले जातात.

संगणकामध्ये प्रोग्रॅमिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग केला जातो. प्रत्येक प्रोग्रामिंग लैंग्वेज करण्याचे वेगवेगळे उद्दिष्ट असते त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार उपयुक्त प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकून IT क्षेत्रात चांगले करियर बनवू शकतो.

टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये प्रोग्रामिंग हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो म्हणून आपल्याला प्रोग्रामिंग विषयी माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळेच या लेखात आपण प्रोग्रामिंग ची माहिती जाणून घेऊया.

Advertisements
programming in marathi

प्रोग्रामिंग म्हणजे काय ? What is programming in marathi

संगणकामध्ये जेव्हा एखादे विशिष्ट कार्य करण्यासाठी प्रोग्रॅम मधील कोड ची निर्मिती करून, त्या कोड चा उपयोग केला जातो तेव्हा त्याला प्रोग्रामिंग असे म्हटले जाते. प्रोग्राम मधील कोड प्रोग्रामर च्या मदतीने संगणकामध्ये लिहिला जातो.

प्रोग्रामिंग च्या मदतीने संगणकीय उपकरणांना निर्देशांचा संच प्रदान केला जातो ज्याच्या मदतीने संगणकीय उपकरण विविध कार्य पार पाडतात. प्रोग्रामर विविध प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या मदतीने वेगवेगळे कंप्यूटर प्रोग्रॅम निर्माण करून संगणकीय उपकरणांची कार्यक्षमता वाढवत असतात.

संगणकामध्ये आपण जे कार्य करतो, त्या सर्व कार्यांच्या मागे प्रोग्रामिंग चा मोलाचा वाटा आहे. म्हणजेच संगणकाद्वारे कोणतेही कार्य पार पाडण्यासाठी Programming केली गेलेली असते व विविध कम्प्युटर प्रोग्रम च्या मदतीनेच संगणक कार्य करत असतो.

उदाहरणार्थ – आपण जेव्हा संगणकाला CTRL+C च्या मदतीने काही मजकूर कॉपी करण्याचे निर्देश देतो तेव्हा कॉपी करण्यासाठी आवश्यक असलेला प्रोग्रॅम हा आधीच प्रोग्रॅमिंगच्या मदतीने निर्माण केलेला असतो व तो संगणक मेमरी मध्ये साठवलेला असतो.

कॉम्पुटर प्रोग्रॅम म्हणजे काय > computer program in marathi

कंप्यूटर प्रोग्रॅम हा प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून व प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या मदतीने निर्माण केलेला संगणकाला देण्यात येणाऱ्या निर्देशांचा संच आहे, ज्याच्या मदतीने संगणकाचे विविध भाग कार्य करत असतात. कॉम्प्युटर प्रोग्राम च्या मानवाला वाचण्यायोग्य स्वरूपाला सोर्स कोड असे म्हणतात.

कॉम्प्युटर प्रोग्राम हे संगणकाचे executable स्वरूपातील सॉफ्टवेअर आहे. कॉम्प्युटर प्रोग्राम मध्ये जटिल कॉम्प्युटर कोड चा उपयोग केलेला असतो ज्याच्या उपयोगासाठी ऑपरेटिंग सिस्टिम ची मदत होत असते तसेच काही कॉम्प्युटर प्रोग्राम चा उपयोग ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने संगणकामध्ये अधिक वैशिष्ट्य प्रदान करण्यासाठी होतो.

प्रोग्रामिंग शिकण्याची काय गरज आहे » प्रोग्रामिंग चा उपयोग

1. आपण तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत त्यामुळे येणाऱ्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे नवनवीन इलेक्ट्रॉनिक उपकरण मार्केटमध्ये उपलब्ध होती व यामुळे प्रोग्रामर ची डिमांड वाढेल.

2. प्रोग्रामिंग शिकण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या डिग्री ची आवश्यकता नसते तुम्ही स्वतः प्रोग्रॅमिंग शिकून चांगले सॉफ्टवेअर निर्माण करू शकता व पैसे कमवू शकतात.

3. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमची कोणतीही कल्पना सत्यात उतरवू शकतात.

4. प्रोग्रॅमिंग तुम्हाला घरबसल्या काम करण्याची संधी देते जे इतर कोणत्याही क्षेत्रात होणे शक्य नाही.

5. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून तुम्हाला समजते की संगणक तसेच संगणकाचे विविध भाग कशाप्रकारे काम करतात याच बरोबर प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून वेगवेगळे सॉफ्टवेअर, ऍप, वेबसाईट यांची कार्य प्रणाली समजते.

6. आता जवळपास सर्वच उद्योग व व्यवसाय डिजिटल होत आहेत त्यामुळे आपण प्रोग्रामिंग शिकून घरबसल्या नोकरी करून किंवा बिझनेसच्या माध्यमातून घरबसल्या मोठ्या प्रमाणावर पैसे कमावू शकतो.

7. प्रोग्रामिंग शिकत असताना वेगवेगळे प्रॉब्लेम येतात व त्यांची उत्तरे शोधावी लागतात ज्याचा उपयोग जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांचे निर्वारण करण्यासाठी होतो.

8. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून तुम्ही स्वयंरोजगार करू शकतात व वेगवेगळ्या क्लायंट साठी काम करून फ्रीलान्सिंग करू शकतात.

9. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून तुम्ही तांत्रिक कौशल्य आणि कल्पनाशक्ती यांचा मेळ घालायला शिकता व याद्वारे चांगले डिजिटल प्रॉडक्ट्स बनवू शकतात.

प्रोग्रामिंग लँग्वेज चे प्रकार

1. Procedural प्रोग्रामिंग लँग्वेज

2. Scripting प्रोग्रामिंग लँग्वेज

3. लॉजिक प्रोग्रामिंग लँग्वेज

4. Object oriented प्रोग्रामिंग लैंग्वेज

5. Functional प्रोग्रामिंग लँग्वेज

1.Procedural प्रोग्रामिंग लँग्वेज

Procedural प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग प्रोग्रॅमिंग स्टेटमेंट च्या क्रमाच्या आधारे निष्कर्ष प्राप्तिसाठी होतो. या प्रकारच्या प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये वेगवेगळे variables हेवी लूप तसेच इतर एलिमेंट चा उपयोग केला जातो. Procedural प्रोग्रामिंग च्या आधारे फंक्शन व्हॅल्यू च्या व्यतिरिक्त variable वर नियंत्रण ठेवले जाते.

2. Scripting प्रोग्रामिंग लँग्वेज

Scripting प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग अनेकदा Procedural प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज म्हणून केला जातो. या प्रोग्रामिंग लँग्वेज चला चालवण्यासाठी अनेकदा छोट्या सिंटॅक्स ची गरज असते. Scripting प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या आधारे संगणकांमध्ये ऑटोमेशन चे निर्माण केले जाते. scripting प्रोग्रॅमिंग लँग्वेज बहुतेकदा इतर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज बरोबर कार्य करतात.

3. लॉजिक प्रोग्रामिंग लँग्वेज

लॉजिक प्रोग्रामिंग लँग्वेज तर्कशास्त्राच्या आधारे कार्य करते. लॉजिक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या आधारे प्रोग्रॅमर घोषणात्मक विधान करतात व संगणकीय उपकरणांच्या माध्यमातून त्याचे परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मजेत प्रोग्रॅमिंग लँग्वेज चा उपयोग तर्कशास्त्राच्या आधारे कार्य करण्यासाठी व प्रोग्रॅमिंग मधील चुका शोधून त्या सुधारण्यासाठी होतो.

4. Object oriented प्रोग्रामिंग लैंग्वेज

Object oriented प्रोग्रामिंग लैंग्वेज मध्ये फंक्शन किंवा लॉजिक च्या व्यतिरिक्त डेटा किंवा ऑब्जेक्ट च्या आधारे प्रोग्रामिंग केली जाते.Object oriented प्रोग्रामिंग लैंग्वेज चा उपयोग मोठ्या जटिल आणि वारंवार अपडेट करण्यात येणाऱ्या प्रोग्राम मध्ये केला जातो. या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग वेगवेगळे एप्लीकेशन चे निर्माण करण्यासाठी व त्यांना डिझाईन करण्यासाठी केला जातो.

5. Functional प्रोग्रामिंग लँग्वेज

फंक्शनल प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग प्रतीकात्मक गणना व लिस्ट आधारित ॲप्लिकेशन मध्ये केला जातो.Functional प्रोग्रामिंग लँग्वेज ही declarative प्रकारातील प्रोग्रॅम शैली आहे.Functional प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग मुख्यतः फंक्शन च्या आधारे सॉफ्टवेअर निर्मितीसाठी होतो. या प्रोग्रामिंग लैंग्वेज चा मुख्य फोकस “काय solve करायचे आहे” यावर असतो ना कि “कसे solve करायचे आहे” यावर.

वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषा (programming languages in marathi)

प्रोग्रॅमिंग ची सुरुवात अठराशे च्या सुमारास सुरु झाली व तेव्हापासून आतापर्यंत जवळपास नऊ हजार प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चे निर्माण केले गेले आहे. या प्रोग्रामिंग लैंग्वेज मधील काही लैंग्वेज या विशिष्ट मशीन साठी निर्माण करण्यात आल्या व त्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज त्या विशिष्ट मशीन साठी मर्यादीत झाल्या.

1940 ला आधुनिक संगणकाचे निर्मिती झाली व तेव्हापासून आधुनिक प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या निर्मितीला सुरुवात झाली परंतु याची पायामुळे Ada Lovelace’s च्या पहिल्या मशीन अल्गोरिदम मध्ये दडलेले आहे.

आधुनिक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज मधील काही प्रचलित प्रोग्रामिंग लॅंग्वेज पुढील प्रमाणे –

Python

• JavaScript

• C++ 

• Java

• C

• C#

• PHP

• SQL

• R

• Visual basis

• Groovy

• Assembly language 

जर वरील प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज कडे काळजीपूर्वक बघितले तर आपल्याला समजेल की यामध्ये HTML आणि CSS चा समावेश केलेला नाही कारण HTML आणि CSS या लँग्वेज चा उपयोग वेबपेज च्या रचनेमध्ये व डिझाईन मध्ये केला जातो व यामध्ये कोणत्याही प्रकारचे निर्देश किंवा स्टेटमेंट नसतात.

वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग भाषांचा उपयोग

प्रोग्रॅमिंग भाषा कुठे उपयोग होतो
C हार्डवेअर ड्रायव्हर, लोकल एप्लीकेशन आणि सिस्टीम मध्ये
Java वेब एप्लीकेशन सिस्टीम, मोबाइल
Python वेब अँप्लिकेशन, Artiificial intelligence
Visual Basic .NET? वेब एप्लीकेशन, लोकल एप्लीकेशन
c++ वेब सर्विस, लोकल एप्लीकेशन, प्रोप्रायटरी सर्विस
c# लोकल एप्लीकेशन, वेब एप्लीकेशन, मायक्रो सर्विस
Javascript लोकल अप्लिकेशन, वेब एप्लीकेशन
php वेब एप्लीकेशन
Objective C एप्पल उत्पादनांच्या ॲपमध्ये
Sql डेटाबेस
Delphi/Object Pascal लोकल एप्लीकेशन
MATLAB गणितीय शोधामध्ये
Ruby वेब अप्लिकेशन, scripting
Assembly language सिस्टीम प्रोग्रामिंग तसेच हार्डवेअर निर्मितीमध्ये
Perl लोकल एप्लीकेशन
R सांख्यिकी गणना व प्रक्रिया
Bash लीनक्स scripting व ऑटोमेशन
kotlin अँड्रॉइड डेव्हलपमेंट
Julia डेटा सायन्स
Prolog कृत्रिम बुद्धिमत्ता
labVIEW इंडस्ट्री ऑटोमेशन

घरबसल्या प्रोग्रॅमिंग कशी शिकायची –

एक काळ असा होता जेव्हा आपल्याला प्रोग्रामिंग शिकण्यासाठी वेगवेगळी पुस्तके वाचावि लागत होती परंतु आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज घर बसल्या शिकू शकतो.

जर तुम्हाला घरबसल्या मोफत प्रोग्रॅमिंग शिकायची असेल तर तुम्ही पुढे दिलेल्या 12 संकेतस्थळांचा उपयोग करू शकता –

1. Coursera

2. Codeacademy

3. W3School

4. edX

5. AGupieWare

6. Udemy

7. GitHub

8. MIT Open Courseware

9. Code Avengers

10. Hack.pledge()

11. Khan academy

12. Free code camp

याच बरोबर जेव्हा आपण प्रोग्रामिंग शिकत असतो तेव्हा आपल्याला कोडींग करताना काही अडचणी येऊ शकतात त्या अडचणींचे उत्तर शोधण्यासाठी आपण Stack overflow या संकेतस्थळाची मदत घेऊ शकतो .

प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे 

जर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रोग्रॅमिंग करू शकत असाल तर तुम्ही प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमवू शकतात. प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला किमान एका प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.

प्रोग्रॅमिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्याचे काही प्रचलित प्रकार –

1. फ्रीलान्सिंग 

2. ऑनलाईन कोर्स विकणे 

3. वेब plugin बनवून विकणे 

4. कोडींग स्पर्धा जिंकून पैसे कमवणे

5. दुसऱ्या व्यक्तीला ऑनलाइन प्रोग्रॅमिंग शिकवणे  

6. ब्लॉगींग

7. मोबाईल ॲप चे निर्माण करणे 

8. Quara च्या माध्यमातून पैसे कमवने.

9. मोबाईल गेम चे निर्माण 

10. वेबसाईट निर्मिती करणे

11. वेबसाईट theme चे निर्माण करणे

12. युट्युब वर प्रोग्रामिंग विषयी व्हिडीओ टाकने

13. आर्टिकल लिहिणे

14. वेब ॲप्लिकेशन चे निर्माण करणे 

सारांश / conclusion

वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या माध्यमातून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वेगवेगळ्या समस्यांवर समाधान प्राप्त केले जात आहे त्यामुळे आजच्या या लेखाद्वारे आपण Programming म्हणजे काय ( what is Programming in Marathi) विषयी माहिती जाणून घेतली.

मला आशा आहे तुम्हाला प्रोग्रॅमिंग विषयी माहिती चा हा लेख नक्कीच आवडला असेल, जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख शेअर करा व जर तुम्हाला त्या लेखामध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर तुम्ही तुमच्या सूचना कमेंट च्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहचवू शकता

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद…..

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *