Advertisements

Printer ची माहिती – Printer information in Marathi

Advertisements

आपण संगणकाचे विविध भाग कोणते आहे त्याबद्दल विचार करतो तेव्हा नकळत आपल्या पुढे एक नाव येते ते म्हणजे प्रिंटर, त्यामुळे या लेखाद्वारे आपण प्रिंटर म्हणजे काय ( what is printer in Marathi ) विषयी माहिती जाणून घेऊया.

आपण संगणक मधील वेगवेगळ्या डॉक्युमेंट च्या हार्ड कॉपी साठी प्रिंटर चा उपयोग करत असतो. परंतु तुम्हाला माहित आहे का प्रिंटरचा शोध कोणी लावला ? प्रिंटरला संगणकाला जोडण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहे ?

तसेच जेव्हा आपण मार्केटमध्ये प्रिंटर खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा प्रिंटर चे वेगवेगळे प्रकार उपस्थित असतात त्यामुळे जर आपल्याला प्रिंटर ची माहिती नसेल तर आपल्याला अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

Advertisements

म्हणूनच या लेखाद्वारे आपण प्रिंटर विषयी माहिती जाणून घेऊया –

अनुक्रमणिका ↕

प्रिंटर म्हणजे काय ( what is printer in Marathi )

What is printer in Marathi

प्रिंटर हे संगणकाचे हार्डवेअर आऊटपुट उपकरण आहे . प्रिंटर चा उपयोग संगणकामधील डॉक्युमेंट (सॉफ्ट कॉपी) चे रूपांतर हार्ड कॉपी मध्ये करण्यासाठी होतो. आपण प्रिंटरला संगणकाला जोडून संगणकामधील चित्रे, अक्षरे किंवा दोन्ही कागदावर छापू शकतो.

संगणकामध्ये च्या हार्ड डिस्क तसेच मेमरी मध्ये साठवलेल्या माहितीला सॉफ्ट कॉपी म्हणून संबोधले जाते व जेव्हा हि माहिती कोणत्याही भौतिक वस्तूवर printer च्या माध्यमातून छापली जाते तेव्हा त्या माहितीला हार्ड कॉपी म्हटले जाते.

काही प्रिंटरच्या माध्यमातून फक्त black and white हार्ड कॉपीचे निर्माण केले जाते तर काही अत्याधुनिक प्रिंटरच्या माध्यमातून कलर फोटो च्या हार्ड कॉपी चे निर्माण केले जाते. काही घरगुती उपयोगाच्या प्रिंटर मधून चांगल्या प्रतीच्या हार्ड कॉपी चे निर्माण केले जाते कारण यामध्ये जास्त dots per inch सेटिंग चा उपयोग केला जातो.

संगणकामधील सॉफ्ट कॉपी चे रूपांतर हार्ड कॉपी मध्ये करण्यासाठी संगणकामधील माहितीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रिंटर पर्यंत पोहोचवणे गरजेचे असते व यासाठी विविध सॉफ्टवेअर चा उपयोग केला जातो.

प्रिंटर चा इतिहास 

वर्ष घटना
1837 Charles Babbage यांनी जगातील पहिल्या मेकॅनिकल प्रिंटर चे निर्माण 1837 मध्ये केले.
1868 Christopher Sholes यांनी 1868 मध्ये typewriter चा शोध लावला. Typewriter ला कीबोर्ड आणि प्रिंटर चा Ancestor मानले जाते.
1957 IBM कंपनीने 1970 मध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर चा शोध लावला व त्याची विक्री केली.
1971 xerox कंपनीमध्ये काम करत असताना Gary Starkweather यांनी Xerox model 7000 copier मध्ये सुधारणा करत 1971 मध्ये पहिल्या लेझर प्रिंटर चा शोध लावला.
1976 Hewlett-Packard यांनी 1976 मध्ये inkjet printer चा शोध लावला.
1977 Siemens ने पहिल्या drop-on-demand inkjet printer चे 1977 मध्ये निर्माण केले.
1988 खूप साऱ्या 3-D प्रिंटर मध्ये उपयोगात येणाऱ्या FDM तंत्रज्ञानाचा S. Scott Crump यांनी शोध लावून पेटंट घेतले.
2009 2009 मध्ये S. Scott Crump यांचे FDM तंत्रज्ञानाचे पेटंट संपुष्टात आले त्यामुळे अनेक ओपन सोर्स कंपन्यांनी FDM चा उपयोग करून 3-D प्रिंटर मध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली.

प्रिंटरची गरज 

पेपरलेस घर तसेच ऑफिस बनवण्याचे स्वप्न अनेक वर्षांपासून पाहिले जात आहे तरी पण आपण पेपर आणि प्रिंटरचा वापर मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळेच आपण प्रिंटर ची गरज समजून घेतली पाहिजे.

1. घरगुती किंवा छोट्या स्केलवर उपयोगासाठी प्रिंटर आणि पेपर ची किंमत ही हार्ड ड्राइव्ह किंवा क्लाउड स्टोरीज पेक्षा कमी असते.

2. वेगवेगळ्या ठिकाणी जसे की बँक शाळा इत्यादी ठिकाणी आपल्याला डॉक्यूमेंट ची हार्ड कॉपी सबमिट करावे लागते अशा वेळेस प्रिंटर ची मदत होते.

3. प्रिंटर च्या मदतीने डॉक्युमेंट चांगल्या प्रकारे छापले जातात त्यामुळे आपण डॉक्युमेंट वर मार्क करू शकतो, चांगल्याप्रकारे वाचू शकतो.

4. सतत संगणकाचा उपयोग केला तर आपल्याला डोळ्यांचा त्रास वाढू शकतो त्यामुळे आपण प्रिंटरच्या मदतीने प्रिंट काढून मोठे डॉक्युमेंट वाचू शकतो.

5. प्रिंटर चा उपयोग आपण विविध डिजिटल माध्यमं बरोबर करू शकतो जसे की आपल्याला एखाद्या डॉक्युमेंट वर सही करून पाठवायचे असेल तर आपण त्याची प्रिंटरच्या मदतीने प्रिंट काढून ई-मेल किंवा व्हाट्सअप च्या मदतीने संबंधित डॉक्युमेंटची सॉफ्ट कॉपी पाठवू शकतो.

6. आता डिजिटल मार्केटिंग चा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असला तरी विविध मार्केटिंगसाठी प्रिंटर ची गरज लागते जसे की विजिटिंग कार्ड ची छपाई करणे, बॅनर निर्माण करणे.

7. घरगुती उपयोगासाठी प्रिंटर्स मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो काही लोकांना मोबाईल किंवा संगणकामध्ये फोटो बघायला आवडत नाहीत असे व्यक्ती फोटो अल्बम चे निर्माण करून फोटो च्या हार्ड कॉपी बघत असतात.

प्रिंटर चे भाग

प्रिंटर ला सुरळीतपणे कार्य करण्यासाठी काही सामान्य प्रिंटरचे भाग आवश्यक असतात ते पुढीलप्रमाणे –

• प्रिंटर कवर

• पेपर सपोर्ट

• Sheet feeder

• Output tray

• Output tray Extension

• कनेक्टर

• कंट्रोल बटन

• Cartridge cover

• प्रिंट हेड

• Edge guide

• प्रिंटर कवर

प्रिंटर मधील सर्व भौतिक भागांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रिंटर कवर ची मदत होते.प्रिंटर कव्हर च्या मदतीने प्रिंटर मधील भाग हे धुळीपासून दूर राहतात तसेच प्रिंटर चा युजर हा प्रिंटर च्या अपघातापासून दूर राहण्यास मदत होते.

• पेपर सपोर्ट

What is Printer in Marathi

पेपर ला प्रिंटर मध्ये छपाईसाठी पाठवण्याकरता पेपर हा सरळ असणे गरजेचे असते व येथेच प्रिंटर सपोर्ट ची मदत होते.पेपर सपोर्ट च्या मदतीने पेपर हा प्रिंटर मध्ये सोडला जातो व प्रिंटिंग ची प्रक्रिया सुरू होते.

• Sheet feeder

Printer information in Marathi

Sheet feeder हा पेपर सपोर्ट नंतर चा भाग असतो . Sheet feeder च्या मदतीने एका पाठोपाठ एक पेपर प्रिंटर मध्ये सोडले जातात.पेपर चांगल्या प्रकारे प्रिंटरमध्ये सोडण्याकरिता Sheet feeder मध्ये दोन रोलिंग पिन चा उपयोग केलेला असतो.

• Output tray

प्रिंटर च्या माध्यमातून प्रिंट झालेले पेपर आउटपुट ट्रे मध्ये येतात. आउटपुट ट्रे च्या माध्यमातून आपण प्रिंट झालेले पेपर क्रमवार प्राप्त करू शकतो व प्रिंटिंग ची गुणवत्ता तपासू शकतो.

• कनेक्टर

कनेक्टर हा प्रिंटरचा महत्त्वाचा भाग आहे कारण कनेक्टर च्या मदतीने प्रिंटर ला पावर सप्लाय दिला जातो व संगणकामधील प्रिंटिंग ची कमांड प्रिंटर कडे पाठवले जाते तसेच कनेक्टर च्या माध्यमातून संगणकामधील सॉफ्ट कॉपी चे रुपांतर हार्ड कॉपी मध्ये करण्यासाठी सॉफ्ट कॉपी प्रिंटर कडे पाठवली जाते.

• कंट्रोल बटन

प्रिंटर वर उपस्थित असलेल्या बटनांना कंट्रोल बटण असे म्हटले जाते.प्रिंटर वर उपस्थित असलेले काही सामान्य कंट्रोल बटण आहेत –

1. ऑन / ऑफ बटन

2. load or eject

3. Ink button

• Cartridge cover

cartridge cover हे cartridge socket वर तीच असते जेणेकरून Cardiage एका जागेवर स्थिर राहील व त्याला प्रिंटिंग कमांड मिळू शकतील. जेव्हा आपल्याला प्रिंटर मध्ये ink cartridges टाकायचे असतील किंवा ink cartridge बाहेर काढायचे असतील तेव्हा आपण Cartridge cover उघडू किंवा बंद करू शकतो.

• प्रिंट हेड

Ink Cardiage कडून पेपर च्या पृष्ठभागाकडे शाई नेण्याचे काम प्रिंट हेड करत असते. जेव्हा प्रिंटरला संगणकाकडून प्रिंट करण्याची कमांड मिळते तेव्हा प्रिंट हेड पेपरच्या पृष्ठभागावर छपाई करण्याचे कार्य करते.

• Edge guide

Edge guide चा उपयोग पेपरला स्थिर ठेवण्यासाठी होतो. प्रत्येक प्रिंटर साठी काही निर्धारित साइज च्या पेपर चा उपयोग केला जातो व Edge guide च्या मदतीने प्रिंटरचा यूजर प्रिंटर साठी उपयुक्त साईज चा पेपर कोणता आहे हे जाणून घेऊ शकतो.

प्रिंटर चे प्रकार 

प्रिंटर हे मॉनिटर नंतर सर्वात जास्त उपयोगात येणारे आउटपुट उपकरण आहे त्यामुळे प्रिंटरचे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जेव्हा आपल्याला प्रिंटर खरेदी करायचा असतो तेव्हा आपल्याला प्रिंटर चे प्रकार आणि प्रिंटर ची वैशिष्ट्ये फायद्याचे ठरते कारण कधी कधी प्रिंटर च्या अतिरिक्त फीचर साठी जास्त पैसे द्यावे लागू शकतात.

त्यामुळे आता आपण प्रिंटर मधील तंत्रज्ञानानुसार प्रिंटर प्रकार जाणून घेऊया –

प्रिंटर मधील मूलभूत तंत्रज्ञानानुसार प्रिंटर चे मुख्य दोन प्रकार असतात जे आहेत इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर.

इम्पॅक्ट प्रिंटर आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर च्या प्रकारांचे विभाजन पुढील प्रमाणे –

1. इम्पॅक्ट प्रिंटर (impact printer)

1A) कॅरेक्टर प्रिंटर (character printer)

• डेजी व्हील प्रिंटर (Daisy Wheel Printer)

• डॉट मॅट्रिक्स प्रिंटर (Dot Matrix Printer)

1B) लाईन प्रिंटर (line printer)

• ड्रम प्रिंटर (Drum printer)

• बँड प्रिंटर (Band printer)

• चैन प्रिंटर (Chain printer)

2. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर (non-impact printer)

• लेझर प्रिंटर (Laser printer)

• इंकजेट प्रिंटर (InkJet printer)

• थर्मल प्रिंटर (Thermal printer)

3. अन्य महत्त्वाचे प्रकार

• फोटो इंकजेट प्रिंटर (Photo Inkjet printer)

• LED printer

• 3-D printer

• मल्टी फंक्शन प्रिंटर (Multifunction printer)

1. इम्पॅक्ट प्रिंटर (impact printer)

इम्पॅक्ट प्रिंटर हे टाइप रायटर प्रमाणे कार्य करतात व सामान्य प्रिंटर च्या तुलनेत जास्त आवाज करतात.इम्पॅक्ट प्रिंटर मध्ये प्रिंटिंग साठी प्रिंट हेड आणि इंक रिबन चा उपयोग केलेला असतो. प्रिंटर हेड वर अक्षरे छापलेले असतात व ही अक्षरे इंक रिबन च्या संपर्कात येऊन कागदावर छपाई करण्याचे कार्य करतात.

Impact printer च्या माध्यमातून एका वेळेस फक्त एकच अक्षर किंवा लाईन छापण्याचे कार्य केले जाते. हा प्रिंटर अन्य पर्यंतच्या तुलनेने स्वस्त असतो.

Impact printer चे काही प्रकार पुढीलप्रमाणे –

A) कॅरेक्टर प्रिंटर (character printer)

• डेजी व्हील प्रिंटर (Daisy Wheel Printer)

• डॉट मॅट्रिक्स प्रिंटर (Dot Matrix Printer)

B) लाईन प्रिंटर (line printer)

• ड्रम प्रिंटर (Drum printer)

• बँड प्रिंटर (Band printer)

• चैन प्रिंटर (Chain printer)

A) कॅरेक्टर प्रिंटर (character printer)

कॅरेक्टर प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर चा प्रकार आहे जो एका वेळेस फक्त एकच अक्षराची छपाई करण्याचे कार्य करू शकतो. कॅरेक्टर प्रिंटर हे कमी गतीने कार्य करत असतात व त्यांच्यामध्ये एका वेळेस संपूर्ण लाईन प्रिंट करण्याची क्षमता नसते.

कॅरेक्टर प्रिंटरचे पुढील दोन मुख्य प्रकारांमध्ये विभाजन केले जाते –

• डेजी व्हील प्रिंटर (Daisy Wheel Printer)

• डॉट मॅट्रिक्स प्रिंटर (Dot Matrix Printer)

• डेजी व्हील प्रिंटर (Daisy Wheel Printer)

डेझी व्हील प्रिंटर चा उपयोग टाईपराईटर च्या माध्यमातून येणारी गुणवत्ता मिळवण्यासाठी होतो. डेजी व्हील प्रिंटर तंत्रज्ञानाचा शोध 1970 मध्ये Andrew Gabor यांनी लावला.

डेजी व्हील प्रिंटर मध्ये डेजी च्या फुला प्रमाणे दिसणाऱ्या प्लास्टीकच्या डिस्क च्या मदतीने प्रिंटिंग केली जाते. जेव्हा डेजी व्हील प्रिंटर ला प्रिंटिंगची कमांड दिली जाते तेव्हा मोटर च्या साह्याने प्लॅस्टिक डिस्क फिरवली जाते व जेव्हा ही डिस्क योग्य ठिकाणी येते तेव्हा प्रिंटिंग हेडच्या मदतीने अक्षरांची छपाई केली जाते.

हे प्रिंटर आत्ताच या तंत्रज्ञानाच्या युगात जास्त वापरल्या जात नाहीत कारण हे प्रिंटर कार्य करत असताना जास्त आवाजाची निर्मिती करतात व यांची कार्यक्षमता 20 ते 25 अक्षरे प्रत्येक सेकंद इतकी असते. त्यामुळे आता डेजी व्हील प्रिंटर ऐवजी लेझर प्रिंटर चा उपयोग केला जातो.

• डॉट मॅट्रिक्स प्रिंटर (Dot Matrix Printer)

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर मध्ये प्रिंटर हेड वर मॅट्रिक्स पिन चा उपयोग केलेला असतो.या मॅट्रिक्स पिन ची संख्या 09 ते 24 प्रति प्रिंटर हेड असते.

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर मध्ये मॅट्रिक्स पिन आणि पेपरच्या मध्ये इंक रिबन चा उपयोग केला जातो. जेव्हा प्रिंट हेड हे पेपर वर योग्य ठिकाणी येते तेव्हा योग्य मॅट्रिक्स पिन इंक रिबन वर आदळली जाते व त्याद्वारे अक्षरांची छपाई केली जाते. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर द्वारे तयार होणारे प्रत्येक अक्षर हे खूप सार्‍या डॉट च्या एकत्रित संगमाने बनलेले असतात.

डॉट मॅट्रिक्स प्रिंटर मध्ये जेवढ्या जास्त मॅट्रिक्स पिन चा उपयोग केलेला असेल तेवढाच जास्त तो प्रिंटर कार्यक्षम समजला जातो. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर साधारणता 100 ते 600 अक्षरे एका सेकंदात छापू शकतात.

B) लाईन प्रिंटर (line printer)

लाईन प्रिंटर हा इम्पॅक्ट प्रिंटर चा असा प्रकार आहे ज्याच्या मदतीने एकाच वेळेस संपूर्ण लाईनची छपाई केली जाते. ऑनलाइन प्रिंटर मध्ये एकाच वेळेस विविध प्रिंटिंग हेड चा उपयोग केला जातो.

कॅरेक्टर प्रिंटर पेक्षा लाईन प्रिंटर हे अधिक वेगाने कार्य करतात म्हणजेच लाईन प्रिंटर मध्ये आपण एका मिनटात 6000 लाईन ची छपाई करू शकतो. लाईन प्रिंटरचा सर्वात मोठा तोटा म्हणजे आपण या प्रिंटरच्या मदतीने चित्र किंवा ग्राफिक्स ची छपाई करू शकत नाही.

लाईन प्रिंटर कार्य करत असताना मोठ्या प्रमाणात आवाजाची निर्मिती करतात व त्यामुळे आपल्याला लाईन प्रिंटर चा उपयोग करताना साऊंडप्रूफिंग ची गरज भासू शकते म्हणून लाईन प्रिंटरचा जास्त उपयोग केला जात नाही.

लाईन प्रिंटचे विभाजन तीन भागांमध्ये केले जाते ते पुढील प्रमाणे –

• ड्रम प्रिंटर (Drum printer)

• बँड प्रिंटर (Band printer)

• चैन प्रिंटर (Chain printer)

• ड्रम प्रिंटर (Drum printer)

ड्रम प्रिंटर मध्ये एका cylindrical ड्रम वर अक्षरांचा समावेश केलेला असतो व जेव्हा ड्रम प्रिंटर चा ड्रम फिरतो तेव्हा इंक रिबन च्या सहाय्याने अक्षरांची छपाई केली जाते. ड्रम प्रिंटरमध्ये कॅरेक्टर चा सेट साठी वेगवेगळ्या हॅमर ची सुविधा असते.

ड्रम प्रिंटर मध्ये जेव्हा एक लाईन प्रिंट केली जाते तेव्हा कागद वर सरकवला जातो व दुसऱ्या लाईन ची छपाई सुरू होते. अशा प्रकारे ड्रम प्रिंटर एका मिनिटांमध्ये 300 ते 2000 लाईन छापू शकतो परंतु हे करत असताना ड्रम प्रिंटर चा आवाज जास्त होतो.

• बँड प्रिंटर (Band printer)

बँड प्रिंटर हा लाईन प्रिंटरचा प्रकार आहे. बँड प्रिंटर मध्ये मेटल बँड किंवा लूप वर उपस्थित असलेल्या अक्षरांच्या संचा मुळे लाईनची छपाई केली जाते. प्रत्येक बँड वर काही विशिष्ट अक्षरांचा संच उपस्थित असतो व आपल्याला जर तो संच बदलायचा असेल तर आपल्याला संबंधित बँड बदलावा लागतो.

बँड प्रिंटर मधील बँड हा आडवा फिरत असतो व जेव्हा संबंधित अक्षरे योग्य स्थानावर येतात तेव्हा ईंक रिबन साहाय्याने कागदावर छपाई केली जाते. जर आपल्याला बँड प्रिंटरमध्ये अक्षरांची रचना आणि आकारमान बदलायचे असेल तर आपण बँड बदलून हे कार्य साध्य करू शकतो.

• चैन प्रिंटर (Chain printer)

चैन प्रिंटर मध्ये चैन वर असलेल्या अक्षरांच्या मदतीने कागदावर छपाई केली जाते. चैन प्रिंटर मध्ये 48, 64 किंवा 96 अक्षरांचा संच चैन वर उपस्थित असतो. चैन प्रिंटर मधील चैन gear च्या सहाय्याने जोडलेली असते.

ड्रम प्रिंटर प्रमाणे चैन प्रिंटर मध्ये देखील वेगवेगळ्या हॅमर चा उपयोग केलेला असतो व या हॅमर ची संख्या प्रिंटिंग पोझिशन च्या बरोबर असते. जेव्हा या प्रिंटरला प्रिंटिंग ची कमांड केले जाते तेव्हा चैन फिरते व योग्य अक्षर योग्य ठिकाणी आल्यावर हॅमर च्या मदतीने इंक रिबन वर अक्षर आदळले जाते व त्या मार्फत छपाई केली जाते.

2. नॉन इम्पॅक्ट प्रिंटर (non-impact printer)

जेव्हा कागदाच्या भौतिक संपर्क शिवाय कॅरेक्टर तसेच चित्राची प्रिंटिंग केली जाते तेव्हा त्या प्रिंटरला नॉन इम्पॅक्ट प्रिंटर असे म्हटले जाते. नोन इम्पॅक्ट प्रिंटर मध्ये cartridge मध्ये शाई साठवलेली असते व जेव्हा गरज असेल तेव्हा या शाई च्या मदतीने कागदावर छपाई केली जाते.

नॉन इम्पॅक्ट प्रिंटर च्या मदतीने एकाच वेळेस संपूर्ण पेज छपाई केली जाते त्यामुळे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर आजच्या काळातील एक लोकप्रिय प्रिंटर चा प्रकार आहे.

नोन इम्पॅक्ट प्रिंटर चे तीन प्रकारांमध्ये विभाजन केले जाते ते पुढीलप्रमाणे :

• लेझर प्रिंटर (Laser printer)

• इंकजेट प्रिंटर (InkJet printer)

• थर्मल प्रिंटर (Thermal printer)

• लेझर प्रिंटर (Laser printer)

लेझर प्रिंटर हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटर चा प्रकार आहे. जेव्हा संगणकाकडून लेझर प्रिंटर कडे सॉफ्ट कॉपी प्रिंटिंग साठी पाठवले जाते तेव्हा इलेक्ट्रिक चार्ज च्या मदतीने लेझर प्रिंटर selenium coated ड्रम वर डॉक्युमेंट draw केले जाते.

नंतर हा ड्रम कोरड्या शाई (टोनर) वरून फिरवला जातो व ही शाई डॉक्युमेंट च्या इलेक्ट्रिक चार्ज कडे आकर्षित होते. नंतर प्रेशर आणि तापमानाच्या मदतीने ड्रम वरील शाई कागदावर छापली जाते.

कागदाची प्रिंटिंग झाल्यानंतर इलेक्ट्रिक चार्ज हटवला जातो व उर्वरित अतिरिक्त टोनर परत साठवला जातो. लेझर प्रिंटर मध्ये 300 ते 2400 DPI (डॉट पर इंच) च्या resolution चा उपयोग केलेला असतो.

• इंकजेट प्रिंटर (InkJet printer)

इंकजेट प्रिंटर मध्ये nozel च्या मदतीने शाई स्प्रे करून प्रिंटिंग केली जाते. इंकजेट प्रिंटर मधील nozel ला छोटे छोटे होल असतात व इंकजेट प्रिंटर मध्ये छपाईसाठी स्पेशल शाई चा उपयोग केला जातो.

इंकजेट प्रिंटर जास्त नोझल चा उपयोग केला जातो त्यामुळे त्यांना एकत्रित पणे jets म्हणून संबोधले जाते. जेव्हा पेपर इंकजेट प्रिंटर पुढून move होतो तेव्हा नोजल स्प्रे च्या मदतिने अक्षरे तसेच चित्रांची छपाई केली जाते.

इंकजेट प्रिंटर मध्ये छपाई साठी उपयुक्त असलेली शाई cardiage मध्ये साठवलेली असते. काही इंकजेट प्रिंटर मध्ये दोन cardiage चा समावेश केलेला असतो ज्यामध्ये एका मध्ये काळी शाई व दुसऱ्या मध्ये cyan, magenta आणि yellow कलर शाई साठवलेली असते, तर काही इंकजेट प्रिंटर मध्ये एकाच cardiage मध्ये या सर्वांचा समावेश केलेला असतो.

इंकजेक्ट प्रिंटर हे अन्य नॉन इम्पॅक्ट प्रिंटर च्या तुलनेत कमी किमतीत उपलब्ध असतात त्यामुळे इंकजेक्ट प्रिंटर चा उपयोग घरगुती वापरासाठी असे छोट्या बिजनेस मध्ये केला जातो. काही उच्च गुणवत्तेच्या इंकजेक्ट प्रिंटर च्या सहाय्याने डिजिटल चित्राची छपाई स्पेशल पेपर वर केली जाते.

• थर्मल प्रिंटर (Thermal printer)

थर्मल प्रिंटर मध्ये तापमान संवेदनशील पेपर वर इलेक्ट्रिक करंट च्या मदतीने तापवलेल्या पिन्स च्या मदतीने छपाई केली जाते. थर्मल प्रिंटर मध्ये उपयोगात येणारा पेपर काही विशेष कोटिंग ने बनवलेला असतो त्यामुळे जेव्हा तो गरम होतो तेव्हा तो डार्क होण्यास सुरुवात होतो.

थर्मल प्रिंटर मध्ये हॉट पीन्स च्या मदतीने खूप साऱ्या डॉट्स ला एकत्रित करून अक्षरांची निर्मिती केली जाते. थर्मल प्रिंटर मध्ये एका अक्षरा नंतर दुसऱ्या अक्षराची छपाई केली जाते. जेव्हा थर्मल प्रिंटर पेंटर च्या मदतीने छपाई पूर्ण होते तेव्हा अत्यंत वेगाने हिट पिन्स बंद केल्या जातात.

थर्मल प्रिंटर च्या साहाय्याने छपाईसाठी कोणत्याही प्रकारच्या शाई ची गरज लागत नाही त्यामुळे या प्रिंटर ची लोकप्रियता वाढत आहे तसेच अनेक मोठ्या बिझनेस मध्ये या प्रिंटर चा उपयोग केला जातो.

थर्मल प्रिंटरचा सर्वात मोठा तोटा म्हणजे जेव्हा जास्त हिट च्या संपर्कात थर्मल प्रिंटर ची प्रिंट येते तेव्हा ती प्रिंट संपूर्ण डार्क होते व थर्मल प्रिंटर च्या मदतीने एका वेळेस एकाच कलर ची प्रिंट प्राप्त होते.

3. प्रिंटर चे अन्य महत्त्वाचे प्रकार

इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर शिवाय अनेक प्रकार जगभरात प्रसिद्ध आहेत. या प्रिंटर च्या प्रकारांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला असतो. प्रिंटर चे हे प्रकार पुढील प्रमाणे –

• फोटो इंकजेट प्रिंटर (Photo Inkjet printer)

• LED printer

• 3-D printer

• मल्टी फंक्शन प्रिंटर (Multifunction printer)

• फोटो इंकजेट प्रिंटर (Photo Inkjet printer)

जेव्हा आपल्याला चांगल्या दर्जाच्या फोटोचे प्रिंटिंग करायची असते तेव्हा आपण फोटो इंकजेट प्रिंटर चा उपयोग करू शकतो.फोटो इंकजेट प्रिंटर हे इंकजेट प्रिंटर पेक्षा जास्त महाग असतात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आपण मोबाईल किंवा टॅब मधील फोटो ल फोटो इंकजेट प्रिंटर च्या मदतीने प्रिंट करू शकतो. काही फोटो इंकजेट प्रिंटर च्या मदतीने आपण सर्व साईज च्या फोटोची प्रिंटिंग करू शकतो.

• LED printer

LED प्रिंटर हे जवळपास लेझर प्रिंटर सारखेच असतात परंतु या प्रिंटर मध्ये लेझर ऐवजी light emitting diode चा उपयोग केलेला असतो. LED प्रिंटर चा उपयोग झेरॉक्स मशीन मध्ये केला जातो. LED प्रिंटर मध्ये चार्ज च्या साह्याने ड्रम वर डॉक्युमेंट ड्रॉ केले जाते व टोनर च्या मदतीने तापमानाच्या जोरावर कागदावर छपाई केली जाते.

• 3-D printer

जेव्हा आपल्याला 3-D ऑब्जेक्ट चे निर्माण करायची असते तेव्हा आपण थ्री-डी प्रिंटर ची मदत घेत असतो.3-D च्या मदतीने विविध पदार्थांचे 3-D इमेज बनवली जाते या पदार्थांमध्ये प्लॅस्टिक, पॉलीमर, खाद्यपदार्थांचा समावेश होतो.3-D मध्ये उच्च प्रतीच्या रेसिन च्या मदतीने ऑब्जेक्ट ची प्रिंटिंग केली जाते. 3-D प्रिंटर चा उपयोग मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीमध्ये केला जातो.

• मल्टी फंक्शन प्रिंटर (Multifunction printer)

 जेव्हा एका पर्यंतच्या माध्यमातून वेगवेगळे संगणकीय कार्य जसे की प्रिंटिंग, स्कॅनिंग, कॉपी तसेच फॅक्स पाठवण्याची क्रिया केली जाते तेव्हा त्या पर्यंतचा मल्टी फंक्शन प्रिंटर म्हटले जाते. मल्टी फंक्शन प्रिंटर चा उपयोग छोट्या बिजनेस मध्ये केला जातो.

 मल्टी फंक्शन प्रिंटर हे विविध उपकरणांचे काम एकटेच करते त्यामुळे या प्रिंटर ला कमी जागा लागते व विविध उपकरण खरेदी करण्याची गरज भासत नाही. आपण मल्टी फंक्शन प्रिंटर वायर तसेच वायरलेस पद्धतीने संगणकाला जोडू शकतो.

प्रिंटर कसे कार्य करतो

प्रिंटर ची कार्यप्रणाली एकदम सोपी आहे, प्रिंटर डिजिटल चित्रे तसेच अक्षरांचे रूपांतर भौतिक स्वरूपात करण्याचे कार्य करतो व त्यासाठी त्याला मदरबोर्ड मधील वेगवेगळ्या सॉफ्टवेअर आणि प्रिंटर डिव्हाईस ड्रायव्हर ची मदत होते. काही प्रिंटर मध्ये पेपर बरोबर संपर्कात येऊन प्रिंटिंग केले जाते तर काही पेंटर मध्ये पेपर बरोबर संपर्कात न येता प्रिंटिंग केली जाते.

पेपर वर प्रिंटिंग करण्याच्या कार्यप्रणाली नुसार प्रिंटर चे अनेक प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. प्रत्येक प्रिंटर ची छपाई करण्याची पद्धत वेगळी आहे काही प्रिंटर मध्ये नोझेल च्या सहाय्याने स्प्रे करून प्रिंटिंग केली जाते तर काही प्रिंटर मध्ये तापमानाचा उपयोग करून प्रिंटिंग केली जाते.

चांगला प्रिंटर कसा निवडायचा

प्रिंटरची माहिती जाणून घेतल्यानंतर आपल्या मनात प्रश्न पडू शकतो की चांगला प्रिंटर कसा निवडायचा व याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे मुद्दे ध्यानात घ्यावे लागतील.

चांगला प्रिंटर निवडण्याकरीता पुढील मुद्दे लक्षात घ्या –

1. गरज

2. प्रिंटर ची शाई 

3. प्रिंटर कनेक्शन

4. Printing चा प्रकार (printer output)

5. Resolution

1. गरज

प्रत्येक व्यक्तीची प्रिंटर खरेदी करण्याची गरज वेगवेगळी असते. काही लोकांना प्रिंटर घरगुती उपयोगाकरिता हवा असतो तर काही व्यक्ती प्रिंटर चा उपयोग बिझनेसमध्ये करतात. जर आपण घरगुती उपयोग करता प्रिंटर खरेदी करत असाल तर आपल्याला प्रिंट ची गुणवत्ता बघणे आवश्यक ठरते तसेच जेव्हा आपण बिझनेस साठी सेंटर खरेदी करतो तेव्हा प्रिंटिंग गती चा विचार करणे आवश्यक असते.

2. प्रिंटर ची शाई 

काही प्रिंटर मध्ये फक्त उच्च प्रतीच्या शाई चा उपयोग केला जातो त्यामुळे कधीकधी प्रिंटर च्या किमती पेक्षा जास्त किमतीच्या चा उपयोग होतो. म्हणून प्रिंटर खरेदी करत असताना प्रिंटर मध्ये कोणत्या प्रकारची शाई चा उपयोग होतो हे जाणून घेणे आवश्यक ठरते.

3. प्रिंटर कनेक्शन

आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रिंटर ला संगणकाला जोडू शकतो परंतु जर आपल्याला प्रिंटर मोबाईल ला जोडायचे असते तर ती सुविधा प्रिंटर मध्ये आहे किंवा नाही हे बघणे महत्वाचे आहे. तसेच काही प्रिंटर मध्ये संगणक मेमरी च्या मदतीने प्रिंटिंग करण्याची सुविधा असते तेव्हा अशा वेळेस प्रिंटर कनेक्शन विषयी माहिती असावी लागते.

4. Printing चा प्रकार (printer output)

काही प्रिंटर च्या माध्यमातून फक्त monochrome (black and white) किंवा कलर प्रिंट चे निर्माण होते तर काही प्रिंटर च्या माध्यमातून दोन्ही प्रकारच्या प्रिंट चे निर्माण केले जाते. जेव्हा आपण फोटो ची प्रिंट काढत असतो तेव्हा आपल्याला उच्च दर्जाच्या गुणवत्तेची अपेक्षा असते त्यामुळे प्रिंटर खरेदी करत असताना प्रिंटर आउटपुट विषयी माहिती घ्यावी.

5. Resolution

प्रिंटर चे resolution हे DPI (dots per inch) मध्ये मोजले जाते. प्रिंटरच्या माध्यमातून जेवढ्या जास्त DPI (resolution) ची प्रिंट निर्माण होईल तेवढी जास्त प्रिंट ची गुणवत्ता असेल.प्रिंटर मध्ये जेवढे जास्त DPI असेल म्हणजे तेवढ्याच जास्त गुणवत्तेची प्रिंट चे निर्माण होईल. 

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न (FAQ)

प्रिंटर चा जनक कोण आहे ?

उत्तर – Johannes Gutenberg’s यांना प्रिंटरचा जनक मानले जाते कारण त्यांनी 1440 मध्ये mechanical moving type प्रिंटिंग चा शोध लावला.

प्रिंटर हे कोणत्या प्रकारचे उपकरण आहे ?

उत्तर – प्रिंटर हे संगणकाचे आऊटपुट प्रकारचे हार्डवेअर उपकरण आहे ज्याचा उपयोग संगणकामधील सॉफ्ट कॉपी चे रूपांतर हार्ड कॉपी मध्ये करण्यासाठी होतो.

प्रिंटर संगणकाला जोडायला कोणत्या प्रकारच्या केबल लागतात ?

उत्तर – प्रिंटर संगणकाला जोडायला युएसबी केबल ची मदत घेतली जाते बहुतांश प्रिंटर यूएसबी केबल च्या मदतीने संगणकाला जोडले जातात.

प्रिंटर संगणकाला कसे जोडायचे ?

उत्तर – सर्वात प्रथम यूएसबी केबल हि प्रिंटर आणि संगणकाच्या युएसबी पोर्ट मध्ये जोडा. आता संगणक आणि प्रिंटर On करा. संगणकामधील Start बटन वर क्लिक करा Settings > Devices > printers & scanners असे क्रमवार ऑप्शन निवडा. Add printer or Scanner ला सिलेक्ट करा. Nearby printers शोधेपर्यंत थांबा व आपल्याला उपयुक्त असलेल्या प्रिंटर वर क्लिक करून Add device पर्याय निवडा.

प्रिंटर ला मराठीत काय म्हणतात?

उत्तर – प्रिंटर ला मराठीमध्ये मुद्रक किंवा छपाईखाना असे म्हटले जाते.

आपण मोबाईल ला प्रिंटर कनेक्ट करू शकतो का ?

उत्तर – होय आपण काही प्रिंटर हे मोबाईल ला वायरलेस पद्धतीने कनेक्ट करू शकतो व त्या प्रिंटरच्या माध्यमातून आपण प्रिंट देखील काढू शकतो.

पेज प्रिंटर कोणता आहे ?

उत्तर – पेज प्रिंटर च्या मदतीने एकाच वेळेस संपूर्ण पेज प्रोसेस करून प्रिंट केले जाते. आधीच्या काळातील पेज प्रिंटर आकाराने खूप मोठे होते परंतु आत्ताच्या आधुनिक काळातील लेझर प्रिंटर व LED प्रिंटर हे पेज प्रिंटर आकाराने लहान व अधिक कार्यक्षम आहे.

सारांश (conclusion)

मला आशा आहे प्रिंटर ची माहिती सांगणाऱ्या या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला प्रिंटर म्हणजे काय (what is Printer in Marathi) या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुम्ही हा लेख नक्की शेअर करा व या लेखात काही समस्या जाणवत असेल तर कमेंट द्वारे कळवा.

आपला दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *