Operating system म्हणजे काय | What is operating system in marathi.

Advertisements

 आजच्या लेखात आज आपण जाणून घेऊया ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय ? What is operating system in marathi. ऑपरेटिंग सिस्टिम सर्व संगणकीय उपकरणांचा महत्वाचा भाग आहे.

जेव्हा आपण संगणकावर कोणतेही कार्य करत असतो जसे काही टेक्स्ट कॉपी करणे, संगणकाच्या माध्यमातून प्रिंट करणे इत्यादी या सर्व कार्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टिमचा उपयोग होत असतो म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टिम संगणक वापरकर्ता आणि संगणकाचे हार्डवेअर उपकरण यांना जोडणारा दुवा आहे.

सध्या मार्केट मध्ये अनेक ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध होत आहेत परंतु त्यामध्ये iOS, Android आणि Windows या ऑपरेटिंग सिस्टिम मुख्य आहे. ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने संगणकाची कार्य प्रणाली सुधारते.

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय

चला तर मग जाणून घेऊया संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिम विषयी अधिक माहिती आणि ऑपरेटिंग सिस्टिम चे प्रकार

अनुक्रमणिका ↕

ऑपरेटिंग सिस्टिम म्हणजे काय ? What is operating system in marathi

ऑपरेटिंग सिस्टिम हे system software आहे ज्यामध्ये संगणकाला निर्देश देण्यासाठी विविध प्रोग्राम चा समावेश केलेला असतो. ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाचे मुख्य सॉफ्टवेअर आहे ज्याला OS म्हणून देखील ओळखले जाते. ऑपरेटिंग सिस्टिम च्या मदतीने वेगवेगळ्या सॉफ्टवेअर ला चालवण्यासाठी मदत होते जसे की फोटोशॉप, कॅमेरा, फाईल मॅनेजर इत्यादी

संगणकाला कार्य करण्यासाठी संगणकाचे विविध भाग मदत करतात व या संगणकाच्या विविध भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही प्रोग्रॅम किंवा सॉफ्टवेअर तयार केलेले असतात त्यांना ऑपरेटिंग सिस्टिम असे म्हटले जाते. ऑपरेटिंग सिस्टिम शिवाय संगणक हा एक फक्त बिना कामाचा बॉक्स आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम चा इतिहास

जगातील पहिल्या ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध 1950 मध्ये लागला जिचे नाव GMOS असे होते. या ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध जनरल मोटर द्वारे IBM कंपनी साठी लावण्यात आला. GMOS ऑपरेटिंग सिस्टिम च्या मदतीने संगणकामध्ये multitasking करणे शक्य नव्हते. ऑपरेटिंग सिस्टिम चा उपयोग केलेल्या संगणकाला mainframe संगणक असे म्हटले गेले. 

1960 सालापर्यंत वेगवेगळ्या designer द्वारे multitasking ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध सुरू होता व हा शोध PDP-1 द्वारे पूर्ण झाला. या संगणकाद्वारे multiprogramming करणे शक्य झाले.

Microsoft कंपनी द्वारे 1975 मध्ये पहिल्या windows ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध लावला गेला पुढे 1981 मध्ये Bill Gates and Paul All यांनी MS-DOS ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध लावून वैयक्तिक संगणकाला आणखी उच्च स्तरावर नेले. पण या ऑपरेटिंग सिस्टिम च्या कमांड सामान्य व्यक्तीला समजणे अवघड होते .

ऑपरेटिंग सिस्टिम चे प्रकार

संगणकाच्या सर्व मूलभूत क्रिया करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम ची गरज असते त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टिम रिसोर्स मॅनेजर चे काम करते. संगणक वापरकर्ता आणि मशीन ला जोडणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम चे प्रचलित प्रकार पुढील प्रमाणे –

1. Time-Sharing operating system

2.  Batch operating system

3. Network operating system

4. Distributed operating system 

5. Real time operating system

1. टाईम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टिम

टाईम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये वेगवेगळ्या युजरला निर्धारित वेळ दिला जातो व संसाधनांला एका युजर कडून दुसऱ्या यूजर कडे पाठवले जाते. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी मात्र काही मिनी सेकंद लागतात.

टाईम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये प्रत्येक task ला काही निर्धारित वेळ दिला जातो त्यामुळे सीपीयू चे कार्य सुरळीतपणे पार पडते. या ऑपरेटिंग सिस्टीम ला मल्टिटास्किंग सिस्टीम असेदेखील म्हटले जाते. या ऑपरेटिंग सिस्टिम मुळे सर्व युजर ला cpu चा समान वेळ मिळतो.

उदाहरण – Honeywell CP-6 , Multics, Unix

2. Batch ऑपरेटिंग सिस्टिम

Batch ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये संगणक वापरकर्ता ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर डायरेक्ट interact करत नाही यासाठी संगणक वापरकर्ता ऑफलाइन उपकरणांच्या जसे की पंच कार्ड च्या मदतीने जॉब्सचे निर्माण करतो आणि त्याला कॉम्प्युटर ऑपरेटर वर सबमिट करतो. 

या पद्धतीने operating systems च्या मदतीने समान जॉब्सला एकत्र करून त्यांचे बॅच केले जाते व ते बॅच सीपीयू कडे पाठवून संगणकामधील आवश्यक क्रिया पूर्ण केल्या जातात. बॅच ऑपरेटिंग सिस्टिम चा मुख्य उपयोग म्हणजे वारंवार केल्या जाणाऱ्या मोठ्या स्वरूपातील संगणकीय क्रिया करण्यासाठी ही OS उपयुक्त आहे.

उदाहरण – बँक स्टेटमेंट, Payroll system

3. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम

नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम ला कार्य करण्यासाठी सर्वर ची गरज असते व या ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने सर्वर हे डेटा, यूजर, security तसेच वेब ॲप्लीकेशन चे व्यवस्थापन करू शकतात. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम चा मुख्य उपयोग प्रिंटर किंवा शेअर केलेल्या फाईल ला विविध संगणकामध्ये access देण्यासाठी होतो.

नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने आपण सहजपणे नवनवीन तंत्रज्ञान व हार्डवेअर अपग्रेड करून त्यांचा उपयोग संगणक सिस्टीम मध्ये करू शकतो. नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने सुरक्षा प्रणाली सर्वर च्या मदतीने हाताळली जाते

उदाहरण- Mac OS X, Microsoft Windows Server 2008,Novell NetWare

4. Distributed ऑपरेटिंग सिस्टिम

Distributed ऑपरेटिंग सिस्टिमच्या मध्ये मदरबोर्ड मधील प्रोसेसर च्या मदतीने वेगवेगळा समकालीन डाटा संगणक वापरकर्त्याला उपलब्ध केला जातो. Distributed ऑपरेटिंग सिस्टिम वेगवेगळ्या संगणकांना जोडण्याचे काम करते.

Distributed ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने विविध संगणक, साइट्स आणि nodes एकमेकांना LAN किंवा VAN केबलच्या माध्यमातून जोडलेले असतात. Distributed ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने remote access करणे सोपे झाले आहे.

उदाहरण – Solaris ऑपरेटिंग सिस्टिम, IRIX, LOCUS,MICROS इत्यादि

5. रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम

रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम एक विशेष टाईप ची ऑपरेटिंग सिस्टम आहे. याचा उपयोग वेळेच्या निर्बंधांमध्ये कामांना पूर्ण करण्यासाठी होतो जसे की मिसाईल लॉन्च करण्यासाठी, एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी, रोबोटिक्स मध्ये , इत्यादी.

रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टिम चे तीन प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे –

1. हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम

2. सॉफ्ट रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम

3. फर्म रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टिम

ऑपरेटिंग सिस्टिम कशा प्रकारे काम करते

ऑपरेटिंग सिस्टिम विषयी अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आपल्याला ऑपरेटिंग सिस्टिम कशा प्रकारे काम करते हे माहिती असणे गरजेचे आहे. समजा आपल्याला संगणकाच्या मदतीने गाणी ऐकायचे आहेत तर आपण आपल्या आवडीच्या गाण्यावर डबल क्लिक करतो तेव्हा ऑपरेटिंग सिस्टीम माउस च्या मदतीने इनपुट ग्रहण करेल व आवश्यक असलेल्या हार्डवेअर उपकरण व रिसोर्सेस ला तयार करेल.

म्हणजेच आपण आपल्या आवडीच्या गाण्यावर डबल क्लिक केले तर स्पीकर, वोल्युम बटन, pause बटण तसेच मॉनिटर  आणि इतर उपयुक्त रिसोर्सेस तयार केले जातील व आपण आपल्या आवडीची गाणी ऐकून शकाल. थोडक्यात सांगायचे झाले तर ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर ला manage करून संगणकाला अधिक कार्यक्षम बनवण्यास मदत करते.

ऑपरेटिंग सिस्टिम ची वैशिष्ट्ये

संगणकाच्या प्रोसेसर चे व्यवस्थापन –

संगणकाच्या प्रोसेसर ला multitasking करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम उपयुक्त आहे. ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने संगणकामध्ये विविध प्रोग्रामचे व्यवस्थापन केले जाते.

मेमरी व्यवस्थापन –

ऑपरेटिंग सिस्टिम संगणकाच्या प्राथमिक मेमरी( RAM आणि ROM) चे व्यवस्थापन करते. ऑपरेटिंग सिस्टिम संगणकामध्ये विविध कार्य करण्यासाठी मेमरी allocate करते व कार्य पूर्ण झाल्यानंतर संबंधित मेमरी deallocate करते .

सुरक्षितता –

ऑपरेटिंग सिस्टिम विविध प्रकारच्या पासवर्डच्या सहाय्याने संगणक वापरकर्त्याचा डेटा सुरक्षित ठेवते ज्यामुळे संवेदनशील डेटाचे कॉम्प्युटर वायरस आणि  हॅकर्स पासून संरक्षण केले जाते.

Error चा शोध –

संगणकामध्ये ऑपरेटिंग सिस्टिम सतत error चा शोध घेत असते व संबंधित एरर शोधून त्यावर उपयुक्त उपाय प्रदान करत असते त्यामुळे संगणकाची कार्यप्रणाली सुरळीत राहते.

सॉफ्टवेअर आणि संगणक वापरकर्त्या मध्ये समन्वय-

सॉफ्टवेअर आणि संगणक वापरकर्त्या मध्ये समन्वय साधण्याचे कार्य ऑपरेटिंग सिस्टिम करत असते. ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने संगणक हा संगणक वापरकर्त्याच्या मदतीने चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो.

फाइल्स चे व्यवस्थापन –

ऑपरेटिंग सिस्टिम संगणकामध्ये उपलब्ध असलेल्या विविध फाइल्स ची नोंदणी ठेवतो त्यामुळे संगणक उपभोक्ताला संगणकामध्ये उपस्थित विविध फाइल्स माहिती घेणे सोपे होते. 

ऑपरेटिंग सिस्टिम चा उपयोग

• इनपुट आणि आऊटपुट ऑपरेशन चे व्यवस्थापन

• प्राथमिक मेमरीच्या व्यवस्थापनात उपयोग

• संगणकाला सुरक्षित बनवते

• फाईल सिस्टिम उपयोगासाठी उपयुक्त

• संगणकाला अधिक कार्यक्षम बनवते

• संगणकाची हार्ड डिस्क आणि फाईल सिस्टीम च्या उपयोगासाठी परवानगी देते

• संगणकाचे विविध प्रोग्राम execute करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिम मदत करते

• multitasking करण्यासाठी उपयुक्त

• संगणकामधील एरर शोधते व त्यावर उपायोजना प्रदान करण्याचे काम ऑपरेटिंग सिस्टिम करते.

• ऑपरेटिंग सिस्टिम संगणकामधील विविध रिसोर्स चे व्यवस्थापन करते व त्याची सुरक्षा करते.

काही प्रचलित ऑपरेटिंग सिस्टिम ची उदाहरणे 

संगणक मोबाईल तसेच लॅपटॉप मध्ये ऑपरेटिंग सिस्टिमचा उपयोग केलेला असतो त्यामुळे आपण विविध ऑपरेटिंग सिस्टिम ची नावे ऐकलेली असतात त्यामधील काही प्रचलित संगणकामधील ऑपरेटिंग सिस्टिम ची नावे पुढील प्रमाणे –

विंडोज ऑपरेटिंग सिस्टिम

MacOS

Chrome OS

Unix 

Linux

संगणका प्रमाणेच मोबाईल मध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा उपयोग होतो ज्यामध्ये अँड्रॉइड आणि iOS ऑपरेटिंग सिस्टिम प्रचलित आहे.

ऑपरेटिंग सिस्टिम चे नाव मार्केट शेअर
अँड्रॉइड 39.47%
विंडोज 32.06%
iOS 17.59
OS X 6.73%
अज्ञात 1.71%
Chrome OS 1.09%

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

ऑपरेटिंग सिस्टिम ची व्याख्या

उत्तर – ऑपरेटिंग सिस्टिम एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे ज्याचा उपयोग विविध संगणकीय उपकरणांचे व्यवस्थापन करण्यासाठी होतो. ऑपरेटिंग सिस्टिम युजर आणि संगणकीय उपकरणांमध्ये मध्यस्थाची भूमिका पार पाडते.

संगणकामध्ये उपस्थित असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध कसा घ्यायचा ?

उत्तर – आपण संगणकाच्या स्टार्ट बटन वर संगणकाच्या सेटिंग मध्ये उपस्थित असलेल्या device specifications ऑप्शन द्वारे संगणकामध्ये उपस्थित असलेल्या ऑपरेटिंग सिस्टिम चा शोध घेऊ शकतो.

जगातील पहिली ऑपरेटिंग सिस्टिम कोणती आहे आणि त्याचा शोध कोणी लावला?

उत्तर – जगातील पहिल्या ऑपरेटिंग सिस्टिम चे नाव GM-NAA I/O आहे व या ऑपरेटिंग सिस्टिमचा शोध जनरल मोटर द्वारे 1956 साली लागला. हि ऑपरेटिंग सिस्टिम जनरल मोटर्सने आयबीएम कंपनी साठी निर्माण केली.

संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा जनक कोण आहे?

उत्तर – संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा जनक Gary Kildall आहे.

ऑपरेटिंग सिस्टीमला सिस्टिम सॉफ्टवेअर असे का म्हटले जाते?

उत्तर – सिस्टिम सॉफ्टवेअर हे विविध हार्डवेअर उपकरण आणि संगणक यूजर च्या दरम्यान समन्वय साधण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टिम देखील संगणकीय उपकरणांमध्ये व यूजर मध्ये ताळमेळ बसविण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीमला सिस्टिम सॉफ्टवेअर असेदेखील म्हटले जाते.

 आज आपण काय शिकलो?

ऑपरेटिंग सिस्टिम हे एक सॉफ्टवेअर आहे ज्याच्या मदतीने विविध संगणकीय उपकरणांमध्ये व युजर मध्ये समन्वय साधला जातो त्यामुळेच ऑपरेटिंग सिस्टिम संगणक, लॅपटॉप, टॅबलेटझ मोबाईल तसेच इतर संगणकीय उपकरणांमध्ये उपस्थित असते त्यामुळे आजच्या ऑपरेटिंग सिस्टीम विषयाच्या लेखाद्वारे आपण जाणून घेतले की operating system म्हणजे काय. What is operating system in marathi.

मला आशा आहे तुम्हाला हा ऑपरेटिंग सिस्टिम विषयी माहिती चा हा लेख नक्कीच आवडला असेल तर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख शेअर करा व या लेखात काही त्रुटी आढळल्या असतील तर जरूर कमेंट करा.

तुमचा दिवस शुभ असो ! धन्यवाद….

Advertisements

Leave a Comment