Advertisements

वेब काय आहे | what is www in Marathi

Advertisements

आपण सर्वानी internet चा अनुभव घेतला असेल तसेच आपण सर्वांनी वेब विषयी ऐकलेलं असते आणि आपल्या मनात हे कुतूहल देखील असते कि वेब हे नेमके काय आहे. आपण या लेखात वेब विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि त्यामुळे आपल्याला आज नंतर वेब काय आहे हा प्रश्न सतावणार नाही.

तर internet चे मुख्यतः दोन प्रकार असतात एक म्हणजे surface web ज्या मध्ये गूगल, youtube अशा site येतात आणि दुसरा प्रकार म्हणजे dark वेब ज्यात विविध सरकारी सरकारी माहिती साठवली जाते आणि आपण फक्त surface web चा उपयोग करू शकतो dark web चा नाही.

Advertisements

Surface web मध्ये गुगल वरील सर्व वेबसाईटचा समावेश होतो आणि त्यासाठी जी प्रणाली वापरली जाते तिला वेब किंवा www असे म्हणतात. WWW पहिल्यांदा 1993-1994 मध्ये सामान्य नागरिकांसाठी उपयोगात आली. WWW मध्ये सर्व website ला वेगवेगळे परंतु unique नाव देण्यात येते.

Www kay aahe

Table of content ↕

वेब काय आहे | what is www in Marathi


WWW चा full फॉर्म आहे world wide web. WWW ला सामान्यता वेब असे संबोधले जाते. WWW ची व्याख्या अशी आहे कि internet वर उपस्थित resources आणि user जे http चा उपयोग आपल्या site च्या url मध्ये करतात त्यांला वेब असे संबोधले जाते.
 वेब आणि इंटरनेट मध्ये मुख्य फरक हा आहे की web हा internet च्या मदतीने माहितीची देवाण-घेवाण करतो. जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर Web हा विविध computer मध्ये internet च्या मदतीने माहितीची देवाणघेवाण करतो.
WWW एक अशी प्रणाली आहे ज्यामध्ये वेबसाईटला विविध युनिक नाव दिले जाते ज्याला domain असे संबोधले जाते. WWW मध्ये विविध लेख, photo, video आणि गाण्याचा समावेश होतो. तसेच इंटरनेट वर उपस्थित सर्व website आणि web application चा समावेश हा www किंवा web मध्ये होतो.
WWW मध्ये जी काही विविध माहिती असते ती html या programming भाषेत लिहली जाते. आजकाल html च्या जोडीला विविध programming languages चा उपयोग करून अत्यन्त सुबक website बनवल्या जातात ज्या मध्ये मुख्य programming languages आहे css आणि JavaScript.

 वेब (www) आणि internet (आंतरजाल )मधील फरक


आपल्या मधील बहुतेक जणांना असे वाटत असेल कि वेब आणि internet मध्ये काहीच फरक नाही परंतु असे नाही आहे.वेब आणि internet मध्ये खूप फरक आहे आणि या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत.
Internet मध्ये विविध संगणक (PC, लॅपटॉप आणि मोबाईल सारखे उपकरणे ) एकमेकांना वायरलेस किंवा wire च्या मदतीने जोडलेले असतात म्हणजे आपण ई-मेल पाठवतो, मोबाईल वरून chatting करतो या साठी internet चा उपयोग होतो.
WWW किंवा वेब मध्ये विविध वेबसाईट आणि webpages एकमेकांना जोडलेले असतात. जेव्हा आपण google उघडतो आणि काहीही सर्च करतो तेव्हा आपल्या समोर वेगवेगळ्या वेबसाईट उघडतात त्याला आपण www किंवा वेब असे म्हणतो.

वेब चा इतिहास | web history in marathi 


वेब चा शोध march 1989 मध्ये Tim berners-ली यांनी लावला त्यावेळी ते CERN मध्ये कार्यरत होते. या सर्व गोष्टी ची सुरवात तेव्हा झाली जेव्हा Tim सरांला विविध कॉम्प्युटर उचकून तसेच विविध पुस्तकांमध्ये माहिती सापडायला अडचण होऊ लागली. तेव्हा त्यांनी अशी system उभरायची ठरवली कि ज्यामध्ये विविध माहिती फक्त एका click वर उपलब्ध होईल.

Tim berners-lee
सण 1993-94 मध्ये www किंवा web हे सर्वांना वापरायला खुले करण्यात आले आणि लोकांसमोर माहितीचे एक नवीन द्वार खुले झाले जेथे खूप सारी माहिती फक्त एका click वर उपलब्ध होते.
30 April 1993 रोजी www हे सर्व लोकांना वापरायला free मध्ये उपलब्ध झाले. त्यावेळी www चा उपयोग करताना web pages तयार करताना HTML (Hypertext Markup Language ) चा मुख्यता उपयोग होत होता.

WWW / web चे घटक

WWW किंवा web चे मुख्यता तीन घटक आहेत
  • URL (Unique Resource Locator )– कोणतीही website आपण उघडतो तेव्हा आपल्याला त्याचा url दिसतो जसे आपली वेबसाईट techmiss.in उघडल्यावर असा url दिसेल – http://techmiss.in/

  • HTTP/HTTPS(Hypertext Transfer Protocol / Hypertext Transfer Protocol Secure )- Website ला उघडल्यावर website च्या url च्या सुरवातीला http किंवा https असते. आपल्याला http ने सुरवात असलेली वेबसाईट असुरक्षित तसेच https ने सुरवात असलेली site सुरक्षित म्हणून ओळखता येते.

  • HTML(Hypertext Markup Language )- HTML चा उपयोग वेबसाईट तयार करण्यासाठी होतो. Internet वर www च्या जाळ्यात जितक्या पण वेबसाईट आहेत त्यांच्यासाठी html चा उपयोग होतो.

WWW कसे काम करते

WWW च्या कार्यप्रणाली मध्ये वरती दिलेले 3 घटक मुख्य भूमिका पार पडतात. आपण जेव्हा google वर काही माहिती शोधतो तेव्हा google आपली search केलेली माहिती सर्वर कडे पाठवतो आणि सर्वर त्याच्याकडे उपलब्ध असलेली माहिती आपल्याला करून देतो.
WWW कार्यप्रणाली मध्ये सर्वर माहिती process करून पाठवतो. ती माहिती html च्या स्वरूपात असते पण आपला browser html वर प्रक्रिया करून ती माहिती simple भाषेत उपलब्ध करून देतो. Browser चे मुख्य काम असते माहिती सर्वर कडे पाठवणे आणि आलेल्या माहितीवर प्रक्रिया करून ती आपल्याला सोप्या भाषेत उपलब्ध करून देणे.
WWW kase kam karte
आपण जी माहिती chrome किंवा इतर browser वर शोधतो ती माहिती html च्या स्वरूपात सर्वर कडे पाठवली जाते. सर्वर वेबसाईट च्या नावाच्या मदतीने वेबसाईट चा शोध लावतो आणि url च्या description च्या मदतीने आपल्याला माहिती उपलब्ध करून देतो .

उदाहरणार्थ – http://techmiss.in/2021/05/WWW-kay-aahe-what-is-www-in-marathi.html
या आपल्या वेबसाईट च्या url मध्ये http://techmiss.in/ हे वेबसाईट चे नाव आहे  WWW च्या पुढील url description आहे.

WWW / वेब चे फायदे –

Www किंवा वेब चे खूप सारे फायदे आहे ते पुढीलप्रमाणे
  • Www हे free मध्ये उपलब्ध आहे.
  • जी माहिती शोधायला कित्येक पुस्तकं वाचावी लागतील ती माहिती वेब च्या मदतीने मॉनिटर वर एका click वर उपलब्ध होते.
  • WWW हे जगात कुठूनही फक्त internet च्या मदतीने उपयोगात आणता येते.
  • WWW मध्ये fast माहिती उपलब्ध होते व वेब चा कमी रॅम च्या उपकरणांमध्ये उपयोग होतो.
  • आपण www च्या मदतीने जगातील विविध लोकांना जोडले जाऊ शकतो उदाहरणार्थ facebook.
  • Connect होण्यासाठी कमी पैसे लागतात.

Www / वेब चे तोटे

Web चे खूप सारे तोटे आहेत त्यामध्ये माहितीच्या सुरक्षिततेचा मोठा मुद्दा उपस्थित झाला आहे त्यामुळे www/ web चे तोटे पुढीलप्रमाणे –
  • आपली खूप सारी वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते ज्यामध्ये आपले नाव, पत्ता, फोन नंबर असू शकतो ज्याद्वारे आपल्याला धोका उद्भवू शकतो.
  • Web वर खूप सारे adult content उपलब्ध आहे ज्यापासून लहान तसेच किशोरवयिन मुलांना दूर ठेवणे अवघड झाले आहे.
  • Web मुळे खोट्या बातम्या खूप जोरात पसरतात.
  • Web मुळे बऱ्याचदा वैयक्तिक जीवनात अडथळा निर्माण होतो त्यामुळे Web चा वापर मर्यादित करावा ही आमच्या सर्व वाचकांला विनंती !

निष्कर्ष / conclusion

आज आपण जाणून घेतले कि www किंवा web काय आहे. Www कश्या प्रकारे काम करते. वेब च्या मदतीने संगणकाचे विविध भाग चांगल्या प्रकारे काम करतात. आपण www चा इतिहास बघितला आणि त्याच्या इतर घटनाक्रमांचा आढावा घेतला. आपण www चे फायदे देखील जाणून घेतले.
आपल्याला आता WWW विषयी कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही comment बॉक्स मध्ये comment करून आम्हाला कळवू शकता. तुमच्या सर्व सूचना स्वीकारल्या जातील.
धन्यवाद.
Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *