App कसा तयार करावा – स्वतःचे ॲप कसे बनवायचे

Advertisements

जेव्हा आपण संगणक किंवा मोबाईलचा उपयोग करत असतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे ॲप बघत असतो अशा वेळेस आपल्या मनात प्रश्न पडतो व स्वतःचे ॲप कसे बनवायचे ( How to make own app in Marathi)

कोणताही व्यक्ती ॲप किंवा अप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवू शकतो परंतु ते बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला coding शिकावे लागते त्यामुळेच या लेखाद्वारे आपण कोडिंग च्या माध्यमातून ॲप कसा तयार करावा हे देखील जाणून घेऊया.

अनुक्रमणिका ↕

ॲप बनवण्याचे प्रत्येक व्यक्तीचे वेगवेगळे उद्दिष्ट असते व त्यामुळे वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या मदतीने बनवला जातो जसे आपण बघत असतो काही ॲप चालवण्यासाठी इंटरनेटची गरज लागते तर काही ॲप ऑफलाइन पण चालू शकतात हे सर्व विविध प्रोग्रामिंग लैंग्वेज उपयोगाने साध्य होते त्यामुळे या लेखात आपण जाणून घेऊ ॲप बनवण्याची माहिती.

make free app in marathi

App कसा तयार करावा – How to make app in marathi

ॲप बनवण्यासाठी आपल्याला काही स्टेट्स चा उपयोग करावा लागतो त्या 09 स्टेप्स च्या मदतीने ॲप कसा तयार करावा हे जाणून घेऊया –

1. ॲप आयडिया 

2. मार्केटमधील उपयोगिता

3. ॲप चे वैशिष्ट्य

4. ॲप ची डिजाइन

5. ॲप चा मार्केटिंग प्लॅन

6. प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या मदतीने ॲप बनवणे

7. प्ले स्टोअर / ऍपल स्टोर ला ॲप सबमिट करणे

8. ॲप ची मार्केटिंग करणे

9. युजर च्या फीडबॅक च्या माध्यमातून ॲप मध्ये सुधारणा करणे.

1. ॲप आयडिया 

जेव्हा आपल्याला ॲप बनवायचा असतो तेव्हा आपल्याकडे ॲप आयडिया पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे आपला ॲप कशासंदर्भात आहे, त्याद्वारे काही माहिती लोकांपर्यंत पोहोचेल की तो ॲप काही वस्तूंच्या खरेदी विक्रीसाठी आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे ठरते.

ॲप आयडिया शोधण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या अडचणींवर लक्षात ठेवून त्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे कशा सोडवता येतील याचा विचार करणे.

जसे की कॉलेजमध्ये किंवा ऑफिसमध्ये जाताना रस्त्यात तुमची बाईक खराब झाली व तुमच्याकडे मेकॅनिक चा नंबर नसेल तर तुमच्या मनात असा प्रश्न पडू शकतो की माझ्याकडे एखाद्या जवळच्या मेकॅनिक चा नंबर असता तर बरे झाले असते व येथेच तुम्हाला तुमच्या ॲप ची आयडिया मिळते. तुम्ही ॲप चे निर्माण करून त्यावर मेकॅनिक network जोडू शकता.

जर आपल्याकडे ॲप आयडिया असेल तर आपण पुढील स्टेप कडे जाऊ शकता परंतु जर आपल्याकडे ॲप आयडिया नसेल तर आपल्याला पहिल्यांदा ॲप आयडिया विकसित करावी लागेल.

प्रत्येक वेळेस एकदम नव्या संकल्पनेचा ॲप बनवणे शक्य नसते त्यामुळे आपण उपलब्ध असलेल्या प्रसिद्ध ॲप मधील त्रुटी दूर करण्यासाठी ॲप विकसित करू शकतो.

जसे की इंस्टाग्राम च्या एका पेक्षा जास्त व्हिडिओ एकाच वेळेस डाउनलोड करणारा ॲप.

2. मार्केटमधील उपयोगिता

ॲप आयडिया विकसित केल्यानंतर आपल्या पुढील सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे तो मार्केटमध्ये उपयुक्त आहे किंवा नाही हे शोधणे. जर आपल्या ॲप आयडिया वर आधारित असलेला दुसरा एखादा ॲप मार्केटमध्ये उपलब्ध असेल व तो खूप प्रसिद्ध असेल तर आपण स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की लोक आपला ॲप का वापरतील.

म्हणजेच आता गुगल क्रोम ब्राऊझर खूप प्रसिद्ध आहे आणि जर आपण ब्राउजर ॲप बनवणार असाल तर आपण हा विचार केला पाहिजे की आपण जे ब्राउझर बनवत आहे ते कोणत्या वैशिष्ट्यांनी क्रोम ब्राउजर पेक्षा चांगले आहे.

आपण आपल्या ॲप आयडिया च्या मिळत्याजुळत्या संकल्पनेवर आधारित ॲप चा अभ्यास केला पाहिजे व जेव्हा आपण प्रत्यक्षात ॲप निर्माण कराल तेव्हा आपण अभ्यास केलेल्या सर्व ॲप मधील त्रुटी आपला ॲप कसा दूर करेल याचा विचार करणे गरजेचे ठरते.

3. ॲप चे वैशिष्ट्य

जर आपल्याला अशी ॲप आयडिया मिळाली जिला मार्केटमध्ये खूप मागणी आहे व ज्याद्वारे लाखो लोकांची मदत होणार आहे तेव्हा आपण आपल्या ॲप मध्ये कोणकोणते वैशिष्ट्य असणार आहेत याचा विचार केला पाहिजे.

जसे ती जेव्हा आपल्याला शॉपिंग संदर्भात ॲप बनवायचा असतो तेव्हा आपल्याला युजर बद्दल माहिती असणे गरजेचे असते त्यामुळे अशा ॲप आपल्याला अकाउंट बनवण्याचे व लॉगिन करण्याचे वैशिष्ट्य प्रदान करावे लागते.

परंतु जेव्हा आपल्याला ॲप च्या माध्यमातून फक्त सामान्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची असते तेव्हा आपल्याला युजर बद्दल जास्त माहिती असण्याची गरज नसते अशा वेळेस आपण ॲप मध्ये अकाउंट बनवण्याची वैशिष्ट दिले नाही तरी चालते.

आपण सर्वप्रथम ॲप आयडिया च्या आधारे ॲप चे वैशिष्टे जाणून घेऊन तो ॲप मार्केटमध्ये लॉन्च करणे गरजेचे ठरते व त्यानंतर आपण ॲप युजर च्या फीडबॅक च्या आधारे काही वैशिष्ट्ये ॲप मध्ये जोडू शकतो किंवा अतिरिक्त असलेल्या वैशिष्ट ॲप मधून वगळू शकतो.

4. ॲप ची डिजाइन

ॲप ची डिझाईन ही unique असावी तसेच ॲप design युजरला वापरण्यासाठी सोपी असावी. जर आपण आपल्या ॲप मध्ये खूप सारे वैशिष्ट्य प्रदान करणार असाल परंतु आपला ॲप सामान्य यूजर ला वापरण्यासाठी अवघड असेल तर तो ॲप fail होण्याची शक्यता असते.

आपण पेपर वर ॲप कसा दिसणार आहे याचा आराखडा करणे गरजेचे असते. तसेच ॲपच्या मुख्य स्क्रीन वर काय दिसणार, मेन नेव्हिगेशन कसे असणार, ॲप मधील पेजेस ची डिझाईन कशी असेल इत्यादी सर्व बाबींचा विचार करणे गरजेचे ठरते.

ॲप ची डिझाईन चांगली असल्यामुळे User Experience चांगला होण्यास मदत होते व त्यामुळे ॲप लोकप्रिय होण्यास मदत होत असते. ॲप चे निर्माण करत असताना ॲप च्या रंगसंगती बाबत चांगला विचार करणे महत्त्वाचे ठरते.

5. ॲप चा मार्केटिंग प्लॅन

ॲप निर्मितीनंतर सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे ॲप मार्केटिंग करणे त्यामुळे आपल्याकडे चांगला ॲप मार्केटिंग प्लान असणे गरजेचे आहे. ॲप चा मार्केटिंग प्लान ठरवताना आपल्याकडे किती बजेट आहे याचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

ॲप मार्केटिंग करताना आपण डिजिटल मार्केटिंग चा उपयोग करू शकतो तसेच जर आपल्याला लोकल एरिया ला अनुरूप ॲप बनवायचा असेल तर आपण फेसबुक किंवा गुगल ऍड चालवणे फायदेशीर ठरते.

कधी कधी आपण ॲप मार्केटिंगसाठी पारंपरिक पद्धतींचा देखील उपयोग करू शकतो ज्यामध्ये आपण बॅनर लावणे, पोस्टर चिटकवणे इत्यादी गोष्टी करू शकतो.

जर आपल्याकडे ॲप मार्केटिंग साठी चांगले बजेट असेल तर आपण सोशल मीडिया इन्फ्ल्यून्सर चा उपयोग करू शकतो त्यांच्याकडे आधीपासून चांगली ऑडियन्स असते त्यामुळे आपल्या ॲप च्या ग्रोथ मध्ये चांगली मदत होते.

6. प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या मदतीने ॲप बनवणे

जेव्हा आपण मार्केटिंग प्लान पर्यंत सर्व पूर्वतयारी करतो तेव्हा आपल्या पुढे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे तो प्रत्यक्षात बनवणे म्हणजेच आपण कागदावर काढलेली डिझाईन आता संगणकामध्ये उतरवायची असते.

ॲप बनवण्यासाठी वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज उपयोग केला जातो ज्यामध्ये अँड्रॉइड ॲप बनवण्यासाठी java,kotlin या प्रोग्रामिंग लैंग्वेज तर iOS ॲप बनवण्यासाठी swift प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा प्रामुख्याने उपयोग होतो.

आपल्याला आपल्या ॲप च्या उपयोगानुसार प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज निवडावी लागते तसेच काही जटिल ॲप बनवण्यासाठी दोन पेक्षा जास्त प्रोग्रामिंग लैंग्वेज चा उपयोग मध्ये करावा लागतो. आपल्या ॲप मध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य चांगल्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या मदतीने प्रत्यक्षात उतरवता

येतात.

प्रोग्रामिंग लैंग्वेज च्या मदतीने ॲप बनवण्यासाठी आपण स्वतःहून करू शकतो तसेच आपण फ्रीलान्सर किंवा ॲप बनविणार्‍या कंपनीला पैसे देऊन ॲप देखील बनवून घेऊ शकतो.

7. प्ले स्टोअर / ऍपल स्टोर ला ॲप सबमिट करणे

जेव्हा आपण प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग करून बनवतो तेव्हा आपण बनवलेला आहे आपल्याला प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअर वर सबमिट करावा लागतो. त्यामुळे आपला ॲप लाखो लोकांना डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतो.

प्ले स्टोअर वर जर आपण पहिल्यांदा ॲप्स सबमिट करणार असाल तर आपल्याला काही one time fee भरावी लागते. तसेच जेव्हा आपण ऍपल स्टोअर वर ॲप्स सबमिट करणार असाल तर आपल्याला दरवर्षी मासिक शुल्क भरावे लागते.

8. ॲप ची मार्केटिंग करणे

ॲप बनवून तो उपयुक्त ॲप स्टोअर वर सबमिट केल्यानंतर आपल्याला आपण बनवलेल्या मार्केटिंग प्लान आधारे ॲप ची मार्केटिंग करावी लागते. जेवढे महत्त्वाचे ॲप चे निर्माण करणे असते तेवढेच महत्त्वाचे आहे ॲप ची मार्केटिंग करणे. ॲप च्या मार्केटिंगमुळे आपल्या ॲप बद्दल लोकांना माहीत होते व त्याद्वारे ॲप बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होते.

ॲप ची मार्केटिंग करत असताना आपण मार्केटिंग करत असलेल्या मार्केटिंग चैनल ची माहिती असणे गरजेचे ठरते जसे की जर आपल्याला गुगल किंवा फेसबुक ऍड चा उपयोग करायचा असतो व यापूर्वी आपण या मार्केटिंग चैनल चा उपयोग केलेला नसेल तर अयोग्य मार्केटिंग मुळे आपले पैसे गमवण्याची शक्यता असते.

9. युजर च्या फीडबॅक च्या माध्यमातून ॲप मध्ये सुधारणा करणे.

ॲप बनवून झाला व त्याचे मार्केटिंग देखील करून झाली परंतु जर आपल्याला आपल्या ॲप मधून काही अपेक्षित परिणाम मिळत नसतील तर आपण युजरच्या फीडबॅक कडे लक्ष देणे गरजेचे ठरते. कधी कधी काही वैशिष्ट्य हे ॲप वापरण्यास अडथळा ठरत असतात अशा वैशिष्ट्य मध्ये सुधारणा करणे गरजेचे असते तसेच यूजर फीडबॅक च्या मदतीने ॲप मधील वेगवेगळ्या त्रुटी दूर करण्यास मदत होते.

ॲप बनवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रोग्रामिंग लँग्वेज आणि उपयोग 

प्रोग्रामिंग लैंग्वेज उपयोग
Python ॲप च्या frontend मध्ये उपयोग होतो तसेच django आणि flask फ्रेमवर्क च्या आधारे backend मध्ये उपयोग.
Javascript वेब एप्लीकेशन बनवण्यासाठी उपयोग तसेच node js च्या मदतीने backend मध्ये उपयोग
java अँड्रॉइड ॲप बनवण्यासाठी Java प्रोग्रामिंग लैंग्वेज चा उपयोग होतो. Java चे सुधारित स्वरूप म्हणून Kotlin चा उपयोग वाढला आहे.
Swift swift प्रोग्रॅमिंग लँग्वेज चा मुख्य उपयोग ॲपल ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये App बनवण्यासाठी केला जातो.
PHP काहि ॲप मध्ये database चा उपयोग केलेला असतो अशा ॲप मध्ये backend प्रोग्रामिंग साठी PHP चा उपयोग केला जातो.
Scala Java प्रोग्रामिंग लँग्वेज ला पर्याय म्हणून Scala या प्रोग्रामिंग लँग्वेज चा उपयोग केला जातो

प्रोग्रामिंग लँग्वेज कुठून शिकायच्या

प्रोग्रामिंग लँग्वेज शिकण्यासाठी आपण वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमांचा उपयोग करू शकतो ज्यामध्ये युट्युब, वेगवेगळ्या वेबसाईट जसे की W3School, geek for geek, Udacity यांचा समावेश होतो.

जर आपल्याला फ्री मध्ये ॲप डेव्हलपमेंट शिकायचे असेल तर आपण युट्युब ची मदत घेऊ शकतो. युट्युब वर वेगवेगळ्या ॲप डेव्हलपर ने यूट्यूब चैनल बनवलेले आहेत ज्यावरती आपल्याला premium content फ्री मध्ये उपलब्ध होते.

जर तुम्ही ॲप डेव्हलपमेंट बद्दल जास्त सिरियस असाल तर तुम्ही Udemy वर ऑनलाईन कोर्स खरेदी करून घरबसल्या ॲप डेव्हलपमेंट शिकू शकता तसेच तुम्ही वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये देखील ऑफलाइन पद्धतीने देखील ॲप डेव्हलपमेंट शिकू शकता.

ॲप बनवण्याचे फायदे

1. जेव्हा आपल्याला बिझनेस efficiency वाढवायची असते तेव्हा स्वतःचा ॲप बनवणे महत्त्वाचे ठरते कारण याद्वारे आपण आपल्या बिझनेसची ब्रँडिंग करू शकतो व customer base वाढवू शकतो.

2. आपण विविध service provider च्या सुविधांचा उपयोग करून बिझनेस संबंधी माहिती साठवून ठेवू शकतो परंतु जर आपल्याला आपल्या बिजनेस संदर्भात असलेली महत्त्वाची माहिती व डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर ॲप बनवणे फायद्याचे ठरते.

3. ॲप आपल्या कल्पनेतील गोष्टी सत्यात उतरवण्याचा मदत करत असतात. ॲप च्या मदतीने आपण विविध आयडीयांचे रूपांतर बिजनेस मध्ये करू शकतो.

4. जेव्हा आपल्या बिजनेस वाढत असतो तेव्हा रेगुलर ॲप वर लोड येण्याची शक्यता असते अशा वेळेस custom app आपल्याला मदत करत असतात.

5. जेव्हा आपल्या बिजनेस चे कस्टमर बरोबर चांगले रिलेशन तयार करायचे असते तेव्हा आपल्याला स्वतःच्या ॲप चा खूप फायदा होतो.

6. स्वतःच्या ॲप मुळे आपण नवीन कस्टमर चा डेटा अधिक चांगल्या प्रकारे साठवून ठेवू शकतो.

7. जेव्हा बिजनेस मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट चालू असतात तेव्हा त्या प्रोजेक्टला चांगल्या प्रकारे रन करण्यासाठी ॲप चा उपयोग होतो.

8. स्वतःच्या ॲपच्या मदतीने आपण डिजिटल फाईल चे रेकॉर्ड maintain करू शकतो.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न – FAQ

कोडींग शिवाय ॲप बनवता येतो का?

उत्तर – होय, कोडींग शिवाय सामान्य ॲप बनवता येऊ शकतो. कोडींग शिवाय बनवण्यासाठी तुम्हाला योग्य ॲप बिल्डर ची मदत घ्यावी लागते परंतु जेव्हा आपल्याला काही जटील बनवायचे असतात तेव्हा कोडींग ला दुसरा पर्याय नाही.

मोबाईल वरून ॲप बनवता येतो का?

उत्तर – मोबाईल वरून ॲप बनवण्यासाठी तुम्हाला कोड एडिटर ची गरज लागते. आजकालच्या स्मार्ट फोन मध्ये आपण वेगवेगळे कोड एडिटर इंस्टॉल करू शकतो व त्यावरून ॲपची कोडींग करून ॲप बनवू शकतो.

ॲप बनवल्यावर त्याद्वारे पैसे कसे कमवायचे?

उत्तर – ॲप बनवल्यावर त्याद्वारे पैसे कमावण्यासाठी आपण गुगल admob किंवा फेसबुक पार्टनर नेटवर्क च्या मदतीने पैसे कमवू शकतो तसेच आपण ॲपच्या माध्यमातून वेगवेगळे product विकून त्या द्वारे पैसे कमवू शकतो. ॲप बनवल्यावर पैसे कमवण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत.

ॲप बनवण्यासाठी डिग्री ची आवश्यकता आहे का?

उत्तर – नाही, ॲप बनण्यासाठी कोणत्याही डिग्री ची आवश्यकता नसते. ॲप बनवण्याकरिता फक्त ॲप बनवण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे.

सारांश / conclusion

मला आशा आहे तुम्हाला या लेखाद्वारे ॲप कसा तयार करावा (app making process in marathi) या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेअर करा व जर या लेखात काही त्रुटी आढळत असतील तर कमेंट च्या माध्यमातून आम्हाला कळवा.

तुमचा दिवस शुभ असो धन्यवाद.

Advertisements

Leave a Comment