Function keys (F1 – F12) काय आहेत | Function keys चा उपयोग

Advertisements

 आपण कायमच कीबोर्ड बघत आलेलो आहे आणि त्यामध्ये  वरती वरच्या बाजूला F1 to F12 keys असतात. आपल्या मनात हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की या बटनांचा उपयोग काय आहे?, function keys काय आहे? यांचा संगणकातील उपयोग काय आहे?इत्यादी.

 आपण जे F1-F12 keys बघत असतो त्यांना म्हणतात Function keys. जर शब्दशः अर्थ काढला तर याचा अर्थ होईल कार्य करणारे बटन. आणि जसा याचा अर्थ आहे तसेच त्याचे कार्य देखील आहे या बटणाचा उपयोग विविध कार्य करण्यासाठी होतो जसे की F3 चा उपयोग विविध दस्तऐवज यांमध्ये शोध घेण्यासाठी होतो.

Table of content ↕

 तसे पाहायला गेले तर F1 to F12 keys ह्या कीबोर्ड मध्ये जीव घालण्याचे काम करतात. विविध कामांचा shortcut या keys मुळे अत्यंत सोपा झाला आहे. कीबोर्ड मध्ये यांचे हेच कार्य त्यांला इतर keys पासून वेगळे बनवतो.या keys चे shortcut शिवाय पण अन्य उपयोग होतो तो आपण पुढे जाणून घेऊ.

Function keys chi mahiti

 महत्वाच्या Function keys आणि त्यांचा उपयोग

संगणकामध्ये वरच्या बाजूला F1 ते F12 keys असतात ज्यांना आपण function keys असे संबोधतो. या keys चा उपयोग संगणकामध्ये shortcut प्रदान करण्यासाठी होतो. जर आपल्याला देखील या keys चा उपयोग माहित नसेल तर चला माहिती करून घेऊ Function keys चा उपयोग.

Function keys chi mahiti

F1 key-

 विचार करा आपण एखादे app संगणकामध्ये घेतलेले आहे आणि ते कसे वापरायचे याविषयी आपल्याला कल्पना नाही आपण विचार करत असतो कदाचित कुठून काही मदत मिळाली तर बरे झाले असते आणि यांचसाठी या key चा उपयोग होतो. F1 या key चा उपयोग मदत (help)घेण्यासाठी होतो.

1.F1 –मदद प्रदान करतो 

2.Ctrl + F1 = Task panel उघडतो 

3.Windows key+ F1 = Windows चे मार्गदर्शन आणि मदत portal उघडते.

F2 key-

 आपण कधी कधी एखादे फोल्डर किंवा फाइल सिलेक्ट केली आणि आपल्याला त्याचे नाव बदलायचे असेल परंतु आपला माणूस खराब झालेला असेल तर निश्चितच हि key आपल्या कामी पडेल कारण या key च्या मदतीने select केलेल्या फाईल चे नाव बदलता येते. हि key Rename चे कार्य करते.

1. F2 = Select केलेल्या फाईल किंवा फोल्डर चे नाव बदलतो.

2. Alt + Shift + F2 = Save / Save as चा option उघडतो.

3. Ctrl + F2 = MS word मध्ये print करण्यासाठीची Window उघडते 

4. F2 = MS Excel मध्ये active cell ला edit करण्यासाठी 

F3 key –

 कधीकधी संगणकामध्ये एखादे डॉक्युमेंट उघडल्यावर आपल्याला त्यामध्ये Search कसे करायचे हे समजत नाही तर सर्च करण्यासाठी या key ची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच Shift+F3 उपयोग केला तर Select केलेला text Uppercase to Lowercase होतो.

1. Window key + F3 = Windows मध्ये Advanced search चा पर्याय उघण्यासाठी उपयुक्त.

2. F3 – Browser /window मध्ये शोधन्याचा option उघडण्यासाठी.

3. Shift + F3 = Highlight केलेल्या शब्दांला Lowercase मध्ये करण्यासाठी उपयुक्त.

F4 key –

या function key चा उपयोग आपण ‘Alt’ बरोबर करू शकतो. जर आपण ‘Alt+F4‘ चा उपयोग एखाद्या app /window केले तर जो पण application / window आपल्या संगणकामध्ये उघडलेला आहे तो बंद होईल. त्याच बरोबर Alt+F4  चा उपयोग जर आपण Desktop च्या home screen वर जाऊन केला तर shutdown चा option दिसेल.

1. Alt + F4 = चालू असलेले कार्य थांबवते आणि ती Window close करते. ( एखाद्या software किंवा App मध्ये उपयोग केला तर )

2. F4 = Adress bar उघडण्यासाठी.

3. Alt + F4 = Shut down आणि इतर निगडित पर्याय बघण्यासाठी (Home screen वर उपयोग केला तर )

F5 –

 जर तुमच्या संगणकाला वारंवार hang होण्याची समस्या असेल तर ही key तुमच्या खूप उपयोगाची आहे कारण या key मुळे Refresh फंक्शन कार्यरत होते . या key च्या उपयोगाने तुम्ही संगणकाची स्क्रीन वारंवार Refresh करू शकतात. तसेच या  Key च्या मदतीने Webpage Reload होण्यास मदत होते.

1. F5 = चालू असलेल्या कार्याची window ला Refresh करण्यासाठी.

2. F5 = PowerPoint मध्ये सुरवातीपासून slideshow करण्यासाठी.

3. F5 = folder मध्ये असलेल्या घटकांना Refresh करण्यासाठी.

4. Ctrl + F5 = संपूर्ण संगणक Refresh करण्यासाठी.

5. F5 = वेबसाईट ला Reload करण्यासाठी.

F6 –

जर तुम्ही Mozilla Firefox किंवा Internet Explorer या browser चा उपयोग करत असाल तर या key चे कार्य तुम्ही जाणून घेतलेच पाहिजे कारण या key मुळे Cursor हा webpage वरून direct web address वर येतो. हा बदल सर्वर side ला न होता client side ला होतो.

1. F6 – Internet चा उपयोग करताना cursor ला Adress bar वर नेण्यासाठी उपयुक्त.

2. F6 – लॅपटॉप मध्ये आवाज कमी करण्यासाठी उपयोगी.

3. Alt + Shift + F6 = MS word मध्ये Print करण्याआधीची window उघडते ज्यात प्रिंट कशी दिसणार आहे ते समजते.

F7-

 जर तुम्ही टायपिंग करत असताना खूप Spelling चुकतात तर तुम्ही F7 चा उपयोग करून spelling check करू शकतात तसेच या key मुळे तुम्हाला व्याकरणातील चुका देखील समजतील.

1. F7 = MS Officeमध्ये Grammar आणि स्पेल्लिंग मधील चुका शोधण्यासाठी आणि बरोबर करण्यासाठी.

2. F7 = लॅपटॉप च्या काही brand मध्ये आवाज वाढवण्याचे बटन म्हणून कार्य करते.

3. Shift + F7 = MS word मध्ये शब्दांचे समानार्थी शब्द शोधण्यासाठी उपयुक्त.

F8-

 जर तुम्हाला संगणकामध्ये Safe mode ला On करायचे असेल तर तुम्ही या key चा उपयोग करू शकतात. यासाठी जेव्हा तुम्ही संगणक Start कराल तेव्हा Windows चा लोगो दिसायच्या आधी F8 या key चा उपयोग करा आणि option मधून safe mode निवडून Ok वर click करा.

1. F8 – Safe mode ला उघडण्यासाठी 

2. F8 – Windows च्या Recovery System च्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी.

F9 –

जर तुम्ही विचार करत असाल कि Microsoft Word मध्ये Measurement Tool Bar कसा उघडू तर याचे उत्तर आहे तुम्ही फक्त F9 या key च्या मदतीने हे कार्य करू शकतात.

1. F9 – Windows Outlook मध्ये ईमेल पाठवण्यासाठी आणि ईमेल चा स्वीकार करण्यासाठी उपयुक्त.

2. F9 – लॅपटॉप मध्ये स्क्रीनचा brightness कमी करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

3. F9 – MS word मध्ये document ला Refresh करण्यासाठी उपयोगी.

F10 –

 या key चा उपयोग संगणकामध्ये जास्त होत नाही परंतु जेव्हा तुम्ही ms word चा उपयोग कराल तेव्हा या key च्या मदतीने तुम्ही विविध shortcut बघून आपले काम सोपे करू शकता. तसेच या key च्या मदतीने तुम्ही Menuabar ला Activate करू शकतात.

1. F10 = Menu bar ला highlight करण्यासाठी उपयुक्त.

2. F10 = लॅपटॉप मध्ये स्क्रीनचा brightness वाढवण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो.

3. Shift +F10 = mouse वर Right click करून जो मेनू bar उघडतो तो या बटनच्या सहाय्याने उघडता येतो.

F11 –

कधी कधी आपल्याला संगणकावर full screen mode हवा असतो व जर आपल्याला तो कसा  Activated करायचा हे माहित नसेल तर अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे F11 चा उपयोग माहित असुद्या . F11 च्या मदतीने आपण Internet Explorer मध्ये Full screen mode ला On करू शकतो.

1. F11 – फुल स्क्रीन मोड उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी या बटणाचा उपयोग होतो 

F12 –

या key चा उपयोग फक्त Office programme मध्ये होतो.Microsoft word मध्ये पुढील shortcut हे F12 च्या मदतीने केले जाऊ शकतात.

1. Ctrl + F12 = नवीन document उघडते

2. Shift + F12= MS word file ला Save करण्यासाठी.

3. Alt + Shift + F12 = MS word मध्ये print साठी.

4. F12 = Browser मध्ये developer tool उघडण्यासाठी या key चा उपयोग होतो.

 खूप वेळा विचारले गेलेले प्रश्न | FAQ (Frequently Asked Questions ) –

 कीबोर्ड मध्ये किती Function key असतात?

उत्तर – कीबोर्ड मध्ये साधारणतः 12 function keys असतात या function keys F1 ते F12 या आहेत तर काही विशिष्ट कीबोर्ड मध्ये यांची संख्या 19 पर्यंत असते परंतु सामान्यता यांची संख्या 12 असते.

कीबोर्ड मध्ये फंक्शन चा काय उपयोग आहे आणि फंक्शन चा कशा प्रकारे उपयोग करावा?

उत्तर – कीबोर्ड मध्ये फंक्शन हे विशिष्ट प्रकारे Operating system ला निर्देश देण्यासाठी बनवलेले असतात. काही विशिष्ट कमांड संगणकाला प्रदान करण्यासाठी या Key चा खूप उपयोग होतो.

 कोण कोणत्या फंक्शन कीज आहेत?

उत्तर – Function key या कीबोर्डच्या वरच्या बाजूला असतात आणि त्या आहेत F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12.

 Function key कशाला म्हणावे?

उत्तर – कीबोर्डच्या वरच्या भागात ज्या  F1 ते F12 key असतात त्यांना Function key म्हणतात. या key वर कोणतेही अक्षर कोरलेले नसते आणि यांचा उपयोग operating system ला निर्देश देण्यासाठी होतो.

F1 key चा काय उपयोग आहे?

 उत्तर – आपल्याला संगणका विषयी जास्त माहिती नसेल आणि आपल्याला संगणकातील विशिष्ट Software / App विषयी मदतीची अपेक्षा असेल तर F1 key दाबल्यावर आपल्याला तो Software / app कसा उपयोग करायचा याचे मार्गदर्शन भेटेल.

सारांश / Conclusion –

 या लेखामध्ये आपण जाणून घेतले की संगणकाच्या वर्षा भागावर असलेल्या F1 to F12 या घटनांचा काय उपयोग आहे तसेच हे कसे कार्य करतात. त्याच्या जोडीला आपण विविध  Microsoft च्या app मध्ये या Key चा कसा उपयोग करायचा ते पण बघितले. आपण बघितले की Function key विषयी सर्वात जास्त विचारले जाणारे प्रश्न कोणते आहेत आणि त्यांची उत्तरे.

 जर या लेखामध्ये तुम्हाला कोणतीही समस्या असेल तर तुम्ही टिप्पणी (Comments  द्वारे आम्हाला सांगू शकता तसेच या लेखामध्ये कोणता भाग चुकीचा असेल किंवा काही बदल करायचा असेल त्या विषयी देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता. तुमची प्रत्येक सूचना स्वीकारली जाईल.

 आपला दिन शुभ असो ! धन्यवाद…

Advertisements

Leave a Comment