Advertisements

हार्डवेअर म्हणजे काय | what is hardware in Marathi

Advertisements

जेव्हा आपण संगणकाकडे बघतो तेव्हा आपल्याला संगणकाचे विविध भाग दिसतात जसे की कीबोर्ड, माऊससीपीयू इत्यादी व या सर्व भौतिक भागांना हार्डवेअर असे म्हणताना आपण या पूर्वी ऐकलेले असेल त्यामुळे आपल्या मनात हार्डवेअर म्हणजे काय what is hardware in Marathi हा प्रश्न जरूर उद्भवू शकतो.

संगणक हा अनेक छोट्या आणि मोठ्या भागांचा बनलेला असतो व त्यांच्या एकत्रित परिणामामुळे संगणक कार्यशील बनतो. संगणकामध्ये अनेक भौतिक भागांचा समावेश होतो व संगणकाचे विविध भाग हार्डवेअर म्हणून संबोधले जातात.

Advertisements
what is hardware in Marathi

 संगणक हार्डवेअर चे दोन भागात रुपांतर केले जाऊ शकते जसे ही अंतर्गत हार्डवेअर आणि बाह्य हार्डवेअर. सामान्यता अंतर्गत हार्डवेअर मध्ये संगणकाला कार्यरत ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या भागाचा समावेश होतो तर बाह्य हार्डवेअर संगणकाला जोडलेले असतात आणि यांचा उपयोग संगणकाला अधिक कार्यशील बनवण्यासाठी होतो.

 हार्डवेअर बद्दल वरील सामान्य माहिती जाणून घेऊन आपल्या मनात हार्डवेअर बद्दल नक्कीच रुची वाढले असेल त्यामुळे आपण या लेखात हार्डवेअर म्हणजे काय, हार्डवेअर चा इतिहास, हार्डवेअर चे प्रकार आणि संबंधित इतर माहिती जाणून घेऊ.

अनुक्रमणिका ↕

 हार्डवेअर म्हणजे काय » what is hardware in Marathi

 संगणकामध्ये हार्डवेअर हे संगणकाचे असे भौतिक भाग असतात ज्यांच्यामध्ये circuit board, ICs किंवा इतर इलेक्ट्रॉनिक्सचा उपयोग केलेला असतो. हार्डवेअरमध्ये संगणकाच्या त्या सर्व भागांचा समावेश केला जातो ज्यांना आपण स्पर्श करू शकतो.

 हार्डवेअरचे सर्वोत्तम उदाहरण मॉनिटर किंवा स्क्रीन आहे ज्याच्या मदतीने तुम्ही हा लेख वाचत आहात.हार्डवेअरच्या उपयोगा शिवाय तुमचा संगणक पूर्णत्वास नेऊ शकत नाही व त्या मधील सॉफ्टवेअर कोणत्याही कामाचे नसेल. हार्डवेअर च्या साह्याने संगणकाचे विविध कार्य पार पाडले जातात व या कार्यांचा संबंध डायरेक्ट वापरकर्त्या बरोबर असतो..

 हार्डवेअर चे मुख्यतः दोन भाग असतात जे आहे बाह्य  हार्डवेअर आणि अंतर्गत हार्डवेअर. बाह्य हार्डवेअर संगणकाला केबलद्वारे किंवा इतर पद्धतीने संगणकाशी जोडलेले असतात व त्यांचे अस्तित्व संगणकाच्या case च्या बाहेर असते याउलट अंतर्गत हार्डवेअर चे भाग आपण सहज बघू शकत नाही कारण ते संगणकाच्या case च्या आत मध्ये असतात.

 हार्डवेअर चे प्रकार 

 संगणकाच्या हार्डवेअर चे संगणकाच्या भागांच्या स्थानानुसार दोन भागात रूपांतर केले जाते जे आहेत अंतर्गत हार्डवेअर आणि बाह्य हार्डवेअर

 अंतर्गत हार्डवेअर –

 अंतर्गत हार्डवेअरचा उपयोग सॉफ्टवेअरच्या मदतीने संगणकाला निर्देश प्रदान करण्यासाठी होतो अंतर्गत हार्डवेअर आपण सहज रित्या बघु शकत नाही कारण ते संगणकाच्या case च्या आत मध्ये असतात.

 1. मदरबोर्ड

मदरबोर्ड प्रिंटेड सर्किट बोर्ड असतात ज्यामध्ये सीपीयू चा समावेश केलेला असतो तसेच यामध्ये इतर अंतर्गत हार्डवेअर उपकरणांचा समावेश असतो. संगणकाच्या सर्व भागांची कार्यप्रणाली मदरबोर्ड मधून चालते.

2. CPU

सीपीयु ला संगणकाचा मेंदू देखील म्हटले जाते कारण सीपीयू संगणकाच्या सर्व भागांना निर्देश प्रदान करण्याचे कार्य करतो. सीपीयू च्या माध्यमातून संगणकाची कार्य करण्याची कृती आणि कार्य क्षमता तपासली जाते.

3. रॅम – Random Access Memory  

 रॅम संगणकाची अल्पकालीन मेमरी असते.रॅम च्या मदतीने संगणकाला त्वरित निर्देश प्रदान करता येतात. जेव्हा संगणकाचे पावर ऑफ केले जाते तेव्हा रॅम मधील सर्व मेमरी मिटवली जाते.

4. Heat sink

 Heat sink च्या माध्यमातून संगणकच्या अंतर्गत भागातील अतिरिक्त उष्णता बाहेर टाकली जाते व त्या द्वारे संगणकातील तापमान नियंत्रित ठेवले जाते.सामान्यता हीट सिंक चा उपयोग cpu च्या वर केला जातो कारण सीपीयू सर्वात जास्त तापमान निर्माण करतात.

5. Network interface card –

 या कार्डचा उपयोग संगणकाला इंटरनेटशी जोडण्यासाठी होतो. यालाच नेटवर्क अडप्टर तेव्हा लोकल एरिया नेटवर्क असते म्हटले जाते.या प्रकारचे adapters सामान्यता इथरनेट internet ला सहयोग करतात.

6. सॉलिड स्टेट ड्राईव्ह –

या ड्राईव्ह NAND flsh मेमरी तंत्रज्ञानाला सहयोग करतात.या प्रकारची मेमरी स्थिर असते त्या मुळे या ड्राईव्ह संगणकाची पॉवर बंद झाली तरी कार्य करतात व मेमरी साठवून ठेवतात. या ड्राईव्ह मध्ये कायमस्वरूपी मेमरी चा समावेश होतो.

7. Hard disk –

या डिस्क मध्ये स्थिर तसेच अस्थिर मेमरी साठवून ठेवली जाते.हे एक भौतिक स्टोरेज उपकरण आहे ज्यामध्ये फोटो,video, गाने, प्रोग्राम, विविध अँप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि विविध प्रकारच्या फाईल साठवून ठेवल्या जाऊ शकतात.

 बाह्य हार्डवेअर –

 बाह्य हार्डवेअर मध्ये समाविष्ट असणाऱ्या उपकरणांना पेरिफेरल असे देखील म्हटले जाते . बाह्य हार्डवेअर उपकरण संगणकाला cable किंवा वायरलेस पद्धतीने जोडलेले असतात. बाह्य हार्डवेअर मध्ये इनपुट आणि आऊटपुट उपकरणांचा समावेश होतो.

 इनपुट उपकरणे

 ज्या उपकरणांच्या माध्यमातून आपण संगणकाला निर्देश प्रदान करतो किंवा बाहेरील माहिती संगणकामध्ये पाठवतो त्या उपकरणांला इनपुट उपकरणे असे म्हटले जाते.

सामान्य input उपकरण आहेत –

1. माऊस

संगणकाचा माऊस हातात मावणारे संगणकाचे pointing उपकरण आहे. माऊस चा उपयोग मुख्यता मॉनिटरमध्ये कर्सर ची हालचाल करण्यासाठी होतो. माऊस चा उपयोग संगणकामध्ये interaction करण्यासाठी होतो. माउस हा wired किंवा वायरलेस असू शकतो.

2. मायक्रोफोन

 मायक्रोफोन ध्वनि तरंगांचे रूपांतर इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये करतात व याद्वारे ध्वनीच्या संभाषणासाठी मदत होते.

3. कीबोर्ड

 कि-बोर्ड च्या मदतीने आपण अंक अक्षर आणि सिम्बॉल चा उपयोग संगणकामध्ये करू शकतो तसेच कीबोर्डवरील उपलब्ध स्पेशल की च्या मदतीने आपण संगणकाचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करू शकतो.

4. टचपॅड

 टचपॅड हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे जे कधीकधी संगणकाला बाह्य उपकरणांद्वारे जोडलेले असते किंवा लॅपटॉप मध्ये अंतर्गत समाविष्ट असते. टचपॅड चा उपयोग माऊस ऐवजी पॉइंटर ची हालचाल करण्यासाठी होतो.

5. कॅमेरा

 कॅमेर्‍याच्या मदतीने आपण फोटो क्लिक करून संगणकांमध्ये स्टोअर करू शकतो. आपण कॅमेरा च्या मदतीने व्हिडिओ कॉल, ऑनलाइन live फोटो अपलोड करणे इत्यादी कार्य करू शकतो.

6. मेमरी कार्ड

 मेमरी कार्डचा उपयोग मेमरी स्टोअर करण्यासाठी होतो. मेमरी कार्ड ला आपण संगणकाशी जोडून संगणकामध्ये डाटा ट्रान्सफर करू शकतो. मेमरी कार्ड च्या मदतीने आपण डाटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी Physical माध्यमातून नेऊ शकतो.

आउटपुट उपकरणे 

 संगणकामधील उपलब्ध माहितीचा उपयोग वापरकर्त्याला होण्यासाठी आउटपुट उपकरणे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. आउटपुट उपकरणांच्या मदतीने संगणकामधील माहिती वापरकर्त्याला विविध माध्यम जसे की चित्र, ध्वनी इत्यादी मार्फत दर्शवली जाते.

 काही सामान्य आउटपुट उपकरणे आहेत

1. प्रिंटर

 प्रिंटरच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक डाटा चे रूपांतर प्रिंटेड मटेरियल मध्ये करता येते .हे प्रिंटेड मटेरियल ब्लॅक ॲण्ड व्हाइट झेरॉक्स किंवा कलर झेरॉक्स असू शकते.

2. मॉनिटर

 मॉनिटर हे संगणकाचे आऊटपुट उपकरण आहे जे टीव्हीच्या स्क्रीन समान असते याच्या मदतीने संगणकामध्ये तयार होणारे विविध माहिती डॉक्युमेंट आणि चित्र वापरकर्त्याला दाखवले जातात.

3. हेडफोन,एयर फोन किंवा एअर बड

 जेव्हा एकट्या संगणक वापरकर्त्याला संगणकामधील वनिता आनंद घ्यायचा असतो तेव्हा तो या उपकरणांचा उपयोग करू शकतो.

4. स्पीकर

 स्पीकर हे संगणकाला जोडलेले आउटपुट उपकरण असतात व यांच्यामार्फत संगणकाच्या मदतीने ध्वनीचे निर्माण केले जाते.

 हार्डवेअर अपग्रेड करणे म्हणजे काय?

 संगणकाची कार्यक्षमता, फीचर आणि गती वाढवण्यासाठी संगणकाचे एक किंवा एकापेक्षा अधिक उपकरण नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाच्या उपकरणांसह बदलण्याला हार्डवेअर अपग्रेड करणे म्हणतात.

 जसे की जर आपल्या संगणकामध्ये वायर माऊस असेल आणि आपण त्याच्या ऐवजी वायरलेस माऊस चा उपयोग करण्यात सुरुवात केली तर याला हार्डवेअर अपग्रेड केले म्हणू शकतो.

 नवीन तंत्रज्ञानाच्या लालची मध्ये हार्डवेअर अपग्रेड करणे महागडी प्रक्रिया बनू शकते त्यामुळे केवळ महत्त्वाच्या उपकरणांना अपग्रेड करणे गरजेचे असते.

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

 हार्डवेअर म्हणजे काय?

उत्तर – संगणक हा अनेक भौतिक भागांचा बनलेला असतो व या भागांना हार्डवेअर म्हणून संबोधले जाते.  हार्डवेअर मध्ये मुख्यतः सर्किट बोर्ड, ICs किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा समावेश केलेला असतो.

 हार्डवेअर चे अंतर्गत हार्डवेअर आणि बाह्य हार्डवेअर हे दोन प्रकार आहेत.

 हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील फरक

उत्तर – हार्डवेअर चा उपयोग संगणकाला संचलित करण्यासाठी तसेच वापरकर्त्याला महत्त्वाची माहिती दर्शवण्यासाठी होतो तर सॉफ्टवेअरचा उपयोग संगणकाला अंतर्गत निर्देश देण्यासाठी होतो.

 हार्डवेअर चे प्रकार?

उत्तर – हार्डवेअर चे प्रकार आहेत अंतर्गत हार्डवेअर आणि बाह्य हार्डवेअर. अंतर्गत हार्डवेअर मध्ये संगणकाच्या केस मध्ये उपस्थित असलेल्या उपकरणांचा समावेश होतो तर बाह्य हार्डवेअर मध्ये संगणकाला केबल किंवा वायरलेस पद्धतीने सोडलेल्या उपकरणांचा समावेश होतो.

 सारांश / conclusion

 मानवासाठी उपयुक्त आणि कार्यशील संगणक बनवण्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ची गरज असते. हार्डवेअर शिवाय संगणक निरुपयोगी असतो.  संगणक विविध भागांचा बनलेला असतो व या भागांना हार्डवेअर संबोधले जाते. हार्डवेअर उपकरणांचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो.

हार्डवेअर विषयी माहिती जाणून घेताना आपण या लेखामध्ये जाणून घेतले हार्डवेअर म्हणजे काय,  हार्डवेअर चे वेगवेगळे प्रकार तसेच अंतर्गत हार्डवेअर आणि बाह्य हार्डवेअर बद्दल माहिती या सोबतीला आपण हार्डवेअर उपग्रेड कसे करायचे हे देखील माहीत करून घेतले.

 हार्डवेअर विषयी माहिती देणारा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारे कळवा आणि ही उपयुक्त माहिती तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *