Affiliate marketing म्हणजे काय | अफिलिएट मार्केटींग कशी करायची

Advertisements

 जेव्हा आपल्याला ऑनलाईन पैसे कमवायचे असतात तेव्हा आपल्या पुढे येणारा महत्त्वाचा विकल्प म्हणजे अफिलिएट मार्केटिंग त्यामुळे आपल्याला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ( What is affiliate marketing in Marathi ) हे माहीत असणे गरजेचे आहे.

जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटवर visit करतो तेव्हा कधी कधी त्या वेबसाईटवर काही प्रॉडक्ट लिंक दिलेल्या असतात व आपण त्या लिंक वर क्लिक केले तर आपण दुसऱ्या वेबसाईट वर जातो व तेथून तो प्रॉडक्ट खरेदी करू शकतो. या सर्व प्रोसेसमध्ये वेबसाईटच्या मालकाला त्याने लावलेल्या अफिलिएट लिंक च्या माध्यमातून सेल झाला तर पैसे मिळत असतात.

अफिलिएट मार्केटिंगचा उपयोग आपण आपल्या व्यवसायामध्ये करून सेल वाढवू शकतो तसेच दुसऱ्या कंपन्यांचे अफिलिएट प्रॉडक्ट विकून त्याद्वारे मिळणाऱ्या कमिशन द्वारे ऑनलाईन पैसे कमवू शकतो.

अनुक्रमणिका ↕

अफिलिएट मार्केटिंग मधील संधी वेगाने वाढत आहेत त्यामुळेच चला तर मग जाणून घेऊया अफिलिएट मार्केटिंग विषयी माहिती.

अफिलिएट मार्केटिंग कशी करायची

 अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ( What is affiliate marketing in Marathi)

अफिलिएट मार्केटिंग हे एक जाहिरातीचे माध्यम आहे ज्यामध्ये कोणताही व्यक्ती, दुसऱ्या व्यक्ती किंवा कंपनीचे प्रॉडक्ट किंवा सेवा विकून त्याद्वारे पैसे कमवू शकतात.अफिलिएट मार्केटिंग हा डिजिटल मार्केटिंग चा प्रकार आहे ज्या मध्ये वेगवेगळ्या श्रेणीतील प्रॉडक्ट नुसार वेगवेगळे अफिलिएट कमिशन निर्धारित केलेले असते.

अफिलिएट मार्केटिंग ची संकल्पना ॲमेझॉन मुळे अधिक लोकप्रिय झाली ज्यामध्ये ब्लॉगर आपल्या वेबसाईटवर ॲमेझॉन वरील प्रॉडक्ट ची लिंक टाकतात. ही लिंक चित्र, अक्षरे किंवा चित्र आणि अक्षरे यांचा संगम च्या स्वरूपात असते व जेव्हा ब्लॉगरच्या वेबसाईटवरील विजिटर त्या अमेझॉन प्रॉडक्ट लिंकवर क्लिक करून काही प्रॉडक्ट खरेदी करतात तेव्हा संबंधित ब्लॉगर ला ॲमेझॉन कडून कमिशन मिळते.

जर आपल्या वेबसाईटवर चांगले ट्राफिक येत असेल तरच आपल्याला affiliate marketing चा चांगला फायदा होऊ शकतो, म्हणजेच जर आपल्याला आपल्या ब्लॉगवर अफिलिएट मार्केटिंग सुरू करायचे असेल तर आपल्या ब्लॉग वर 5000 विजिटर प्रत्येक दिवशी आले पाहिजेत.

अफिलिएट मार्केटिंग हि डिजिटल दुनियेतील अब्जावधी डॉलरची इंडस्ट्री बनली आहे ज्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग कंपन्या इंटरनल analytics च्या माध्यमातून वेबसाईटवर येणाऱ्या ट्राफिक आणि सेल ला मोजत असतात व अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्या थर्ड पार्टी पब्लिशर ला त्यांच्याद्वारे झालेल्या सेल ची माहिती देत असतात.

अफिलिएट मार्केटिंग चे फायदे 

जर आपल्याला एखादी कंपनी सुरू करायचे असेल किंवा स्टार्टअप सुरु करायचे असेल तर आपल्याला आपल्या प्रॉडक्ट च्या मार्केटिंग वर पैसे खर्च करावे लागतात व येथेच आपण अफिलिएट मार्केटिंग ची मदत घेऊन मार्केटिंग वरील खर्च खूप कमी करू शकतो. अफिलिएट मार्केटिंग मधील कमी खर्च व चांगल्या परिणामामुळे अफिलिएट मार्केटिंग दिवसेंदिवस लोकप्रिय मार्केटिंग टेक्निक बनत चालली आहे.

अफिलिएट मार्केटिंगचे काही फायदे पुढीलप्रमाणे – 

1. जाहिराती वरील खर्चाचा पुरेपूर वापर

अफिलिएट मार्केटिंग ही परिणामावर आधारीत मार्केटिंग टेक्निक आहे, ज्यामध्ये जेव्हा आपण आपल्या कंपनीसाठी अफिलिएट मार्केटिंग करत असतो तेव्हा आपण थर्ड पार्टी पब्लिशर द्वारे आपल्या वेबसाईट वर आलेल्या ट्राफिक किंवा सेल चे पैसे देत असतो. थर्ड पार्टी पब्लिशर द्वारे आपल्या वेबसाईटवर उच्च गुणवत्तेचे ग्राहक येतात त्यामुळे आपल्या वेबसाईट चा नफा वाढण्याची संभावना वाढते.

2. SEO मध्ये फायदा 

जेव्हा आपण आपल्या वेबसाईटवरील सेवा किंवा प्रॉडक्ट अफिलिएट मार्केटिंगसाठी साठी उपलब्ध करत असतो तेव्हा आपल्या वेबसाईटला वेगवेगळ्या ब्लॉग, फोरम तसेच सोशल वेबसाईट पासून लिंक भेटत असतात ज्याचा फायदा आपल्याला वेबसाईटची रँकिंग सुधारण्यासाठी होते.

3. ट्रेकिंग करण्यास सोपे

अफिलिएट मार्केटिंग मध्ये इतर मार्केटिंग पद्धती जसे की ईमेल मार्केटिंग प्रमाणे ट्रेकिंग करणे सोपे असते. अफिलिएट मार्केटिंग मधील ट्रेकिंग मुळे अफिलिएट कंपनी ला थर्ड पार्टी पब्लिशर कडून आलेल्या ट्रॅफिक आणि सेल ची अचूक माहिती मिळते व त्याचप्रमाणे थर्ड पार्टी पब्लिशर ला त्याच्या वेबसाईट वरून पाठवण्यात आलेल्या ट्राफिक व त्यामधून मिळणाऱ्या परिणामांची माहिती मिळत असते.

4. ब्रँड विषयी जागरूकता पसरवण्यास मदत होते

बरेच ऑनलाइन ग्राहक नवीन वेबसाईट किंवा ब्रॅण्ड कडून ऑनलाईन खरेदी करत नाही त्याऐवजी ते त्यांना ओळखीच्या असलेल्या वेबसाईटवरून ऑनलाइन खरेदी करणे पसंत करतात. म्हणूनच, जेव्हा आपण नवीन ब्रँड ची निर्मिती करत असतो तेव्हा लोकांपर्यंत आपल्या ब्रॅण्ड ची जागृतता पसरवण्यासाठी अफिलिएट मार्केटिंग मदत करत असते.

5. जागतिक बाजारपेठेत प्रवेश

जर तुमचे ऑनलाइन प्रॉडक्ट हे चांगले असेल तर तुम्ही ते प्रॉडक्ट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा विकू शकतात व त्यासाठी लागणाऱ्या मार्केटिंग मध्ये अफिलिएट मार्केटिंग तुम्हाला मदत करत असते. आपले प्रॉडक्ट किंवा सेवा जागतिक बाजारपेठेला अनुरूप आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी अफिलिएट मार्केटिंग ची आपल्याला खूप मदत होते.

अफिलिएट मार्केटिंग मधील काही महत्त्वपूर्ण संकल्पना ( affiliate marketing concept in Marathi )

जेव्हा आपण अफिलिएट मार्केटिंग शिकत असतो तेव्हा आपल्याला सुरुवातीला या मधील महत्त्वपूर्ण संकल्पना माहीत नसतात त्यामुळे आपल्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो, म्हणूनच आता आपण अफिलिएट मार्केटिंग मधील काही महत्त्वपूर्ण संकल्पना जाणून घेऊया –

1. Affiliate Marketplace

काही कंपन्या वेगवेगळ्या श्रेणीतील प्रॉडक्ट किंवा सेवा Affiliate मार्केटिंगसाठी उपलब्ध करून देतात त्या कंपन्यांना असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ – ॲमेझॉन अफिलिएट प्रोग्रॅम

2. Affiliates

 Affiliates ही संकल्पना अशा व्यक्तींना उद्देशून वापरली जाते जे अफिलिएट प्रोग्रॅम ला जॉईन करतात व अफिलिएट प्रॉडक्ट त्यांच्या वेबसाईट किंवा अन्य माध्यमांद्वारे promote करतात व त्याद्वारे मिळणाऱ्या कमिशन च्या माध्यमातून पैसे कमवतात.

 3. Affiliate ID

Affiliate ID हा एक युनिक आयडी असतो जो अफिलिएट कंपन्यांद्वारे Affiliates ला साईन अप च्या वेळेस दिला जातो. या आयडी च्या मदतीने Affiliates च्या माध्यमातून झालेल्या सेल ला ट्रेकिंग करणे सोपे होते.

4. Affiliate link

जेव्हा कोणताही व्यक्ती हा अफिलिएट product किंवा सेवेचे प्रमोशन करत असतो तेव्हा त्यासाठी तो Affiliate link ची मदत घेत असतो. Affiliate link च्या मदतीने रेकॉर्ड ठेवणे सोपे होते.

5. Link Clocking

Affiliate link या बऱ्याच वेळा खूप लांब असतात तेव्हा त्यांना लिंक shortner च्या मदतीने बारीक केले जाते या प्रक्रियेला Link Clocking असे म्हटले जाते.

6. Comission

जेव्हा यशस्वी विक्री केल्यानंतर ती विक्री करणाऱ्या व्यक्तीस जेवढे पैसे प्राप्त होतात त्या पैशांना कमिशन असे म्हटले जाते. हे कमिशन प्रत्येक प्रॉडक्ट च्या श्रेणी नुसार आधीच निर्धारित केलेले असते.

7. अफिलिएट मॅनेजर

जेव्हा नवीन अफिलिएट ला अफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करायचा असतो तेव्हा त्याला काही अडचणी येऊ शकतात व या अडचणींचे समाधान देण्यासाठी काही व्यक्ती नियुक्त केलेले असतात त्यांना अफिलिएट मॅनेजर असे संबोधले जाते.

8. Payment Threshold

काही अफिलिएट मार्केटिंग कंपन्यांचे प्रोडक्ट जेव्हा आपण सेल करतो तेव्हा आपल्याला कमिशन मिळते व ह्या कमिशनची रक्कम जोपर्यंत कंपनीने निर्धारित केलेल्या न्यूनतम रकमेपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला पैसे withdraw करता येत नाही ज्याला पेमेंट Threshold असे म्हटले जाते. 

अफिलिएट मार्केटिंग चे प्रकार 

अफिलिएट मार्केटिंग चे तीन मुख्य प्रकार आहेत –

1. Unattached अफिलिएट मार्केटिंग

2. Related अफिलिएट मार्केटिंग

3. Involved अफिलिएट मार्केटिंग

1.Unattached अफिलिएट मार्केटिंग

Unattached अफिलिएट मार्केटिंग म्हणजे आपण अशा अफिलिएट प्रॉडक्ट चे प्रमोशन करत असतो ज्याचा आपल्या niche बरोबर कोणताही संबंध नसतो.unattached अफिलिएट मार्केटिंग मध्ये प्रॉडक्ट ची विश्वासाहर्ता राखण्याची संभावना नसते.

Unattached अफिलिएट मार्केटिंग अशा व्यक्तींना आकर्षक वाटू शकते ज्यांना त्यांच्या कस्टमर बरोबर च्या relation चे कोणतीही देणेघेणे नसते. त्यांना जो प्रोग्रॅम आवडला त्याचे ते प्रमोशन करतात भलेही तो प्रोग्रॅम वाईट का असाना.

2. Related अफिलिएट मार्केटिंग

जेव्हा आपण niche च्या संबंधित असलेल्या अफिलिएट प्रॉडक्टचे प्रमोशन करत असतो पण स्वतः तो प्रॉडक्ट वापरत नसतो तेव्हा त्या प्रकारच्या मार्केटिंगला Related अफिलिएट मार्केटिंग असे म्हटले जाते. 

Related अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण प्रमोशन करत असलेला प्रॉडक्ट आपल्या niche संबंधी आहे म्हणून त्याचे प्रमोशन करत असतो. Related अफिलिएट मार्केटिंग मधील मुख्य आव्हान म्हणजे आपण तो प्रॉडक्ट आधी वापरलेल्या नसतो त्यामुळे तो प्रॉडक्ट चांगला की वाईट हे ठरवणे अवघड होते.

3. Involved अफिलिएट मार्केटिंग

Involved अफिलिएट मार्केटिंग मध्ये आपण फक्त अशाच प्रोडक्शन प्रमोशन करतो यांचा उपयोग आपण केलेला असतो . Involved अफिलिएट मार्केटिंग सत्यता आणि विश्वासाहर्ता वर आधारित असते म्हणून हि अफिलिएट मार्केटिंग मार्केटिंग कस्टमर साठी सर्वोत्तम असते.

Involved अफिलिएट मार्केटिंग मुळे कस्टमरचा आपल्यावर विश्वास वाटतो व त्यामुळे स्थाई बिजनेस बनवण्यास आपणास मदत होते. Involved अफिलिएट मार्केटिंग आपला कस्टमर प्रति प्रामाणिकपणा दर्शवत असते.

अफिलिएट मार्केटिंग कसे काम करते 

जर आपण ऑनलाइन दुनियेत पाऊल ठेवलेले असेल व आपल्याला जाणून घ्यायचे असेल कि अफिलिएट मार्केटिंग काय आहे, अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे तर सर्वात प्रथम आपल्याला अफिलिएट मार्केटिंग ची कार्यप्रणाली माहित असणे गरजेचे असते.

जेव्हा आपण एखाद्या अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम ला जॉईन करतो तेव्हा आपल्याला त्या प्रोग्रामच्या माध्यमातून एक युनिक लिंक मिळते जिल्हा अफिलिएट लिंक असे म्हणतो.

जेव्हा आपण आपल्याला भेटलेल्या युनिक लिंक चे सोशल मीडिया, वेबसाईट तसेच ब्लॉग द्वारे प्रमोशन करतो तेव्हा जर आपण शेअर केलेल्या लिंक वर क्लिक करून एखाद्या व्यक्तीने अफिलिएट मार्केटिंग कंपनीचे प्रोडक्ट खरेदी केले तर तो सेल काउंट केला जातो व अशा प्रत्येक सेल साठी आपल्याला काही पैसे मिळत असतात.

अफिलिएट मार्केटिंग च्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तीन व्यक्ती सहभागी असतात –

1. सेलर –

सेलर म्हणजे अशा व्यक्ती ज्याला आपली सेवा किंवा प्रॉडक्ट ऑनलाईन माध्यमातून विकायचे आहे व त्यासाठी तो थर्ड पार्टी पब्लिशर (अफिलिएट) ला प्रत्येक सेल्स साठी पैसे देत असतो.

2. थर्ड पार्टी पब्लिशर ( अफिलिएट )

जो व्यक्ती सेलर च्या प्रॉडक्ट किंवा सेवेचे प्रमोशन करत असतो व त्याद्वारे सेलर साठी सेल निर्माण करून पैसे कमवत असतो त्याला थर्ड पार्टी पब्लिशर असे म्हटले जाते.

3. ग्राहक (कस्टमर)

जेव्हा थर्ड पार्टी पब्लिशर ने शेयर केलेल्या युनिक लिंक वर क्लिक करून एखादा व्यक्ती सेलर चे प्रॉडक्ट किंवा सेवा खरेदी करत असतो तेव्हा त्याला ग्राहक म्हणतात.

जेव्हा ग्राहक हा सेलर ची सेवा किंवा प्रॉडक्ट खरेदी करतो तेव्हा त्याच्यापासून मिळणाऱ्या पैशातून सेलर आणि थर्ड पार्टी पब्लिशर आपसात पैसे वाटून देत असतात.

अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आपण पुढील उदाहरणाची मदत घेऊया –

जेव्हा एखाद्या व्यक्तीला जमीन विकायची असते तेव्हा तो व्यक्ती त्या जमिनीची माहिती प्रोपर्टी ब्रोकर ला देतो व प्रोपर्टी ब्रोकर या जमिनीसाठी योग्य कस्टमर शोधतो. जेव्हा कस्टमरला जमीन पसंत पडते तेव्हा कस्टमर त्या जमिनीची योग्य रक्कम देऊन जमीन खरेदी करतो, मिळालेल्या पैशातून ब्रोकर आणि ज्याला जमीन विकायची होती तो व्यक्ती आपसात ठरल्याप्रमाणे पैसे वाटून घेतात.

अफिलिएट मार्केटिंग कशी करायची  (Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवायचे)

अफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून चांगले पैसे कमवण्यासाठी आपल्याला अफिलिएट मार्केटिंग करण्याची पद्धत माहीत असणे गरजेचे आहे. अफिलिएट मार्केटिंग कसे काम करते हे माहीत झाल्यानंतर आता आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया अफिलिएट मार्केटिंग चा बिजनेस कसा करायचा.

1. आवश्यक प्लॅटफॉर्म निवडणे

आपल्याला युनिक लिंक चे प्रमोशन लाखो लोकांना करावे लागेल व हे सर्व लोक एकत्र जोडण्यासाठी आपल्याला कोणतातरी एका प्लॅटफॉर्म निवडावा लागेल.

हा प्लॅटफॉर्म सोशल मीडिया जसे की व्हाट्सअप, टेलिग्राम, फेसबूक, इंस्टाग्राम असू शकतो. त्याच प्रमाणे अफिलिएट मार्केटिंग साठी सर्वात जुनी पद्धत म्हणजे वेबसाईट किंवा ब्लॉग चे निर्माण करून त्यावर अफिलिएट मार्केटिंग product चे प्रमोशन करणे.

2. Niche निवडणे व माहितीचे निर्माण करणे.

प्लॅटफॉर्म निवडल्यानंतर आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर इमेज, व्हिडिओ किंवा लेख च्या स्वरूपात उपयुक्त कंटेंट टाकावा लागेल व त्यासाठी तुम्हाला एक niche निवडावी लागेल. niche म्हणजेच अशी कॅटेगिरी जिच्या संबंधी आपल्याला प्लॅटफॉर्मवर कंटेंट टाकायचा आहे.

उदाहरणार्थ – जर आपल्याला प्लॅटफॉर्म वर शिक्षणासंबंधी कंटेंट टाकायचा असेल शिक्षण ही आपली niche होईल.

या जगात लाखो अफिलिएट मार्केटिंग कंपन्या आहे व त्या कंपन्यांचे करोडो प्रॉडक्ट आहे. त्यामुळे आपण आपल्याला अनुरूप niche निवडली पाहिजे. ही niche अशी असली पाहिजे ज्या विषयी तुम्हाला ज्ञान असेल व तुम्ही त्या niche संबंधी माहितीचे निर्माण करू शकाल.

3. अफिलिएट मार्केटिंग नेटवर्क जॉईन करणे

आपण आपली niche निवडल्यानंतर त्या niche संबंधित प्रोडक्टची माहिती व अफिलिएट लिंक प्लॅटफॉर्म वर शेअर करावी लागेल. या सर्व प्रक्रियेसाठी आपल्याला अफिलिएट मार्केटिंग नेटवर्क जॉईन करावे लागतील. इंटरनेट वर आपल्याला खूप सारे अफिलिएट मार्केटिंग नेटवर्क मिळतील ज्यावर आपण आपले अकाऊंट बनवू शकतो यामधील काही लोकप्रिय अफिलिएट मार्केटिंग नेटवर्क पुढीलप्रमाणे –

• Cuelinks

• Amazon Associates

• Commission junction

• vCommission

• Flipkart affiliate

• CJ affiliate

• Clickbank

• eBay affiliate

• Bigrock

एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही अशाच प्रॉडक्ट किंवा सेवेचे प्रमोशन करा ज्याची तुम्हाला खात्री आहे व ते प्रॉडक्ट किंवा सेवा तुमच्या niche संबंधित असावे. उदाहरणार्थ जर तुमचा प्लॅटफॉर्म आरोग्य संबंधित niche चा असेल व त्यावर तुम्ही जर शिक्षणा संबंधित प्रॉडक्ट किंवा सेवा शेअर करत असाल तर तुम्हाला आवश्यक परिणाम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

4. अफिलिएट लिंक शेअर करा

जेव्हा आपण आवश्यक प्लॅटफॉर्म आणि कॅटेगरी निवडतो व त्यानंतर अफिलिएट नेटवर्क जॉईन करतो त्यापुढील महत्वाची स्टेप म्हणजे आपल्याला मिळालेली युनिक लिंक प्लॅटफॉर्म वरील माहितीमध्ये शेअर करणे.

आपण वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने अफिलिएट लिंक चे प्रमोशन करू शकतो जसे की व्हाट्सअप द्वारे, फेसबुक ग्रुप द्वारे, फेसबुक ग्रुप द्वारे, युट्यूब मधील डिस्क्रिप्शन आणि कमेंट मध्ये तसेच quora द्वारे.

अफिलिएट लिंक शेअर करण्यासाठी आपण ब्लॉग ची मदत देऊ शकतो ज्यामध्ये आपल्याला अफिलिएट प्रॉडक्ट किंवा सेवेशी संबंधित एक लेख लिहावा लागेल व त्यामध्ये युनिक अफिलिएट लिंक द्यावी लागेल.

उदाहरणार्थ – जर आपली niche संगणक संबंधित आहे तर आपण संगणकाचे विविध भाग नावाने लेख लिहून त्यामध्ये संगणकाच्या विविध पार्ट ची अफिलिएट लिंक टाकू शकतो.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

आम्ही संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) आणि Google AdSense एकत्र वापरू शकतो का?

उत्तर – संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) आणि Google AdSense हे दोन्ही कायदेशीर रित्या लीगल आहे त्यामुळेच आपण आपल्या ब्लॉग मध्ये गूगल अड्सेंस आणि संलग्न विपणन एकत्रितपणे वापरू शकतो. गुगल adsense चा उपयोग करण्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते परंतु संलग्न विपणन मध्ये आपण कमी कालावधीत जास्त पैसे कमवू शकतो त्यामुळे अनेक ब्लॉगर संलग्न विपणन चा उपयोग करण्यास प्राथमिकता देतात.

संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) साठी ब्लॉग किंवा वेबसाईट असणे गरजेचे आहे का ?

उत्तर – संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) करण्यासाठी ब्लॉग किंवा वेबसाईट असणे गरजेचे नसते, परंतु जर आपल्याकडे ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर विजिटर स्वतः तुमच्या niche मधील माहिती साठी तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर येत असतात

संलग्न विपणन प्रोग्राम जॉईन करण्यासाठी फी भरावी लागते का?

उत्तर – जर कोणीही संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) प्रोग्राम जॉईन करण्यासाठी पैसे मागत असेल तर अशा स्कीम पासून दूर राहा कारण अफिलिएट मार्केटिंग मध्ये फक्त तुमचा एकट्याचा फायदा नसतो तर सेलर चा पण फायदा असतो म्हणून मुख्यतः असे अफिलिएट मार्केटिंग प्रोग्राम फ्री असतात.

संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) शिकण्यासाठी एखादा कोर्स करावा लागतो काय ?

उत्तर – नाही, संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग ) शिकण्यासाठी तुम्हाला कोणताही कोर्स करण्याची गरज नसते जर तुम्ही हा पूर्ण लेख काळजीपूर्वक वाचला असेल तर तुम्ही आरामात संलग्न विपणन करू शकतात.

संलग्न विपणन ( अफिलिएट मार्केटिंग )च्या माध्यमातून किती पैसे कमवले जाऊ शकतात ?

उत्तर – संलग्न विपणन च्या माध्यमातून पैसे कमवण्याची कोणतीही सीमा नाही. खूप सारे लोक संलग्न विपणन च्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत परंतु हे सर्व तुम्ही केलेल्या सेल व कमिशन रेटवर अवलंबून असते.

आपण मोबाईल च्या मदतीने अफिलिएट मार्केटिंग करू शकतो का ? 

उत्तर – होय, आता जवळपास सर्वच वेबसाईट मोबाईल ला अनुरूप बनवले जात असल्याने आपण संगणकाच्या मदतीशिवाय फक्त स्मार्टफोन वरून देखील अफिलिएट मार्केटिंग करू शकतो.

अफिलिएट मार्केटिंग कोण कोण करू शकतो ?

उत्तर – ज्या व्यक्ती कडे स्मार्टफोन आहे आणि इंटरनेटचे सामान्य ज्ञान आहे असा कोणताही व्यक्ती अफिलिएट मार्केटिंग करू शकतो.अफिलिएट मार्केटिंग साठी बरेच लोक वेबसाईट किंवा ब्लॉक ची मदत घेतात परंतु आपल्याकडे वेबसाईट किंवा ब्लॉग नसेल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अफिलिएट मार्केटिंग करू शकतो. 

सारांश › Conclusion

मला आशा आहे तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय ( What is affiliate marketing in Marathi ) या लेखाद्वारे अफिलिएट मार्केटिंग विषयी माहिती मिळाली असेल व अफिलिएट मार्केटिंग कशी करायची हे समजले असेल.

जर तुम्हाला या लेखामध्ये कोणतेही त्रुटी किंवा अडचण आढळून आली तर तुम्ही कमेंट करून आम्हाला सुधारण्याची संधी देऊ शकता व जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….


Advertisements

Leave a Comment