Advertisements

हार्ड डिस्क (HDD) म्हणजे काय ? HDD आणि SSD मधील फरक

Advertisements

संगणकामधील माहिती साठवण्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची मदत घेतली जाते, असेच एक उपकरण आहे हार्ड डिस्क. या लेखामध्ये आपण हार्ड डिस्क म्हणजे काय ? (Hard disc information in marathi) याविषयी माहिती जाणून घेऊया.

संगणकामध्ये डेटा साठवण्यासाठी मेमरी ची गरज असते व त्यासाठी प्रायमरी मेमरी व सेकंडरी मेमरी चा उपयोग केला जातो. प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रोम चा उपयोग होतो तर सेकंडरी मेमरी मध्ये हार्ड डिस्क, फ्लॉपी डिस्क, मेमरी कार्ड इत्यादीचा समावेश होतो.

अनुक्रमणिका ↕

हार्ड डिस्क च्या मदतीने विविध आकाराच्या फाईल संगणकामध्ये साठवल्या जातात. हार्ड डिक्स आणि रॅम मध्ये मुख्य फरक हा आहे की हार्ड डिस्क फाइल्स साठवण्यासाठी उपयोगात येते तर रॅम त्या फाईलचा चालवण्यासाठी उपयोगात येते.चला तर मग जाणून घेऊया हार्ड डिस्क विषयी माहिती.

Advertisements

हार्ड डिस्क म्हणजे काय

हार्ड डिस्क म्हणजे काय ? (Hard disc information in marathi)

 हार्ड डिस्क ला हार्ड डिस्क ड्राइव्ह असे देखील म्हटले जाते. हार्ड डिस्क हे सेकंडरी स्टोरेज उपकरण आहे तसेच हार्ड डिस्क हा नॉन वोलेटाइल मेमरीचा प्रकार आहे. हार्ड डिस्क चा उपयोग संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी तसेच माहितीचा गरजेनुसार उपयोग करण्यासाठी केला जातो.

 हार्ड डिस्क चा शोध Reynolds B. Johnson द्वारे 13 सप्टेंबर 1956 रोजी लावला गेला. हार्ड डिस्क ला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते जसे की हार्ड डिस्क ड्राईव्ह (HDD), हार्ड डिक्स, हार्ड ड्राइव्ह किंवा फिक्स ड्राईव्ह.

 हार्ड डिक्स मधील माहिती वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर मिटवली जात नाही. हार्ड डिक्स मधील माहिती साठवण्यासाठी मॅग्नेटिक स्टोरेज प्रणालीचा उपयोग केला जातो त्यामुळेच हार्ड डिस्क ला इलेक्ट्रो मेकॅनिकल स्टोरेज उपकरण असे देखील म्हटले जाते.

 हार्ड डिक्स मधील माहिती साठवण्यासाठी Platter चा उपयोग केला जातो व हे प्लॅटर ग्लास किंवा ॲल्युमिनियम धातूचे बनलेले असतात ज्याला मॅग्नेटिक मटेरियलने कोटिंग केलेले असते. प्लॅटर चा उपयोग मॅग्नेटिक हेड च्या जोडी ने केला जातो ज्यामध्ये मॅग्नेटिक हेड प्लॅटर वर माहिती read आणि write करत असतात.

हार्ड डिस्क ची आवश्यकता

 संगणकामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे मेमरी असतात एक आहे प्रायमरी मेमरी आणि दुसरी आहे सेकंडरी मेमरी प्रायमरी मेमरी मध्ये रॅम आणि रोम चा समावेश होतो. रॅम एक volatile मेमरी आहे म्हणजेच वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रॅम मधील मेमरी मिटवली जाते.

 ऑपरेटिंग सिस्टम ला रॅम मध्ये लोड करून संगणक जलद गतीने चालवला जाऊ शकतो, परंतु ऑपरेटिंग सिस्टमला install करण्यासाठी हार्ड डिस्कची गरज लागते. हार्ड डिस्क संगणकामध्ये वेगवेगळ्या फाईल्स आणि सॉफ्टवेअर साठी जागा उपलब्ध करत असतो.

 रॅम मधील कोणतीही फाइल कायमस्वरूपी साठवली जाऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला फाइल्स कायमस्वरूपी साठवण्यासाठी हार्ड डिस्क ची गरज लागते.हार्ड डिक्स मध्ये आपण वेगवेगळी चित्रे, सॉफ्टवेअर, व्हिडिओ तसेच ऑडिओ साठवून ठेवू शकतो.

 हार्ड डिस्कची वैशिष्ट्ये » hard disk characteristics in Marathi

 हार्ड डिस्क ची मुख्य तीन वैशिष्ट्ये आहेत –

1. कार्यक्षमता

2. फॉर्म फॅक्टर

3. स्टोरेज क्षमता

1. हार्ड डिस्क कार्यक्षमता -.

 माहिती लिहिणे आणि वाचणे हे हार्ड डिस्क चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मेकॅनिकल हार्ड डिस्क मध्ये असणाऱ्या अंतर्गत डिस्क ( प्लॅटर ) चे एका सेकंदात किती रोटेशन होतात यावरून मेकॅनिकल हार्ड डिस्क ची वेगवेगळ्या प्रकारात विभागणी केली जाते.

प्लॅटर च्या गोल फिरण्याच्या गतीबरोबर कनेक्शनचा प्रकार स्टोरेज पद्धती आणि डिवाइस bandwidth हार्ड डिस्क ची कार्यक्षमता निर्धारित करत असतात. SSD मध्ये उपस्थित असणारी फ्लॅश मेमरी तंत्रज्ञान हे HDD पेक्षा अधिक वेगाने कार्य करू शकतात.

2. फॉर्म फॅक्टर

वेगवेगळ्या प्रकारचे संगणक हे वेगवेगळ्या प्रकारच्या हार्ड ड्राईव्ह ला सपोर्ट करत असतात. जेव्हा आपण वर्तमान तंत्रज्ञानामधील हार्ड ड्राइव्ह बघत असतो तेव्हा आपल्याला समजेल की 3.5 इंच , 2.5 इंच आणि 1.5 इंच फॉर्म फॅक्टर असलेले हार्ड ड्राइव्ह मार्केटमध्ये उपलब्ध असतात . जास्त लांब असलेले फॉर्म फॅक्टर चे हार्ड ड्राइव्ह कमी लांबीच्या फॉर्म फॅक्टर असलेल्या उपकरणांमध्ये फिट बसू शकत नाही.

3. स्टोरेज क्षमता 

हार्ड डिक्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फोटो , व्हिडीओ आणि ऑडिओ साठवलेले असतात त्यामुळे हार्ट डिस्क ची स्टोरेज क्षमता जास्त असते. हार्ड डिस्क मधील स्टोरेज क्षमता काही MB, जीबी पासून ते काही TB पर्यंत असू शकते. जितकी जास्त हार्ड डिस्क ची क्षमता असते तितक्या जास्त फाईल संगणकामध्ये साठवल्या जाऊ शकतात .

 हार्ड डिस्क चा इतिहास

 1953 सालि IBM कंपनीच्या इंजीनियर ने पहिल्या हार्ड डिस्क ची निर्मिती केली तिचा आकार दोन रेफ्रिजरेटर एवढा होता त्या हार्ड डिस्क ला IBM 305 RAMAC हे नाव दिले गेले. या हार्ड डिस्क क्षमता फक्त 5 mb होती. हि हार्ड डिस्क जून 1956 मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध झाली 

RAMAC (Random Access Method of Accounting And Control) हार्ड डिस्क चा व्यास 2 feet होता व संगणकाच्या तंत्रज्ञानामध्ये हि डिस्क एक महत्त्वाचे पाऊल होते कारण त्यापूर्वी स्टोरेज करण्यासाठी मॅग्नेटिक टेप चा उपयोग केला जात होता.

1961 मध्ये IBM कंपनीद्वारे नवीन हार्ड डिस्क चे निर्माण करण्यात आले व त्याला IBM 1301 हे नाव दिले गेले. या हार्ड डिस्क मध्ये हेड आणि प्लॅटर ला एका पातळ लेयर मध्ये float करण्यात आले ज्यामुळे स्टोरेज density वाढली.

 1973 च्या वर्षी IBM कंपनीद्वारे 3340 Winchester हे हार्ड डिस्क चे मॉडेल बाजारात उतरवण्यात आले. हे एक पहिले sealed हार्ड डिस्क चे मॉडेल होते.

1980 साली IBM कंपनीने पहिले 1GB हार्ड ड्राइव्ह चे निर्माण केले. या हार्ड ड्राईव्ह ची किंमत 40 हजार अमेरिकन डॉलर होती.या hard ड्राईव्ह चे आकारमान एका रेफ्रीजिरेटर एवढे होते.

 1990 मध्ये IBM 0663 corsair या हार्ड डिक्स मार्केट मध्ये आल्या. या हार्ड डिस्क चे मुख्य वैशिष्ट्य हे होते की या हार्ड डिस्क 1 जीबीचे स्टोरेज फक्त आठ मिलिमीटर च्या डिस्क मध्ये समाविष्ट करण्याची क्षमता ठेवत होत्या.

1994-1996 च्या दरम्यान IBM कंपनी एक बिलियन बिट्स प्रत्येक स्क्वेअर इंच वर समाविष्ट करण्यास सक्षम झाली होती.  Seagate cheetah ही हार्ड डिस्क दहा हजार RPM वर कार्य करणारी पहिली हार्ड डिस्क बनली.

 2003 मध्ये Seagate ने पहिल्या serial ATA ड्राईव्ह चे निर्माण केले. याच वर्षी आयबीएम कंपनीने डाटा स्टोरेज डिव्हिजन Hitachi कंपनीला विकले.

हार्ड डिस्क चे प्रकार

 हार्ड डिस्क हे मॅग्नेटिक स्टोरेज प्रणालीवर कार्य करणारे उपकरण आहे व हार्ड डिस्क चे मुख्य पाच प्रकार आहेत –

• Serial Advanced Technology Attachment ( SATA)

 • Parallel Advanced Technology Attachment ( PATA )

• Small Computer System Interface ( SCSI )

• Solid State Drive ( SSD )

• NVM Express

PATA (Parallel Advanced Technology Attachment)

PATA हा हार्ड डिस्क चा सर्वात पहिला प्रकार आहे. या हार्ड डिस्क मधील parallel ATA तंत्रज्ञानाच्या आधारे हि हार्ड डिस्क संगणकाशी जोडली जाते . PATA हार्ड डिस्क ला IDE ड्राईव्ह किंवा EIDE ड्राईव्ह असे देखील संबोधले जाते.

  PATA हार्ड डिस्क चा शोध 1986 मध्ये वेस्टन डिजिटल आणि Compaq Back द्वारे लावला गेला. त्यांनी हार्ड आणि इतर उपकरणांना संगणकाशी सोडण्यासाठी  common drive interface चा उपयोग केला.

PATA हार्ड डिस्क च्या अंतर्गत रचनेमध्ये मेकॅनिकल मोविंग  पार्ट चा उपयोग केला गेला त्यामुळे PATA ची जागा S ATA या सुधारित हार्ड डिस्क च्या प्रणालीने घेतली .

SATA (Serial Advanced Technology Attachment )

SATA चा शोध 2000 मध्ये लागला व या सुधारित तंत्रज्ञानाने PATA ची जागा घेतली. SATA तंत्रज्ञानामध्ये केबल ची संख्या कमी झाली व त्यामुळे किंमत देखील कमी झाली. SATA चे सिग्नल विस्तारित करण्याची गती PATA पेक्षा जास्त आहे.

SATA मध्ये सिग्नल विस्तारित करण्यासाठी सिरीयल सिग्नल प्रणालीचा उपयोग केला जातो. SATA मध्ये 7-पिन डेटा कनेक्शन चा उपयोग केला जातो तसेच यामध्ये PATA च्या तुलनेत कमी विजेची खपत होते.

SCSI ( Small Computer System Interface )

SCSI हार्ड ड्राइव्ह प्रणाली ही काही प्रमाणात IDE ड्राईव्ह प्रमाणे आहे परंतु ही हार्ड ड्राईव्ह Small Computer System Interface च्या आधारे संगणकाशी जोडली जाते. SCSI हार्ड ड्राईव्ह अंतर्गत तसेच बाह्य प्रणालीद्वारे संगणकाशी जोडली जाऊ शकते.

SCSI प्रणाली हि जलद, विश्वासू तसेच 24×7 तास उपयोगासाठी उपयुक्त आहे. SCSI हार्ड ड्राईव्ह चा मुख्य उपयोग सर्वर मध्ये केला जातो.

( SSD ) सॉलिड स्टेट ड्राईव्ह-

SSD मध्ये कोणत्याही प्रकारचे मेकॅनिकल मोविंग पार्ट नसतात त्यामुळे SSD चे आकारमान SATA पेक्षा लहान असते. SSD मध्ये माहिती साठविण्याकरिता फ्लॅश मेमरी टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. फ्लॅश मेमरी टेक्नॉलॉजीचा शोध Fujio Masuoka यांनी 1980 सालि लावला.

SSD चे जास्त आयुष्यमान आणि कमी आकारा मुळे SSD आजच्या तंत्रज्ञानामध्ये सर्वात लोकप्रिय तंत्रज्ञान आहे. SSD च्या मदतीने SSD मधील माहिती जलद गतीने संगणक वापरकर्त्याला उपलब्ध होते त्यामुळे संगणक वापरकर्त्याला कमी response time चा अनुभव होतो परिणामी संगणक कमी विजेचा वापर करत जास्त गतिमान होतो.

हार्ड डिस्क चे भाग / घटक  ( Hard disc parts information in Marathi )

हार्ड डिस्क च्या मदतीने संगणकामध्ये माहिती आणि app डेटा साठी space उपलब्ध केला जातो. हार्ड डिस्क च्या case मध्ये चार मुख्य अंतर्गत भाग आहेत –

Hard drive parts

प्लॅटर – डेटा साठवण्यासाठी उपयुक्त

स्पिंडल – प्लॅटर ला जागेवर गोल फिरवण्यासाठी

Read/Write arm – प्लॅटर वर डेटा लिहण्यासाठी व डेटा वाचण्यासाठी

Actuator – Actuator चा उपयोग Read/Write arm वर नियंत्रण ठेवण्यासाठी होतो.

प्लॅटर

प्लॅटर हार्ड डिस्क मध्ये उपस्थित गोल आकाराच्या डिस्क असतात ज्यामध्ये बायनरी नंबर च्या सहाय्याने माहिती साठवली जाते. प्लॅटर ग्लास, aluminium किंवा सिरॅमिक चे बनलेले असतात ज्यावर मॅग्नेटिक सरफेस ची कोटिंग असते. मॅग्नेटिक surface च्या मदतीने प्लॅटर वर माहिती साठवली जाते.प्लॅटर वर डेटा ट्रॅक, सेक्टर व cylinder वर साठवला जातो ज्यामुळे डेटा शोधन्यास मदत होते.

स्पिंडल – 

स्पिंडल प्लॅटर ला योग्य स्थिती मध्ये ठेवण्यासाठी मदत करतात व गरजेनुसार प्लॅटर ला rotate करतात. स्पिंडल प्लॅटर ला किती RPM वेगाने फिरवू शकते यानुसार हार्ड डिस्क ची कार्य करण्याची क्षमता निर्धारित होते. स्पिंडल च्या मदतीने प्लॅटर मधील माहिती read आणि write करण्याची गती नियंत्रित होते.

Read/ Write Arm –

Read/ Write Arm हा Read/ Write हेड ची हालचाल निर्धारित करत असतो. Read/ Write हेड च्या मदतीने प्लॅटर च्या मॅग्नेटिक पृष्ठभागावर इलेक्ट्रिक करंट च्या मदतीने माहिती लिहिली आणि वाचली जाते. प्रत्येक प्लॅटर साठी प्रत्येकी एक Read/ Write Arm उपयोगात येतो.Read/ Write Arm हा Read/ Write हेड ला योग्य स्थितीत ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

Actuator –

Actuator किंवा हेड Actuator हि एक लहान मोटर असते जी हार्ड डिस्क च्या सर्किट बोर्ड कडून माहिती घेऊन Read/write Arm ला नियंत्रित करत असते व प्लॅटर वरील माहिती प्रसारणाला देखरेख करत असते. Actuator च्या मदतीने read/write हेड प्रत्येक वेळी योग्य ठिकाणी असण्यास मदत होते.

 हार्ड डिस्क कशा प्रकारे काम करते » हार्ड डिस्क ची कार्यप्रणाली  

 जेव्हा आपण संगणकामध्ये कोणतीही फाइल सेव्ह करतो तेव्हा ती फाईल हार्ड डिस्क मध्ये पर्मनंट सेव्ह केली जाते,परंतु तुम्हाला माहीत आहे का सी.पी.यु. मध्ये उपस्थित असलेली  हार्ड डिस्क कशा प्रकारे काम करते ? चला तर मग जाणून घेऊया हार्ड डिस्क ची कार्यप्रणाली.

हार्ड डिक्स मध्ये एक गोल फिरू शकणारी प्लॅटर असते जी स्पिंडल च्या सहाय्याने गोल फिरत असते. प्लॅटर वर मॅग्नेटिक कोटिंग उपस्थित असते. Read / Write arm च्या मदतीने प्लॅटर वर हेड फिरत असतो जो प्लॅटर च्या लहान नॉर्थ – साऊथ भागावर बायनरी नंबर म्हणजेच ‘0’ आणि ‘1’ लिहित असतो.

 प्लेटर वर डाटा लिहिल्यानंतर तो डेटा गरजेनुसार परत वाचण्यासाठी Read / Write हेड सेम स्थानावर परत जातो व नॉर्थ – साऊथ भागाचे पूर्वावलोकन करून तो डेटा परत मिळवतो. ह्या प्रक्रियेसाठी बायनरी नंबर extract केला जातो.

 प्लॅटर वर माहिती लिहिण्याच्या व वाचण्याच्या कार्यावर लक्ष ठेवण्याचे काम Actuator करतो व त्याच्या मदतीने Read/ write आर्म ची हालचाल नियंत्रित केली जाते.

 हार्ड डिस्क निर्माण करणाऱ्या मुख्य कंपनी 

 हार्ड डिस्क निर्माण करणाऱ्या विविध कंपनी मार्केट मध्ये उपलब्ध आहेत, परंतु त्यामधील काही कंपन्यांनी हार्ड डिक्स मार्केटमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. त्या हार्ड डिस्क निर्माण करणाऱ्या मुख्य कंपनी पुढील प्रमाणे  –

• सॅमसंग 

• SanDisk

• Toshiba

• LaCie

• Western Digital

• Kingston Technology

• Seagate Technology 

• Hitachi 

 हार्ड डिस्क ड्राइव्ह  (HDD) आणि सॉलिड स्टेट ड्राईव्ह (SSD) मधील फरक 

गुणधर्म HDD SSD
पूर्ण स्वरूप हार्ड डिस्क ड्राइव्ह सॉलिड स्टेट ड्राईव्ह
आकारमान HDD चे आकारमान जास्त असते. SSD चे आकारमान कमी असते.
वजन HDD चे वजन SSD पेक्षा जास्त असते SSD चे वजन SSD पेक्षा कमी असते
डेटा ट्रान्सफर प्रक्रियेसाठी होणारा विलंब जास्त कमी
पार्ट मेकॅनिकल पार्ट जसे की प्लॅटर, Read/ Write arm इत्यादी फक्त इलेक्ट्रिकल पार्ट उपस्थित असतात जसे की IC ( Integrated circuit )
रिस्पॉन्स टाईम जास्त रिस्पॉन्स टाईम कमी
किंमत कमी जास्त
वापरताना डिस्क चा आवाज होतो का? हो नाही
डेटा साठवण्याचे तंत्रज्ञान मॅग्नेटिक स्टोरेज तंत्रज्ञान फ्लॅश मेमरी तंत्रज्ञान
विश्वसनीयता मेकॅनिकल भाग खराब होण्याचा धोका असतो. SSD हे जास्त विश्वसनीय तंत्रज्ञान आहे.
शोध कधी लागला 1953 मध्ये 1978 मध्ये

  सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ 

 हार्ड डिस्क चा शोध कोणी लावला?

उत्तर – हार्ड डिस्क चा शोध IBM कंपनीच्या इंजिनियर Reynold B. Johnson यांच्या नेतृत्वाखालील टीम ने लावला.

 हार्ड डिस्क चा जनक कोण आहे?

उत्तर – Reynold B. Johnson यांना हार्ड डिस्क चा जनक मानले जाते.

 हार्ड डिस्क शिवाय संगणक कार्य करू शकतो का?

उत्तर – होय, हार्ड डिस्कमध्ये ऑपरेटिंग सिस्टम इनस्टॉल केलेली असते त्यामुळे संगणक सुरू होण्यास मदत होते. परंतु बऱ्याच ऑपरेटिंग सिस्टम आपण पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड किंवा सीडी मध्ये इनस्टॉल करून संगणक सुरू करू शकतो व संगणकाचा उपयोग करू शकतो.

 हार्ड डिस्क ची स्टोरेज क्षमता किती असते?

 उत्तर- हार्ड डिस्कच्या स्टोरेज क्षमतेची रेंज खूप जास्त आहे म्हणजेच हार्ड डिस्क ही काही mb पासून ते काही TB पर्यंत असू शकते.

 बाह्य हार्ड डिक्स म्हणजे काय?

उत्तर – जेव्हा संगणक अपग्रेड न करता आपल्याला urgent स्टोरेज ची गरज असते तेव्हा आपण बाह्य हार्ड डिस्क चा उपयोग करू शकतो. बाह्य हार्ड डिस्क मध्ये आपण अंतर्गत हार्ड  डिस्क प्रमाणे विविध फाईल साठवू शकतो 

 सारांश –

 हार्ड डिस्क हा संगणकाचा खूप महत्त्वाचा हार्डवेअर मेमरी भाग आहे. हार्ड डिस्क मध्ये असलेल्या स्टोरेज मुळे विविध फाईल संगणकामध्ये साठवणे शक्य झाले आहे. हार्ड डिस्क च्या तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहे  कारण काही TB ची मेमरी असलेली हार्ड डिस्क तळहातावर मावणे शक्य झाले आहे. हार्ड डिस्क चे वेगवेगळे प्रकार व मॉडेल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.

 मला आशा आहे तुम्हाला हार्ड विषयी माहिती जाणून घेताना आनंद वाटला असेल. जर तुम्हाला हार्ड डिस्क म्हणजे काय? What is hard disks in Marathi हा लेख आवडला असेल तर हा लेख तुमच्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा.

 जर तुम्हाला या लेखामध्ये काही त्रुटी आढळली असेल किंवा एखादा भाग वगळला गेल्याचा तुमच्या निदर्शनास आले असेल तर आम्हाला कमेंट द्वारे जरूर कळवा.

 तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *