Advertisements

संगणकाचे फायदे आणि तोटे

Advertisements

संगणक मानवी जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दिवसेंदिवस संगणक वापरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच आपल्याला संगणकाचे फायदे आणि तोटे ( Advantages and disadvantages of computer in Marathi ) माहिती असणे गरजेचे ठरते.

संगणकाचे विविध भाग संगणकाला अधिक कार्यशील बनवत असतात व संगणकाची हीच कार्यक्षमता मानवी प्रगतीमध्ये मोलाचे योगदान करत आहे. संगणकाच्या मदतीने अशक्यप्राय काम करणे सोपे झाले आहे म्हणून संगणकाचा जवळपास सर्व क्षेत्रात उपयोग केला जातो.

संगणकाचे फायदे आहेत तसेच संगणकाचे तोटे देखील आहेत. वेगवेगळ्या रिसर्च द्वारे असे समोर आले आहे की संगणकाचा आपल्या मेंदू व इतर भागांवर अत्यंत अनिष्ट परिणाम होतो व त्यामुळे मानवी शारीरिक क्षमता क्षीण होत चालल्या आहे.

Advertisements
अनुक्रमणिका ↕

आपल्या दैनंदिन उपयोगात मदत करणाऱ्या संगणकाविषयी आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे म्हणून या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया संगणकाचे फायदे व तोटे.

संगणकाचे फायदे व तोटे / Advantages and disadvantages of computer in Marathi

संगणक हे एक बहुउद्देशीय उपकरण आहे ज्याचा उपयोग माहितीची साठवणूक करण्यासाठी व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी केला जातो. संगणक हे प्रोग्रॅम्स च्या मदतीने विशिष्ट कार्य जलद गतीने करण्यासाठी बनवलेले असतात म्हणून संगणकाच्या मदतीने किचकट कामे सोप्या पद्धतीने करून वेळेमध्ये बचत होते.

संगणक हे एक इले्ट्रॉनिक्स मशीन आहे जे इनपुट च्या स्वरूपात युजर कडून सूचना घेते व त्या सूचनेवर संगणक मेमरी मध्ये साठवलेल्या डेटा च्या आधारे प्रक्रिया करते व शेवटी युजरला आवश्यक असलेला परिणाम दर्शवते.

संगणकाचे विविध भाग संगणकाला कार्य करण्यासाठी मदत करत असतात यामध्ये काही भाग इनपुट उपकरण (कीबोर्ड, माऊस ) म्हणून कार्य करतात तर काही भाग आउटपुट उपकरण (मॉनिटर, स्पीकर) म्हणून कार्य करत असतात व या सर्व भागांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सी.पी.यु. ची मदत घेतली जाते.

संगणकाच्या मदतीने किचकट गणितीय उदाहरणे खूप कमी वेळात सोडवली जातात, वेगवेगळ्या वैद्यकीय ऑपरेशन मध्ये संगणकाची मदत घेतली जाते, जवळपास सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये संगणकाचा माहिती साठविण्यासाठी व माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी उपयोग केला जातो.

संगणकाने मानवी जीवनावर वेगळीच छाप सोडली आहे परंतु यामुळे होणारे तोटे दुर्लक्षित करून चालणार नाही. संगणकामुळे माणूस आळशी बनत चालला आहे व संगणकाच्या अतिवापरामुळे डोळ्यांचे आजार वाढत चालले आहेत. संगणकामुळे मानवाची एकाग्रता भंग होत चालली आहे.

संगणकाचे अधिक चांगल्या प्रकारे विश्लेषण होण्यासाठी आपल्याला संगणकाचे उपयोग आणि तोटे ची information असणे गरजेचे आहे जे पुढील मुद्द्यांच्या आधारे आपण जाणून घेऊया –

संगणकाचे उपयोग ( computer uses in marathi )

संगणकामुळे होणारे वेगवेगळे फायदे पुढील मुद्द्यांच्या आधारे मांडता येतील-

अचूकता

• गतिमान

• वेळेची बचत

• वापरण्यास सोपे

• मनोरंजनाचे माध्यम

• फाईल ट्रान्सफर करण्यासाठी

• स्वयंचलित

• विश्वासाचे उपकरण

• कार्य विविधता 

• सामाजिक माध्यमे

• मल्टिटास्किंग 

• कौशल्यपूर्ण रोजगानिर्मिती 

अचूकता

जेव्हा आपल्याला कोणतेही काम वारंवार करायचे असेल तेव्हा आपण संगणकाची मदत घेऊ शकतो. संगणक सॉफ्टवेअर च्या मदतीने कोणतेही कार्य किंवा जटिल सांख्यिकी समीकरणे अचूकतेने सोडवू शकतो.

गतिमान

आज-काल संगणक फक्त सांख्यिकी घडामोडी करण्याचे साधन न राहता सर्वांच्या जीवनाचा भाग बनला आहे व याचे मुख्य कारण आहे संगणकाची गतिमानता. संगणकाच्या मदतीने विविध डिजिटल कार्य काही सेकंदात पार पाडले जातात.

वेळेची बचत

संगणकामध्ये विविध डेटा साठवलेला असतो व त्या डेटा च्या मदतीने संगणक आपण दिलेल्या सूचना काही सेकंदात पार पाडतो. संगणक जलद गतीने माहितीवर प्रक्रिया करतो व विविध माहिती साठवण्यासाठी मदत करतो. संगणकाच्या मदतीने जटिल कार्य सोप्या पद्धतीने करून वेळेची बचत केली जाते.

वापरण्यास सोपे

संगणक वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचा विशिष्ट कोर्स करण्याची गरज नसते त्यामुळे संगणकाचा उपयोग लहान मुलांपासून वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण करू शकतात. विविध सॉफ्टवेअर निर्माता सॉफ्टवेअर चे निर्माण करून संगणक वापरन्यास सरलता प्रदान करतात.

मनोरंजनाचे साधन

संगणकाचा मनोरंजनाचे साधन म्हणून मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. संगणकामध्ये आपण विविध फोटो, व्हिडिओ तसेच गाणी साठवून ठेवू शकतो. इंटरनेटच्या वर उपस्थित विविध वेबसाईट च्या मदतीने आपण मूवी बघू शकतो, गेम खेळू शकतो तसेच आपले मनोरंजन होऊ शकते.

फाईल ट्रान्सफर करण्यासाठी

आपण इंटरनेट तसेच विविध मेमरी उपकरणांच्या मदतीने विविध फाईल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवू शकतो. जगातील कोणत्याही कानाकोपर्‍यात फाइल्स पाठवण्यासाठी आपण संगणकाची मदत घेऊ शकतो.

स्वयंचलित

आपण संगणकाच्या मदतीने विविध संगणकीय क्रिया स्वयंचलित पद्धतीने पार पाडू शकतो जसे की ई-मेल पाठवणे, मेसेज पाठवणे, कॉम्प्युटर वायरस स्कॅनिंग, विशिष्ट हार्डवेअर उपकरणांचा उपयोग करणे इत्यादी. या सर्वांच्या व्यतिरिक्त आपण काही विशिष्ट कार्य पार पाडण्यासाठी देखील सॉफ्टवेअर प्रोग्राम च्या मदतीने संगणकाची मदत घेऊ शकतो.

विश्वासाचे उपकरण

संगणकाचा उपयोग आपण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकतो. संगणकाच्या मदतीने आपण विना-अडथळा विविध महत्त्वाची कार्य पार पाडू शकतो. संगणक संपूर्ण बिघडण्याचे प्रमाण खूपच कमी असते जर संगणकाचा एखादा भाग निकामी झाला तर आपण तो बदलू शकतो.

कार्य विविधता

संगणक कोणतेही एक विशिष्ट कार्य करण्यासाठी बनवलेला नाही. म्हणजेच, संगणकाचा उपयोग मनोरंजनापासून वैद्यकीय तसेच शिक्षण क्षेत्रापर्यंत सर्वच ठिकाणी केला जातो. संगणक हा विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये व औद्योगिक क्षेत्रात देखील वापरला जातो. संगणकाचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कार्ये करण्यासाठी केला जातो.

सामाजिक माध्यमे

संगणकाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उपस्थित असलेली सामाजिक माध्यमे. संगणकामध्ये सामाजिक माध्यमांच्या मदतीने जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यातील दोन व्यक्ती एकमेकांना जोडले जाऊ शकतात, त्यांच्यामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. लाखो लोकांना जोडण्याचे काम संगणक करत आहे.

 मल्टिटास्किंग

 संगणकामध्ये आपण एकाच वेळेस वेगवेगळी कामे करू शकतो जसे की ऑनलाइन फॉर्म भरताना आपण गाणी ऐकू शकतो. संगणकाच्या विविध टॅब मध्ये आपण वेगवेगळे एप्लीकेशन उघडून त्यांचा उपयोग करू शकतो. संगणक विविध कार्य एकाच वेळेस जलदगतीने पार पाडतो.

 कौशल्यपूर्ण रोजगानिर्मिती 

 संगणकामुळे विविध क्षेत्रात विविध लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. वेगवेगळ्या सॉफ्टवेअर निर्माता कंपनीमध्ये चांगली रोजगार निर्मिती झाली आहे त्यामुळे विदेशी मुद्रा प्राप्तीकरन होत आहे. इंटरनेटच्या वेब च्या मदतीने विविध लोक लाखो रुपये घरबसल्या कमवत आहेत.

संगणकाचे तोटे ( computer disadvantages in Marathi)

प्रत्येक तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे फायदा असतो त्याच प्रकारे तोटा देखील असतो अशाच प्रकारे संगणकाचे विविध तोटे आहेत ते पुढील प्रमाणे

• मानवी स्वास्थ्यावर घातक परिणाम

• सायबर गुन्हे

• हॅकिंग आणि व्हायरस ऍटॅक

• रोजगाराच्या संधीत कमी

• लक्ष विचलित होणे

• जास्त किंमत

• पर्यावरणासाठी हानिकारक

• खोट्या बातम्या

• बुद्धिमत्तेचा अभाव

• संगणकाचे व्यसन

मानवी स्वास्थ्यावर घातक परिणाम

संगणका पुढे तासनतास एकाच ठिकाणी बसल्यामुळे पाठीच्या मणक्याचे आजार, गुडघ्याचे आजार तसेच डोळ्याचे आजार वाढत आहेत. काही शोधांद्वारे असे लक्षात आले आहे की संगणकाच्या अतिवापरामुळे मानवी रचनेवर परिणाम होत आहे

सायबर गुन्हे

संगणकाच्या मदतीने विविध समाजघातक व्यक्ती आपली वैयक्तिक तसेच सामाजिक माहिती चोरत असतात. मागील दशकांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

हॅकिंग आणि व्हायरस ऍटॅक

दिवसेंदिवस संगणकामध्ये हॅकिंग आणि व्हायरस ऍटॅक चे प्रमाण वाढले आहे. हॅकिंग च्या मदतीने हॅकर्स आपल्या संगणकावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात व माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. कॉम्प्युटर व्हायरस अटॅक मुळे आपल्या संगणकामधील माहितीचे मोठे नुकसान होते.

रोजगाराच्या संधीत कमी

संगणक विविध लोकांचे काम एकटाच पार पाडत असतो तसेच विविध औद्योगिक कार्य पार पाडण्यासाठी संगणकाची मदत घेतली जाते त्यामुळे मानवी रोजगारात कमी पाहण्यास मिळते.

लक्ष विचलित होणे

संगणकामधील विविध मनोरंजनाची माध्यमे आपला किमती वेळ संपवण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला काम करताना संगणकामुळे लक्ष विचलित होण्याची समस्या जाणवत असते. संगणकामुळे आपली एकाग्रता भंग होते.

जास्त किंमत

संगणकामध्ये चांगले आधुनिक तंत्रज्ञान येत असले तरी संगणकाची किंमत जास्त आहे. जर संगणकाचा महत्वाचा भाग निकामी झाला तर आपल्याला खूपच जास्त रक्कम मोजावी लागते. काही विशिष्ट कार्यासाठी उपयोगात येणारा संगणक खरेदी करण्यासाठी आपल्याला लाखो रुपये मोजावे लागू शकतात.

पर्यावरणासाठी हानिकारक

संगणकामुळे दिवसेंदिवस इलेक्ट्रॉनिक वेस्ट पृथ्वीवर वाढत चालले आहे. संगणकामधील विविध घटक विघटन नाहीत ते वर्षानुवर्षे पृथ्वीवर तसेच पडून राहतात त्यामुळे ते पृथ्वीवर प्रदूषण निर्माण करत असतात. संगणकामधील पदार्थांमुळे विविध समस्या निर्माण झाल्या आहे.

खोट्या बातम्या

संगणकाच्या मदतीने विविध खोट्या बातम्या खूपच वेगाने प्रसारित होतात. संगणकाच्या मदतीने मानवी मनाला विशिष्ट विचारसरणी कडे वळवणे सोपे झाले आहे. संगणकामधील खोट्या बातम्यांमुळे समाजात द्वेष पसरत आहे.

बुद्धिमत्तेचा अभाव

संगणक कितीही प्रगत झाले तरी शेवटी ते एक मशीन आहे व त्यामध्ये मानवी बुद्धिमत्तेचा अभाव असतो. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मध्ये वेगाने प्रगती होत आहे तरी पण संगणक अजून मानवाला टक्कर देऊ शकत नाही. रचनात्मक कार्य करण्याच्या संगणकामधील अभाव आढळतो.

संगणकाचे व्यसन

संगणकामध्ये विविध मनोरंजक व रोचक गोष्टीमुळे आपल्याला संगणकाच्या व्यसन लागू शकते व त्याचा आपल्या मानसिक तसेच शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो. संगणकाच्या व्यसनामुळे आपल्याला विविध शारीरिक व्याधी होऊ शकतात.

संगणकाचा उपयोग कुठे होतो

संगणकाचा उपयोग आपल्या जीवनातील जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये केला जातो या मधील काही क्षेत्र पुढीलप्रमाणे.

• घर

• मनोरंजन

• वैद्यकीय क्षेत्र

• शिक्षण

• बँक

• औद्योगिक क्षेत्र

• बिझनेस

• कला

• सरकारी कार्यालय

• प्रशिक्षण

• विज्ञान आणि तंत्रज्ञान

सारांश / conclusion

असे म्हटले जाते की अती सर्वत्र वर्जयेत म्हणजेच कोणत्याही गोष्टीचा मर्यादीत वापर केला तरच ती गोष्ट आपल्याला फायद्याची ठरते नाही तर त्यापासून आपल्याला तोटाच होतो व हीच पद्धती तंत्रज्ञानाशी देखील निगडित आहे.

संगणकाचा आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांमध्ये उपयोग केला जातो पण याच संगणकाचे काही तोटे देखील आहे जे या लेखाद्वारे आपण जाणून घेतले मला आशा आहे तुम्हाला संगणकाचे फायदे आणि तोटे ( computer advantages and disadvantages in marathi ) हा लेख आवडला असेल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा व कॉम्प्युटर चे फायदे व तोटे या लेखात काही चुका आढळल्या असतील किंवा सुधारणा आवश्यक तर आम्हाला कमेंट द्वारे कळवा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *