Advertisements

संगणकाच्या माऊस बद्दल माहिती | information about computer mouse in Marathi

Advertisements

आपल्यापैकी जवळपास सर्व जणांनी संगणक बघितलेला असेल व संगणकामधील एक महत्त्वाचे संगणकाचे भाग आहे संगणकाचा माऊस ! संगणकाच्या माऊस शिवाय संगणकाचा विचार करणे खूपच कठीण आहे. माउस च्या मदतीने संगणकामधील खूप महत्त्वाचे कार्य पार पाडले जातात.

 संगणकाचा माऊस हा कीबोर्ड प्रमाणे संगणकाचे महत्त्वाचे हार्डवेअर इनपुट उपकरण आहे. संगणकाचा माऊस च्या मदतीने संगणकामधील कर्सर ची हालचाल केली जाते तसेच कॉपी-पेस्ट फाईलचे नाव बदलणे या कार्यातही माऊसची मदत होते.

संगणकाच्या माउस बद्दल माहिती मिळवणे आपल्याला खूपच गरजेचे आहे कारण आपण जेव्हा संगणकाची स्क्रीन / मॉनिटर control करत असतो तेव्हा संगणकाच्या स्क्रीन वरील गती विधी साठी माऊस ची अत्यंत जास्त गरज पडते.

Advertisements
Table of content ↕

संगणकाच्या माउस बद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेताना आपण या लेखात जाणून घेऊ संगणकाच्या माउस बद्दल माहिती तसेच संगणकाच्या माऊस चे कार्य, संगणकाच्या माऊस चे भाग, संगणकाचा माऊस कसे काम करतो त्याचप्रमाणे आपण संगणकाच्या माऊसचे अत्याधुनिक प्रकार देखील माहिती करून घेऊ.

 संगणकाच्या माउस बद्दल माहिती

संगणकाच्या माउस बद्दल माहिती

 संगणकाचा माऊस हे हाताने उपयोगात येणारे छोटे Hardware इनपुट उपकरण आहे. संगणकाचा माऊस च्या मदतीने screen वरील हालचाल नियंत्रित केली जाते.ज्या दिशेने संगणकाच्या माऊसची हालचाल केली जाते अगदी त्याच दिशेने संगणकाच्या मॉनिटर वर कर्सर ची हालचाल होत असते त्यामुळे संगणकाच्या graphics user interface वरती नियंत्रण केले जाते.

 वेगवेगळ्या प्रकारचे माऊस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते परंतु बहुतेक वेळा माऊस वर तीन बटणे असतात ज्यामध्ये एक डावे व एक उजवे बटन व एक scroll wheel चा समावेश होतो.

 संगणकाचा माऊस हे संगणकाचे छोटे हार्डवेअर इनपुट उपकरण आहे. Desktop संगणकामध्ये संगणकाचा माऊस सपाट पृष्ठभागावर ठेवून उपयोगात आणला जातो. संगणकाच्या माऊस च्या मदतीने drap and drop, select,point, scroll इत्यादी कार्य पूर्ण केले जातात. संगणकाच्या माऊस वर उपस्थित बटनांचा वेगवेगळ्या कार्यासाठी उपयोग होतो. संगणकाच्या माउसच्या मदतीने विविध फाइल्स हार्ड डिस्क मध्ये साठविण्यास मदत होते.

 संगणकाच्या माऊसची व्याख्या

 संगणकाचा माऊस हे हाताने उपयोगात येणारे संगणकाचे pointing उपकरण आहे ज्याच्या मदतीने surface वर होणाऱ्या 2d हालचालींवर नियंत्रण ठेवून संगणकाच्या screen वर कर्सर ची हालचाल केली जाते व त्यामुळे संगणकाच्या graphics user interface वर नियंत्रण ठेवणे सोपे जाते.

जर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर संगणकाचा माऊस हा मानवा द्वारे माऊस च्या मदतीने पृष्ठभागावर होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याद्वारे संगणकाच्या कर्सर ची हालचाल घडवून आणतो व यासाठी त्याला संगणकाचा सी.पी.यू. ची मदत होते.

 संगणकाचा माऊस चा फुल फॉर्म 

 काय आपल्याला माहित आहे का संगणकाच्या माउसचा एक फुल फॉर्म देखील आहे व तो अशाप्रकारे आहे Manually Operated User Selection Equipment. याचा मराठीत अर्थ सांगायचा झाला तर तो अशा प्रकारे होईल की बिना मशीनच्या सहाय्याने उपभोक्त्या द्वारे उपयोगात येणारे निर्देश येणारे उपकरण.

  संगणकाच्या माऊस चा शोध कोणी लावला?

 संगणकाच्या माऊसचा शोध 1960 च्या दरम्यान Stanford Research Institute मधील तंत्रज्ञ् Douglas Engelbart यांच्याद्वारे  केला गेला यासाठी त्यांची bill english या तंत्रज्ञाने मदत केली.

 संगणकाच्या माऊसचा शोध जरी 1960 च्या दरम्यान  लागला असला तरी त्याचे Patent 17 नोव्हेंबर 1970 सालि केले गेले.

 संगणकाच्या माऊस चा इतिहास

कोणत्या गोष्टीची पूर्ण माहिती मिळण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीचा इतिहास माहिती असणे अत्यंत गरजेचे असते. जेवढे रोचक माऊस चे आजचे तंत्रज्ञान आहे त्यापेक्षा जास्त मजेदार हा संगणकाच्या माउस चा इतिहास आहे.

 संगणकाच्या माऊसची शोधाची सुरुवात 1960 साली Douglas Engelbart यांच्याद्वारे सुरू झाली व संगणकाचा माऊस चा पहिला prototype 1964 साली bill english यांच्याद्वारे केला गेला. या माऊस मध्ये दोन चाकांचा चा perpendicular कोनामध्ये उपयोग केला गेला व त्याच्या वरच्या भागात एक बटन होते. हा माउस फक्त उजवीकडे डावीकडे व पुढेमागे सरळ रेषेत हालचाल करू शकत होता त्यामुळे याला x-y co-ordinate indicator असे देखील म्हटले जाते.

 सन 1968 साली Rainer Mallebrein यांच्याद्वारे चालवण्यात येणारी जर्मन कंपनी Telefunken द्वारे माउस मधील दोन्ही चाकांना वगळून त्याऐवजी रोलिंग बॉल्स चा वापर केला गेला व त्या माऊसला Rollkugel असे म्हटले गेले. Telefunken कंपनीद्वारे या शोधा वर जास्त लक्ष केंद्रित केले केले नाही व त्यांनी याला निरुपयोगी अविष्कार समजून याचा पेटंट देखील register केला नाही परंतु आता याच तंत्रज्ञानाचा जास्त उपयोग केला जात आहे .

 1972 साली Billie English यांनी xerox PARC मध्ये काम करताना Douglas Engelbart यांच्या माउस मध्ये महत्त्वाचे बदल केले. त्यांनी दोन्ही चाकांऐवजी rolling ball चा उपयोग केला. त्याचबरोबर त्यांनी x आणि y coordinate ओळखण्यासाठी infrared light आणि सेन्सर चा देखील उपयोग केला. या माउसची अतिरिक्त बाब म्हणजे यामध्ये 9 pin connector चा उपयोग करून संगणकाला सिग्नल पाठवण्याची सुविधा करून देण्यात आली.

Mause मधील रोलिंग ball मध्ये धूळ जमा होऊन माउस चे कार्य प्रभावित होत होते त्यामुळे या समस्येवर समाधान म्हणुन सन 1988 मध्ये झेरॉक्स या कंपनीमध्ये Lisa M. Williams आणि Robert S. Cherry या तंत्रज्ञांनी optical mouse चा शोध लावला. या माऊस मध्ये rolling ball ला पूर्णपणे वगळून त्याऐवजी लाईट च्या स्त्रोताचा उपयोग केला. गेला. हे तंत्रज्ञान त्याकाळी जास्त प्रसिद्ध झाले नाही कारण यासाठी वेगळ्या माऊस पॅड ची गरज लागत होती

 सण 1990 मध्ये असा माऊस निर्माण करण्यात आला ज्याच्यासाठी वेगळा माऊस पॅडची गरज लागणार नाही व तो surface tolerant देखील होता.

 मोठ्या प्रमाणावर बदलत्या तंत्रज्ञानामध्ये वायरलेस माऊसचा देखील अविष्कार झाला हा अविष्कार 1984 च्या सुमारास झाला च्या मध्ये सिग्नल पाठवण्यासाठी infrared signal चा उपयोग केला केला. आजच्या काळात या प्रकारच्या माउस मध्ये सिग्नल पाठवण्यासाठी radio सिग्नल प्रणालीचा उपयोग केला जातो यामध्ये वाय-फाय किंवा ब्लूटूथ च्या सहाय्याने सिग्नल पाठवले जातात.

संगनकाच्या माऊसचे प्रकार

 काळानुसार तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात बदलत आहे व त्याचा परिणाम माऊस वर देखील झाला आहे. माऊसच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल घडला आहे व आजच्या अत्याधुनिक काळात माऊस चे वेगवेगळे प्रकार बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्या गरजेच्या दृष्टीने सर्वोत्तम माउस खरेदी करण्यासाठी आपल्याला संगणकाच्या माऊसचे प्रकार माहीत असणे गरजेचे आहेत.

 मेकॅनिकल माऊस ची माहिती

 मेकॅनिकल माऊस ला ball माउस देखील म्हटले जाते कारण या प्रकारच्या माउस मध्ये धातूच्या किंवा रबराच्या बॉल चा समावेश असतो.

मेकॅनिकल माऊस ची माहिती



 जेव्हा मेकॅनिकल माउस ची हालचाल होते तेव्हा माउस मधील ball हा roll होतो आणि त्या ball ची हालचाल माउस मधील सेंसर द्वारे catch केली जाते आणि त्याद्वारे संगणकाच्या स्क्रीन वरील कर्सर ची हालचाल केली जाते. आज-काल मेकॅनिकल माऊस ला ऑप्टिकल माऊस ने मोठ्या प्रमाणावर बदललेले आहे .

 ऑप्टिकल माऊस बद्दल माहिती

 आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये ऑप्टिकल माऊस बद्दल माहिती घ्यायची झाली तर या माउस चा उपयोग हा सर्वात जास्त होत असतो. या प्रकारच्या माऊस मध्ये मुख्यता light source आणि light detector चा उपयोग होतो. ऑप्टिकल माऊस ने मोठ्या प्रमाणावर मेकॅनिकल माऊस ची जागा घेतली आहे.

ऑप्टिकल माऊस बद्दल माहिती



 जर ऑप्टिकल माऊस च्या आताच्या परिस्थितीविषयी माहिती सांगायची झाली तर आज काल optoelectronic सेंसर च्या मदतीने ऑप्टिकल माऊस कार्य करतो व हा माउस कोणत्याही पृष्ठभागावर कार्य करू शकतो.

 वायरलेस माऊस विषयी माहिती

 वायरलेस माऊस ला संगणकाशी जोडण्यासाठी कोणत्याही वायरची गरज लागत नाही त्यामुळे वायरलेस माऊस लाच cordless माउस देखील संबोधले जाते. वायरलेस माऊस हा radio सिग्नल द्वारे संगणकाशी जोडला जातो.

वायरलेस माऊस विषयी माहिती



 वायरलेस माऊस हा वाय-फाय, ब्लूटूथ, इन्फ्रारेड तरंग तसेच इत्यादी तंत्रज्ञानाद्वारे संगणकाशी जोडला जातो. बहुतेकदा संगणकामध्ये usb चा receiver म्हणून उपयोग करून वायरलेस माऊस हा संगणकाशी जोडला जातो.

 ट्रॅक बॉल माऊस विषयी माहिती

 ट्रॅक बॉल माऊस हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे ज्यामध्ये सॉकेट मध्ये बॉल चा उपयोग करून सेंसर द्वारे बॉल च्या हालचालिंचे रूपांतर सिग्नल मध्ये करून हे सिग्नल संगणकाकडे पाठवले जातात.

ट्रॅक बॉल माउस विषयी माहिती


 ट्रॅक बॉल मध्ये एक किंवा दोन बटनांचा समावेश होतो तसेच ट्रॅक बोल हे एकाच जागेवर राहत असल्यामुळे इतर माऊस प्रमाणे यामध्ये जास्त जागा लागत नाही तसेच या mouse मध्ये movement करताना जास्त efforts घ्यावे लागत नाहीत.

 वायर माऊस विषयी माहिती

 वायर माऊस हे वायर द्वारे संगणकास डायरेक्ट जोडले गेलेले असतात. या प्रकारच्या माऊस मध्ये मुख्यतः usb port द्वारे माहिती संगणकाला पाठवली जाते. आजकाल सर्वत्र या माऊसचा जास्त उपयोग होतो.

वायर माउस विषयी माहिती


 वायर माऊस चे खूप सारे फायदे आहेत जसे की जलद response time, केबलद्वारे डेटा transmission, इतर माउस च्या तुलनेत जास्त अचूकता, इत्यादी.

 लेझर माउस विषयी माहिती

 लेझर माऊस हा ऑप्टिकल माऊस चा एक प्रकार आहे. या प्रकारच्या माउस मध्ये लेझर लाईट च्या साह्याने माउस ची हालचाल जाणून घेतली जाते. हा माऊस led ऑप्टिकल माऊस पेक्षा जास्त अचूक असतो.

लेझर माउस विषयी माहिती


 इतर ऑप्टिकल माऊस प्रमाणे या माऊस मध्ये कोणताही moving part नसतो. या माऊस मधील जास्त sensitivity आणि अचूकता या माऊसला विशेष बनवतात.

 माऊस कनेक्टर चे प्रकार

 वेगवेगळ्या प्रकारचे माऊस वेगवेगळ्या प्रकारच्या कनेक्टर ने संगणकाशी जोडलेले असतात. आपण जेव्हा माऊस विषयी माहिती घेत असतो तेव्हा आपल्याला माऊस कनेक्टर चा प्रकार माहीत असणे कारण माऊस कनेक्टर नुसारच माऊस कडून संगणकाला पाठवल्या जाणाऱ्या सिग्नल ची गती निर्धारित होत असते.

 माऊस कनेक्ट अनुसार माऊस चे पाच प्रकार असतात जे आहेत –

 बस माउस ( BUS mouse )

 जेव्हा पहिल्या माउस ची निर्मिती करण्यात आली तेव्हा तो माउस BUS च्या सहाय्याने संगणकाशी जोडला गेला त्यामुळेच या माऊसला बस माऊस म्हटले जाते. हा माऊस सर्वप्रथम IBM च्या वैयक्तिक संगणकामध्ये उपयोगात आणला गेला.

बस माउस ची माहिती


 या प्रकारचा माउस मदरबोर्ड मधील special add in card च्या साहाय्याने specialized BUS च्या मदतीने संगणकाशी जोडला जातो.

 सिरीयल माऊस (serial mouse)

 सिरीयल माउस हा सिरीयल port च्या सहाय्याने संगणकाशी जोडला जातो. या port च्या साहाय्याने bit by bit माहिती संगणकातुन प्रसारित केली जाते.


सिरीयल माऊस



 सिरीयल पोर्ट हा मदरबोर्ड च्या मागच्या बाजूला D-type 9 pin male port (DB9M) च्या रूपात उपस्थित असतो. या कनेक्टर ला जोडला जाणारा कनेक्टर female कनेक्टर असणे गरजेचे असते.

PS/2 माउस विषयी माहिती 

 PS/2 माऊस हा PS/2 कनेक्टर च्या साहाय्याने संगणकाशी जोडलेला असतो. हा कनेक्टर 6-pin mini-din कनेक्टर असून याचे निर्माण 1987 साली करण्यात आले.

PS/2 माउस


PS/2 कनेक्टर हे नाव IBM’s personal systems/2 वरून या कनेक्टर ला देण्यात आलेले आहेत. अधिक तर या माऊस कनेक्टर चा रंग हा हिरवा असतो.

 यूएसबी माऊस कनेक्टर (USB माउस)

 यूएसबी माऊस हा दिसायला बाकी माऊस सारखाच असतो परंतु हा माऊस यूएसबी port द्वारे संगणकाशी जोडला गेलेला असतो. यूएसबी कनेक्टर द्वारे इतर उपकरण जसे की कीबोर्ड देखील संगणकाचे जोडला जाऊ शकतो.

यूएसबी कनेक्टर


यूएसबी कंनेक्टर च्या माध्यमातून वायर माऊस तसेच वायरलेस माउस देखील संगणकाशी जोडला जाऊ शकतो. यूएसबी माऊस आजच्या काळात प्रचलित आहेत.

 वायरलेस माऊस कनेक्टर

 वायरलेस माऊस हे रेडीओ तरंगाच्या माध्यमातून संगणकाशी जोडले गेलेले असतात. वायरलेस माऊस मुख्यता वाय-फाय ब्लूटूथ किंवा यूएसबी च्या माध्यमातून संगणकाशी जोडलेले असतात.

वायरलेस माऊस कनेक्टर


 वायरलेस माऊस हे माउस मधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे यामध्ये माऊसला संगणकाशी आहे जोडण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वायरची गरज लागत नाही. हे माउस वापरण्यात जास्त clean असतात.

 माउस कसे कार्य करतो?

 वेगवेगळ्या प्रकारचे माउस वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करतात. माउस मधील तंत्रज्ञानानुसार माऊस चे कार्य करण्याची पद्धती वेगवेगळी असते. काही महत्त्वपूर्ण माउस ची कार्यपद्धती पुढील प्रमाणे —

 मेकॅनिकल माऊस ( बॉल माऊस ) कसे काम करतो

 जेव्हा आपण मेकॅनिकल माऊस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतो म्हणजेच त्याची movement करतो तेव्हा माउस मधील उपस्थित रबर बॉल देखील roll होतो आणि बॉल ला जोडलेले दोन चाके देखील move करतात आणि त्या movement चे रूपांतर X आणि Y कॉर्डिनेट मध्ये होते.

LED हि slits च्या माध्यमातून लाईट प्रसारित करते आणि transducer लाईट चे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये करतात व हे सिग्नल संगणकाकडे पाठवले जातात. जेव्हा माऊस वरील बटन क्लिक केले जाते तेव्हा अतिरिक्त माहिती संगणकाकडे पाठवली जाते.

मेकॅनिकल माऊस कसे काम करतो


1. Roller

2. Rubber ball

3. Moving roller

4. Slotted wheel

5. LED

6. Cable coupling

7. Plastic housing

8. Cable

 कोणत्याही माउस चे मुख्य उद्दिष्ट हे असते की हाताच्या माध्यमातून माऊसची होणारी हालचाल ध्यानात घेऊन संगणकाकडे सिग्नल पाठवणे.

 ऑप्टिकल माऊस कसे काम करतो

 ऑप्टिकल माउस चे कार्य करण्याचे principle जरी मेकॅनिकल माऊस प्रमाणे असले तरी ऑप्टिकल माऊस ची कार्यपद्धती खूपच भिन्न आहे.

 ऑप्टिकल माउस विषयी विचार केला तर हा एक लहान कॅमेरा आहे जो प्रत्येक सेकंदाला 1500 फोटो click करत असतो. व या फोटोची संख्या मोजण्यासाठी छोट्या bouncing light ची मदत घेतली जाते.

 जेव्हा फोटो क्लिक केले जातात तेव्हा चे फोटो digital signal processor (DSP) कडे पाठवले जातात. DSP फोटोमध्ये तुलना करतो आणि माऊसच्या स्पीड आणि जागेची माहिती coordinates च्या रूपात संगणकाकडे पाठवतो.

 .त्यामुळेच ऑप्टिकल माऊस मध्ये माऊसची स्थिती जाणून घेण्यासाठी कॅमेरा तंत्रज्ञान आणि डिजिटल प्रोसेस तंत्रज्ञानाचा उपयोग होतो.

 वायरलेस माऊस कसे काम करतो

 ज्या प्रकारे वायर माउस मध्ये वायर च्या मदतीने माऊसची माहिती संगणकाकडे पाठवले जाते, त्याच प्रमाणे वायरलेस माऊस मध्ये रेडिओ सिग्नलच्या माध्यमातून data transmission ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

 रेडिओचा रंगांच्या माध्यमातून माहिती प्रसारित करण्यासाठी मुख्यतः दोन उपकरणांची गरज लागते जे आहेत transmitter आणि receiver.

Transmitter चा उपयोग माऊस मध्ये केला जातो आणि त्याच्या मदतीने माउसची हालचाल, क्लिक केलेले बटन यांची माहिती encode करून रेडीओ तरंगाच्या माध्यमातून संगणकाकडे पाठवली जाते.

Receiver चा उपयोग संगणकामध्ये केला जातो आणि तो transmitter कडून मिळालेल्या माहितीचे decode करून ती माहिती संगणकाच्या सीपीयू कडे पाठवतो.

ट्रॅकबॉल माउस कसे काम करतो

ट्रॅकबॉल माउस हा संगणकाचा स्पेशल प्रकारचा माउस आहे. त्यामध्ये प्लॅस्टिक case च्या वरच्या भागात बॉल चा उपयोग केलेला असतो व जेव्हा या बॉल ची हालचाल होते तेव्हा ती हालचाल संगणकाकडून केंद्रित करून त्या रूपात cursor ची हालचाल केली जाते .

या प्रकारच्या माऊस मध्ये प्लॅस्टिकची case स्थिर असते व ball ची अंगठ्याच्या किंवा बोटांच्या सहाय्याने movement केली जाते. हि बॉल ची हालचाल sensor द्वारे मोजली जाते व संगणकाकडे पाठवली जाते व त्यानुसार संगणकामधील कर्सर ची हालचाल होते.

 माऊसच्या कर्सर विषयी माहिती

 संगणकाच्या user interface मध्ये कर्सर हे एक indicator आहे ज्याचा उपयोग मॉनिटर मध्ये position दर्शवण्यासाठी होतो. माऊसच्या कर्सर ला पॉइंटर देखील म्हटले जाते.

माउस कर्सर चे प्रकार


 माऊसच्या कर्सर चे प्रकार 

Cursor च्या उपयोगानुसार कर्सर चे बारा प्रकार पडतात. माऊसचा कर्सर च्या प्रत्येक प्रकाराचे वेगवेगळे वैशिष्ट आहे. माउस कर्सर चे बारा प्रकार पुढीलप्रमाणे-

• टेक्स्ट पॉइंटर

• Busy Pointer 

• Move Pointer

• Standard Pointer 

• Link Pointer

• Help pointer

• Precision Pointer

• Diagonal resize

• Vertical resize

• Background busy pointer

• Horizontal resize

• Unavailable Pointer 

माऊस चे कार्य › Function of mouse in Marathi

संगणकाचा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी आपण माऊसच्या उपयोग करतो व माउस द्वारे संगणकाच्या मॉनिटर वर वेगवेगळी कार्य पूर्णत्वास नेली जातात त्यामधील काही महत्त्वाची कार्ये पुढीलप्रमाणे –

 प्रोग्रॅम उघडणे किंवा रन करणे –

 जेव्हा आपण माऊसचा पॉइंटर एखाद्या आयकॉन, फोल्डर किंवा object वर नेतो व क्लिक किंवा डबल क्लिक करतो तेव्हा संबंधित प्रोग्रॅम उघडला किंवा रन केला जातो.

 माउस कर्सर ची हालचाल करणे –

 माऊस चा मुख्य उपयोग मॉनिटरवर माउस कर्सर ची हालचाल करण्यासाठी होतो.

 सिलेक्ट –

 माउस च्या मदतीने टेस्ट सिलेक्ट केला जातो, त्याच प्रमाणे विविध फाईल, फोल्डर एकाच वेळेस सिलेक्ट करणे सोपे होते.

 होवर-

 जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट ऑब्जेक्ट वर माऊस कर्सर नेतो व कोणत्याही प्रकारे क्लिक करत नाही तरीदेखील मॉनिटर वर काही विशिष्ट क्रिया पार पडतात अशा विशिष्ट क्रियेला होवर असे म्हणतात.

 ड्रॅग आणि ड्रॉप –

जेव्हा आपण संगणकामध्ये काही सिलेक्ट करत असतो तेव्हा आपण ड्रॅग आणि ड्रॉप च्या साह्याने त्याची हालचाल करू शकतो.

Scroll –

 जेव्हा आपण एखादी वेबसाइट किंवा एखादे डॉक्युमेंट बघत असतो तेव्हा आपल्याला स्क्रोल करण्याची गरज असते व अशा स्थितीत आपण माऊसच्या मदतीने स्क्रोल करू शकतो.

 सर्वोत्तम माऊस निर्माता कंपनी

 माऊस च्या तंत्रज्ञानामध्ये काळानुसार मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे, त्यामुळेच माउस निर्माण करणाऱ्या कंपनीमध्ये पण मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेमधून काही कंपन्यांनी माउस च्या दुनियेत वर्चस्व निर्माण केले आहेत त्या सर्वोत्तम दहा कंपन्या पुढीलप्रमाणे –

• logitech

• steelseries

• roccat

• razer

• asus

• hyperx

• corsair

• vaxee

• benq

• glorious

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न

माऊस च्या निर्मिती साठी कोणते मटेरियल वापरले जाते?

उत्तर -प्लास्टिक acrylonitrile butadiene styrene (ABS) प्लास्टिक पासून माऊसचे बाह्य आवरण तसेच व्हील आणि शाफ्ट बनवले जातात. माउस मधील बॉल धातूचा बनलेला असतो व त्याला रबराची कोटिंग केलेली असते.

एअर माऊस म्हणजे काय?

उत्तर – जेव्हा संगणकाचा माऊस मोशन सेन्सर तंत्रज्ञानाच्या मदतीने माउस कर्सर नियंत्रित करत असतो तेव्हा त्या माऊसला एअर माऊस असे म्हटले जाते. एअर माऊस च्या उपयोगासाठी डेस्क ची गरज लागत नाही.

 माऊस चा जनक कोण आहे ?

उत्तर – Douglas Engelbart यांना माऊस चा जनक म्हटले जाते.

माऊस पॉइंटर म्हणजे काय ?

उत्तर – माऊस पॉइंटर ला माउस कर्सर किंवा माउस Arrow असे देखील म्हटले जाते. माऊस पॉइंटर हे एक ग्राफिक इमेज आहे ज्याचा उपयोग ग्राफिक युजर इंटरफेस मध्ये विविध element कंट्रोल करण्यासाठी होतो. 

आज आपण काय शिकलो > सारांश

माऊस संगणकाचा उपयुक्त हार्डवेअर भाग आहे. माऊस च्या मदतीने कर्सर चे हालचाल केली जाते व संगणकावर विविध प्रोग्राम सॉफ्टवेअर चालवले जातात. बदलत्या तंत्रज्ञानानुसार माऊस चे वेगवेगळे प्रकार देखील आहेत.

 माऊस चे मुख्य तीन भाग असतात ज्यामध्ये दोन बटने आणि एका व्हिल समावेश होतो. या दोन बटनांची वेगवेगळी कार्य आहे व व्हिल चे वेगळे कार्य आहे. माऊस शिवाय संगणकाची कल्पना करणे अकल्पनीय आहे.

 आज आपण माऊस विषयी महत्त्वाची माहिती जाणून घेतली त्यामुळे तुम्हाला संगणकाच्या माऊस बद्दल माहिती > information about computer mouse in Marathi हा लेख कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा तसेच या लेखाबद्दल तुमच्या मनात काही शंका किंवा काही त्रुटी असतील तर तुम्ही आम्हाला contact us पेज वर संपर्क करू शकता.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….






Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *