Advertisements

वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय | web application in Marathi

Advertisements

 जेव्हा आपल्याला संगणकामध्ये कोणत्याही ॲप चा उपयोग करायचा असतो तेव्हा आपण तो app डाऊनलोड करून त्याचा उपयोग करतो परंतु जर आपल्याला एखादा ॲप डाऊनलोड न करता उपयोगात आणायचा असेल तर आपण कशा प्रकारे करू शकतो या प्रश्नाचे उत्तर आपण वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय | web application in Marathi ह्या लेखाद्वारे जाणून घेऊया.

 समजा तुम्ही एखाद्या ॲप्लिकेशनचे निर्माण केलेले आहे आणि तुम्हाला ते ॲप्लिकेशन मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे तर तुम्ही त्या ॲप्लिकेशनची स्क्रिप्ट सर्वर टाकून एकाच वेळेस लाखो लोकांना तो ॲप बिना डाऊनलोड करता उपयोगासाठी उपलब्ध करून देऊ शकता.

Advertisements
वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय

 आपण वेब ॲप्लिकेशन विषयी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वेब ॲप्लिकेशनचा उपयोग करण्यासाठी संगणक / डिवाइस मधील ब्राउझर ची मदत घेतली जाते चला तर मग वेब ॲप्लिकेशन विषयी माहिती जाणून घेऊया.

अनुक्रमणिका ↕

 वेब ॲप्लिकेशन म्हणजे काय 

 वेब ॲप्लिकेशन (वेब ॲप ) हे असे ॲप्लिकेशन प्रोग्रॅम आहे जे सर्वर वर store केलेले असतात आणि आपण त्या ॲप्लिकेशन प्रोग्रॅम चा उपयोग वेब ब्राऊजर या सॉफ्टवेअर द्वारे करू शकतो. तसेच वेब ॲप्लिकेशन च्या उपयोगासाठी संगणकामध्ये वेब ब्राऊजर शिवाय इतर कोणत्याही सॉफ्टवेअरची मदत घेतली जात नाही.

 वेब ॲप्लिकेशन च्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लैंग्वेज चा उपयोग केला जातो त्यामध्ये सर्वर साईड लैंग्वेज आणि क्लाइंट साईड लैंग्वेज चा समावेश होतो.

 वेब ॲप्लिकेशन चा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो जसे की इकॉमर्स शॉप, ऑनलाइन कॅल्क्युलेटर तसेच वेगवेगळ्या ऑनलाइन सामाजिक माध्यमांच्या निर्मितीसाठी वेब ॲप्लिकेशन चा उपयोग होतो.

 वेब ॲप्लिकेशन चा इतिहास

 सण 1999 च्या सुमारास जावा या प्रोग्रॅमिंग लैंग्वेज मध्ये वेब ॲप्लिकेशन ची संकल्पना बघायला मिळते. त्यानंतर Jesse James Garrett यांनी Ajax: A New Approach to Web Applications या लेखामध्ये Ajax च्या मदतीने वेब ॲप्लिकेशन च्या निर्मितीची माहिती दिली.

2008 मध्ये HTML5 प्रथम सार्वजनिकरित्या उपलब्ध झाले. 2014 मध्ये W3C च्या मार्गदर्शनानुसार HTML5 मध्ये update करण्यात आले. वेब ॲप्लिकेशन च्या निर्मितीमध्ये HTML5 चा मुख्य रूपात उपयोग केला जातो.

 2015 मध्ये Alex Russell यांच्याद्वारे progressive web app (PWA) ची संकल्पना उदयास आली. Progressive web app मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला.

 वेब ॲप्लिकेशन चे प्रकार » types of web application in Marathi 

 वेब ॲप्लिकेशन च्या  उपयोगिता आणि कार्यप्रणालीच्या आधारावर web application चे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत त्यातील काही महत्त्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे –

 •  Static web application
 • Dynamic web application
 •  E commerce / online shop
 •  Portal webapp
 •  Content management system
 •  Progressive web app

 स्टॅटिक वेब ॲप्लिकेशन

 स्टॅटिक वेब ॲप्लिकेशन चा उपयोग प्रत्येक user साठी सारखीच माहिती दाखवण्यासाठी होतो. स्टॅटिक वेब ॲप्लिकेशन हा वेब ॲप्लिकेशन चा सर्वात जुना प्रकार आहे.

 स्टॅटिक वेब ॲप्लिकेशन मध्ये html, css या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा उपयोग केलेला असतो. स्टॅटिक वेब ॲप्लिकेशन मध्ये वापरकर्ता आणि सर्वर च्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे interaction होत नाही.

उदाहरण – एखाद्या कंपनीची वेबसाईट, वैयक्तिक पोर्टफोलियो वेबसाईट

 डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन

 डायनामिक वेब ॲप्लिकेशन चा उपयोग वेगवेगळ्या युजर साठी वेगवेगळा कंटेंट दर्शवण्यासाठी होतो. User शी डायरेक्ट interact करण्यासाठी डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन ची मदद होते.

 डायनॅमिक वेब ॲप्लिकेशनच्या मदतीने वेगवेगळी माहिती इंटरनेटवर टाकने सोपे झाले आहे, परंतु डायनॅमिक वेब एप्लीकेशन चे बॅकेंड सांभाळणे अवघड असते. डायनॅमिक वेब ॲप्लिकेशन मध्ये वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज चा समावेश होतो परंतु यामध्ये PHP आणी ASP या प्रोग्रामिंग लैंग्वेज मुख्य आहेत.

उदाहरण – ब्लॉग

 ई-कॉमर्स वेब ॲप / ऑनलाइन शॉप

 जेव्हा आपण ब्राउझर च्या मदतीने विविध वेबसाईट वरून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करत असतो तेव्हा त्या वेबसाईटला ई-कॉमर्स वेब ॲप किंवा ऑनलाइन शॉप असे म्हटले जाते. ई-कॉमर्स वेब ॲप मध्ये पेमेंट पद्धतीचा समावेश असतो.

 ई – कॉमर्स वेब ॲप बनवायला जटिल असतात कारण यामध्ये उत्तम frontend आणि backend प्रोग्रामिंग लैंग्वेज चे ज्ञान असणे आवश्यक असते त्याचबरोबर वेगवेगळ्या पेमेंट पद्धतीचा समावेश करता येणे गरजेचे असते.

 ई कॉमर्स वेब ॲप वरून आपण वेगवेगळ्या सर्विस, वस्तू, इ बुक, वेगवेगळी उत्पादने इत्यादी गोष्टी विकू शकतो. ई – कॉमर्स वेब ॲपच्या मदतीने वेगवेगळ्या कंपन्या निर्माण झाल्या आहेत.

उदाहरण – ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा

 पोर्टल वेब ॲप

 पोर्टल वेब ॲप च्या मदतीने वेगवेगळी माहिती सोप्या पद्धतीने मांडणे सोपे झाले आहे. पोर्टल वेब ॲप च्या मदतीने होमपेजवर वेगवेगळ्या section किंवा कॅटेगिरी च्या आधारावर वेगवेगळी माहिती मांडली जाते

 पोर्टल वेब ॲपचा मुख्य उद्देश वेगवेगळी माहिती समजणे योग्य पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी होतो.

 उदाहरण– बँकेचे पोर्टल वेब ॲप  

 कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम 

 विविध ब्लॉग, न्युज वेबसाईट बनवण्यासाठी कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम चा उपयोग होतो. कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम द्वारे वेगवेगळी माहिती इंटरनेटवर टाकने किंवा माहिती अपडेट करणे खूप सोपे झाले आहे.

 आज इंटरनेटवर वेगवेगळे कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम उपलब्ध आहेत परंतु त्यामधील दोन मुख्य कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम आहेत – वर्डप्रेस आणि ब्लॉगर

 वर्डप्रेस – जेव्हा आपण वैयक्तिकरीत्या होस्टिंग खरेदी करून वेबसाईट बनवत असतो तेव्हा आपण वर्डप्रेस ची मदत घेऊ शकतो वर्डप्रेस मध्ये विविध प्लग इन च्या मदतीने वेबसाईट बनवणे सोपे झाले आहे. वर्डप्रेस वर वेबसाईट बनवण्यासाठी कोडींग ची गरज लागत नाही .

 ब्लॉगर

 जेव्हा आपण फ्री मध्ये वेबसाईट बनवण्याचा विचार करतो तेव्हा आपल्या पुढे पहिले नाव येते ते म्हणजे ब्लॉगर. ब्लॉगर वर मध्ये आपण फ्री मध्ये होस्टिंग चा फायदा घेऊ शकतो . ब्लॉगर मध्ये वेबसाईट बनवताना आपल्याला थोडीफार कोडींग येणे गरजेचे आहे.

  प्रोग्रेसिव वेब ॲप / progressive web app

 Progressive web application ब्राउजर द्वारे प्रसारित होणाऱ्या वेब ॲप्लिकेशन चा प्रकार आहे ज्याच्या निर्मिती मध्ये  HTML , CSS , JavaScript आणि वेब असेंबली चा उपयोग केला जातो.

 वेब गुणवत्ता पूर्ण करणाऱ्या कोणत्याही ब्राऊजरमधे प्रोग्रेसिव वेब ॲप चा उपयोग केला जाऊ शकतो. प्रोग्रेसिव वेब ॲप च्या मदतीने वेबसाईट फास्ट लोड होते.

उदाहरण –  MakeMyTrip, उबेर ची वेबसाईट 

 वेब ॲप्लिकेशन ची उदाहरणे › web application example in Marathi 

 आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये खूप सारे वेब ॲप्लिकेशन इंटरनेटवर उपलब्ध आहेत त्यामधील काही महत्त्वाचे वेब ॲप्लिकेशन पुढीलप्रमाणे –

1. नेटफ्लिक्स

 जर तुम्ही वेगवेगळ्या वेबसिरिज बघण्याचा आनंद घेत असाल तर तुम्हाला नेटफ्लिक्स विषयी निश्चितच माहिती असेल. नेटफ्लिक्स हे एक प्रचलित वेब ॲप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे भरून वेबसेरीस तसेच चित्रपट बघण्याचा आनंद घेऊ शकतात.

2. facebook

 फेसबुकच्या मदतीने तुम्ही जगातील वेगवेगळ्या लोकांसोबत मैत्री करू शकता. फेसबुक हे एक वेगवेगळ्या लोकांसोबत संवाद साधण्यासाठी ऑनलाइन सामाजिक माध्यम आहे .

3. Image text extractor

 या वेब ॲप चा उपयोग चित्रांमधून अक्षरे बाहेर काढण्यासाठी होतो उदाहरणार्थ तुमच्याकडे एखाद्या पुस्तकांमधील पानाचा फोटो आहे व तुम्हाला त्यामध्ये असलेला टेस्ट कॉपी करायचा आहे तर तुम्ही या वेब ॲप्लिकेशन चा उपयोग करू शकता.

4. Pixlr

Pixlr एक प्रचलित फोटो एडिटर आहे. याच्या मदतीने तुम्ही वेगवेगळे फोटो एडिट करू शकतात.

5. Codepen

 Codepen एक प्रचलीत मॅप एप्लीकेशन आहे ज्याचा उपयोग प्रोग्रॅमिंग कोड रन करण्यासाठी तसेच तो मित्रांबरोबर शेअर करण्यासाठी होतो याच बरोबर आपण याच्या मदतीने ऑनलाईन कोड सेव देखील करू शकतो

6. Gmail

 जेव्हा आपण ब्राउझर च्या मदतीने जीमेल चा उपयोग करतो तेव्हा जीमेल वेब ॲप्लिकेशन  म्हणून कार्य करत असते. जीमेल च्या मदतीने ई-मेल पाठवणे आणि स्वीकार करणे सोपे झाले आहे.

 वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशन मधील फरक » difference between website and web application in marathi

 आपण वेब ॲप्लिकेशन विषय जाणून घेत आहोत, त्यामुळे आपल्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की वेब ॲप्लिकेशन आणि वेबसाइट मधील फरक काय असेल.  आता तोच फरक आपण पुढील table द्वारे जाणून घेऊया 

वेब ॲप्लिकेशन आणि वेबसाईट मधील फरक
वेब ॲप्लिकेशन वेबसाईट
वेब ॲप्लिकेशन चा उपयोग युजर बरोबर interaction करण्यासाठी होतो वेबसाइट मधील माहिती स्टॅटिक असते.
वेब ॲप्लिकेशन उपयोगा आधी पूर्व संचालित केले जातात वेबसाइट उपयोगा आधी पूर्व संचलित केली जात नाही .
वेब ॲप्लिकेशन चा उपयोग युजर बरोबर interaction करण्यासाठी होतो वेबसाइट मधील माहिती स्टॅटिक असते.
युजर web app मधील माहिती वाचून त्यामध्ये बदल करू शकतात युजर वेबसाइट मधील माहिती मध्ये बदल करू शकत नाही
वेब ॲप ची कार्यप्रणाली जटिल असते वेबसाइट मधील कार्यप्रणाली जटील नसते.
 वेब ॲप हे वेबसाईट असू शकतात. वेबसाइट वेब ॲप असू शकत नाही.
वेब एप्लीकेशन चे ब्राउझर बरोबर कार्य करण्याची क्षमता जास्त असते. वेबसाईट ची ब्राऊजर बरोबर कार्य करण्याची क्षमता कमी असते.
वेब ॲप निर्माण करणे अवघड असते कारण यामध्ये जटील कार्य प्रणालीचा उपयोग केलेला असतो वेबसाईट निर्माण करणे तुलनेने सोपे असते.
उदाहरण – फेसबूक, मेक माय ट्रिप, ॲमेझॉन उदाहरण- विविध न्युज वेबसाईट

 वेब ॲप्लिकेशन चा फायदा » advantages of web application in Marathi

 आजच्या काळात वेब ॲप्लिकेशन चा उपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वेब ॲप्लिकेशन चा उपयोग करून चांगल्या प्रकारे user मॅनेजमेंट करता येते.

 •  वेब एप्लीकेशन चा उपयोग करण्यासाठी फक्त ब्राउजर ची गरज असते त्यामुळे वेब एप्लीकेशन चा उपयोग वेगवेगळ्या डिवाइस मध्ये करता येतो.
 •  वेब एप्लीकेशन अपडेट करणे सोपे असते.
 •  वेब ॲप्लिकेशनच्या मदतीने ॲप बनवण्याची किंमत कमी होते
 •  वेब ॲप्लिकेशन चा उपयोग जगभरामध्ये कोणताही user करू शकतो
 •  वेब एप्लीकेशन चा उपयोग करण्यासाठी ब्राउजर ऐवजी कोणत्याही अतिरिक्त फाईल डाऊनलोड करण्याची गरज पडत नाही त्यामुळे मदरबोर्ड मध्ये मेमरी वर लोड पडत नाही.
 •  वेब ॲप्लिकेशन सर्वर वर उपस्थित फाईल च्या मदतीने चालतात त्यामुळे ते चोवीस तास उपलब्ध असतात.
 •  कमी रॅम असणाऱ्या मोबाईल आणि संगणकामध्ये देखील वेब एप्लीकेशन चा उपयोग केला जाऊ शकतो.
 •  वेब ॲप्लिकेशन सदैव up to date असतात

 वेब ॲप्लिकेशनचा तोटा

 वेब एप्लीकेशन चा उपयोग जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात आहे परंतु वेब ॲप्लिकेशन चे काही तोटे देखील आहेत त्यातील काही महत्त्वाचे पुढील प्रमाणे

 •  वेब ॲप्लिकेशन चा उपयोग इंटरनेटच्या मदतीने केला जातो परंतु ज्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध नाही त्या ठिकाणी वेब ॲप्लिकेशन चा उपयोग होऊ शकत नाही .
 •  ज्या ठिकाणी इंटरनेटची गती कमी असते त्या ठिकाणी वेब ॲप्लिकेशन चांगल्या प्रकारे काम करत नाही.
 •  वेब एप्लीकेशन प्ले स्टोअर किंवा apple स्टोर वर उपलब्ध नसतात त्यामुळे ते उपयुक्त युजर पर्यंत प्रसारित करणे अवघड असतात.
 •  वेब ॲप्लिकेशन मध्ये कितीही सुधारणा झालेली असली तरीही ते जावा किंवा कोटलीन लैंग्वेज ने बनवलेल्या ॲपला टक्कर देऊ शकत नाही.
 •  वेब ॲप्लिकेशन तुलनेने कमी सुरक्षित असतात.

 सारांश

 वेब ॲप्लिकेशन चा उपयोग इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात केला जात आहे त्यामुळे आपल्याला वेब ॲप्लिकेशन विषयी माहिती असणे गरजेचे आहे. या लेखामध्ये आपण वेब ॲप्लीकेशन ची माहिती जाणून घेतली तसेच वेबसाईट आणि वेब ॲप मधील फरक देखील जाणून घेतला.

 वेब ॲप्लिकेशन चे वेगवेगळे फायदे आहेत परंतु त्यातील मुख्य फायदा आहे user interaction. वेब एप्लीकेशन चा उपयोग वेगवेगळ्या शॉपिंग वेबसाईट तसेच सोशल मीडिया वेबसाईट मध्ये केला जातो.

 मला खात्री आहे तुम्हाला वेब ॲप्लिकेशन विषयी माहिती आवडली असेल. जर तुम्हाला वेब ॲप्लिकेशन ची माहिती आवडली असेल तर हा लेख तुमच्या मित्रांना शेअर करा व या लेखामध्ये काही त्रुटी असतील तर टिपणी द्वारे आम्हाला जरूर कळवा.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद…  

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *