Advertisements

ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती • what is graphics card in Marathi

Advertisements

संगणकाच्या मॉनिटर वर चांगल्या प्रकारे गेम, व्हिडिओ, फोटो व सॉफ्टवेअर दिसण्यासाठी आपल्याला ग्राफिक्स कार्ड ची गरज असते त्यामुळे या लेखात आपण जाणून घेऊया ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती » what is graphics card in Marathi.

 जर तुम्हाला संगणकामध्ये गेम खेळण्याची सवय असेल किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिट करायला आवडत असेल तर तुम्ही ग्राफिक कार्ड विषयी नक्की ऐकले असेल. तसेच इतर विविध कारणांनी तुम्ही ग्राफिक्स कार्ड हे नाव नक्की ऐकले असेल. परंतु तुम्हाला माहित आहे का जर संगणकीय उपकरणांमध्ये चांगले ग्राफिक्स कार्ड उपलब्ध नसेल तर त्यावरील इमेज Lag होण्याचे प्रमाण वाढते.

 ग्राफिक्स कार्ड संगणक, मोबाईल आणि लॅपटॉप मध्ये उपलब्ध असतात. आपण संगणकामध्ये किंवा लॅपटॉप मध्ये अतिरिक्त ग्राफिक्स कार्ड जोडू शकतो, परंतु आपल्याला मोबाईल मध्ये ग्राफिक्स कार्ड साठी स्लॉट उपलब्ध नसल्यामुळे ग्राफिक्स कार्ड जोडता येत नाही.

Advertisements
अनुक्रमणिका ↕

 ग्राफिक्स कार्ड चे वेगवेगळे प्रकार असतात व ग्राफिक्स कार्ड स्वतः रॅम, प्रोसेसर सारख्या उपकरणांचा बनलेला असतो. चला तर मग जाणून घेऊया ग्राफिक्स कार्ड विषयी अधिक माहिती.

 ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती › what is graphics card in Marathi

 ग्राफिक्स कार्ड संगणकाचा हार्डवेअर भाग आहे ज्याचा उपयोग संगणकाची व्हिडिओ मेमरी वाढवण्यासाठी व डिस्प्ले क्वॉलिटी अधिक चांगली करण्यासाठी होतो. संगणकाच्या मॉनिटर वर दिसणाऱ्या इमेज ची गुणवत्ता ग्राफिक्स कार्डच्या गुणवत्तेवर आधारित असते.

ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती

 सन 1980 मध्ये IBM कंपनीद्वारे ग्राफिक्स कार्ड चा शोध लावला गेला. ग्राफिक्स कार्ड च्या मदतीने संगणकामध्ये high level कामे केली जातात. संगणकामध्ये गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंग साठी ग्राफिक्स कार्ड खूप महत्त्वाचा भाग आहे.

 ग्राफिक्स कार्ड चा उपयोग

 ग्राफिक कार्ड संगणकामधील expansion card आहे ज्याचा उपयोग संगणकाच्या मॉनिटर वर चित्र प्रस्तुतीकरण करण्यासाठी होतो. High-end ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट चा उपयोग गेमिंग, रे ट्रेसिंग, क्रिप्टो करेंसी माइनिंग तसेच ग्राफिक्स प्रोडक्शन साठी केला जातो. ग्राफिक्स कार्ड च्या मदतीने 3d इमेज चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले आहे. ग्राफिक्स कार्डचा उपयोग फोटो तसेच व्हिडिओ एडिटिंग साठी केला जातो कारण उत्तम ग्राफिक्स कार्ड च्या मदतीने लाखो पिक्सल एकच वेळेस हाताळले जातात व त्यांच्यावर प्रक्रिया केली जाते.

 ग्राफिक्स कार्ड चे प्रकार > types of graphics card in Marathi

 जर तुम्हाला संगणकामध्ये नवीन ग्राफिक्स कार्ड जोडायचे असेल किंवा नवीन संगणकीय उपकरण घ्यायचे असेल तर तुम्हाला ग्राफिक कार्डचे प्रकार माहीत असणे गरजेचे आहे. संगणकाच्या मॉनिटर वर उत्तम अनुभव घेण्यासाठी आपल्याला उत्तम ग्राफिक्स कार्ड घेणे गरजेचे आहे त्यामुळेच जाणून घेऊया ग्राफिक्स कार्ड चे प्रकार –

• इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड 

• PCI ग्राफिक्स कार्ड 

• PCI एक्सप्रेस ग्राफिक्स कार्ड 

• AGP ग्राफिक कार्ड

 इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड 

 इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड ला onboard ग्राफिक कार्ड देखील म्हटले जाते. जर तुमच्याकडे संगणक असेल व तुम्ही त्यामध्ये ग्राफिक कार्ड अपग्रेड केलेले नसेल तर तुमच्या संगणकामध्ये इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड असण्याची खूप शक्यता आहे.

 इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड संगणकाच्या मदरबोर्ड बरोबर उपस्थित असतात त्यामुळे ते बदलत्या तंत्रज्ञानाला अनुरूप असतील असे नाही म्हणजे जर तुमच्याकडे जुना संगणक असेल तर तुम्हाला व्हिडिओ गेम खेळण्यासाठी किंवा high level कामे करण्यासाठी संगणकामध्ये उपस्थित असलेले इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड उपग्रेड करावे लागेल.

PCI ग्राफिक कार्ड

PCI ग्राफिक्स कार्ड संगणकाला जोडण्यासाठी संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये PCI स्लॉट असणे गरजेचे असते. PCI स्लॉट मुख्यता जुन्या संगणकामध्ये उपस्थित असतात त्यामुळे जर तुम्हाला तुमचा जुना मदरबोर्ड ग्राफिक्स काढणे अपग्रेड करायचा असेल तर तुम्ही PCI ग्राफिक्स कार्डचा उपयोग करू शकता . PCI ग्राफिक्स कार्ड थोडेसे कालबाह्य झालेले ग्राफिक्स कार्ड आहेत.

PCI एक्सप्रेस ग्राफिक्स कार्ड

PCI एक्सप्रेस ग्राफिक्स कार्ड हे सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ग्राफिक्स कार्ड आहेत. PCI ग्राफिक्स कार्ड संगणकाचे जोडण्यासाठी संगणकाच्या मदरबोर्ड मधील PCI-E स्लॉट चा उपयोग केला जातो. जर संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये एका पेक्षा जास्त PCI-E slot उपस्थित असतील तर आपण एकापेक्षा जास्त ग्राफिक्स कार्ड संगणकाशी जोडू शकतो.

PCI एक्सप्रेस ग्राफिक्स कार्ड मदरबोर्डशी जोडताना कधीकधी comparability प्रॉब्लेम होऊ शकतो तसेच कधी कधी काही मदरबोर्ड ठराविक ग्राफिक्स कार्ड ला चांगल्याप्रकारे सपोर्ट करू शकतात त्यामुळे PCI एक्सप्रेस  ग्राफिक्स कार्ड खरेदी करताना थोडी काळजी घेणे गरजेचे असते.

AGP ग्राफिक्स कार्ड

PCI ग्राफिक कार्ड प्रमाणेच जेव्हा मदरबोर्ड ला ग्राफिक्स कार्ड जोडण्यासाठी AGP स्लॉट ची मदत घेतली जाते तेव्हा त्या ग्राफिक्स कार्ड ला AGP ग्राफिक्स कार्ड असे म्हटले जाते. AGP ग्राफिक्स कार्ड मधील तंत्रज्ञानामुळे हे ग्राफिक्स कार्ड PCI एक्सप्रेस ग्राफिक कार्ड पेक्षा अधिक वेगाने कार्य करू शकत नाहीत. AGP ग्राफिक्स कार्ड त्यांच्या compatibility मुळे इतर ग्राफिक्स कार्ड च्या प्रकारा पेक्षा अधिक उपयोगात आणले जातात.

 ग्राफिक्स कार्ड चे भाग • parts of graphics card in Marathi

 संगणकाचे विविध भाग प्रमाणे ग्राफिक्स कार्ड चे विविध भाग असतात. ग्राफिक कार्ड जरी अति महत्वाचा भाग नसला तरी ग्राफिक्स कार्डचा गेमिंग आणि विविध सॉफ्टवेअर मध्ये महत्त्वाचा रोल आहे. ग्राफिक्स कार्ड मध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला असतो व ग्राफिक्स कार्ड विविध भागांचा बनलेला असतो. ग्राफिक्स कार्ड चे भाग पुढील प्रमाणे –

ग्राफिक्स कार्ड चे भाग

• ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट 

• मेमरी 

• power connector 

• हिट सिंक आणि फॅन 

• पोर्ट 

  ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट

 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट किंवा GPU ग्राफिक्स कार्डचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ग्राफिक्स प्रोसेसिंग साठी ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट चा उपयोग होतो. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट प्रोसेसर हजारो कोर चा बनलेला असतो ज्याचा उपयोग किचकट ग्राफिक क्रिया करण्यासाठी होतो.

Nvdia द्वारे ग्राफिक्स कोर ला cuda core हे म्हटले जाते तर AMD द्वारे ग्राफिक्स कोर ला stream processor असे म्हटले जाते. Coda cores आणि stream processor मध्ये आकारमानात आणि कार्यामध्ये भिन्नता असते.

 मेमरी

 ग्राफिक्स कार्ड मेमरी मध्ये ग्राफिक्स ऑपरेशन आणि अवघड टेक्चर साठवलेले असतात. ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट मेमरी मधून ग्राफिक्स ऑपरेशन घेऊन ग्राफिक्स प्रक्रिया करत असतात व त्यांना रॅम कडे पाठवत असतात. रॅम कडून प्रक्रिया केलेले ग्राफिक्स RAMDAC ( Random Access Memory digital to analogue converter) कडे पाठवले जातात तिथून ते मॉनिटरकडे पाठवले जातात.

 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट नुसार वेगवेगळ्या प्रकारची मेमरी ग्राफिक्स कार्ड मध्ये उपलब्ध असते. ग्राफिक कार्ड मध्ये GDDR3 आणि GDDR5 ( G- Graphics DDR- Double Data Rate ) मेमरी मुख्यता उपलब्ध असतात. ग्राफिक कार्ड मेमरी संगणकामध्ये किंवा लॅपटॉप मध्ये उपलब्ध असलेल्या मेमरी पेक्षा अधिक वेगाने कार्य करते.

 पावर कनेक्टर

 पावर कनेक्टर जास्त रेंज असलेल्या ग्राफिक्स कार्ड मध्ये उपलब्ध असतात. हे ग्राफिक्स कार्ड 6-pin असतात व कधीकधी दोन पावर कनेक्टर चा काही ग्राफिक कार्ड मध्ये उपयोग केला जातो. कमी रेंज असलेल्या ग्राफिक्स कार्ड मध्ये शक्यतो पावर कनेक्टर चा उपयोग केलेला नसतो कारण त्यांना कार्य करण्यासाठी कमी ऊर्जेची गरज असते.

 हिट सिंक आणि फॅन 

 हिट सिंक आणि फॅन चा उपयोग ग्राफिक्स कार्ड चे तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी होतो. हीट सिंक passive कूलिंग उपकरण आहे जे कॉपर आणि ॲल्युमिनियम चे बनलेले असते. हिट सिंक च्या मदतीने ग्राफिक्स कार्ड मधील अतिरिक्त तापमान कमी करण्यास मदत होते.

 फॅन हे एक्टिव कूलिंग उपकरण आहे. फॅन मधील हवा हिट सिंग कडे सोडली जाते जेणेकरून हिट सिंक लवकर थंड होऊन चांगल्या प्रकारे कार्य करू शकेल. काही कमी रेंज असलेल्या ग्राफिक्स कार्ड मध्ये फक्त हिट सिंक चा उपयोग केला जातो परंतु उत्तम दर्जाच्या ग्राफिक्स कार्ड मध्ये हिट सिंक आणि फॅन दोन्हींचा चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो.

पोर्ट

 ग्राफिक्स कार्ड मध्ये पोर्ट बाह्य भागामध्ये स्थित असतात. केबल च्या मदतीने एलसीडी स्क्रीन किंवा मॉनिटर ग्राफिक्स कार्ड ला जोडण्यासाठी पोर्ट ची मदत घेतली जाते. ग्राफिक कार्डमध्ये मुख्यतः VGA, HDMI, DVI पोर्ट चा उपयोग केलेला असतो.

 ग्राफिक कार्डचे सर्व भाग PCB ( प्रिंटेड सर्किट बोर्ड ) ला जोडलेले असतात. वर दिलेल्या भागांप्रमाणेच इतर अनेक भाग ग्राफिक्स कार्ड मध्ये उपस्थित असतात जसे की कॅपॅसिटर, डायोड, रेजीस्टर, ट्रांजिस्टर इत्यादि.

 ग्राफिक्स कार्ड ची वैशिष्ट्ये / चांगले ग्राफिक्स कार्ड कसे निवडावे 

 विविध तांत्रिक घटक ग्राफिक्स कार्डची कार्यक्षमता निर्धारित करत असतात. कधीकधी जास्त किंमत असलेले ग्राफिक्स कार्ड चांगले असू शकतात परंतु प्रत्येक वेळेस असे असणे गरजेचे नाही त्यामुळे आपल्याला ग्राफिक्स कार्ड चे वैशिष्टे माहीत असणे गरजेचे आहे. ग्राफिक्स कार्ड चे काही वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे –

गुणधर्म उपयोग
ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (AMD, Nvidia) ग्राफिक्स कार्ड च्या मुख्य भाग जेथे ग्राफिक्स प्रोसेस केले जातात.
कोर ची संख्या जास्त कोर ची संख्या चांगल्या ग्राफिक्स कार्ड चे प्रतिनिधित्व करते.
कोर क्लॉक स्पीड कोर द्वारे निर्धारित वेळेत केले जाणारे एकूण ग्राफिक्स ऑपरेशन
मेमरी टाईप अत्याधुनिक प्रकारातील मेमरी चांगली कार्यक्षमता व ऊर्जेची बचत करते.
मेमरी साइज जितकी जास्त मेमरी साइज असेल तितके जास्त ग्राफिकल ऑपरेशन त्यामध्ये साठवले जातात व त्याद्वारे ग्राफिक्स कार्ड अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो
मदरबोर्ड कनेक्शन ग्राफिक्स कार्ड मदरबोर्ड ला सोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्शन उपस्थित असतात त्यामुळे ग्राफिक्स कार्ड खरेदी करताना थोडी काळजी घेणे गरजेचे असते.
मेमरी bandwidth memory bandwidth म्हणजे तुमच्या ग्राफिक्स कार्ड मधील VRAM किती जलद आहे.
पावर कनेक्टर उच्च तंत्रज्ञानाच्या ग्राफिक कार्ड मध्ये पावर कनेक्टर ची सुविधा उपलब्ध असते.
थर्मल डिझाईन पावर थर्मल डिझाईन पावर म्हणजेच किती अतिरिक्त ऊर्जा ग्राफिक्स कार्ड द्वारे सहन केली जाईल.थर्मल डिझाईन पावर Watts मध्ये मोजली जाते.
आउटपुट पोर्ट संगणकाच्या मॉनिटर किंवा एलसीडी स्क्रीन ला जोडण्यासाठी विविध पोर्ट ची गरज असते त्यांना आउटपुट पोर्ट असे म्हटले जाते
gigaflop or teraflop gigaflop or teraflop हे प्रोसेसिंग युनिट च्या थेरॉटिकल कार्यक्षमतेचे युनिट आहे. gigaflop किंवा teraflop च्या मदतीने विविध ग्राफिक्स कार्ड च्या कार्यक्षमतेचे आकलन केले जाते.

 ग्राफिक्स कार्ड आणि साऊंड कार्ड मधील फरक

parameter ग्राफिक्स कार्ड व्हिडिओ कार्ड
उपयोग मुख्याता गेमिंग आणि व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ प्रोसेसिंग आणि मल्टीमीडिया प्रोजेक्टवर कार्य करण्यासाठी
संकल्पना ग्राफिक्स कार्ड चित्राची गुणवत्ता सुधारून चांगला गेमिंग व high level कार्याचा अनुभव देतो. व्हिडिओ कार्ड चित्राची गुणवत्ता, रंगसंगती, व चित्र प्रक्रियासाठी महत्त्वाचा आहे.
किंमत इंटिग्रेटेड ग्राफिक्स कार्ड ची किंमत कमी असते. व्हिडिओ कार्ड ची किंमत ग्राफिक्स कार्ड च्या तुलनेत जास्त असते.
कार्यक्षमता व्हिडिओ कार्ड पेक्षा कमी जास्त
संगणकामध्ये उपलब्धता ग्राफिक्स कार्ड वैकल्पिक असतात म्हणजेच काही संगणकामध्ये ग्राफिक्स कार्ड उपलब्ध असू शकत नाहीत. साऊंड कार्ड अनिवार्य असतात त्यामुळे ते प्रत्येक संगणकामध्ये उपलब्ध असतात.
याद्वारे होणारी सु
धारणा
याद्वारे चित्राची कॉलिटी सुधारते व 3d इमेज चा आनंद घेता येतो. ग्राफिक्स कार्ड द्वारे जास्त रिझोल्युशन चे चित्र निर्माण होतात. व्हिडिओ कार्ड द्वारे संगणकाची display सेटिंग नियंत्रित केली जाते.

 सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

 ग्राफिक्स म्हणजे काय ?

उत्तर – ग्राफिक्स म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट चे चैत्रिक प्रस्तुतीकरण होय. ग्राफिक्स हे 2d किंवा 3d असू शकतात. उदाहरण – फोटोग्राफ, ड्रॉईंग, मॅप, ग्राफिक्स डिझाईन इत्यादी.

 ग्राफिक्स सॉफ्टवेअर म्हणजे काय ?

उत्तर – ग्राफिक्स सॉफ्टवेअर हे प्रोग्राम किंवा प्रोग्राम चा संच असतात जे ग्राफिक्स निर्माण करतात, एडिट करतात आणि ग्राफिक्स दर्शविण्याचे कार्य करतात. उदाहरण – मायक्रोसॉफ्ट पेंट, फोटोशॉप,coreldraw इत्यादी.

 ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट (GPU) आणि ग्राफिक्स कार्ड मधील फरक

उत्तर – ज्या प्रकारे प्रोसेसर हा मदरबोर्ड चा एक भाग असतो अगदी त्याच प्रकारे ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट हा ग्राफिक्स कार्ड चा एक भाग आहे जो सर्व ग्राफिक्स ऑपरेशन करण्यासाठी उपयुक्त असतो.

 आपण लॅपटॉप मध्ये ग्राफिक्स कार्ड जोडू शकतो का?

उत्तर – आपण सर्वच लॅपटॉप मध्ये ग्राफिक कार्ड जोडू शकत नाही परंतु काही लॅपटॉप मध्ये उपस्थित असलेल्या थंडरबोल्ट पोर्ट च्या साह्याने आपण लॅपटॉप मध्ये ग्राफिक्स कार्ड जोडू शकतो.

सारांश

 संगणकाच्या मॉनिटर वर ग्राफिक्स ची हाताळणी करण्यासाठी ग्राफिक कार्डचा महत्त्वाचा रोल आहे. ग्राफिक्स कार्ड च्या मदतीने संगणकामध्ये विविध कामे अधिक चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले आहे. ग्राफिक्स कार्ड हा विविध भागांचा बनलेला असतो.

 ग्राफिक्स कार्ड चे वेगवेगळे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे ग्राफिक्स कार्ड खरेदी करताना आपल्याला ग्राफिक कार्ड ची वैशिष्टे माहित असणे गरजेचे असते. ग्राफिक्स कार्ड आणि साउंड कार्ड मध्ये फरक असतो तो आपण या लेखांमध्ये जाणून घेतला.

 तुम्हाला ग्राफिक्स कार्ड विषयी माहिती • what is graphics card in Marathi हा लेख कसा वाटला हे टिपणी द्वारे जरूर कळवा तसेच या लेखामध्ये कोणताही भाग वगळला गेला असेल किंवा काही त्रुटी असेल तरी देखील तुम्ही टिपणी द्वारे कळवू शकता.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद…..

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *