Advertisements

डेटाबेस म्हणजे काय | Database (DBMS) Information in Marathi

Advertisements

संगणकाविषयी माहिती जाणून घेत असताना आपण कधीतरी डेटाबेस म्हणजे काय ( Database Information in Marathi ) डेटाबेस चे घटक कोणते आहे ? असे प्रश्न ऐकलेच असतील.

आपण वेगवेगळ्या फाईल शोधून काढण्यासाठी त्या फाइल्स योग्य पद्धतीने मांडतो. तेव्हा, अशा योग्य पद्धतीने मांडलेल्या फाइल्स मधून आपल्याला आवश्यक असलेली फाईल लवकर सापडते. अगदी त्याच प्रमाणे संगणक मध्ये विविध माहितीचे योग्य प्रकारे संकलन करून ठेवण्यासाठी डेटाबेस चा उपयोग केला जातो.

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये डेटाचे संकलन करणे आणि व्यवस्थापन करणे जिकरीचे काम झाले आहे परंतु डेटाबेस च्या मदतीने आपण हे कार्य सहजपणे करू शकलो.  चला तर मग जाणून घेऊया डेटाबेस विषयी माहिती.

Advertisements
Database information in Marathi
अनुक्रमणिका ↕

डेटाबेस म्हणजे काय ? Database meaning in Marathi

डेटाबेस म्हणजे संगणकामध्ये साठवण्यात येणाऱ्या माहितीचा किंवा डेटा चा समूह आहे. डेटाबेस चा उपयोग संगणकामध्ये डेटा साठवण्याकरता, डेटा मध्ये सुधारणा करण्याकरता किंवा डेटा अपडेट करण्याकरिता होतो. डेटाबेस ला नियंत्रित करण्याकरिता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम चा उपयोग होतो.

आपण Microsoft Office Excel चा उपयोग करत असतो तेव्हा आपण डेटा ला टेबल मधील Row आणि Column च्या माध्यमातून साठवत होतो. टेबल च्या माध्यमातून डेटा साठल्यामुळे आपल्याला आवश्यक असलेली माहिती लवकर मिळण्यास मदत होते.

विविध डायनॅमिक वेबसाईट मध्ये वेगवेगळ्या कारणांकरिता database चा उपयोग केला जातो.

उदाहरणार्थ, जेव्हा आपण कोणत्याही वेबसाईट किंवा ॲप वर अकाउंट Open करत असतो तेव्हा आपल्याकडून आपले नाव तसेच संबंधित माहिती विचारली जाते व एकदा ती माहिती पूर्णपणे भरून अकाउंट तयार केल्यावर आपण भरलेली माहिती संबंधित वेबसाईट च्या डेटाबेस मध्ये साठवली जाते त्यामुळे जेव्हा आपण दुसऱ्यांदा त्या वेबसाईट ला विजीट करतो तेव्हा आपण फक्त लॉग इन आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने संबंधित वेबसाईट वरील आपल्या अकाउंट चा उपयोग करू शकतो.

डेटाबेसचे प्रकार

डेटाबेस च्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डेटाबेस ची आवश्यकता भासू शकते. डेटाबेस चे त्याच्या उपयोगानुसार आणि कार्यप्रणालीनुसार काही महत्त्वाचे प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे :-

1. Network database

2. Hierarchical database

3. Relation database

4. Distributed database

5. Object oriented database

6. NoSQL database

Graph database

1. Network database

नेटवर्क डेटा बेस हे डेटाबेस मॉडेल चे एक प्रकार आहे ज्यामध्ये विविध मेम्बर्स किंवा फाईल या विविध owner च्या फाईल बरोबर जोडलेले असतात. नेटवर डेटाबेस ला उलट्या झाडाच्या रचनेप्रमाणे देखील संबोधले जाते. ज्यामध्ये विविध मेम्बर्स या झाडाच्या फांद्या असतात तर owner हे या झाडाचे मुख्य केंद्रस्थान असते.

2. Hierarchical database

Hierarchical database मध्ये डेटा ला एखाद्या झाडाच्या रचनेप्रमाणे संबोधले जाते. Hierarchical database मध्ये विविध child डेटा structure साठी एक सिंगल parent असतो. या रचनेमध्ये डेटा हा रेकॉर्ड च्या स्वरूपात साठवलेला असतो जो एकमेकांना लिंक्स च्या माध्यमातून जोडलेला असतो.

3. Relation database

E. F. Codd यांनी 1970 मध्ये दिलेल्या रिलेशन डेटा मॉडेल च्या आधारावर रिलेशन database निर्माण झाला आहे. रिलेशन डेटाबेस च्या व्यवस्थापनासाठी रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम चा उपयोग केला जातो. खूप सार्‍या रिलेशन डेटाबेस मध्ये SQL च्या आधारे डेटाबेस चे मॅनेजमेंट करण्याची सुविधा असते. रिलेशन डेटाबेस मध्ये योग्य प्रकारे डेटाच्या व्यवस्थापनासाठी टेबलचा उपयोग केलेला असतो.

4. Distributed database

Distributed database मध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त फाइल्स या वेगवेगळ्या साईट्स वरती साठवलेल्या असतात. या साइट्स एकाच नेटवर्क मध्ये किंवा वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये असू शकतात. Distributed database मधील डेटा फक्त एकाच साईट वर साठवलेला नसतो. जेव्हा काही उपयुक्त डेटाचा उपयोग विविध युजर द्वारे वेगवेगळ्या लोकेशन वरून करायचं असतो तेव्हा Distributed database चा उपयोग होतो 

5. Object oriented database

Object oriented database मध्ये प्रोग्रॅमिंग लँग्वेज मध्ये उपयोगात येणाऱ्या ऑब्जेक्ट च्या मदतीने डेटाचे व्यवस्थापन केले जाते. Object oriented database हे मुख्यतः डेटा वर आधारित असतात व लॉजिक वर आधारित नसतात.Object oriented database मध्ये विविध प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज च्या object चा उपयोग केला जातो.

6. NoSQL database

NoSQL database मध्ये रिलेशन डेटाबेस प्रमाणे टेबल्स चा उपयोग केला जात नाही. NoSQL database मध्ये चार मुख्य प्रकारांचा समावेश होतो जसे की डॉक्युमेंट डेटाबेस, ग्राफ डेटाबेस, Column oriented डेटाबेस, की व्हॅल्यू स्टोअर्स. NoSQL database चा उपयोग वेगवेगळ्या स्वरूपातील डेटा साठविण्याकरिता व त्याचे व्यवस्थापण करण्यासाठी होतो.

डेटाबेसचे घटक / डेटाबेस चे भाग 

ज्याप्रमाणे संगणकाचे विविध भाग मिळून संगणक तयार होतो त्याच प्रमाणे डेटाबेस अस विविध घटक डेटाबेस निर्मितीमध्ये उपयुक्त ठरतात.

कोणत्याही प्रकारच्या डेटाबेस च्या निर्मितीसाठी पाच मुख्य डेटाबेस घटकांचा उपयोग होतो जे आहेत –

1. डेटा

2. हार्डवेअर

3. सॉफ्टवेअर

4. Procedures (डेटाबेस चे निर्देश)

5. Database Access Language (डेटाबेस च्या उपयोगासाठी आवश्यक प्रोग्रामिंग लैंग्वेज)

1. डेटा

डेटाबेस मध्ये डेटा म्हणजे अशी माहिती जी जे आपल्याला योग्य पद्धतीने व्यवस्थापन करायचे असते ज्याद्वारे भविष्यात आपल्याला त्या माहितीचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने ने डेटाबेस मध्ये डेटा चे व्यवस्थापन केले जाते.

2. हार्डवेअर

भौतिक इलेक्ट्रॉनिक उपकरणांना हार्डवेअर असे संबोधले जाते जसे की संगणक, हार्ड डिस्क इत्यादी. हार्डवेअर उपकरणांमुळे भौतिक दुनिया आणि संगणकाची आभासी दुनिया एकमेकांना जोडली जाते.

3. सॉफ्टवेअर

डेटाबेस वर नियंत्रण ठेवण्याकरिता व डेटाबेसमधील डेटाचे व्यवस्थापन करण्यासाठी काही संगणकीय प्रोग्राम ची आवश्यक असते त्याला आपण सॉफ्टवेअर असे म्हणतो. ऑपरेटिंग सिस्टिम, नेटवर्क सॉफ्टवेअर आणि डेटाबेस सॉफ्टवेअर हे डेटाबेस चे मुख्य सॉफ्टवेअर आहेत.

4. Procedures (डेटाबेस चे निर्देश)

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम ला दिल्या गेलेल्या निर्देशांना Procedures म्हणून संबोधले जाते. Procedures मध्ये डेटाबेस इंस्टॉल करणे, डेटाबेस वर लॉग इन करने, डेटाबेस चा बॅकअप घेणे, डेटाबेस चे रिपोर्ट तयार करणे इत्यादी निर्देशांचा समावेश होतो.

5. Database Access Language (डेटाबेस च्या उपयोगासाठी आवश्यक प्रोग्रामिंग लैंग्वेज)

डेटाबेस चा उपयोग करण्यासाठी, डेटाबेस वरील माहिती अपडेट किंवा डिलीट करण्यासाठी Database Access Language चा उपयोग होतो. Database Access Language मधील कमांड च्या मदतीने डेटाबेस वर वेगवेगळी कार्य पार पाडले जातात.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS) म्हणजे काय ?

डेटाबेस व्यवस्थापनासाठी उपयोगात येणाऱ्या कार्यप्रणाली ला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणून असे म्हटले जाते. डाटाबेस मँनेजमेंट सिस्टीमची च्या मदतीने डेटा बेस चे निर्माण केले जाते, डेटाबेस वर डेटा साठवला जातो, डेटा मध्ये बदल केला जातो तसेच आवश्यक नसलेला डेटा डिलीट करता येतो.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने गुंतागुंतीच्या डेटाचे सोप्या स्वरूपात रूपांतर करून व्यवस्थापन केले जाते. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने वेगवेगळ्या लोकेशन वरील डेटाबेस युजर डेटाबेस चा उपयोग करू शकतात. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने डेटाबेस ला सुरक्षा प्रदान केली जाते तसेच डेटाबेस मेनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने डेटाबेस मध्ये सातत्याने बदल घडवून आणणे शक्य होते.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS)  चे फायदे

• डेटाबेस मेनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने आपण डेटाबेसमध्ये आपण सातत्याने नवनवीन डेटा साठवून ठेवू शकतो.

• डेटाबेस च्या माध्यमातून आपण सुरक्षितपणे डेटा साठवून ठेवू शकतो.

• डेटाबेस चा वापर फक्त अधिकृत युजर च करू शकतो त्यामुळे डेटाबेसमध्ये गोपनीयता राखण्यासाठी मदत होते.

• प्रत्येक डेटाबेस मध्ये युजरनेम आणि पासवर्ड चा उपयोग केलेला असतो त्यामुळे डेटाबेसमधील माहिती सुरक्षित राहण्यास मदत होते.

• डेटाबेस मध्ये अचूक आणि खात्रीशीर माहिती भरण्यासाठी डेटाबेस मेनेजमेंट सिस्टीम चा उपयोग होतो.

• वेगवेगळ्या युजर कडून वेगवेगळ्या लोकेशन मध्ये एकाच फाईलच्या सारख्याच कॉपी निर्माण होण्याचा धोका असतो व हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या माध्यमातून टाळले जाते.

• डेटाबेस मेनेजमेंट सिस्टीम च्या मदतीने डेटाबेस युजर एकमेकांमध्ये डेटा शेअर करू शकतात.

डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम (DBMS) चे तोटे –

• आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या कंपनी वेगवेगळ्या कारणांकरिता डेटाबेस चा उपयोग करत असतात त्यामुळे डेटाबेस मध्ये जटिलता (complexity) वाढली आहे.

• वेगवेगळ्या हार्डवेअर उपकरणांच्या आणि सॉफ्टवेअर च्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत त्यामुळे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम महागडी बनत चालली आहे.

• डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम छोट्या स्तरावर काम करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरत नाही व त्यामुळे अशा ठिकाणी डेटाबेस मेनेजमेंट सिस्टीमची कार्यक्षमता कमी होते.

• कधीकधी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम मेंटेनन्स रक्कम खूप जास्त वाढू शकते.

• डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम वारंवार अपग्रेड करण्याची गरज असते नाहीतर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम च्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

सारांश (conclusion)

डेटाबेस चा उपयोग कंपन्यांद्वारे कस्टमर ची माहिती साठवून ठेवण्यासाठी होतो. जसे की आपण एखाद्या वेबसाइटवर अकाउंट तयार केले तर ती माहिती डेटाबेस वर साठवली जाते ज्याच्या मदतीने आपण भविष्यात संबंधित वेबसाईट वर कधीही लॉगिन करू शकतो.

डेटाबेस विषयी माहिती जाणून घेत असताना आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेतले की डेटाबेस म्हणजे काय | Database (DBMS) Information in Marathi तसेच डेटाबेस विषयी इतर महत्त्वाची माहिती देखील आपण जाणून घेतली.

मला आशा आहे तुम्हाला डेटाबेस विषयी माहिती सांगणारा हा लेख आवडला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर आलेत तुम्ही हा लेख नक्की शेअर करा व या लेखात काही चुका आढळल्या असतील तर तुम्ही कमेंट च्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता.

आपला दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *