Advertisements

मोडेम म्हणजे काय | modem information in marathi

Advertisements

जेव्हा आपल्याला संगणकाला टेलिफोन लाईन च्या मदतीने इंटरनेट कनेक्ट करायचे असते तेव्हा आपल्याला मॉडेम चा उपयोग होत असतो त्यामुळेच या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया मोडेम म्हणजे काय | modem information in marathi.

मॉडेम चा उपयोग विविध वेब कनेक्शन जसे की डायल-अप, ब्रॉडबॅंड नेटवर्क बरोबर केला जातो. मॉडेम च्या मदतीने संगणक चांगल्या प्रकारे data transmission प्रक्रिया पूर्ण करू शकतो. मोडेम ची गती आणि कार्यप्रणाली नुसार वेगवेगळे मोडेम चे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

अनुक्रमणिका ↕

मॉडेम ला मदरबोर्ड बरोबर integrate करून उपयोगात आणले जाते. चला तर मग जाणून घेऊया मोडेम ची माहिती 

Advertisements

मोडेम म्हणजे काय – what is modem in marathi

Modem information in marathi

मॉडेम किंवा modulator-demodulator हे संगणकाचे हार्डवेअर उपकरण आहे ज्याचा उपयोग टेलिफोन लाईन किंवा केबल च्या मदतीने वेगवेगळ्या संगणक नेटवर्क मध्ये डेटा ची देवाण-घेवाण करण्यासाठी होतो. 

मॉडेम हे इनपुट – आउटपुट उपकरण म्हणून कार्य करते. modem संगणकातील डिजिटल सिग्नल चे रूपांतर analog सिग्नल मध्ये करते व माहिती प्रसारित करते. त्याचप्रमाणे मॉडेम analog सिग्नल चे रूपांतर डिजिटल सिग्नल मध्ये करून संगणकमध्ये माहिती स्वीकारण्यास मदत करते.

आता आपल्या मनात असा प्रश्‍न येऊ शकतो की, आपण डायरेक्ट टेलिफोन केबल संगणकाला जोडून का नाही data transfer करत ? 

ह्याचे उत्तर आहे संगणकामधील डेटा हा डिजिटल सिग्नल च्या स्वरुपातच प्रसारीत केला जाऊ शकतो व टेलिफोन केबल मधील डेटा हा analog सिग्नल च्या मदतीने प्रसारित केला जातो. त्यामुळे जर आपल्याला टेलीफोन केबल च्या मदतीने data transmission करायचे असेल तर आपल्याला पहिल्यांदा डिजिटल सिग्नलचे रूपांतर analog सिग्नल मध्ये करावे लागेल व याच प्रमाणे जर डेटा स्वीकार करायचा असेल तर analog सिग्नल चे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये करावे लागेल.

Working of modem in marathi

मोडेम ची गरज ?

आजच्या काळात देखील विविध घरे एकमेकांना टेलिफोन केबलच्या सहाय्याने जोडलेले असतात व कधी कधी तिथे मोबाइल सिग्नल मिळणे अवघड असते अशा वेळेस मोडेम च्या सहाय्याने आपण अशा ठिकाणी इंटरनेटचा उपयोग करू शकतो.

जेव्हा आपण मोबाईलच्या सहाय्याने बोलत करत असतो तेव्हा प्रथम आपल्या मोबाईल मध्ये आपल्या आवाजाच्या डिजिटल सिग्नल चे रुपांतर analog सिग्नल मध्ये केले जाते व फोन रिसीवर च्या मोबाईल मध्ये analog सिग्नलचे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये करून आवाज ऐकला जातो.

विविध सिस्टीम मध्ये analog सिग्नल चा उपयोग केलेला असतो अशा सर्वच सिस्टीम चा उपयोग करून आपण मोडेम च्या सहाय्याने संगणकामधील डेटा ट्रान्सफर करू शकतो.

मॉडेमचे कार्य – Function of modem in maarathi

संगणक नेटवर्क सिस्टीम मध्ये इंटरनेटच्या उपयोगासाठी उपयुक्त असलेल्या मोडेम चे कार्य पुढील प्रमाणे –

• Error correction

जेव्हा केबलच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर केला जातो तेव्हा काही डेटा loss होण्याची किंवा डेटा मध्ये बदल होण्याची शक्यता असते त्यामुळे मोडेम माहितीचे विभागणी फ्रेम मध्ये करते व प्रत्येक फ्रेम ला checksum बरोबर टॅग करते.

ज्याप्रमाणे प्रत्येक मानवाचे फिंगरप्रिंट हे unique असतात अगदी त्याच प्रमाणे फ्रेम मधील डेटा साठी unique checksum चा उपयोग केलेला असतो. जेव्हा एक मोडेम दुसऱ्या मोडेम कडून फ्रेम मधील माहितीची स्वीकारनी करते तेव्हा संबंधित फ्रेम मधून स्वतःचे checksum प्राप्त करते व त्याला फ्रेम पाठवणाऱ्या मोडेम बरोबर मॅच करून बघते. 

जर दोन्ही checksum मॅच झाले तर सुरक्षितरित्या माहिती प्रक्रिया पूर्ण झाली असे समजले जाते व जर दोन्ही checksum मॅच नाही झाले तर माहितीमध्ये बदल झाल्याची किंवा माहिती लॉस झाल्याची शक्यता असते.

• डेटा कॉम्प्रेशन

डेटा जलद गतीने ट्रान्सफर करण्यासाठी व सिग्नल मधील error थांबवण्यासाठी डेटा कॉम्प्रेशन करावे लागते. जर डेटा कॉम्प्रेस केला तर टेलिफोन केबल च्या मदतीने डेटा ट्रान्सफर होण्यासाठी कमी सिग्नल ची आवश्यकता असते त्यामुळे मोडेम डेटा कॉम्प्रेशन चे कार्य करते.

• Flow Control

प्रत्येक मोडेम हा वेगवेगळ्या गतीने डाटा ट्रान्सफर करत असतो त्यामुळे जास्त वेगाने डाटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेम ला कमी वेगाने डाटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेम बरोबर मॅच करावे लागते. 

जर जास्त वेगाने डेटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेम ला मॅच केले गेले नाही तर तो कमी वेगाने टाटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेमकडे अतिरिक्त डेटा पाठवेल व जर असे झाले तर कमी वेगाने डेटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेम कडून जास्त वेगाने डेटा ट्रान्सफर करणाऱ्या मोडेम कडे सिग्नल पाठवला जाईल. त्यामुळे डेटा ट्रान्सफर ची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात येते.

जेव्हा कमी वेगाने डेटा ट्रान्सफर करणारा मोडेम परत डेटा स्वीकारण्यासाठी तयार होतो तेव्हा परत सिग्नल पाठवला जातो व डेटा ट्रान्सफर प्रक्रिया सुरू होते.

• modulate signal

जेव्हा टेलिफोन केबल च्या माध्यमातून डेटा transfer करायचा असतो तेव्हा डिजिटल सिग्नल चे Analog सिग्नल मध्ये रूपांतर करणे गरजेचे असते व हे कार्य मोडेम च्या मदतीने साध्य होते. तसेच मोडेम Analog सिग्नल चे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये करून डेटा स्वीकारू शकतो.

मोडेम च्या मदतीने आपण कोणत्याही Analog सिग्नल प्रणाली वापरणाऱ्या सिस्टीम जसे की ऑप्टिकल नेटवर्क,  रेडिओ कनेक्शन चा उपयोग करून संगणकाचा डेटा पाठवू शकतो.

मोडेम चे प्रकार

मोडेम च्या सहाय्याने होणाऱ्या डेटा ट्रान्सफर च्या आधारावर मोडेम चे मुख्य चार प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे –

• Satellite मोडेम

• टेलिफोन मोडेम

• DSL (डिजिटल सबस्क्रायबर लाईन)modem

• केबल मोडेम

• Satellite मोडेम

जेव्हा satellite dishes च्या मदतीने संगणक नेटवर्क मध्ये डेटा ट्रान्सफर ची प्रक्रिया पूर्ण केली जाते तेव्हा त्या मोडेम ला सॅटॅलाइट मोडेम असे म्हटले जाते. सॅटॅलाइट मोडेम मध्ये रेडिओ सिग्नल च्या मदतीने डेटा ट्रान्सफर ची प्रक्रिया पूर्ण केली जाते. हे मोडेम इतर प्रकारांपेक्षा जास्त किमतीचे व जास्त विश्वसनीय असतात.

• टेलिफोन मोडेम

जेव्हा विविध संगणक टेलीफोन केबलच्या माध्यमातून एकमेकांना जोडलेले असतात व टेलिफोन केबलच्या माध्यमातून डेटा ट्रान्सफर ची प्रक्रिया पूर्ण केली जाते तेव्हा त्या ठिकाणी टेलिफोन मोडेम कार्य करत असते.

टेलिफोन मोडेम हे इतर मोडेम पेक्षा स्वस्त असतात कारण त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे स्पेशल installation करण्याची गरज नसते व टेलिफोन मोडेम ची मासिक फी देखील कमी असते. टेलिफोन मोडेम चा उपयोग अशा प्रत्येक घरी केला जाऊ शकतो जिथे टेलिफोन कनेक्शन उपलब्ध आहे.

• DSL (डिजिटल सबस्क्रायबर लाईन) modem

जेव्हा आपल्याला टेलिफोन केबल च्या माध्यमातून जास्त गतीचे इंटरनेट कनेक्शन हवे असते तेव्हा DSL मोडेम चा उपयोग केला जातो. DSL modem हे टेलिफोन मोडेम पेक्षा जास्त महागडी असतात.

DSL मोडेम ला आपण टेलिफोन मोडेम प्रमाणे टेलिफोन लाईनला जोडू शकतो तसेच DSL मोडेम च्या साह्याने आपण एकाच वेळेस टेलिफोन वर बोलू शकतो व इंटरनेटचा देखील उपयोग करू शकतो परंतु टेलिफोन मोडेम मध्ये ही सुविधा उपलब्ध नसते.

• केबल मोडेम

जेव्हा आपल्याला केबल टीव्ही च्या केबलच्या माध्यमातून इंटरनेटचा उपयोग करायचा असतो तेव्हा आपण केबल मोडेम चा उपयोग करत असतो. आत्ताच्या तंत्रज्ञानामध्ये खूप सारे केबल मोडेम हे संगणकाचे बाह्य उपकरण म्हणून कार्य करत असतात.

केबल मोडेम ची कार्य प्रणाली पुढील प्रमाणे –

Function of modem in marathi

मोडेम चा उपयोग

मोडेम चा उपयोग नेहमी pair मध्ये करावा लागतो व यासाठी पुढील basic modulation techniques चा उपयोग केलेला असतो.

• Frequency shift keying

• Amplitude shift keying

• Phase shift keying

• Differential phase shift keying

कोणत्याही प्रकारच्या सिस्टीम ( simplex, duplex )  मध्ये मोडेम चा उपयोग करायचा असेल तर मोडेम चा उपयोग pair मध्ये करावा लागतो ज्यामध्ये एक मोडेम डेटा पाठवण्याचे कार्य करतो तर दुसरा मोडेम डेटा स्वीकारण्याचे कार्य करतो.

त्यामुळेच आपण मोडेम ला electronic bridge देखील म्हणू शकतो जो डिजिटल सिग्नल ला analog सिग्नल बरोबर जोडण्याचे कार्य करतो. मोडेम च्या साहाय्याने ट्रान्सफर झालेला डेटा आपण मॉनिटर वर बघू शकतो.

मोडेम चे वैशिष्ट्ये

• मोडेम चा उपयोग डेटा ट्रान्सफर प्रक्रियेमधील चुका टाळण्यासाठी होतो.

• मोडेम च्या सहाय्याने सुरक्षित डेटा ट्रान्स्फर प्रक्रिया पूर्ण केली जाते.

• मोडेम च्या साह्याने होणारे डेटा ट्रान्सफर BPS (बीट पर सेकंद) मध्ये मोजली जाते एका चांगल्या मोडेम ची गती 9600BPS ते 56800BPS पर्यंत असू शकते.

• मोडेम हे डेटा कॉम्प्रेशन प्रक्रियेमध्ये मदत करत असते व डेटा कॉम्प्रेशन च्या साह्याने जलद डेटा ट्रान्सफर होणे शक्य होते 

• मोडेम हे संगणकाला टेलिफोन केबल किंवा वायरलेस पद्धतीने डेटा transfer प्रक्रियेमध्ये मदत करत असते.

सारांश ( conclusion ) 

मला आशा आहे तुम्हाला मॉडेल विषयी माहिती सांगणाऱ्या या लेखाच्या माध्यमातून मोडेम म्हणजे काय ( modem information in marathi ) विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख शेअर करा व जर या लेखात काही सुधारणा आवश्यक असेल तर तुम्ही कमेंट करू शकता.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *