RAM म्हणजे काय | रॅम चे प्रकार

Advertisements

 आजचे युग तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या युगामध्ये संगणकाच्या तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. आपल्याला आपल्या सभोवताली असणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असणे गरजेचे आहे त्यामुळेच या लेखात आपण जाणून घेणार आहोत रॅम म्हणजे काय ( what is RAM in Marathi )

 जेव्हा आपण मोबाईल किंवा संगणक खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपल्या कानावर एक शब्द नेहमी पडतो तो म्हणजे रॅम. संगणकाचे विविध भाग असतात जर आपल्याला संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये उपस्थित असलेल्या हार्डवेअर “रॅम” या भागाविषयी माहिती नसेल तर आपल्याला संगणक किंवा मोबाइल खरेदी करताना अडचणी येऊ शकतात.

what is RAM in marathi

 रॅम चा उपयोग जवळपास सर्वच संगणकीय उपकरणांमध्ये जसे कि मोबाईल, टॅबलेट, लॅपटॉप, किंवा इतर असे उपकरणे ज्यांच्यामध्ये संगणकीय क्रिया केल्या जातात, त्या सर्व उपकरणांमध्ये रॅम चा उपयोग होतो.

 रॅम च्या मदतीने संगणकीय उपकरणे जलद गतीने कार्य करू शकतात त्यामुळे संगणकीय उपकरणांची कार्यक्षमता सुधारते व आपण त्यांच्या चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ रॅम विषयी माहिती

अनुक्रमणिका ↕

 रॅम म्हणजे काय ( what is RAM in Marathi )

 रॅम मदरबोर्ड ला जोडलेली संगणकाची जलद गतीने कार्य करणारी अल्पकालीन मेमरी असते. रॅम संगणकामध्ये सर्वात जास्त उपयोगात येणाऱ्या डेटा ला अल्पकाळासाठी साठवून ठेवते, त्यामुळे तो डेटा संगणक किंवा मोबाइल वापरकर्त्याला जलद गतीने उपलब्ध होतो.

 रॅम चे पूर्ण स्वरूप आहे रैंडम एक्सेस मेमोरी. सेमीकंडक्टर च्या मदतीने बनलेली रॅम शॉर्ट टर्म मेमरी चा प्रकार आहे. रॅम च्या मदतीने संगणकाच्या गतिमध्ये वाढ होते. अधिक क्षमतेच्या रॅम मुळे संगणकामध्ये multitasking करणे सोपे झाले आहे.

 जोपर्यंत संगणकाला लाईटचा (electricity) पुरवठा होत आहे तो पर्यंत रॅम कार्य करते व जेव्हा संगणकाचा वीज पुरवठा खंडित होतो तेव्हा रॅम मधील मेमरी मिटवली जाते. रॅम संगणकाला गती प्रदान करते त्यामुळे रॅम ची किंमत ही तेवढ्याच क्षमतेच्या मेमरी कार्ड पेक्षा जास्त असते.

रॅम चा इतिहास

 कोणत्याही तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती होण्यासाठी आपल्याला त्या तंत्रज्ञानाचा इतिहास माहीत असणे गरजेचे आहे. जितके रोचक आजचे रॅम चे तंत्रज्ञान आहे तितकाच रोचक रॅम चा इतिहास देखील आहे. रॅम च्या इतिहासाविषयी पूर्ण माहिती पुढीलप्रमाणे-

1947- विलिएम्स ट्यूब

 1947 साली पहिल्या व्यवहारीक रॅम चे निर्माण करण्यात आले. हि रॅम कॅथोड रे ट्यूब च्या तोंडाला इलेक्ट्रिक स्पॉट च्या रूपात डेटा साठवत असे. विलिएम्स ट्यूब ची क्षमता काही शंभर बिट ते काही हजार बिट होती.  विलिएम्स ट्यूब रॅम च्या मदतीने manchster बेबी संगणकामध्ये 21 जून 1948 मध्ये पहिला संगणकीय प्रोग्रॅम चालवला गेला.

1947-mid 1970 › magnetic core memory –

 मॅग्नेटिक कोर मेमरी चा शोध 1947 साली लागला व या मेमरी वर 1970 च्या मध्यापर्यंत संशोधन केले गेले. या मेमरी मध्ये प्रत्येक रिंग वर एक बिट स्टोअर केले गेले व विविध एड्रेस वायर च्या मदतीने या मेमरीचा उपयोग केला गेला.

1963 – SRAM ( static Random Access Memory )-

Robert H. Norman या तंत्रज्ञानाने SRAM या रॅम चा शोध लावला.SRAM मॅग्नेटिक कव्हर मेमरी ला चांगला विकल्प होत्या. परंतु यामध्ये एक bit डेटा स्टोअर करण्यासाठी 6 मॉस ट्रांजिस्टर ची गरज होती.

1964 – मॉस (mos- metal oxide semiconductor) मेमरी

 1960 च्या दरम्यान सेमीकंडक्टर चा शोध लागला व सेमीकंडक्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने 1964 साठी या john mchmidt या तंत्रज्ञांनी मॉस मेमरी चा शोध लावला. उच्च क्षमतेचे बरोबरच मॉस मेमरी मॅग्नेटिक कोर मेमरी च्या तुलनेत कमी विजेची खपत करत होते.

1967 – DRAM ( dynamic Random Access Memory ) –

1967 साली रॉबर्ट h. डेनार्ड यांनी ibm कंपनी सोबत DRAM चे Patent नोंदणीकृत केले. DRAM च्या मदतीने प्रत्येक मेमरी सेल वर डेटा स्टोअर करणे सोपे झाले.

 Intel 1103 हि पहिली व्यवसायिक DRAM IC चिप 1970 मध्ये निर्माण करण्यात आली व 1972 मध्ये हे जगातील सर्वात जास्त विकली जाणारी रॅम चिप होती.

1992- SDRAM ( synchronous dynamic Random Access Memory)

 या रॅम चे निर्माण सॅमसंग कंपनी द्वारे करण्यात आले. 1992 साली सॅमसंग कंपनी द्वारे पहिल्या Samsung KM48SL2000 या SDRAM चे निर्माण करण्यात आले. या रॅम ची क्षमता 16 Mbit होती. याचबरोबर 1998 साली सॅमसंग कंपनीद्वारे DDR SDRAM चे निर्माण करण्यात आले.

रॅम चे प्रकार ( Types of RAM in Marathi )

 रॅम चे मुख्यतः दोन प्रकार आहेत ते आहे SRAM ( static Random Access Memory ) आणि DRAM ( Dynamic Random Access Memory ).

Static रॅम (SRAM) म्हणजे काय?

 स्टॅटिक रॅम हि अस्थाई रॅम आहे म्हणजे विजेचा पुरवठा खंडित झाल्यानंतर या रॅम मधील सर्व डेटा मिटवला जातो. स्टॅटिक रॅम मध्ये फ्लीप फ्लोप पद्धतीने बिट साठवले जाते . स्टॅटिक रॅम ला रिफ्रेश होण्याची गरज नसते.

SRAM ( static Random Access Memory ) या डायनॅमिक रॅम पेक्षा जलदगतीने कार्य करतात त्यामुळे यांचा निर्मिती खर्च जास्त असतो. स्टॅटिक रॅम यांचा उपयोग हार्ड ड्राईव्ह बरोबर केला जातो तेथे यांचा उपयोग कॅचे मेमरी म्हणून केला जातो.

 स्टॅटिक रॅम चा ऍक्सेस टाइम कमी असतो कारण या रॅम ला रिफ्रेश होण्याची गरज नसते.स्टॅटिक रॅम चा access time जवळपास 10 नॅनो सेकंद असतो.स्टॅटिक रॅम च्या जटील आंतरिक structure मुळे यांचा उपयोग मुख्य रॅम म्हूणन मदरबोर्ड वर केला जात नाही तसेच यांच्या घनरूपामुळे या मेमरी चा उपयोग मुख्य मेमरी म्हणून केला जात नाही. या रॅम चा उपयोग मुख्यता कॅचे मेमरी म्हणून तसेच रेजिस्टर साठवण्यासाठी होतो.

 स्टॅटिक रॅम चा उपयोग hard drive, CD, printer, modern routern, digital versatile disc तसेच सर्व प्रकारच्या डिजिटल कॅमेरा मध्ये केला जातो.

 स्टॅटिक रॅम ची वैशिष्ट्ये 

• कॅचे मेमरी म्हणून उपयोग 

• रिफ्रेश करण्याची गरज नाही 

• जास्त आयुष्यमान 

• जास्त आकारमान 

• जास्त किंमत  

• जास्त विजेची खपत 

DRAM (dynamic Random Access Memory ) म्हणजे काय 

 डायनॅमिक रैंडम एक्सेस मेमोरी चा उपयोग सीपीयू किंवा प्रोसेसर द्वारे विविध सॉफ्टवेअर जलदगतीने उपयोगात आणण्यासाठी होतो. या मेमरीचा उपयोग मुख्यतः वैयक्तिक संगणक, सर्वर किंवा वर्कस्टेशन मध्ये केला जातो.

DRAM चा शोध 1967 सालि रॉबर्ट h. डेनार्ड यांच्याद्वारे केला गेला व इंटेल कंपनीद्वारे व्यवसायिक स्तरावर या रॅम चा उपयोग 1970 मध्ये केला गेला. DRAM मध्ये ट्रांजिस्टर च्या मदतीने डेटा साठवला जातो.

 आपल्याला माहीत असेल सी.पी.यू. मध्ये सर्व फाईल आणि ॲप्स चा डेटा साठवलेला असतो. जेव्हा आपल्याला काही ठराविक app open करायचे असतील तेव्हा सीपीयू कडून वापरकर्त्याला मॉनिटर वर आवश्यक डेटा पाठवला जातो. तो डेटा सीपीयू कडून घेण्यासाठी काही वेळ जाऊ शकतो व हाच वेळ वाचवण्यासाठी डायनॅमिक रॅम चा उपयोग होतो.

 डायनॅमिक रॅम मधील डेटा ट्रांजिस्टर च्या मदतीने साठवला जातो व आपल्याला माहित असेल ट्रांजिस्टर ला कार्य करण्यासाठी विजेची आवश्यकता असते. त्यामुळे जेव्हा विजेचा पुरवठा खंडित होतो तेव्हा डायनॅमिक रॅम मधील डेटा मिटवला जातो.

डायनॅमिक रॅम चे प्रकार 

 DRAM चे विभाजन पुढील प्रकारांमध्ये होते.

1. RDRAM

2. SDRAM

3. DDR SDRAM –

  • DDR1 SDRAM

  • DDR2 SDRAM

  • DR3 SDRAM 

  • DDR4 SDRAM

DRAM ची वैशिष्ट्ये

• कमी वेळेसाठी डाटा साठवून ठेवतो 

• स्टॅटिक रॅम पेक्षा स्लो 

• वारंवार रिफ्रेश करायची गरज असते 

• छोटे आकारमान 

• कमी किंमत

• कमी विजेची खपत 

RDRAM विषयी माहिती

RDRAM चे पूर्ण स्वरूप आहे Rambus Dynamic Random Access Memory.Rambus Inc द्वारे निर्मित या रॅम ची तुलना SDRAM सोबत केली जाते. RDRAM चा उपयोग जलदगतीने डेटा ट्रान्सफर करण्यासाठी होतो.

RDRAM हे एक रॅम चे किट आहे यामध्ये रॅम, रॅम कंट्रोलर आणि रॅम बसचा समावेश होतो ज्याच्या मदतीने ही रॅम संगणकाला जोडली जाते. RDRAM चे निर्माण 1999 सालि Rambus Inc कंपनीद्वारे केले गेले.

 सामान्यता SDRAM ची डेटा ट्रान्सफर ची गती 135 MHz असते परंतु RDRAM च्या मदतीने 800 MHz गती पर्यंत डेटा ट्रान्सफर केला जातो.RDRAM ला च डायरेक्ट RDRAM किंवा Rambus म्हणून देखील संबोधले जाते.

RDRAM मध्ये Rambus Inline Memory Module चा उपयोग केलेला असतो. या प्रकारच्या रॅम मध्ये क्लॉक च्या अप आणि डाऊन सायकलने डेटा ट्रान्सफर केला जातो त्यामुळे या प्रकारचे रॅम जलदगतीने कार्य करू शकते. 400 MHz रॅम बस च्या मदतीने 400-800 mHz गतीने डेटा ट्रान्सफर केला जाऊ शकतो.

SDRAM विषयी माहिती

SDRAM चे पूर्ण स्वरूप आहे Synchronous Dynamic Random Access Memory. या पूर्ण स्वरूपामध्ये synchronous चा अर्थ आहे समकालीन. SDRAM मध्ये प्रोसेसर बसच्या समकालीन रॅम refresh केली जाते त्यामुळे ट्रांजिस्टर च्या मदतीने बनलेल्या सी.पी.यु. कडून SDRAM कडे जलद गतीने डेटा ट्रान्सफर केला जातो.

SDRAM चे निर्माण 1992 साली सॅमसंग कंपनी द्वारे केले केले.SDRAM ची गती megahertz मध्ये मोजली जाते. या रॅम च्या जलद गतीमुळे हि रॅम जगभर प्रसिद्ध आहे व संगणकाबरोबर इतर संगनकीय उपकरणांमध्ये या रॅम चा उपयोग केला जातो.

 या रॅम ची मेमरी विविध ब्लॉक मध्ये विभाजीत केलेली असतेत्यांना बँक असे म्हटले गेलेले आहे. या बँकेच्या मदतीने वापरकर्ता संगणकामध्ये किंवा मोबाईल मध्ये multitasking करू शकतो.

SDRAM मध्ये पाईप लाईन सिस्टिम चा उपयोग केला जातो ज्यामध्ये पहिली कमांड संपायच्या आत दुसरी कमांड सीपीयू कडून या रॅम ला लोड केली जाते. एकामागून एक येणाऱ्या कमांड मुळे संगणकाची कार्यक्षमता सुधारते. ही रॅम ऑटोमॅटिक रिफ्रेश होण्याचे देखील कार्य करते.

DDR SDRAM म्हणजे काय

DDR SDRAM चे पूर्ण स्वरूप आहे Double Data Rate Synchronous Dynamic Random Access Memory. नावाप्रमाणेच या प्रकारच्या रॅम मध्ये SDRAM च्या तुलनेने जलद गतीने डेटा ट्रान्सफर होतो. या प्रकारच्या रॅम मध्ये clock च्या सायकल च्या दोन्ही edges ने डेटा ट्रान्सफर केला जातो.

 या रॅम चे निर्माण सॅमसंग कंपनी द्वारे 1998 साली करण्यात आले. SDRAM बरोबर जर तुलना केली तर ही रॅम SDRAM च्या तुलनेत जलद गतीने data ट्रान्सफर करू शकते तसेच या रॅम साठी कमी पावर ची गरज लागते त्यामुळे या प्रकारचे बहुतेक वेळा लॅपटॉप मध्ये देखील हि रॅम उपयोगात आणली जाते.

 या रॅम मध्ये क्लॉक ची वारंवारिता न वाढवता अप आणि डाऊन सायकलचा उपयोग करून डेटा ट्रान्सफर ची गती वाढवता येते. DDR SDRAM च्या विविध पिढ्यांचे निर्माण करण्यात आले आहे ज्यांची माहिती पुढील प्रमाणे –

DDR 1

DDR 2

DDR 3

DDR 4

DDR1 काय आहे 

DDR1 ही DDR SDRAM ची पहिली पिढी होती जीचे कार्यकाळ 2001 ते 2005 होते . या प्रकारच्या रॅम मध्ये  DDR-200, DDR-266 ,DDR-333, DDR-400 या स्टॅंडर्ड चा उपयोग केला गेला आहे. ही रॅम 2.5 ते 2.6 च्या वोल्टेज वर काम करत होती. या रॅम चा यांचा ट्रान्सफर रेट 200 to 400 Mt/s होता.

DDR2 काय आहे 

DDR2 हि DDR SDRAM ही दुसरी पिढी होती जिचे कार्यकाळ 2006 ते 2010 होते. या रॅम मध्ये DDR2-400, DDR2-533 ,DDR2-667, DDR2-800, DDR2-1066 या स्टॅंडर्ड चा उपयोग केला गेला. ही रॅम पहिल्या पिढीच्या तुलनेत कमी व्होल्टेज वर म्हणजेच 1.6 च्या व्होल्टेज वर काम करत होती. या रॅम चा ट्रान्सफर रेट 533 ते 800 Mt/s होता.

DDR3 काय आहे 

DDR3 हि DDR SDRAM ही तिसरी पिढी होती जिचे कार्यकाळ 2011 ते 2015 होते. या रॅम मध्ये DDR3-800, DDR3-1066 ,DDR3-1333, DDR3-1600, DDR3-1866, DDR3-2133 या स्टॅंडर्ड चा उपयोग केला गेला. ही रॅम 1.3 -1.5 च्या व्होल्टेज वर काम करते. या रॅम चा ट्रान्सफर रेट 800 ते 1600 Mt/s होता.

DDR4 काय आहे 

DDR4 हि DDR SDRAM ही चौथी पिढी आहे जिचे कार्यकाळ 2016 ते 2020 होते. या रॅम मध्ये DDR4-1600, DDR4-1866 ,DDR4-2133, DDR4-2400, DDR4-2666, DDR4-2933, DDR4-3200 या स्टॅंडर्ड चा उपयोग केला गेला. ही रॅम 1.2-105 च्या व्होल्टेज वर काम करत आहे . या रॅम चा ट्रान्सफर रेट 2133 ते 3200 Mt/s आहे. हे रॅम एका सायकल मध्ये 4 डाटा वर प्रक्रिया करू शकते.

 रॅम ची वैशिष्ट्ये / लक्षण

 जेव्हा आपल्याला रॅम विषयी संपूर्ण माहिती हवे असेल तेव्हा आपल्याला त्यांचे वैशिष्ट्य माहित असणे गरजेचे आहे. रॅम ची वेगवेगळे वैशिष्ट आहे जी रॅम मध्ये नाविन्यता प्रदान करते. जेव्हा आपण रॅम खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा आपण या वैशिष्ट्यांचा विचार केला पाहिजे.

 1. उपयोग –

 रॅम चे हे वैशिष्ट्य सर्वात महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. आपल्याला ज्या प्रकारचे रॅम खरेदी करायचे आहे, आपल्याला त्या रॅम चा उपयोग माहिती असणे गरजेचे आहे असे. जसे की स्टॅटिक रॅम उपयोग कॅचे मेमरी म्हणून होतो व डायनॅमिक रॅम चा उपयोग ॲप्लीकेशन किंवा प्रोग्रॅम रन करण्यासाठी होतो.

 2. गती –

 आपण आपल्याला उपयोगी असणाऱ्या रॅम चा प्रकार निश्चित केला आला असेल तर त्यानंतर रॅम चे महत्वपूर्ण वैशिष्ट आहे रॅम ची गती. जर आपला संगणक quick response देणारा आवश्यक असेल तर आपण रॅम च्या गती कडे लक्ष देणे गरजेचे आहे. रॅम उत्कृष्ट गतीसाठी आपण लेटेस्ट जनरेशन च्या रॅम चा उपयोग करु शकतो. उच्च प्रतिच्या रॅम मुळे माऊस च्या मदतीने scroll करणे फास्ट होते.

 3. मदरबोर्ड ला जोडण्यासाठी पिन्स –

 रॅम च्या पिन्स चा उपयोग मदरबोर्ड ला रॅम जोडण्यासाठी होतो . जर रॅम ला जास्त पिन्स असतील तर जास्त डेटा एकाच वेळेस ट्रान्सफर होऊ शकतो. जरी असे असले तरी संगणकाची एकूण गती मदरबोर्ड आणि सीपीयू वरती आधारित असते.

 4. वोल्ट्स –

रॅम ला लागणारी वीज वोल्ट्स मध्ये मोजली जाते. जे प्रेम कमी विजेवर ते चालते व कमी हिट निर्माण करते ती रॅम संगणकाच्या छोट्या सिस्टिम जसे की लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल यांच्यासाठी अत्यंत उपयोगी असते. आपण मोबाईल मधील अपग्रेड करू शकत नाही.

 5. CAS latecy

CAS (column Adress Drobe) latecy म्हणजे रॅम कडून संगणकाच्या प्रोसेसर ला किंवा सीपीओ ला डेटा पाठवण्याची गती. जितकी कमी CAS latecy असेल तितकीच ती रॅम चांगली व कार्यरत मानली जाते.

 रॅम कशा प्रकारे काम करते ( RAM working in Marathi )

 रॅम विषयी माहिती जाणून घेताना आपल्याला रॅम कशा प्रकारे कार्य करते हे देखील माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. रॅम ची कार्यपद्धती अत्यंत सोपी आहे जी आपण पुढील उदाहरणातून जाणून घेऊ –

उदाहरण – समजा आपल्या घरी खूप पाहुणे आले आहेत व आपल्याला किचनमधून जेवणाची भांडे दुसऱ्या खोलीमध्ये न्यायची आहेत तेव्हा आपल्यापुढे दोन विकल्प असू शकतात एक म्हणजे आपण जी भाजी लागेल ती किचन मध्ये जाऊन घेऊन येऊ शकतो किंवा आपण सर्व भांडी दुसऱ्या रूम मध्ये नेऊन पाहुणे मागतील तेव्हा त्यांना भाजी देऊ शकतो व काम झाल्यावर सर्व भांडी किचन मध्ये नेऊन ठेवू शकतो.

 अगदी अशाच प्रकारे रॅम कार्य करते. येथे जी भाजी लागेल ती direct किचन मधून देण्याच्या उदाहरणाला cpu मधील माहिती डायरेक्ट वापरकर्त्या कडून उपयोगात आणणे म्हणू शकतो किंवा दुसऱ्या उदाहरणाप्रमाणे सर्व फाईल रॅम मध्ये अल्पकाळासाठी साठवल्या जातात व त्यांचा उपयोग वापरकर्ता गरजेप्रमाणे करू शकतो .   

 रॅम अपग्रेड कशी करायची

 रॅम अपग्रेड करायची म्हणजेच रॅम ची क्षमता वाढवायची. आपण संगणकामध्ये मदरबोर्ड मध्ये अतिरिक्त रॅम चा उपयोग करून रॅम अपग्रेड करू शकतो परंतु मोबाईल मध्ये रॅम अपग्रेड करण्याची सुविधा नसते. आपण काही लॅपटॉप मध्ये देखील रॅम अपग्रेड करू शकतो.

 आपण संगणकामध्ये रॅम अपग्रेड करण्याआधी तो संगणक किती क्षमते पर्यंत रॅम ला सपोर्ट करू शकतो याची आपल्याला माहिती असणे गरजेचे असते.

 संगणकामध्ये आपण पुढील पद्धतीने रॅम अपग्रेड करू शकतो  –

1. आवश्यक साधनांची जुळवाजुळव करा –

 रॅम अपडेट करण्यासाठी आपल्याला रॅम, संगणक, स्क्रू ड्रायव्हर, युजर मॅन्युअल यांची गरज असेल

2. संगणक शट डाऊन करून ठेवा 

3. पावर केबल काढून ठेवा

4. पावर बटन चार पाच मिनिटं दाबून ठेवा जेणेकरून residual energy डिस्चार्ज होईल.

5. User manual च्या मदतीने संगणकाची case उघडा व कोणता स्क्रू कुठे होता हे लक्षात ठेवा.

6. पेंट न केलेल्या ठिकाणी मदरबोर्ड ला स्पर्श करा जेणेकरून तुमच्या मार्फत अर्थिंग भेटेल व तुमच्या शरीरातील असलेली स्टॅटिक एनर्जी डिस्चार्ज होईल.

7. मदरबोर्ड वर रॅम चा शोध घ्या.

8. Module च्या कडेला असलेले क्लिप दाबा जेणेकरून आधीची रॅम मेमरी बाहेर येईल.

9. आता काळजीपूर्वक तुमची नवीन रॅम मदरबोर्ड ला जोडा व हे करताना नवीन रॅम कडांला पकडा व गोल्ड कनेक्टर ला स्पर्श टाळा.

10. संगणकाची case व्यवस्थितपणे जोडा व संगणकाचे कनेक्शन जोडून संगणक चालू करा.

किती रॅम ची आवश्यकता असते 

 जर आपल्याला एकाच वेळेस एक काम करण्याची सवय असेल तर आपण 2 जीबी रॅम सोबत जाऊ शकता. परंतु या वापरण्याचा एक महत्त्वाचा तोटा आहे की आपण या रॅम मध्ये जास्त मल्टिटास्किंग करू शकत नाही.

 जर तुम्हाला थोडीफार multitasking करायची असेल आणि सोपे गेम खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही 4 जीबी रॅम चा उपयोग करू शकता. या रॅम च्या उपयोगाने तुम्ही रॅम ला जास्त load देणारी कामे करू शकत नाही.

 वेगवेगळ्या नवनवीन गेम्सचा आनंद घेण्यासाठी तसेच फोटो एडिटिंग, विडिओ एडिटिंग किंवा इतर महत्वाच्या कामांसाठी तुम्ही आठ जीबी किंवा सोळा जीबी च्या रॅम चा उपयोग करू शकता. जितकी जास्त रॅम चा उपयोग तुम्ही कराल तितकाच संगणक Smooth चालेल व सिस्टीम हॅन्ग होण्याचा धोका कमी होईल.

 जास्त रॅम असल्याचा फायदा

आपण आतापर्यंत जाणून घेतले आहे की रॅम चा उपयोग संगणकामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे परंतु तुम्हाला माहित आहे का जास्त रॅम असल्याचा काय फायदा आहे तर या संबंधी आपण अधिक माहिती जाणून घेऊया.

 चांगल्या प्रकारे मल्टिटास्किंग –

 हो तुम्ही जर संगणकाची रॅम वाढवली तर तुम्ही चांगल्या प्रकारे मल्टिटास्किंग करू शकता म्हणजे तुम्ही browser वर हा लेख वाचताना गाणे देखील ऐकू शकता व या वेबसाईट ची दुसरी पाने वेगवेगळ्या टॅब मध्ये उघडून ठेवू शकता.

Fast browsing

 संशोधनातून असे समोर आले आहे की ज्या संगणकाची रॅम जास्त असते त्या संगणकांमध्ये इंटरनेटचा उपयोग करतांना कमी समस्येला तोंड द्यावे लागते व पेजेस लवकर लोड होतात. यामागचे कारण असे आहे की जेव्हा संगणकामध्ये रॅम कमी असते तेव्हा इंटरनेट चा उपयोग करताना डायरेक्ट हार्ड डिस्क शी संपर्क करून डेटा स्टोर करावे लागतात. परंतु जर जास्त रॅम उपस्थित असेल तर कीबोर्ड वर enter केल्यावर जलद गतीने पेजेस load केले जातात.

 चांगली gaming –

 जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळण्याचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही रॅम अपग्रेड करू शकता किंवा जास्त रॅम च्या संगणकाचा उपयोग करू शकता. जास्त रॅम चा उपयोग केला तर गेम मधील चित्रे स्पष्ट आणि Bright दिसतात तसेच जास्त रॅम च्या मदतीने रिस्पॉन्स टाइम कमी होतो व गेम फास्ट चालतो.

 चांगली व्हिडिओ एडिटिंग

 चांगल्या व्हिडिओ एडिटिंग साठी जास्त रॅम च्या संगणकाची आवश्यकता असते.  कारण व्हिडिओ एडिटिंग करताना मोठ्या प्रमाणावर मेमरी कॅचे केली जाते व त्यामुळे संगणक स्लो होतो म्हणून जर तुम्ही video एडिटिंग करत असाल तर तुम्ही जास्त रॅम चा उपयोग नक्कीच करत असाल.

 चांगली प्रिंटिंग

 जर तुम्हाला नेहमीत प्रिंटिंग करण्याची गरज असेल व तुमच्या संगणका मधून सोडलेल्या प्रिंट स्लो मध्ये प्रिंट होत असतील व त्यांच्यामधील फोटो ला क्लॅरिटी कमी झाली असेल तर तुम्हाला रॅम अपग्रेड करण्याची गरज आहे. जर तुम्ही जास्त रॅम च्या संगणकाचा उपयोग केला तर जास्त resolution च्या इमेज आणि clear प्रिंटिंग होईल

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

 संगणकाच्या रॅम आणि मोबाईलच्या रॅम मधील फरक

उत्तर –संगणकाच्या रॅम मदरबोर्ड ला सोडण्यासाठी एक किंवा एकापेक्षा जास्त सॉफ्टवेअरची गरज असते तर मोबाईल ची रॅम डायरेक्ट मदरबोर्ड ला सोल्डरिंग केलेली असते.

 आपण संगणकाची रॅम अपग्रेड करू शकतो परंतु आपण मोबाईल ची रॅम अपग्रेड करू शकत नाही.

 संगणकाचे रॅम मुख्यता अधिक कार्यक्षमतेची रॅम असते उदाहरण DDR4 परंतु मोबाईल ची रॅम कमी पावरचा उपयोग करणारी असते जसे कि LDDDR3.

रॅम कशाचा प्रकार आहे?

उत्तर – रॅम अंतर्गत मेमरी चा प्रकार आहे. अंतर्गत मेमरी चे मुख्यतः दोन प्रकार आहेत ते म्हणजे रॅम ( Random Access Memory ) आणि रॉम ( Read Only Memory ). या मध्ये रॅम अस्थाई मेमरी असते तर रॉम स्थाई मेमरी असते.

 रॅम चे एकूण किती प्रकार आहेत 

उत्तर – रॅम चे मुख्यतः दोन प्रकार आहेत जे आहे SRAM ( static Random Access Memory ) आणि DRAM ( Dynamic Random Access Memory ).

या मध्ये SRAM चा उपयोग कॅचे मेमरी म्हणून केला जातो तर DRAM चा उपयोग app किंवा समकालीन प्रोग्राम रन करण्यासाठी होतो.

 रॅम चा शोध कधी लागला व कोणी लावला?

उत्तर – रॅम चा शोध 1968 साली रॉबर्ट ह. डेनार्ड यांनी लावला. श्री डेनार्ड टेक्सास मध्ये जन्मलेले अभियांत्रिक होते.

 संगणकामधील फास्टेस्ट मेमरी कोणती आहे?

उत्तर – संगणकामध्ये उपस्थित असणारी SRAM ( static Random Access Memory )  जिलाच कॅचे मेमरी म्हूणन संबोधले जाते हा रॅम चा प्रकार संगणकामधील फास्टेस्ट मेमरी आहे.

 काय अतिरिक्त रॅम मुळे संगणकाची गती वाढते?

उत्तर – होय या मुळे संगणकाचे गती वाढते कारण संगणकाला कार्य करण्यासाठी मेमरी उपलब्ध होते व हार्ड डिस्क शी असणारा डायरेक्ट संपर्क कमी होतो ज्याने पेज fast load होऊन संगणकाची गती वाढते.

 सारांश / conclusion

 आपण या लेखामध्ये रॅम बद्दल माहिती पाहिली. रॅम चा मुख्य उपयोग संगणकाची गती वाढवून संगणकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी होतो. रॅम चे वेगवेगळे प्रकार आहेत ज्यांचा वेगवेगळा उपयोग आहे परंतु स्टॅटिक रॅम आणि डायनॅमिक रॅम या मुख्य समजल्या जातात.

रॅम बद्दल अधिक माहिती जाणून घेताना आपण रॅम म्हणजे काय – what is RAM in Marathi बद्दल माहिती घेतली तसेच आपण रॅम चे प्रकार देखील जाणून घेतले.रॅम च्या ऐताहासिक माहिती साठी आपण रॅम चा इतिहास जाणून घेतला.

अधिक माहितीसाठी आपण रॅम कशी काम करते, रॅम कशी अपग्रेड करायची असते तसेच जास्त रॅम चे उपयोग आणि रॅम ची वैशिष्ट्य जाणून घेतली व आपल्या सामान्य ज्ञानासाठी आपण सर्वात जास्त विचारलेले प्रश्न जाऊन घेतले.

मला खात्री आहे रॅम विषयी माहिती चा हा लेख तुम्हाला नक्की आवडला असेल त्यामुळे हा लेख तुमच्या मित्रांसोबत share करा आणि काही सूचना असतील कंमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा.

तुमच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छांसह, धन्यवाद… 

Advertisements

Leave a Comment