संगणकामध्ये विविध डॉक्युमेंट्स साठवण्यासाठी स्कॅनर चा उपयोग केला जातो त्यामुळे आजच्या या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया स्कॅनर ची माहिती – Scanner information in Marathi.
संगणकाचे विविध भाग संगणकाला नाविन्यपूर्ण बनवत असतात व याच भागांमध्ये स्कॅनर महत्त्वाची भूमिका निभावत असतो. स्कॅनरच्या मदतीने डॉक्युमेंट ला आपण डिजिटल स्वरूपात साठवू शकतो.
संगणकामध्ये विविध दस्तऐवजांची सॉफ्ट कॉपी साठविण्यास मदत करणाऱ्या स्कॅनर ची माहिती पुढील प्रमाणे –
अनुक्रमणिका ↕
स्कॅनर ची माहिती – Scanner information in Marathi
स्कॅनर म्हणजे Documents किंवा Picture च्या हार्ड कॉपी चे रूपांतर सॉफ्ट कॉपी मध्ये करणारे उपकरण आहे. स्कॅनरच्या मदतीने कोणत्याही भौतिक वस्तू ची डिजिटल आवृत्ती संगणकामध्ये साठवणे सोपे होते. स्कॅनर ला संगणकाचे इनपुट उपकरण म्हणून ओळखले जाते.
आपण स्कॅनर च्या साहाय्याने स्कॅन केलेले डॉक्युमेंट संगणक मध्ये बघू शकतो, साठवू शकतो तसेच त्यात बदल करू शकतो. आपण scanner च्या मदतीने स्कॅन केलेले डॉक्युमेंट physical documents पेक्षा जास्त वर्षे सुरक्षित ठेवू शकतो.
जेव्हा डॉक्युमेंट स्कॅन करायचे असते तेव्हा डॉक्युमेंट चे रूपांतर डिजीटल सिग्नल मध्ये केले जाते व नंतर या डॉक्युमेंट च्या इलेक्ट्रॉनिक वर्जन वर स्कॅनिंग ची प्रक्रिया पूर्ण केली जाते. स्कॅनर चे तंत्रज्ञानानुसार वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.
स्कॅनर चे प्रकार
तंत्रज्ञानाच्या युगात वेगाने सुधारणा होत आहेत व याच बदलत्या तंत्रज्ञानाचा भाग असलेला स्कॅनर वेगवेगळ्या आकारात तसेच वेगवेगळ्या तंत्रज्ञानात उपलब्ध आहे त्यामुळे आपले महत्वपूर्ण documents किंवा picture संगणकामध्ये साठविण्याकरिता स्कॅनर चे पुढील प्रकार उपयोगात येतील –
स्कॅनर चे प्रकार (types of Scanner in Marathi)
• ड्रम स्कॅनर (Drum Scanner)
• फ्लॅटबेड स्कॅनर (Flatbed Scanner)
• हँडहेल्ड स्कॅनर (Handheld Scanner)
• बुक स्कॅनर (Book scanner)
• 3D स्कॅनर
• शीट-फेड स्कॅनर (Sheet-fed scanner)
• बारकोड स्कॅनर (QR / Bar Code Scanner)
• ड्रम स्कॅनर (Drum Scanner)
ड्रम स्कॅनर मध्ये फोटो मल्टिप्लायर ट्युब चा उपयोग केलेला असतो. हि ट्यूब लाईट सेन्सिटिव्ह असते त्यामुळे ड्रम स्कॅनरच्या मदतीने चांगले रिझोल्यूशन, शार्पनेस आणि डिटेल असलेली डिजिटल इमेज आपल्याला मिळते.
ड्रम स्कॅनर चा उपयोग कोणत्याही डॉक्युमेंट ला स्कॅन करून जास्त रिझोल्यूशन च्या इमेज स्वरूपात साठवण्यासाठी होतो त्यामुळे ड्रम स्कॅनर ची किंमत थोडी जास्त असते व काही निवडक कंपन्यांच ड्रम स्कॅनर निर्माण करतात.
• फ्लॅटबेड स्कॅनर (Flatbed Scanner)
फ्लॅटबेड स्कॅनर मध्ये कोणत्याही डॉक्युमेंट च्या स्कॅनिंग साठी ते डॉक्युमेंट स्कॅनर च्या काचेवर ठेवले जाते व काचेच्या वरील झाकण बंद करुन के स्कॅनिंग प्रक्रिया पूर्ण केली जाते. फ्लॅटबेड स्कॅनर च्या मदतीने डॉक्युमेंट वरील सर्व घटक जसे की चित्र, अक्षरे, graphics इत्यादी capture केले जातात. फ्लॅटबेड स्कॅनर ला ऑप्टिकल स्कॅनर म्हणून ओळखले जाते.
फ्लॅटबेड स्कॅनर घर तसेच कार्यालयांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे स्कॅनर आहेत. फ्लॅटबेड स्कॅनर च्या मदतीने फक्त एका बटनाच्या क्लिक वर कोणतेही डॉक्युमेंट स्कॅन केले जाऊ शकते. काही फ्लॅटबेड स्कॅनर मध्ये Automatic Documents Feeder ची सुविधादेखील उपलब्ध असते.
• हँडहेल्ड स्कॅनर (Handheld Scanner)
हँडहेल्ड स्कॅनरच्या मदतीने आपण कोणतेही भौतिक स्वरुपातील डॉक्युमेंट आपण साठवू शकतो, त्यात बदल करू शकतो तसेच ते शेअर करू शकतो. जेथे जागेची कमतरता आहे अशा ठिकाणी हँडहेल्ड स्कॅनर चा उपयोग केला जातो.
हँडहेल्ड स्कॅनर ची किंमत flatbed स्कॅनर च्या तुलनेत कमी असते तसेच हँडहेल्ड स्कॅनरच्या मदतीने कोणतेही मोठे डॉक्युमेंट आपण स्कॅन करू शकतो. हँडहेल्ड स्कॅनर चा चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी आपल्याला हँडहेल्ड स्कॅनर वापराचा अनुभव असणे गरजेचे आहे.
• बुक स्कॅनर (Book scanner)
बुक स्कॅनर मध्ये V आकाराच्या रचनेवर पुस्तक ठेवले जाते व दोन ओव्हरहेड कॅमेरा दोन्ही बाजूचे पेजेस स्कॅन करत असतात.स्कॅनिंग ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्कॅन केलेल्या पेजेस वर प्रक्रिया करून ते पेजेस PDF फॉरमॅटमध्ये साठवले जातात.
बुक स्कॅनर च्या मदतीने आपण कोणतेही पुस्तक जलदगतीने स्कॅन करून ते संगणकामध्ये साठवून ठेवू शकतो. बुक स्कॅनरच्या मदतीने स्कॅन केलेले पुस्तक त्यावरील पेज नंबर च्या क्रमात साठवले जाते.
• 3D स्कॅनर
3D स्कॅनरच्या मदतीने आपण वास्तव जगातील कोणत्याही object ची अचूक स्कॅनिंग करू शकतो. 3D स्कॅनिंग प्रक्रिया हि नॉन कॉन्टॅक्ट, नॉन destructive प्रक्रिया आहे. 3D स्कॅनर कोणत्याही वस्तूचे अचूक आकारमान व साईज मोजतो व त्याचे रूपांतर संगणकामध्ये 3D रचनेमध्ये करत असतो. 3D रचनेमुळे कोणतेही ऑब्जेक्ट अधिक चांगल्या प्रकारे समजणे सोपे झाले आहे.
• शीट-फेड स्कॅनर (Sheet-fed scanner)
शीट-फेड स्कॅनर चा उपयोग loose असलेल्या डॉक्युमेंट चे रूपांतर डिजिटल स्वरूपात करण्यासाठी होतो. शीट-फेड ला Automatic Document Scanner किंवा ADF म्हणून ओळखले जाते. शीट-फेड स्कॅनर चा उपयोग व्यवसायिक कार्यालयांमध्ये डॉक्युमेंट्स स्कॅनिंग साठी उपयोग होतो. शीट-फेड स्कॅनर चा उपयोग पुस्तक अन्य निगडित वस्तू स्कॅन करण्यासाठी होत नाही.
• बारकोड स्कॅनर (QR / Bar Code Scanner)
बारकोड स्कॅनर इनपुट च्या स्वरूपात बारकोड वरील माहिती घेऊन त्या माहितीला डीकोड करण्यासाठी उपयोगात येतात. बारकोड स्कॅनर बारकोड रेषांला ब्लॉक करून त्यामधील space ला कॅप्चर करून स्कॅनिंग ची प्रक्रिया पूर्ण करत असतात.
बारकोड स्कॅनर ला POS स्कैनर म्हणून ओळखले जाते. बारकोड स्कॅनर च्या मदतीने ऑप्टिकल impulse चे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये केले जाते. बारकोड स्कॅनर चा उपयोग विविध व्यवसायांमध्ये व दुकानांमध्ये वस्तू ओळखण्यासाठी उपयोगात येतात.
स्कॅनर कसे काम करते ?
स्कॅनर मध्ये charged coupled device (CCD) चा उपयोग केलेला असतो जे लाईट च्या मदतीने डॉक्युमेंट चे रूपांतर इलेक्ट्रिक चार्ज मध्ये करते व त्याद्वारे संगणकावर डिजीटल डेटा पाठवून इमेज ची सॉफ्ट कॉपी निर्माण करण्याचे काम करते.
जेव्हा आपण स्कॅनरचमध्ये डॉक्युमेंट स्कॅन होताना बघत असतो तेव्हा आपल्याला स्कॅनर मध्ये लाईट दिसते ही लाईट मेथोड लॅम्प किंवा xenon lamp च्या माध्यमातून प्राप्त होत असते.
जेव्हा डॉक्युमेंट वर लाईट पडते तेव्हा ती लाईट विविध आरशांच्या series मधून पास केले जाते व या लाईट चा फोकस हा CCD वर केंद्रित केलेला असतो. CCD त्याला मिळालेल्या लाईट चे रूपांतर इलेक्ट्रिक चार्ज मध्ये करते व त्यामार्फत डिजीटल डेटा चे निर्माण करून स्कॅनिंग ची प्रक्रिया पुर्ण करते.
डॉक्युमेंट वर अक्षरे तसेच चित्रांचा समावेश केलेला असतो जे सफेद पृष्ठभागापेक्षा कमी लाईट परावर्तित (reflect) करतात त्यामुळे संगणकामध्ये अचूक इमेज चे निर्माण होण्यास मदत होते.
कधी कधी आपण डॉक्युमेंट व्यतिरिक्त इतर object ची स्कॅनिंग करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला चूक इमेज प्राप्त होत नाही कारण तिथे लाईट reflection चे कार्य चांगल्या प्रकारे होत नाही.
जेव्हा एखाद्या कलर डॉक्यूमेंट ची स्कॅनिंग केले जाते तेव्हा लाईट फिल्टर आणि लेन्स च्या मदतीने लाल, हिरव्या आणि निळ्या रंगात विभागनी केली जाते ज्यावर नंतर प्रक्रिया करून संगणकामध्ये कलर इमेज प्राप्त होते. स्कॅनर च्या कार्यप्रणाली मध्ये सॉफ्टवेअर आणि स्कॅनर डिवाइस ड्रायव्हर महत्त्वाची भूमिका निभावत असतात.
स्कॅनर चा उपयोग
1. स्कॅनरच्या मदतीने आपण विविध चित्रे तसेच diagram च्या हार्ड कॉपी स्कॅन करून संबंधित सॉफ्ट कॉपी संगणकामध्ये साठवून ठेवू शकतो.
2. स्कॅनरच्या मदतीने आपण विविध डॉक्युमेंट स्कॅन करू शकतो.
3. जेव्हा आपल्याला विविध पुस्तकांतील माहिती एकत्र साठवून ठेवायचे असते तेव्हा आपण स्कॅनरच्या मदतीने हे कार्य पूर्ण करू शकतो.
4. विविध फॉर्म भरण्यासाठी आपल्याला डॉक्यूमेंट ची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागते अशावेळेस उत्तम गुणवत्तेच्या सोफ्ट कॉपी प्राप्तीसाठी आपण स्कॅनर ची मदत घेऊ शकतो.
5. जेव्हा आपल्याला एखादे डॉक्युमेंट जास्त लोकांपर्यंत पाठवायचे असते तेव्हा हार्ड कॉपी च्या माध्यमातून एक करणे शक्य नसते. अशा वेळेस आपण डॉक्युमेंट्स स्कॅन करून एकाच वेळेस हजारो लोकांपर्यंत डॉक्युमेंट पोहोचवू शकतो.
सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न | FAQ
स्कॅनर चा शोध कधी लागला?
उत्तर – स्कॅनर चा शोध 1957 मध्ये लागला व हा स्कॅनर होता ड्रम स्कॅनर.
स्कॅनर चा जनक कोण आहे ?
उत्तर – Russell Kirsch यांनी जगातील पहिल्या डिजिटल इमेज स्कॅनर चा शोध लावला म्हणून Russell Kirsch यांना स्कॅनर चा जनक म्हटले जाते.
स्कॅन म्हणजे काय?
उत्तर – स्कॅन करणे म्हणजे एखाद्या object चे रूपांतर डिजिटल स्वरूपात करणे. स्कॅन केलेल्या object ची सॉफ्ट कॉपी संगणकामध्ये साठवली जाते ज्यामुळे object चे अधिक चांगले विश्लेषण करणे सोपे होते.
स्कॅनर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे?
उत्तर – स्कॅनर हे संगणकाचे हार्डवेअर इनपुट उपकरण आहे. स्कॅनर हे कीबोर्ड प्रमाणे संगणकाच्या बाहेरील क्रिया संगणकामध्ये मॉनिटर च्या सहाय्याने दाखवण्यास मदत करते.
स्कॅनर मध्ये कोणत्या भागांचा समावेश होतो?
उत्तर -स्कॅनर चे वेगवेगळे प्रकार उपस्थित आहे परंतु प्रत्येक स्कॅनर मध्ये काही मूलभूत भागांचा समावेश केलेला असतो ते पुढील प्रमाणे –
1. Charge Coupled Device (CCD)
2. आरसे (mirror)
3. लॅम्प
4. Filter
5. Scan head
6. Power supply
7. Connecting port
स्कॅनर आणि प्रिंटर मध्ये काय फरक आहे ?
उत्तर – स्कॅनर हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे जे सॉफ्ट कॉपी चे निर्माण करते या उलट प्रिंटर हे संगणकाचे आऊटपुट उपकरण आहे जे हार्ड कॉपी चे निर्माण करते.
सारांश / conclusion
मला आशा आहे तुम्हाला स्कॅनर म्हणजे काय – Scanner information in Marathi या लेखाद्वारे स्कॅनर ची माहिती असेल. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख नक्की शेअर करा व या लेखात काही त्रुटी आढळल्या तर नक्कीच कमेंट करा.
आपला दिवस शुभ असो, धन्यवाद…