Advertisements

सर्वर म्हणजे काय | what is server in Marathi

Advertisements

 आपण सर्व कायम न्यूजमध्ये ऐकत असतो की काही कंपन्यांचे सर्वर डाऊन झाले आहे, बँकेचे व्यवहार सर्वर डाऊन झाल्यामुळे बंद झाले आहेत. तेव्हा आपल्या मनात स्वाभाविकपणे प्रश्न येतो की सर्वर काय आहे | what is server in Marathi.

 सर्वर डिजिटल युगातील एक महत्वपूर्ण अंग आहे. सर्वर शिवाय आधुनिक जगाच्या इंटरनेटची कल्पना करणे अशक्य आहे त्यामुळेच आपण बहुतेकदा वेगवेगळ्या न्यूज द्वारे सर्वर चा उल्लेख होताना ऐकत असतो.

आपण इंटरनेटवर कोणत्याही वेबसाइटला विजिट करतो तेव्हा ती वेबसाइट सर्वर च्या मदतीने कार्य करत असते. आपल्याला इंटरनेट किंवा वेब वर कोणतेही कंटेंट दिसते त्याच्या मागील विज्ञान आहे सर्वर.

Advertisements
अनुक्रमणिका ↕

 सर्वर म्हणजे काय » what is server in Marathi

 सर्वर हे संगणकाचे प्रोग्रॅम किंवा उपकरण असतात जे संगणकाच्या इतर प्रोग्राम आणि युजर ला सुविधा प्रदान करत असतात. सर्वर वेगवेगळ्या सुविधा प्रदान करण्याचे काम करत असतात जसे की डेटा शेअर करणे, डेटा स्टोअर करणे इत्यादी.

सर्वर म्हणजे काय

 सर्वर स्थानिक तसेच विस्तृत क्षेत्रावर कार्य करणारे नेटवर्क आहे जे डेटा प्रदान करण्याचे कार्य करते. त्यामध्ये लोकल एरिया नेटवर्क (LAN) कमी क्षेत्रात कार्य करते, याउलट वाईड एरिया नेटवर्क (WAN) विस्तृत क्षेत्रात कार्य करते.

 सर्वर नेटवर्क रिसर्च मॅनेजर प्रमाणे देखील कार्य करत असते. म्हणजेच जेव्हा तुम्ही गुगल वर techmiss.in सर्च कराल तेव्हा तुम्हाला हिच वेबसाईट दिसेल ना की एखादी डांस ची वेबसाईट.

 सर्वर चे प्रकार » types of server in Marathi

 सर्वर विषयी परिपूर्ण माहिती घेण्यासाठी आपल्याला सर्वर चे प्रकार माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वर चे वेगवेगळे प्रकार आहेत आणि सर्वर चे तंत्रज्ञान आणि उपयोगानुसार पुढील प्रकार आहेत.

  •  वेब सर्वर
  •  ॲप सर्वर
  •  डेटाबेस सर्वर
  •  FTP सर्वर
  •  फाईल सर्वर
  •  प्रॉक्सी सर्वर
  • जंप सर्वर

 वेब सर्वर 

 वेब सर्वर च्या मदतीने वेबसाईट वरील सर्व माहिती स्टोअर केली जाते व इंटरनेट वापरकर्त्याला त्याच्या request नुसार वेबसाईट वरील माहिती प्रदान करण्यासाठी होतो.

 इंटरनेटवर उपस्थित सर्व वेबसाईट आणि वेब ॲप्लिकेशन  मध्ये वेब सर्वर चा उपयोग केला जातो. जेव्हा इंटरनेट वापरकर्ता एखादे वेब पेज सर्च करत असतो तेव्हा सर्वर वेबसाईट वरील वेब पेज इंटरनेट वापरकर्त्याला दाखवत असतो व जर एखादे वेब पेज उपलब्ध नसेल तर 404 error दाखवत असतो .

 एका वेब सर्वर मध्ये अनेक वेबसाईटचा समावेश असू शकतो त्याचप्रमाणे एक वेबसाईट एकापेक्षा जास्त सर्वर चा उपयोग करु शकते.

 जेव्हा इंटरनेट वापरकर्ता वेबसाईट वर उपस्थित वेब पेज चा शोध घेत असतो तेव्हा सर्वर ला रिक्वेस्ट जाते. तेव्हा सर्वर रिक्वेस्ट चा शोध घेतो आणि इंटरनेट वापरकर्त्याला आवश्यक परिणाम दाखवत असतो. 

 वेब सर्वर ची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी आपण पुढील image चा उपयोग करू या.

वेब सर्वर म्हणजे काय

 वर दिल्या गेलेल्या चित्राची माहिती पुढीलप्रमाणे –

1. रिक्वेस्ट ला एक्सेस करणे

2. डोमेन नेम चा शोध घेणे

3. डोमेन नेम च्या सहाय्याने वेबसाईटवर उपस्थित उपयुक्त माहितीचा शोध घेणे.

 वर दिलेली प्रक्रिया पाहून आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की हे सर्व करण्यासाठी खूप वेळ लागत असेल तर याचे उत्तर आहे नाही हि सर्व प्रक्रिया मात्र दोन ते तीन सेकंदात पूर्ण होते.

 ॲप सर्वर 

 ॲप मध्ये उपस्थित माहिती वर प्रक्रिया करण्यासाठी व ती माहिती ॲप वापरकर्त्याला उपलब्ध करण्यासाठी ॲप सर्वर चा उपयोग होतो. ॲप सर्वर च्या मदतीने युजरला विशिष्ट व्यावसायिक उद्देशाने डायनॅमिक कंटेंट प्रदान केला जातो.  

 ॲप सर्वर ला च ॲप्लिकेशन सर्वर असे देखील म्हटले जाते. ॲप मध्ये दिसणारी सर्व माहिती ॲप सर्वर च्या मदतीने कार्य करत असते. ॲप सर्व चा उपयोग वेगवेगळ्या व्यवसायिक सुविधा तसेच सर्विस प्रधान करण्यासाठी होतो.

 अनेक कंपन्या ॲप सर्वर ची सुविधा प्रदान करत असतात जसे की गुगल चे firebase,आयबीएम कंपनी चे websphere इत्यादी.

 डेटाबेस सर्वर 

 डेटाबेस सर्वर चा उपयोग कस्टमर ची डिटेल स्टोअर करण्यासाठी होतो. डेटाबेस सर्वर च्या मदतीने कस्टमर ची माहिती शोधणे सोपे होते. डेटाबेस सर्वर चा उपयोग मुख्यता ई-कॉमर्स वेबसाईट द्वारे केला जातो.

आपण शॉपिंग वेबसाईट वर जाऊन वेगवेगळे सामान मागवत असतो त्यामुळे आपल्या मनात हा कधीतरी प्रश्न आलाच असेल की या शॉपिंग वेबसाईट ला इतक्या युजर्सची ऑर्डर कस काय लक्षात राहत असेल तेव्हा इथेच कार्य करत असतो डेटाबेस सर्वर.

 डेटाबेस सर्व च्या मदतीने ई-कॉमर्स वेबसाइट ला कस्टमर ची डिटेल, कस्टमर ची ऑर्डर तसेच इतर माहिती वेगवेगळी ठेवणे सोपे झाले आहे त्यामुळे डेटाबेस सर्वर ई-कॉमर्स वेबसाइट ला कार्य करणे अशक्य आहे.

 डेटाबेस सर्वर ची सुविधा उपलब्ध करणाऱ्या कंपनी – hostgator, A2 hosting,site ground इत्यादी 

FTP सर्वर विषयी माहिती

FTP चे पूर्ण स्वरूप आहे फाईल ट्रांसफर प्रोटोकॉल. FTP सर्वर इंटरनेट वापरकर्त्याला फाईल डाऊनलोड करणे आणि फाईल अपलोड करण्याची सुविधा प्रदान करतात. FTP सर्वर च्या मदतीने इंटरनेट वापरकर्ता आणि सर्वर च्या दरम्यान फाईल ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे.

 जेव्हा आपण आपली वेबसाइट इंटरनेटवर कार्यान्वित करत असतो तेव्हा आपल्याला वेब सर्वर ची गरज असते व त्यासाठी आपण होस्टिंग ची मदत घेत असतो. जेव्हा आपल्याला वेबसाईट मध्ये थोड्याफार प्रमाणात बदल करायचा असतो तेव्हा आपण डायरेक्ट वेब सर्वर च्या मदतीने तो करू शकतो.

जर आपल्याला जर दररोज आपल्या वेबसाईटवर काही माहिती प्रकाशित करायची असेल तर वेब सर्वर च्या मदतीने हि प्रक्रिया करणे किचकट बनते त्यासाठी वेब सर्वर च्या जोडीला FTP सर्वर ची मदत घेतली जाते.

FTP सर्वर चा उपयोग करण्यासाठी आपल्याला client सॉफ्टवेअरची गरज असते ज्याद्वारे आपण सर्वर मध्ये फाईल अपलोड करू शकतो तसेच फाईल l डाऊनलोड करू शकतो.

FTP सर्वर चे उदाहरण – filezilla, WinSCP, Coffeecup free FTP

 प्रॉक्सी सर्वर ( proxy server )

  संगणकांमध्ये प्रॉक्सी सर्वर चा उपयोग आपली ओळख लपवून वेगवेगळ्या वेबसाईट, वेब पेज किंवा विविध ॲपचा उपयोग करण्यासाठी होतो. प्रॉक्सी सर्वर क्लाइंट आणि रिसोर्स मध्ये मध्यस्थीची भूमिका पार पडत असतात. 

प्रॉक्सी सर्वर

 प्रॉक्सी सर्वर चा उपयोग इंटरनेट वापरकर्ता आणि इंटरनेट मध्ये ब्रिज सारखा केला जातो, म्हणजेच क्लाइंट ने पाठवलेल्या सर्व रिक्वेस्ट पहिल्यांदा प्रॉक्सी सर्वर कडे जातात त्यानंतर त्या रिक्वेस्ट रिसोर्स कडे पाठवल्या जातात व रिसोर्स  चा प्रतिसाद प्रॉक्सी सर्वर द्वारे क्लाइंट ला कळवला जातो.

 प्रॉक्सी सर्वर ची उदाहरणे – वेब प्रॉक्सी सर्वर, CGI प्रॉक्सी सर्वर.

  जंप सर्वर (Jump Server)

 वेगवेगळ्या सुरक्षा श्रेणीतील उपकरणांना जोडण्यासाठी व त्यांचा उपयोग करण्यासाठी जंप सर्वर चा उपयोग होतो. जंप सर्वर वेगवेगळ्या सुरक्षा श्रेणीमध्ये असणाऱ्या उपकरणांमध्ये ब्रिजचे कार्य करतो.

जंप सर्वर च्या मदतीने दोन उपकरणे वेगवेगळ्या सुरक्षा श्रेणित असूनही त्या उपकरणांमध्ये चांगला समन्वय साधून त्यांच्यावर नियंत्रण केले जाते व त्या उपकरणांचा उपयोग केला जातो.

 सर्वर कशा प्रकारे काम करते

 जेव्हा इंटरनेट वापरकर्ता इंटरनेटवर कोणत्याही गोष्टीचा शोध घेत असतो तेव्हा इंटरनेट कडून सर्वर कडे इनपुट च्या स्वरूपात डेटा पाठवला जातो व सर्वर त्या डेटा वर प्रक्रिया करून आउटपुट च्या स्वरूपात तो डेटा इंटरनेट वापरकर्त्याला दाखवत असतो.

 अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाची मदत करूया – जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की, सर्वर म्हणजे काय हा लेख मी एका सर्वर वर अपलोड केला आहे.

जेव्हा तुम्ही इंटरनेटवर सर्वर म्हणजे काय techmiss असे सर्च कराल तेव्हा तुम्हाला हा लेख दिसेल म्हणजेच, इंटरनेट तुमच्याकडून सर्वर म्हणजे काय techmiss हि माहिती इनपुट च्या स्वरुपात घेईल व ती माहिती माझ्या सर्वर कडे पाठवेल व माझा सर्वर त्या माहितीवर प्रक्रिया करून हा लेख तुम्हाला दर्शवेल व तुम्ही या लेखाचा आनंद घेऊ शकाल अधिक माहितीसाठी आपण पुढील इमेज ची मदत घेऊया.

सर्वर कशा प्रकारे काम करते

 सर्वर चे हार्डवेअर पार्ट

 सर्वर हा एक संगणकाचा प्रकार आहे जो इंटरनेट वापरकर्त्या कडून इनपुट च्या स्वरूपात माहिती घेतो व त्यावर प्रक्रिया करून इंटरनेट वापरकर्त्याला आउटपुट दाखवत असतो. या प्रक्रियेसाठी सर्वर चे वेगवेगळे हार्डवेअर पार्ट किंवा भाग आहेत त्यातील काही महत्त्वाचे पुढील प्रमाणे 

 मदरबोर्ड –

 मदरबोर्ड इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आहे ज्यामध्ये सर्वर च्या महत्त्वपूर्ण भागांचा समावेश होतो जसे की सीपीयू, प्रोसेसर इत्यादी. मदरबोर्ड संगणकाचे विविध भाग एकमेकांना जोडून ठेवण्याचे काम करतो.

 प्रोसेसर

 सर्वर ची सर्व कार्य प्रणाली प्रोससर च्या मदतीने होत असते त्यामुळे प्रोसेसर हा सर्वर चा मेंदू आहे. प्रोसेसर शिवाय सर्वर ला कार्य करणे अशक्य आहे. प्रत्येक मदरबोर्ड ची रचना अशा प्रकारे केलेली असते की तो विशिष्ट प्रकारच्या प्रोसेसर ला सहयोग करू शकेल.

 मेमरी –

 सर्वर मध्ये जितके जास्त मेमरी असेल तितकेच जास्त स्टोरेज वाढेल व त्यामुळे सर्वर ची कार्यक्षमता सुधारेल. सर्वर ची मेमरी डेटा साठवण्याचे कार्य करते व आवश्यकतेनुसार तो डेटा इंटरनेट वापरकर्त्याला उपलब्ध करते.संगणकाच्या प्राथमिक मेमरी मध्ये रॅम आणि रोम चा समावेश होतो.

 सर्वर डाऊन का होते

 जेव्हा विविध कारणांमुळे सर्वर कार्य करण्याचे बंद होते तेव्हा त्या स्थितीला आपण सर्वर डाऊन होणे म्हणत असतो. सर्वर डाऊन होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात त्यातील काही कारणे पुढीलप्रमाणे –

• जेव्हा सर्वर ला देण्यात येणारा हा वीजपुरवठा खंडित होतो तेव्हा वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत सर्वर चे कार्य करण्याचे बंद होते व त्यामुळे त्या काळाकरिता सर्वर डाऊन होते .

• जेव्हा सर्वर ला नेटवर्क प्रदान करणारी केबल खराब होते किंवा अतिरिक्त ऊर्जेमुळे सर्वर चे नेटवर्क प्रणाली मधील काही उपकरण कार्य करण्याचे बंद होतात तेव्हा त्या स्थितीमध्ये सर्वर उचित नेटवर्कला जोडला जाऊ शकत नाही त्यामुळे त्या स्थितीमध्ये सर्वर डाऊन होते.

• जेव्हा सर्वर मधील ऑपरेटिंग सिस्टिम चांगल्या प्रकारे कार्य करत नाही तेव्हा सर्वर च्या अंतर्गत प्रणालीमध्ये बिघाड होतो व सर्वर कार्य करण्याचे बंद होते परिणामी आपण त्याला सर्वर डाऊन झाले म्हणू शकतो.

• जेव्हा सर्वर मधील मेमरी स्टोरेज पूर्णपणे भरते तेव्हा सर्वर मध्ये अतिरिक्त मेमरी च्या कमतरतेमुळे सर्वर वर लोड येऊन सर्वर क्रॅश होते 

• जेव्हा सर्वर च्या सॉफ्टवेअरमध्ये काही प्रमाणात त्रुटी निर्माण होतात किंवा काही bug निर्माण होतात तेव्हा सर्वर च्या हार्डवेअर भागाचे कार्य करण्याची क्षमता बिघडते व परिणामी सर्वर डाऊन होतो.

• जेव्हा काही मानवी चुकांमुळे जसे की चुकून काहीच स्विच ऑफ करणे, नेटवर्क किंवा विजेचे बिल न भरणे इत्यादी कारणांमुळे सर्वर ची कार्यक्षमता बिघडते तेव्हा देखील सर्वर क्रॅश होतो.

 सर्वर चा उपयोग › advantages of server in Marathi

  • सर्वरला विविध संगणक जोडले जाऊ शकतात व ते संगणक सर्वर मधील माहितीचा आवश्‍यकतेनुसार उपयोग करू शकतात.
  •  सर्वर 24×7 तास चालू असतात त्यामुळे सर्वर मधील माहितीचा उपयोग आपण केव्हाही इंटरनेट द्वारे करू शकतो.
  •  सर्वर मधील डेटा हा सुरक्षित असतो म्हणजेच तो डेटा हरवण्याचे किंवा चोरी होण्याचे प्रमाण कमी असते.
  •  सर्वर मध्ये स्टोरेज क्षमता ही सामान्य संगणकापेक्षा खूप जास्त असते त्यामुळे सर्वर मध्ये मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर केला जाऊ शकतो.
  •  सर्वर मध्ये सामान्य संगणकापेक्षा अधिक गुणवत्तेच्या भागांचा उपयोग केलेला असतो त्यामुळे सर्वर हे स्टोरेज साठी व इतर कार्यासाठी जास्त विश्वसनीय असतात.
  •  सर्वर च्या अधिक क्षमतेमुळे सर्वर चा एकाच वेळेस अनेक व्यक्ती उपयोग करु शकतात.

सर्वात  जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ

होम सर्वर म्हणजे काय?

उत्तर – जेव्हा सर्वर चा उपयोग घरामध्ये किंवा कमी कार्यक्षेत्रामध्ये केला जातो तेव्हा त्या सर्वर ला होम सर्वर असे म्हणतात. होम सर्वर मध्ये ग्लोबल सर्वर च्या तुलनेत कमी क्षमतेच्या उपकरणांचा उपयोग केलेला असतो.

जेव्हा सर्वर चा उपयोग फक्त काही घरापुरता किंवा एखाद्या बिल्डिंग पुरता केलेला असतो तेव्हा त्या सर्वर ला होम सर्वर असे म्हणता येईल.

 सांबा सर्वर म्हणजे काय?

उत्तर – सांबा सर्वर हे एक मुक्त प्रणाली सॉफ्टवेअर आहे ज्याचे निर्माण Andrew Tridgell यांनी केले आहे . सांबा सर्वर चा उपयोग अनेक ऑपरेटिंग सिस्टम मध्ये केला जातो ज्यामध्ये विंडोज आणि लिनक्स चा समावेश होतो.

 सांबा सर्वर च्या मदतीने विविध ऑपरेटिंग सिस्टम मध्ये फाइल्सची देवाण-घेवाण केली जाते.

 सर्वर मधील ऑपरेटिंग सिस्टिम कोणत्या आहेत?

 उत्तर – सर्वर मध्ये वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टम चा उपयोग होतो त्यामधील काही महत्त्वाच्या ऑपरेटिंग सिस्टिम पुढील प्रमाणे –

👉 Unix operating system

👉 linux operating system

👉 Windows operating system

👉 Netware operating system

 सर्वर विषयी थोडक्यात माहिती / सारांश

 सर्वर हे एक हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर भाग असतात ज्यांच्या मदतीने संगणक वापरकर्त्याने पाठवलेल्या माहितीवर इंटरनेटच्या मदतीने प्रक्रिया करून आवश्यक परिणाम दाखवले जातात. सर्वर चे उपयोगानुसार आणि गुणधर्मानुसार वेगवेगळे प्रकार आहेत जसे की वेब सर्वर, ॲप सर्वर 

 सर्वर च्या निर्मिती साठी वेगवेगळ्या भागांचा समावेश होतो जसे की मदरबोर्ड, प्रोसेसर, मेमरी इत्यादी. सर्वर मुळे इंटरनेटवर वेगवेगळे कार्य पूर्ण केले जातात त्यामुळे सर्वर इंटरनेटचे मुख्य अंग बनले आहे.

 मला आशा आहे सर्वर विषयी माहिती जाणून घेताना तुम्हाला नक्कीच आनंद वाटला असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर सर्वर म्हणजे काय what is server in Marathi हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर जरूर शेअर करा व या लेखांमध्ये काही त्रुटी असेल तर टिपणी द्वारे आम्हाला जरूर कळवा. तुमचा प्रत्येक आम्हाला प्रोत्साहित करत असतो.

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *