Sound card विषयी माहिती , प्रकार आणि उपयोग

Advertisements

 तुम्हाला माहित आहे का Sound card म्हणजे काय जर नाही तर या लेखाद्वारे आपण साऊंड कार्ड विषयी माहिती जाणून घेऊया ज्याद्वारे आपल्याला साऊंड कार्ड कशा प्रकारे काम करतो ,साऊंड कार्ड चे प्रकार तसेच साऊंड कार्ड विषयी माहिती चे ज्ञान होईल.

संगणकामध्ये ध्वनीचे निर्माण करण्यासाठी साऊंड कार्ड महत्त्वाचे भूमिका निभावत असतो त्यामुळे जर आपण आपल्या संगणकामध्ये साऊंड चा उपयोग करत असेल तर आपल्याला चांगल्या दर्जाचा ध्वनी संगणकाद्वारे ऐकायला मिळेल.

अनुक्रमणिका ↕

आपल्याला आपल्या संगणकामध्ये वापरण्यात येणाऱ्या साऊंड कार्ड विषयी संपूर्ण माहिती असणे गरजेचे असते त्यामुळेच आजच्या या लेखामध्ये आपण Sound card माहिती जाणून घेणार आहोत.

Sound card विषयी माहिती

साऊंड कार्ड विषयी माहिती  ● information about sound card in marathi

साऊंड कार्ड संगणकामध्ये उपयोगात येणारे expansion card किंवा integrated circuit असतात. साऊंड कार्ड चा उपयोग संगणकामध्ये ध्वनीनिर्मिती साठि होतो. Sound card संगणकामधील आवाजाचे रूपांतर ऑडिओ सिग्नल मध्ये करून स्पीकर कडे पाठवतात व microphone किंवा ऑडिओ टेप मधिल आवाजाचे रूपांतर डिजिटल डेटा मध्ये करून आवाजाला संगणकामध्ये साठवण्यासाठी मदत करतात.

साऊंड कार्ड ला ऑडिओ बोर्ड, साऊंड बोर्ड किंवा ऑडिओ आउटपुट उपकरण असे देखील म्हटले जाते. साऊंड कार्ड संगणकाचा मुख्य भाग नसला तरी सर्व संगणकांमध्ये साऊंड कार्ड हे expansion card किंवा मदरबोर्ड मध्ये inbuild उपलब्ध असतात.

साऊंड कार्ड चा इतिहास

संगणकाच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात साऊंड कार्डल संगणकाचा महत्त्वाचा भाग मानले जात नव्हते त्यामुळे बऱ्याच संगणकांमध्ये साऊंड कार्डचा उपयोग केला जात नव्हता त्या ऐवजी संगणकांमध्ये अंतर्गत स्पीकर चा उपयोग केला जात होता.

परंतु जेव्हा संगणकाचे कार्य जटील बनत गेले व संगणक अधिक कॉम्प्लेक्स बनत गेला तेव्हा संगणकामधील ध्वनि निर्मिती महत्त्वाचा भाग बनू लागली व त्यामुळे संगणकामध्ये अधिक चांगल्या ध्वनि साठी संगणक तंत्रज्ञ प्रयत्न करू लागले.

सन 1972 मध्ये Sherwin Gooch नावाच्या संगणक तंत्रज्ञांनी सर्वात प्रथम साऊंड कार्ड चा शोध लावला व या साऊंड कार्ड ला Gooch Synthetic Woodwind नाव दिले गेले. Gooch Synthetic Woodwind साऊंड कार्ड चा उपयोग PLATO टर्मिनल द्वारे करण्यात आला.

सन 1980 च्या दरम्यान बऱ्याच संगणकामध्ये in build साऊंड कार्डचा उपयोग केला गेला ज्याच्या मदतीने संगणकामध्ये काही basic ध्वनी निर्मिती करण्यास मदत झाली. AdLib अशी पहिली कंपनी होती की आयबीएम च्या संगणकांसाठी साऊंड कार्ड चे निर्माण करत होती.

साऊंड कार्डचा उपयोग

साऊंड कार्ड विषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम साऊंड कार्डचा उपयोग काय आहे हे माहीत असणे गरजेचे असते त्यामुळेच आता आपण जाणून घेऊया साउंड कार्ड चा उपयोग .

1. साउंड कार्डच्या मदतीने संगणकामध्ये अतिरिक्त ऑडिओ पोर्ट उपलब्ध होतात. 

2. साऊंड कार्ड analog सिग्नल चे रूपांतर डिजीटल डेटा मध्ये करून संगणकामध्ये ऑडिओ फाईल साठवण्यासाठी मदत करतात.

3. काही साऊंड कार्ड संगणकाच्या सीपीयू आणि ऑपरेटिंग सिस्टिम ला साउंड प्रोसेसिंग मध्ये मदत करून सीपीयू वरील लोड कमी करतात.

4. संगणकामधील ऑडिओ फाईल चे रूपांतर ध्वनि तरंग मध्ये करुन स्पीकर किंवा हेडफोन च्या माध्यमातून चांगला आवाज ऐकण्यासाठी साऊंड कार्ड मदत करतात.

5. साऊंड कार्ड च्या मदतीने संगणकाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ध्वनी ची गुणवत्ता सुधारते

6. काहि उच्च गुणवत्तेच्या साऊंड कार्ड च्या मदतीने संगणकाचे विविध भाग मधील electrical interference रोखला जातो.

साऊंड कार्ड चे प्रकार

संगणक बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार अधिक advanced होत आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे साउंड कार्ड मार्केटमध्ये उपलब्ध आहेत व आपल्याला चांगला साऊंड कार्ड खरेदी करण्यासाठी साऊंड कार्ड चे प्रकार माहीत असणे गरजेचे आहे. साऊंड कार्ड चे तीन मुख्य प्रकार मार्केट मध्ये उपलब्ध आहेत जे आहेत –

1. Standard साऊंड कार्ड

2. Motherboard साऊंड चिप

3. External sound adapter 

1. Standard साउंड कार्ड

Standard साऊंड कार्ड संगणकाला जोडण्यासाठी expansion slot ची गरज असते तसेच Standard साऊंड कार्ड मध्ये स्वतःची प्रोसेसर चिप असते. Standard साऊंड कार्ड मधील प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर  मुळे संगणकाच्या प्रोसेसर वरील लोड कमी होऊन संगणकाची कार्यक्षमता सुधारते. काहि सुधारित आवृत्ती चे Standard साऊंड कार्ड उपयुक्त features प्रदान करतात जसे की 24-bit रेकॉर्डिंग.

2. मदरबोर्ड साउंड कार्ड

साउंड निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात मदरबोर्ड साऊंड कार्ड चे निर्माण झाले, ज्यामुळे सुरवातीच्या काळात motherboard साउंड कार्ड ची किंमत आजच्या तंत्रज्ञानामधील साऊंड कार्ड च्या तुलनेत फारच जास्त होती.

मदरबोर्ड साउंड बोर्ड ची किंमत कमी करण्यात यश मिळाले तेव्हा miniaturization तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणक हार्डवेअर तंत्रज्ञांनी ध्वनी निर्मिती साठि फक्त एका चिप चा उपयोग करण्यात देखील यश मिळवले त्यामुळे सर्व अद्ययावत तंत्रज्ञानाच्या संगणकामध्ये मदरबोर्ड साऊंड कार्डचा उपयोग होतो.

3. External sound adapter 

External sound adapter मध्ये standard साऊंड कार्ड ची सर्व वैशिष्ट्ये उपस्थित असतात परंतु या प्रकारचे साऊंड कार्ड संगणकाला जोडण्यासाठी मदर बोर्ड मध्ये अंतर्गत स्लॉट ची गरज नसते. External sound adapter संगणकाला जोडण्यासाठी युएसबी केबल किंवा FireWire पोर्ट ची गरज असते.

कधीकधी External sound adapter मध्ये standard साउंड कार्ड ची सर्व वैशिष्ट्य जसे की अतिरिक्त इनपुट आणि आउटपुट उपस्थित नसतात. External sound adapter चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे साऊंड कार्ड एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणे सोपे असते.

साऊंड कार्ड चे भाग

सर्वात सामान्य साऊंड कार्ड देखील प्रिंटेड सर्किट बोर्ड असते ज्यामध्ये 4 मुख्य भाग असतात, ज्यांच्या मदतीने साऊंड कार Analog आणि डिजिटल सिग्नल ला ट्रान्सलेट करण्याचे काम करतात.

1. digital to analog converter (DAC)

2. analog to digital converter (ADC)

3. साऊंड कार्ड ला मदरबोर्ड बरोबर जोडण्यासाठी असलेली PCI or ISA रचना.

4. इनपुट आणि आऊटपुट कनेक्शन ज्यांच्या मदतीने मायक्रोफोन किंवा स्पीकर साऊंड कार्ड बरोबर जोडला जातो.

साउंड कार्ड मध्ये असलेल्या 4 मूलभूत parts व्यतिरिक्त काही भाग साऊंड कार्ड मध्ये उपस्थित असतात जे आहेत –

• डिजिटल सिग्नल प्रोसेसर

• अतिरिक्त इनपुट आउटपुट कनेक्शन

• प्रोसेसर

• मेमरी

ट्रांजिस्टर 

• Sony किंवा Philips Digital Interface (S/PDIF) मधील ऑडिओ फाईल ट्रान्सफर प्रोटॉकल

• usb केबल किंवा FireWire द्वारे डिजिटल ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डर जोडण्याची सुविधा

साऊंड कार्ड कनेक्शन 

साऊंड कार्ड कनेक्शन मध्ये आपण वर दिलेल्या चित्रामध्ये बघू शकतो की साउंड कार्डच्या पाठीमागच्या बाजूला वेगवेगळे ऑडिओ जॅक किंवा ऑडिओ कनेक्टर जोडलेले असतात. साऊंड कार्ड कनेक्शन मध्ये वेगवेगळे कनेक्टर उपस्थित असतात ज्यांच्या प्रत्येकाचा कलर कोड वेगवेगळा आहे.

1. Digital out पिवळ्या किंवा सफेद कलर मध्ये उपस्थित असतात ज्यांचा उपयोग लाउडस्पीकर किंवा sound साठि करण्यासाठी होतो.

2. निळ्या कलर मध्ये मुख्यता Sound in or line in उपस्थित असतात ज्यांच्या मदतीने बाहेरील साऊंड स्त्रोत जसे की टेप रेकॉर्डर, सीडी प्लेयर हे साऊंड कार्ड ला जोडले जातात.

3.गुलाबी रंगाच्या ऑडिओ कनेक्टर चा उपयोग हेडफोन किंवा मायक्रोफोन ला साऊंड कार्ड बरोबर जोडण्यासाठी होतो.

4. Sound out or line out हे हिरव्या रंगाच्या ऑडिओ जॅक ने दर्शविले जातात. Sound out or line out ऑडिओ कनेक्टर हे साऊंड किंवा हेडफोन साठी मुख्य कनेक्टर मानले जातात. साउंड कार्डमध्ये काळा किंवा केशरी रंग अतिरिक्त ऑडिओ Sound out or line out जॅक दर्शवण्यासाठी होतो.

5. FireWire – डिजिटल व्हिडिओ कॅमेरा तसेच इतर उपकरणे जोडण्यासाठी या ऑडियो जॅक चा उपयोग होतो. ( वरील चित्रात हे ऑडिओ कनेक्टर उपस्थित नाही )

साऊंड कार्ड कसे काम करते ?

सर्व प्रकारच्या साउंड कार्ड मध्ये वर दिल्या प्रमाणे मुख्यतः चार भाग असतात – DAC,  ADC, PCI किंवा ISA रचना आणि इनपुट – आऊटपुट कनेक्शन. साऊंड कार्ड च्या कार्यप्रणाली मध्ये हे चार भाग मुख्य भूमिका निभावत असतात परंतु काही साऊंड कार्ड मध्ये कोडर – डिकोडर चिप उपस्थित असते ज्याच्या मदतीने DAC आणि ADC हे दोन्ही कार्य केले जातात.

जेव्हा संगणकाच्या मदतीने काही ध्वनी निर्माण केला जातो तेव्हा संबंधित ध्वनी चे सिग्नल PCI किंवा ISA रचनेच्या माध्यमातून साऊंड कार्ड कडे पाठवले जातात व संबंधित सिग्नल साऊंड कार्ड मधील DAC मधून पाठवून आउटपुट कडे पास केले जातात ज्यामुळे ध्वनीवर प्रक्रिया होऊन सुंदर पाठवून निर्माण होतो.

जेव्हा संगणकाच्या माध्यमातून आवाजाची रेकॉर्डिंग होत असते तेव्हा वरील सर्व प्रक्रिया उलट्या पद्धतीने चालते, ज्यामध्ये साऊंड कार्ड इनपुट कनेक्शन च्या माध्यमातून सिग्नल स्वीकारतो व त्याला ADC मधून पाठवून बायनरी मध्ये रूपांतर करतो. म्हणजेच साऊंड कार्ड इनपुट ध्वनी तरंगांचे संगणकामध्ये सेव्ह करण्याच्या फॉरमॅटमध्ये रूपांतर करतो व हा सुधारित आवृत्तीचा ध्वनि फॉरमॅट सीपीयू कडे प्रोसेसिंगसाठी पाठवतो.

तसेच काही साऊंड कार्ड मध्ये डिजिटल सिग्नल प्रोसेसर आणि ऍम्प्लिफायर उपस्थित असतात. यांच्या मदतीने संगणकामधील सी.पी.यु. वर ऑडिओ प्रोसेसिंग लोड कमी होतो व चांगल्या क्वालिटीचे आउटपुट सिग्नल पाठवण्यासाठी मदत होते.

 चांगले साऊंड कार्ड कसे निवडायचे

आपण आत्तापर्यंत साऊंड कार्ड विषयी खूप माहिती जाणून घेतली परंतु आता आपण चांगले साऊंड कार्ड कसे निवडायचे याविषयी माहिती जाणून घेऊया तसेच चांगले साऊंड कार्ड निवडण्यासाठी पुढील मुद्दे ध्यानात घेणे गरजेचे आहे –

• Interface

साऊंड कार्ड खरेदी करताना संबंधित साऊंड कार्ड आपल्या मदरबोर्ड बरोबर अनुरूप असणे गरजेचे असते त्यामुळेच आपण साऊंड कार्ड खरेदी करताना साऊंड कार्ड Interface जाणून घेणे गरजेचे असते

• Full-duplex

आजच्या काळातील जवळपास सर्व साऊंड कार्ड मध्ये Full-duplex या तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. Full-duplex मुळे संगणकामध्ये एकाच वेळेस ध्वनीचे निर्माण करणे व ध्वनी संग्रहित करणे शक्य होते.

• उपलब्ध कनेक्शन

साऊंड कार्ड खरेदी करताना आपल्याला त्यामध्ये मायक्रोफोन कनेक्टर, अतिरिक्त साऊंड कनेक्टर तसेच game पोर्ट विषयी माहिती असणे गरजेचे असते. या सर्व पोर्ट च्या मदतीने साउंड कार्ड ची कार्यक्षमता सुधारते

• 3-D acceleration

जर तुम्ही गेम खेळण्याचा आनंद गेला असाल तर तुम्ही साऊंड कार्ड मधील 3-D acceleration कडे लक्ष दिले पाहिजे.

• अतिरिक्त बाबी

जेव्हा आपण साऊंड खरेदी करत असतो तेव्हा आपण साऊंड कार्ड कंपनी कडून दिला जाणारा सपोर्ट तपासला पाहिजे तसेच आपल्या साऊंड कार्ड ला काही निश्चित कालावधीची गॅरंटी असणे देखील गरजेचे आहे.

प्रचलित साऊंड कार्ड कंपनी

जर तुम्ही साऊंड कार्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला काही प्रचलित जाऊन कार्ड कंपनी माहीत असणे गरजेचे आहे त्यामुळे आता आपण जाणून घेऊया काही प्रचलित sound card कंपनी –

• Asus

• Creative Technology

• Focusrite

• Turtle Beach

• M-Audio

• Raser

• Gravis

• Auzentech

• Alba

• E – MU Systems

• C-Media

• Sabrent

साऊंड कार्ड संगणकाला कसे जोडायचे       

• सर्वात प्रथम संगणकाच्या सर्व पावर कनेक्शन बंद करा व स्वतःला Ground करा जेणेकरून तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटीक डॅमेज चा धोका राहणार नाही.

• आता तुम्ही सीपीयू चा केस ओपन करा व मदरबोर्ड वर PCI स्लॉट शोधा.

• जर तुम्हाला मदरबोर्ड मध्ये PCI स्लॉट शोधण्यासाठी अडचणी येत असतील तर तुम्ही मदरबोर्ड मॉडेल नंबर नुसार ऑनलाइन PCI स्लॉट शोधू शकतात.

• आता जर तुम्ही आधीचे साऊंड कार्ड बदलत असाल तर जुने साऊंड कार्ड काढून घ्या.

• जुने साऊंड कार्ड काढण्याआधी त्याला जोडलेले सर्व उपकरण disconnect करा.

• काळजीपूर्वक नवीन साऊंड कार्ड मदरबोर्ड मधील स्लॉट च्या नॉच मध्ये गुंतवा व त्याला हळूच प्रेस करा.

• नवीन साउंड कार्ड ला सर्व उपकरणांचे कनेक्शन जोडा व संगणक सुरू करून साऊंड कार्ड ची test घ्या.

साऊंड कार्ड मधील प्रचलित प्रॉब्लेम

जर आपल्याला संगणकामध्ये रेकॉर्डिंग सेव करण्यासाठी अडचणी येत असतील किंवा स्पीकर द्वारे चांगल्या आवाजाचे निर्माण होत नसेल तर या मागे साऊंड कार्ड मधील प्रॉब्लेम असू शकतो.

कधीकधी संगणक मधून ध्वनी निर्मिती होत नाही कारण संगणकामधील ऑडिओ किंवा व्हिडिओ mute झालेले असतात त्यामुळे आपल्याला आपली संगणक सिस्टीम mute तर झाली नाही ना हे बघणे गरजेचे असते.

जेव्हा साउंड कार्ड आणि स्पीकर किंवा रेकॉर्डर मध्ये कनेक्शन weak होते तेव्हा आपल्याला संगणकामध्ये आवाजा संबंधी प्रॉब्लेम होऊ शकतात त्यामुळे साऊंड कार्ड कनेक्शन तपासणे गरजेचे असते.

कधीकधी रॅम द्वारे साऊंड कार्ड संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात त्यामुळे संगणकाच्या आवाज संबंधित समस्या निर्माण झाल्यावर संगणक बंद करून पुन्हा सुरू करणे गरजेचे असते.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

मोबाईल मध्ये साऊंड कार्ड असते का?

उत्तर – मोबाईल मध्ये साऊंड कार्ड उपस्थित असते . मोबाईल मधील साऊंड कार्डच्या मदतीने मोबाईल रेकॉर्डिंग आणि ध्वनी निर्मितीचे कार्य पार पाडत असतो.

साऊंड कार्ड अपग्रेड करता येते का ?

उत्तर – आपण संगणकामधील साऊंड कार्ड अपग्रेड करू शकतो व अधिक चांगल्या आवाजाचा आनंद घेऊ शकतो.

साऊंड कार्ड चा शोध कोणी लावला ?

उत्तर – साऊंड कार्ड चा शोध Sherwin Gooch यांनी 1972 मध्ये लावला.

सारांश

आजच्या या लेखाद्वारे आपण Sound card विषयी माहिती , प्रकार आणि उपयोग जाणून घेतले. मला आशा आहे तुम्हाला या लेखाद्वारे साऊंड कार्ड विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल.

Sound card विषयी माहिती सांगणारा हा लेख लिहिताना संपूर्ण खबरदारी घेतली गेलेले आहे परंतु तरीही तुम्हाला या लेखामध्ये कोणतीही त्रुटी आढळली तर तुम्ही कमेंट करू शकता तसेच तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद…

Advertisements

Leave a Comment