Advertisements

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय | डिजिटल मार्केटिंग कशी शिकायची

Advertisements

आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे व या युगामध्ये सर्वांना डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ( What is digital marketing in Marathi ) हे माहीत असणे गरजेचे झाले आहे.

आजच्या काळात जवळपास सर्वांकडेच स्मार्टफोन आलेला आहे त्यामुळे मार्केटिंग क्षेत्रात वेगवेगळ्या संधी निर्माण होत आहे. डिजिटल मार्केटिंग मुळे पारंपरिक मार्केटिंगच्या तुलनेत कमी खर्चात चांगले रिझल्ट मिळतात त्यामुळे डिजिटल मार्केटिंग चा स्कोप वाढत आहे.

इंटरनेटच्या वाढत्या उपयोगामुळे जवळपास 80 टक्के इंटरनेट वापरकर्ता कोणतीही वस्तू खरेदी करण्याआधी त्याविषयी ऑनलाईन रिसर्च करतात त्यामुळे जवळपास सर्वच कंपन्या किंवा बिजनेस साठी डिजिटल मार्केटिंग महत्वाची ठरत आहे.

Advertisements
अनुक्रमणिका ↕

डिजिटल मार्केटिंग च्या भविष्यात वाढणाऱ्या मागणीनुसार आपल्याला डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती असणे गरजेचे आहे, त्यामुळेच आपण या लेखाद्वारे डिजिटल मार्केटिंग माहिती जाणून घेऊया.

What is digital marketing in Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ? What is digital marketing in Marathi 

जेव्हा मार्केटिंग मध्ये brands ला उपयुक्त कस्टमर बरोबर जोडण्यासाठी इंटरनेट तसेच डिजिटल माध्यमांचा उपयोग केला जातो तेव्हा त्या प्रकारच्या मार्केटिंग ला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. डिजिटल मार्केटिंग ला ऑनलाइन मार्केटिंग असेदेखील म्हटले जाते.

कोणतीही वस्तू किंवा सेवा निर्मिती केल्यानंतर त्यापुढील महत्त्वाचे आव्हान म्हणजे मार्केटिंग. आपण मार्केटिंग दोन प्रकारे करू शकतो एक म्हणजे पारंपरिक पद्धत यामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉडक्ट चे पोस्टर लावणे, पोम्प्लेट वाटणे, बॅनर लावणे अशा प्रकारच्या पद्धतीद्वारे मार्केटिंग करत असतो. पारंपरिक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात वेळ व संसाधने खर्च केले जातात परंतु आवश्यक परिणाम मिळण्याची शाश्वती नसते.

या उलट डिजिटल मार्केटिंग मध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असलेल्या श्रेणीतील कस्टमरला टार्गेट करून आपण कमी खर्चात जास्त चांगल्या प्रकारे मार्केटिंग करू शकतो. डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून विविध बिजनेस कमी वेळात, चांगल्या प्रकारे प्रस्थापित झाले आहेत.

डिजिटल मार्केटिंग चे महत्व ( डिजिटल मार्केटिंग चा उपयोग )

डिजिटल मार्केटिंगचा उपयोग ऑनलाइन माध्यमातून उपयुक्त कस्टमर बरोबर जोडण्यासाठी होतो.जेव्हा आपल्याला आवश्यक असलेला कस्टमर गुगल वर असतो तेव्हा त्याच्यासोबत कनेक्ट होण्यासाठी SEO & PPC ची मदत घेतली जाते, जेव्हा तो सोशल मीडियावर असतो तेव्हा सोशल मीडिया मार्केटिंग व ई-मेलच्या माध्यमातून ग्राहकासोबत जोडण्यासाठी ई-मेल मार्केटिंगचा उपयोग केला जातो.

जवळपास सर्वच बिजनेस मध्ये डिजिटल मार्केटिंग ची मदत घेतली जाते कारण डिजिटल मार्केटिंग चे फायदे बरेच आहेत त्यामधील काही पुढीलप्रमाणे – 

१. मोबाईलचा वाढत उपयोग –

मागील दशकापासून मोबाईलचा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे व त्याचबरोबर इंटरनेटचा उपयोग देखील वाढला आहे त्यामुळे आपण डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून आवश्यक मोबाईल युजरला टार्गेट करून आपला बिझनेस वाढवू शकतो.

२. मार्केटिंग साठी कमी खर्च –

डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत कमी खर्चात पोहोचू शकतो याउलट पारंपरिक पद्धतीमध्ये वेळ आणि पैसा खर्च करून आवश्यक परिणाम येण्याची गॅरंटी नसते.

३. कंपनीचा विस्तार वाढवण्यास मदत

बरेच इंटरनेट वापर करता ऑनलाइन माध्यमातून खरेदी करत असतात त्यामुळे आपण गुगल व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म  ॲड चा उपयोग करून आपल्या उत्पादनांच्या संभाव्य खरेदीदार पर्यंत पोहोचू शकतो व आपल्या कंपनीचा विस्तार वाढवू शकतो.

४. मार्केटिंग करण्याची मुक्तता 

डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून आपण ई-मेल, सोशल मीडिया पोस्ट, कंटेंट मार्केटिंग, व्हिडिओ आणि बॅनरच्या माध्यमातून मार्केटिंग करू शकतो त्यामुळे आपल्यावर विशिष्ट मार्केटिंग पद्धतीचा उपयोग करण्याचे बंधन राहत नाही.

५. परस्पर संवाद वाढण्यास मदत

जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करत असतो तेव्हा इंटरनेट वापरकर्ता आपण मार्केटिंग करत असलेल्या कंटेंट वर डायरेक्ट लक्ष देतो व बऱ्याच वेळा या पद्धतीमुळे आपले उत्पादन युजर च्या लक्षात राहते व त्यामुळे सेल वाढण्यास मदत होते.

६. विशिष्ट कस्टमर टार्गेट करणे  

इंटरनेट तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याकडील माहिती संग्रहित केली जाते त्यामुळे विशिष्ट भागात राहणाऱ्या लोकांच्या आवडीनिवडी कळण्यास मदत होते व वारंवार उपयोगात येणाऱ्या सेवांची उत्पादनांची माहिती मिळते व या माहितीच्या आधारे वेगवेगळ्या कंपनी आपल्या उत्पादनाला अनुसरून असलेल्या कस्टमरला टार्गेट करतात व सेल वाढवू शकतात.

७.कस्टमर चे प्रश्न सोडवण्यास मदत

जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करत असतो तेव्हा आपण आपल्या प्रॉडक्ट किंवा इंडस्ट्री बद्दल असलेले लोकांचे गैरसमज दूर करू शकतो व त्या माध्यमातून आपण ग्राहकांचा विश्वास संपादित करू शकतो.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार

जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग करत असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतींचा उपयोग करत असतो म्हणजेच जेव्हा आपल्याला सोशल मीडियावरील ग्राहकाला टार्गेट करायचे असते तेव्हा आपण सोशल मीडिया मार्केटिंग करत असतो व जेव्हा आपल्याला गुगल वरील युजरला टार्गेट करायचे असते तेव्हा आपण वेबसाईट किंवा ॲपचा SEO करत असतो.

त्यामुळेच कार्यपद्धतीनुसार डिजिटल मार्केटिंग चे प्रकार निर्धारीत केले गेले आहेत जे पुढील प्रमाणे 

  1. सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO)
  2. सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
  3. सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
  4. पे पर क्लिक मार्केटिंग (Pay Per Click Marketing)
  5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)
  6. कंटेंट मार्केटिंग (Content Marketing)
  7. अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
  8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)
  9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)
  10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

1. SEO (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे आपल्या वेबसाईट किंवा ॲप वरील कन्टेन्ट अशा प्रकारे बनवणे की गुगल त्याला गुगल शोधाच्या परिणामांमध्ये जास्तीत जास्त वरच्या स्थानामध्ये रँक करेल. जेव्हा आपण चांगल्या प्रकारे SEO करून आपला लेख गुगलच्या शोध परिणामांमध्ये पहिल्या तीन शोध परिणामांमध्ये दर्शनवण्यास यशस्वी ठरतो तेव्हा गुगलच्या मदतीने आपल्या वेबसाईटवर ऑरगॅनिक ट्राफिक मिळते.

2. SEM (सर्च इंजिन मार्केटिंग) 

तेव्हा सर्च इंजिनच्या माध्यमातून मोफत तसेच पैसे देऊन ट्राफिक वेबसाईटवर आणले जाते तेव्हा त्याला सर्च इंजिन मार्केटिंग “SEM” असे म्हटले जाते.सर्च इंजिन मार्केटिंग मध्ये कन्टेन्ट च्या सर्च इंजिन मधील इम्प्रेशन साठी पैसे दिले जातात. सर्च इंजिन मार्केटिंगच्या माध्यमातून वेबसाईटची रँकिंग सुधारून त्यावर मोफत ऑरगॅनिक ट्राफिक मिळण्यास मदत होते.

3. सोशल मीडिया मार्केटिंग 

जेव्हा विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किंवा वेबसाईटच्या मदतीने वेगवेगळ्या सेवा तसेच प्रॉडक्टचे मार्केटिंग केले जाते तेव्हा त्याला सोशल मीडिया मार्केटिंग असे म्हटले जाते. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग वेगवेगळ्या ब्रॅण्ड उपयोग करत आहेत. सोशल मीडिया मार्केटिंग च्या मदतीने ब्रॅण्ड value वाढविण्यास मदत होते.

4. पे पर क्लिक मार्केटिंग (PPC)

जेव्हा सर्च इंजिन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून वेबसाईटवर क्लिक वाढवायचे असतात तेव्हा वेबसाईटचे मालक सोशल मीडिया किंवा सर्च इंजिनच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक क्लिक साठी काही पैसे प्रदान करतात त्याला पे पर क्लिक मार्केटिंग म्हटले जाते.आपण पे पर क्लिक मार्केटिंग चा उपयोग करून सर्च इंजिन ला छोटी रक्कम देऊन त्या माध्यमातून मोठा सेल वेबसाईटच्या माध्यमातून घडवून आणू शकतो.

5. डिस्प्ले मार्केटिंग (Display Marketing)

जेव्हा आपण चित्र, व्हिडिओ, ॲनिमेशन तसेच टेस्ट लिंक च्या माध्यमातून इंटरनेटवर जाहिरात प्रदर्शित करत असतो तेव्हा त्याला डिस्प्ले मार्केटिंग असे म्हटले जाते.डिस्प्ले मार्केटिंग चे मुख्य वैशिष्ट्य हे आपला ब्रँड अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवणे व त्याबद्दल जनजागृती प्रदान करने असते.

6. कंटेंट मार्केटिंग (Content Marketing)

कंटेंट मार्केटिंग म्हणजे उपयुक्त आणि संबंधित माहितीचे निर्माण करून ती माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे. ही माहिती वेबसाईटवरील लेख, सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ, फोटो तसेच इतर माध्यमातून निर्माण केलेली असू शकते.कंटेंट मार्केटिंग मध्ये जर चांगली माहिती निरंतर प्रसारित केली गेली तर नक्कीच चांगले परीणाम मिळतात.

7. अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

अफिलिएट मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या वेबसाइट त्यांच्याद्वारे प्रदान करण्यात येणारी उत्पादने तसेच सेवा विकण्यासाठी ती सेवा किंवा उत्पादने विकणाऱ्या व्यक्तीस काही कमिशन प्रदान करतात. अफिलिएट मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या श्रेणीनुसार अफिलिएट कमिशन निर्धारित केलेले असते

8. ई-मेल मार्केटिंग (Email Marketing)

जेव्हा लाखो लोकांना एकाच वेळेस ई-मेल पाठवून प्रॉडक्टचे प्रमोशन केले जाते तेव्हा त्या मार्केटिंग ला ई-मेल मार्केटिंग (Email Marketing) असे म्हटले जाते. ई-मेल मार्केटिंगच्या माध्यमातून वेबसाईट किंवा ॲप वर ट्राफिक आणून त्या माध्यमातून वेबसाईटवरील सेल वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.

9. विडिओ मार्केटिंग (Video Marketing)

जेव्हा व्हिडिओच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत आपले प्रॉडक्ट व सेवा पोहोचवल्या जातात व त्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या मार्केटिंगला व्हिडिओ मार्केटिंग असे म्हटले जाते. व्हिडिओ मार्केटिंगसाठी यूट्यूब सारख्या प्लॅटफॉर्म ची मदत घेतली जाते. व्हिडिओ मार्केटिंग च्या मदतीने आपण आपल्या ब्रॅण्ड ची जागृकता वाढवून लोकांपर्यंत नवनवीन माहिती देखील पोहचवू शकतो.

10. मोबाईल मार्केटिंग (Mobile Marketing)

जेव्हा एसएमएस, ईमेल, सोशल मीडिया तसेच सर्च इंजिन च्या माध्यमातून मोबाईल उपभोक्त्यांना टारगेट करून मार्केटिंग केले जाते तेव्हा त्या मार्केटिंगला मोबाईल मार्केटिंग असे म्हटले जाते. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वजण मोबाईलचा उपयोग करताना आढळतात त्यामुळे मोबाईल मार्केटिंग च्या मदतीने एका मोठ्या वर्गावर लक्ष केंद्रित करून मार्केटिंग करू शकतो.

डिजिटल मार्केटिंग कशी शिकायची (how to learn digital marketing in Marathi)

डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहे ज्यामध्ये आपण पैसे देऊन तसेच फ्री मध्ये सुद्धा डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो.जर तुम्ही पहिल्यांदाच डिजिटल मार्केटिंग शिकत असाल व तुम्हाला डिजिटल मार्केटिंग चे बेसिक नॉलेज नसेल तर तुम्ही पैसे देऊन डिजिटल मार्केटिंग शिकू शकता व तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग चे सामान्य ज्ञान असेल तर तुम्ही गुगलच्या माध्यमातून शिकू शकतात.

डिजिटल मार्केटिंग शिकण्यासाठी तुम्ही पुढील पद्धतींचा अवलंब करू शकता –

1. पैसे देऊन डिजिटल मार्केटिंग शिकणे

जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग चे सामान्य ज्ञान नसेल तर तुम्ही पैसे देऊन डिजिटल मार्केटिंग शिकले पाहिजे व त्याद्वारे डिजिटल मार्केटिंग चे सामान्य ज्ञान घेतले पाहिजे. आपण फ्री मध्ये देखील डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो परंतु पहिल्यांदा फ्री मध्ये शिकण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते व बऱ्याच अडचणी येतात ज्यांना आपण paid कोर्स द्वारे दूर करू शकतो.

2. स्वतःचा ब्लॉग सुरू करणे

जेव्हा आपण स्वतःचा ब्लॉग सुरू करतो तेव्हा आपण त्या ब्लॉगद्वारे चांगले परिणाम मिळण्यासाठी सोशल मीडिया मार्केटिंग, SEO ,वर्डप्रेस इत्यादी गोष्टी शिकत असतो ज्याद्वारे आपल्याला डिजिटल मार्केटिंग चे सामान्य ज्ञान मिळण्यास मदत होते व आपल्याला डिजिटल मार्केटिंग चा अनुभव मिळतो.

3. डिजिटल मार्केटिंग चे पुस्तके वाचणे

जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कोर्स साठी पैसे खर्च करायचे नसतील तर तुम्ही त्यापेक्षा कमी रकमेमध्ये उपलब्ध असलेले डिजिटल मार्केटिंग चे पुस्तके वाचू शकतात व त्याद्वारे मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग करून डिजिटल मार्केटिंग शिकू शकतात. डिजिटल मार्केटिंग पुस्तकांद्वारे डिजिटल मार्केटींगचे व्यवहारिक ज्ञान मिळण्याची शाश्‍वती नसते परंतु या द्वारे तुमचा डिजिटल मार्केटिंग चा पाया नक्कीच भक्कम होतो.

4. इंटर्नशिप करणे

जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग सुरू करण्याबाबत सिरियस असाल तर तुम्ही एखाद्या चांगल्या डिजिटल मार्केटिंग कंपनी सोबत इंटर्नशिप केली पाहिजे. जे ज्ञान तुम्हाला त्या इंटरंशिप द्वारे मिळेल ते ज्ञान तुम्हाला स्वतः मिळवण्यास खूप अडचणी येतील.डिजिटल मार्केटिंग कंपनी सोबत इंटर्नशिप करताना तुम्हाला डिजिटल मार्केटिंग बरोबर काम करण्याची संधी मिळेल ज्याद्वारे तुमचे डिजिटल मार्केटींगचे ज्ञान खूप वाढेल.

5. युट्यूब वर व्हिडिओ बघणे

कधी कधी आपल्याला पुस्तके वाचण्याचा कंटाळा येऊ शकतो किंवा आपल्याकडे डिजिटल मार्केटिंग कोर्स साठी पैसे नसतात तेव्हा आपण युट्युब वर मोफत उपलब्ध असलेल्या डिजिटल मार्केटिंग चा व्हिडिओ बघू शकतो. युट्युब वर वेगवेगळ्या डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांद्वारे डिजिटल मार्केटींगचे ज्ञान दिले जाते ज्यांना आपण युट्युब वर सबस्क्राईब करून डिजिटल मार्केटिंग शिकू शकतो.

6. डिजिटल मार्केटिंग पॉडकास्ट ऐकणे

दिवसेंदिवस पॉडकास्ट ऐकणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे जर आपल्याला डिजिटल शिकायचे असेल तर आपण डिजिटल मार्केटिंग विषयी उपलब्ध असलेले पॉडकास्ट ऐकू शकतो.

7. डिजिटल मार्केटिंग वेबिनार मध्ये सहभागी होने

वेगवेगळ्या डिजिटल मार्केटिंग तज्ज्ञांद्वारे डिजिटल मार्केटिंग वेबिनार चे आयोजन केले जाते ज्यामध्ये आपण सहभागी घेऊन आपले डिजिटल मार्केटिंग विषयी असलेले ज्ञान वाढवू शकतो. डिजिटल मार्केटिंग webinar मध्ये सहभागी होऊन आपण डिजिटल मार्केटिंग विषयी नवनवीन संकल्पना शिकू शकतो.आपण गुगलच्या माध्यमातून डिजिटल मार्केटिंग वेबिनार मध्ये सहभागी होऊ शकतो.

8. डिजिटल मार्केटिंग मध्ये MBA करणे 

जर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री करायची असेल तर आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये एमबीए करू शकतो. हा MBA दोन वर्षांचा असतो, ज्यामध्ये आपल्याला डिजिटल मार्केटींगचे ज्ञान दिले जाते.डिजिटल मार्केटिंग मधील एमबीए मध्ये SEM, SEO, email marketing, SMM आणि डिजिटल मार्केटिंग विषयी बऱ्याच संकल्पना शिकवल्या जातात.

पारंपारिक मार्केटिंग आणि डिजिटल मार्केटिंग मधील फरक

पारंपरिक मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग
 पारंपरिक मार्केटिंग मध्ये मनुष्यबळाच्या आधारे मार्केटिंग केले जाते जसे की पोस्टर लावणे, बॅनर लावणे इत्यादी. डिजिटल मार्केटिंग मध्ये डिजिटल माध्यमांद्वारे मार्केटिंग केले जाते यामध्ये गुगल वर Ad चालवणे, सोशल मीडिया मार्केटिंग इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
पारंपारिक मार्केटिंग मध्ये लावलेल्या पैशाच्या तुलनेत कमी आवश्यक परिणाम बघण्यास मिळतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी पैशात चांगले परिणाम बघण्यास मिळतात.
पारंपारिक मार्केटिंग मध्ये आपण एकाच वेळेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे जर आपण एकाच ठिकाणी बॅनर लावले तर ते काही मर्यादित लोकांनाच दिसते. डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण एकाच वेळेस खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो जसे की जर आपण फेसबुकवर ऍड रन केली तर आपण अत्यंत कमी कालावधीत लाखो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो.
पारंपारिक मार्केटिंगमध्ये कमी परस्पर संवाद साधला जातो डिजिटल मार्केटिंग मध्ये आपण आपल्या ग्राहकांबरोबर डायरेक्ट बोलून त्यांच्या समस्या सोडवू शकतो व ग्राहकाचा आपल्यावरील विश्वास वाढवू शकतो.
पारंपारिक मार्केटिंग मध्ये लावलेल्या पैशांवर आपल्याला किती फायदा झाला हे समजणे अवघड असते. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून लावलेल्या पैशांवर आपल्याला किती फायदा झाला हे समजने खूप सोपे असते.
पारंपारिक मार्केटिंग कमी लाभदायक व जास्त खर्चिक असते. डिजिटल मार्केटिंग जास्त लाभदायक व कमी खर्चिक असते.
पारंपरिक मार्केटिंगमध्ये विशिष्ट ग्राहकांना केंद्रित करून मार्केटिंग करणे शक्य नसते. डिजिटल मार्केटिंग मध्ये विशिष्ट ग्राहकांवर केंद्रित मार्केटिंग करणे शक्य असते.
पारंपारिक मार्केटिंगच्या माध्यमातून ग्राहक त्यांना आवश्यक असलेल्या जाहिराती बघू शकत नाही त्यांच्यावर आपण दाखवलेल्या जाहिराती बघण्याचे बंधन असते. डिजिटल मार्केटिंग मध्ये ग्राहकाला आपली जाहिरात आवडली नाही तर तो आपली जाहिरात स्किप करू शकतो किंवा त्या जाहिराती कडे दुर्लक्ष करू शकतो

डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे

जेव्हा आपण डिजिटल मार्केटिंग शकतो तेव्हा आपल्यापुढे महत्त्वाचा प्रश्न पडतो की डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे. आपण डिजिटल मार्केटिंग च्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने पैसे कमवू शकतो जसे की स्वतःच्या बिझनेसचे निर्माण करणे, कंटेंट लिहिणे इत्यादी.

डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आपण पुढील पद्धतींचा उपयोग करू शकतो –

1. SEO एक्सपर्ट बनने व SEO सेवा लोकांना प्रदान करणे

2. उपयुक्त माहिती चे निर्माण करून त्याद्वारे पैसे कमवणे

3. अफिलिएट मार्केटिंग करणे

4. स्वतःची वेबसाईट बनवून ऍड च्या माध्यमातून पैसे कमवने

5. सोशल मीडिया मॅनेजर बनणे

6. वेगवेगळ्या कंपन्यांना डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देणे

7. स्वतःचा यूट्यूब चैनल तयार करून त्याद्वारे ऍड व स्पॉन्सरशिप च्या माध्यमातून पैसे कमावणे.

8. दुसऱ्या कंपन्यांसाठी पे पर क्लिक कॅम्पेन चे निर्माण करणे.

9. डिजिटल मार्केटिंग कंपनी मध्ये नोकरी करणे.

10. स्वतःची डिजिटल मार्केटिंग एजन्सी सुरू करणे.

11. इ-कॉमर्स विशेषज्ञ बनून त्याद्वारे पैसे कमावणे.

12. स्वतःच्या डिजिटल प्रॉडक्ट चे निर्माण करून ते विकणे.

डिजिटल मार्केटिंग मध्ये येणारी आव्हाने ( समस्या )

डिजिटल मार्केटिंग मुळे मिळणाऱ्या यशामुळे डिजिटल मार्केटिंग मध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे जर आपल्याला डिजिटल मार्केटिंग विषयी चांगले ज्ञान नसेल तर आपण अडचणीत येऊ शकतो त्यामुळेच आपल्याला डिजिटल मार्केटिंग मध्ये येणारी आव्हाने माहित असणे गरजेचे असते.

डिजिटल मार्केटिंग मध्ये येणारी काही प्रचलित आव्हाने पुढील प्रमाणे- 

1. आपल्या प्रॉडक्ट किंवा सेवा साठी आवश्यक असलेला उपयुक्त ग्राहक कोणता हे माहितच नाही.

2. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून सेल घडवून आणणे

3. आपल्या ग्राहकाला आवश्यक अनुरूप माहितीच्या निर्माण करण्याचे तंत्र माहीत नसणे

4. लोकांना कशा प्रकारची माहिती हवी आहे हे माहितच नाही.

5. पे पर क्लिक च्या माध्यमातून वेबसाईटवर आलेल्या ट्रॅफिकचा फायदा न होणे.

6. आपल्या ब्रँड चा लोकांच्या मनावर ठसा उमटवणे.

7. डेटा तसेच अन्य उपयुक्त तंत्रांचा चांगल्या प्रकारे उपयोग न करता येणे.

8. मोबाईलच्या दृष्टीने आवश्यक डिजिटल मार्केटिंग करणे.

9. एकाच वेळेस अनेक डिजिटल माध्यमातून सारखाच संदेश पाठवण्याचा प्रयत्न करणे.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न ( FAQ ) 

डिजिटल मार्केटिंग मधील ऑफलाइन चॅनल कोणते आहेत ?

उत्तर – टीव्ही, रेडिओ, इलेक्ट्रिक बिल बोर्ड, कॉल मोबाईल ऑनलाईन मार्केटिंग हे डिजिटल मार्केटिंग मधील ऑफलाईन चॅनल आहेत.

डिजिटल मार्केटिंग कोण करू शकतो ?

उत्तर – कोणताही व्यक्ती डिजिटल मार्केटिंग करू शकतो परंतु जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग कंपनी मध्ये काम करायचे असेल तर तुम्ही सर्टिफिकेट कोर्स करणे गरजेचे आहे.

आपण मोबाईलच्या सहाय्याने डिजिटल मार्केटिंग करू शकतो का ?

उत्तर – होय, आपण मोबाईलच्या सहाय्याने डिजिटल मार्केटिंग करू शकतो व त्याद्वारे पैसे देखील कमवू शकतो.

आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये करियर बनवू शकतो का ?

उत्तर – आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे व त्यामुळे डिजिटल मार्केटिंग मधील संधी वाढत चालली आहे म्हणून आपण डिजिटल मार्केटिंग मध्ये चांगले करिअर बनवू शकतो.

डिजिटल मार्केटिंग केल्यावर आपल्याला कोणता जॉब मिळतो ?

उत्तर – डिजिटल मार्केटिंग केल्यावर आपल्याला पुढील जॉब मिळू शकतात – 

1. गुगल तसेच फेसबुक एड स्पेशलिस्ट

2. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर

3. सोशल मीडिया manager

4. कंटेंट राईटर

5. ग्राफिक डिझाईनर

6. SEO executive

सारांश ( conclusion )

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डिजिटल मार्केटिंग मधील संधी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळेच आजच्या या लेखाद्वारे आपण डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय (what is digital marketing in Marathi) या विषयी माहिती जाणून घेतली.

मला आशा आहे तुम्हाला डिजिटल मार्केटिंग विषयी माहिती चा हा लेख नक्कीच आवडला असेल जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख शेअर करा व या लेखात काही त्रुटी आढळल्या असतील तर आम्हाला कमेंट वर कळवा.

आपला दिवस शुभ, असो धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *