Device driver म्हणजे काय | Device Driver in Marathi

Advertisements

 जेव्हा आपण संगणकाचा उपयोग करत असतो तेव्हा आपल्याला कधीतरी डिव्हाइस ड्रायव्हर हा शब्द ऐकायला असतो त्यामुळेच या लेखाद्वारे आपण जाणून घेणार आहोत Device driver म्हणजे काय what is device driver in marathi.

जेव्हा आपण संगणकाला संगणकाचे विविध भाग जोडत असतो तेव्हा आपल्या मनात हा प्रश्न पडू शकतो की संगणकाला कसं काय कळते, आपण जोडलेला संगणकाचा भाग कोणता आहे, त्याचा उपयोग काय आहे व याच प्रश्नाचे उत्तर  देण्याचे काम device driver करतो.

अनुक्रमणिका ↕

बरेच संगणक वापरकर्ता डिव्हाईस ड्रायव्हर संगणकामध्ये इन्स्टॉल करत असतात परंतु त्यांना डिवाइस ड्रायव्हर विषयी संपूर्ण माहिती नसते त्यामुळेच या लेखाद्वारे आपण जाणून घेऊया डिव्हाइस ड्रायव्हर विषयी माहिती.

डिव्हाईस ड्रायव्हर म्हणजे काय

डिव्हाइस ड्रायव्हर म्हणजे काय ? Device driver in Marathi

डिव्हाईस ड्रायव्हर संगणकाच्या सॉफ्टवेअरचा एक हिस्सा आहे ज्याच्या मदतीने ऑपरेटिंग सिस्टिम आणि इतर सॉफ्टवेअर संगणकाच्या हार्डवेअर उपकरणांला जोडले जाऊ शकतात. संगणकामध्ये काही विशिष्ट हार्डवेअर उपकरणांसाठी उपयुक्त असलेले विशिष्ट डिव्हाईस ड्रायव्हर उपस्थित असतात. 

डिवाइस ड्रायव्हरला driver , hardware driver किंवा device driver असेदेखील म्हटले जाते. डिव्हाईस ड्रायव्हर शिवाय संगणकामधील हार्डवेअर उपकरणे निकामी होऊ शकतात.

उदाहरणार्थ जेव्हा आपल्याला स्कॅनरच्या माध्यमातून संगणकामध्ये काही डॉक्युमेंट स्कॅन करून सेव करायचे असतील तेव्हा डिव्हाईस ड्रायव्हर हे स्कॅनर सुरू करण्यासाठी उपयुक्त असलेल्या प्रोग्राम ची माहिती आणि स्कॅनर कार्यरत राहण्यासाठी आवश्यक असलेली माहिती ऑपरेटिंग सिस्टिम ला देते व त्यानुसार संगणकामध्ये डॉक्युमेंट वर प्रक्रिया पूर्ण केली जाते.

डिव्हाईस ड्रायव्हर चे प्रकार 

संगणकाशी निगडित जवळपास सर्वच उपकरणांमध्ये डिव्हाईस ड्रायव्हर चा उपयोग होतो. म्हणजेच सामान्य BIOS ( बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम ) पासून वेगवेगळ्या प्रकारचे जटील कार्य करणाऱ्या संगणकीय मशीन मध्ये डिव्हाईस ड्रायव्हर चा उपयोग केला जातो.

डिव्हाईस ड्रायव्हर चे दोन मुख्य प्रकार आहेत –

कर्नल डिव्हाईस ड्रायव्हर

• यूजर मोड डिव्हाईस ड्रायव्हर

कर्नल डिव्हाईस ड्रायव्हर

कर्नल device driver चा उपयोग अशा हार्डवेअर उपकरणांसाठी केला जातो जे ऑपरेटिंग सिस्टिम बरोबर लोड होतात. कर्नल डिव्हाईस ड्रायव्हर चा उपयोग केलेले हार्डवेअर उपकरण ऑपरेटिंग सिस्टिम चा भाग म्हणून कार्य करू शकतात. कर्नल डिव्हाईस ड्रायव्हर साठी कमी सिस्टीम च्या वैशिष्ट्यांची गरज लागते.

उदाहरण – मदरबोर्ड, प्रोसेसर, BIOS

यूजर मोड डिव्हाईस ड्रायव्हर

संगणकाच्या मूलभूत कार्यप्रणाली साठी उपयुक्त असलेल्या हार्डवेअर उपकरणांना कर्नल डिव्हाईस ड्रायव्हर ची गरज असते परंतु या व्यतिरिक्त इतर हार्डवेअर उपकरणांसाठी यूजर मोड डिव्हाईस ड्रायव्हर ची मदत होते.

उदाहरण – कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, हार्ड डिस्क, इत्यादी

डिव्हाईस ड्रायव्हर चे त्याच्या कार्यप्रणाली नुसार चार मुख्य प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे

हार्डवेअर डिव्हाईस ड्रायव्हर

Virtual डिव्हाईस ड्रायव्हर

मदरबोर्ड ड्रायव्हर

BIOS 

1. हार्डवेअर डिव्हाईस ड्रायव्हर

संगणकामध्ये उपस्थित असलेल्या विविध प्रोग्रॅम च्या फाईल च्या मदतीने जेव्हा संगणकाला जोडलेली एक किंवा एकापेक्षा जास्त हार्डवेअर उपकरणे नियंत्रित केली जातात तेव्हा त्या फाइल्सच्या संचाला हार्डवेअर डिव्हाईस ड्रायव्हर असे म्हणतात. हार्डवेअर डिव्हाईस ड्रायव्हर शिवाय संगणकाला जोडलेली हार्डवेअर उपकरणे नियंत्रित करणे अशक्य आहे.

हार्डवेअर डिव्हाईस ड्रायव्हर हे संगणकाचे सॉफ्टवेअर प्रोग्रॅम असतात ज्यांच्या मदतीने संगणकाचे हार्डवेअर भाग जसे की expansion slot संगणकाबरोबर कार्य करू शकतात. विविध expansion slot जसे की साऊंड कार्ड , व्हिडिओ कार्ड , मेमरी कार्ड इत्यादी ड्रायव्हर डिस्क बरोबर उपस्थित असतात ज्याद्वारे उपयुक्त डिव्हाईस ड्रायव्हर संगणकामध्ये इन्स्टॉल करायला मदत होते

2. Virtual डिव्हाईस ड्रायव्हर

Virtual डिव्हाईस ड्रायव्हर मध्ये कोणत्याही हार्डवेअर उपकरणाला संगणकाला न जोडता संगणकाला भ्रमित करून असे भासवले जाते की ते हार्डवेअर उपकरण संगणकाला जोडले गेलेले आहे. Virtual डिव्हाईस ड्रायव्हरच्या मदतीने .iso फाइल शोधल्या जातात.

3. मदरबोर्ड ड्रायव्हर

मदरबोर्ड ड्रायव्हर हे छोटे संगणकीय प्रोग्राम असतात जे ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये उपस्थित असतात. मदरबोर्ड ड्रायव्हर च्या मदतीने साधारण संगणकीय कार्य पूर्ण केले जातात. मदरबोर्ड ड्रायव्हर च्या मदतीने ब्रॉडबँड पोर्ट, माउस पोर्ट, कीबोर्ड पोर्ट तसेच usb पोर्ट बरोबर कार्य करणे शक्य होते. मदरबोर्डच्या रचनेनुसार काही मदरबोर्ड मध्ये मदरबोर्ड ड्रायव्हर च्या मदतीने ध्वनी प्रणाली व चित्र प्रणाली नियंत्रित करणे शक्‍य होते.

4. BIOS

BIOS (बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम) हे संगणकामधील सर्वात साधारण डिव्हाईस ड्रायव्हर आहे  जो संगणक चालू झाल्यानंतर सर्वात आधी boots होतो. BIOS हा संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये साठवलेल्या मेमरीत उपस्थित असतो. BIOS च्या मदतीने विविध हार्डवेअर उपकरणे संगणकाबरोबर कार्य करण्यासाठी उपयुक्त होण्यास मदत होते.

डिव्हाईस ड्रायव्हर कशा प्रकारे काम करते

जेव्हा आपण कोणतेही पेरिफेरल उपकरणे जसे की कीबोर्ड, माऊस, प्रिंटर, स्कॅनर इत्यादी खरेदी करतो तेव्हा आपल्याला संबंधित उपकरणाचे डिव्हाईस ड्रायव्हर संगणकामध्ये इन्स्टॉल करणे गरजेचे असते. जेव्हा आपण डिवाइस ड्रायव्हर संगणकामध्ये इंस्टॉल करतो तेव्हा डिव्हाईस ड्रायव्हर संबंधित उपकरणाचा शोध घेते व संगणकाच्या मदतीने त्या उपकरणाला कंट्रोल करण्यास मदत करते.

संगणकामध्ये डिव्हाईस ड्रायव्हर ऑपरेटिंग सिस्टिम च्या कर्नल लेयर मध्ये कार्य करते. कर्नल लेयर हा ऑपरेटिंग सिस्टीमचा असा भाग आहे जो संगणकामधील भौतिक उपकरणांशी डायरेक्ट interact करतो. ऑपरेटिंग सिस्टिम मधील कर्नल लेयर संगणकामधील विशिष्ट उपकरनासोबत डायरेक्ट कार्य करण्याऐवजी डिवाइस ड्रायव्हरला लोड करते व डिव्हाईस ड्रायव्हर वर काही विशिष्ट कमांड देऊन त्याद्वारे संबंधित उपकरणा बरोबर कार्य करते.

उदाहरण – जेव्हा आपण स्कॅनर ला संगणकाबरोबर जोडतो व स्कॅनर संबंधित डिव्हाईस ड्रायव्हर संगणकामध्ये इन्स्टॉल करतो तेव्हा आपल्याला संगणकामध्ये डिवाइस ऑब्जेक्ट दिसतो जो स्कॅनर चे प्रतिनिधित्व करतो. म्हणजेच आपण संगणकामध्ये दिसणाऱ्या स्कॅनरच्या डिवाइस ऑब्जेक्ट च्या माध्यमातून स्कॅनर संबंधित कार्य करू शकतो. जेव्हा आपण संगणकाद्वारे स्कॅन करण्याची कमांड देतो तेव्हा ती कमांड ऑपरेटिंग सिस्टिम मधील कर्नल लेयर च्या माध्यमातून डिव्हाईस ड्रायव्हर कडे पाठवली जाते व डिव्हाईस ड्रायव्हर त्या कमांड वर ॲक्शन घेऊन स्कॅनर मधील मायक्रोप्रोसेसर कडे विशिष्ट कमांड पास करतो व त्याद्वारे विविध डॉक्युमेंट च्या स्कॅनिंग ची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

संगणकातील डिवाइस ड्रायव्हर कसे चेक करायचे ? 

संगणकामधील डिव्हाईस ड्रायव्हर चे स्टेटस जाणून घेण्यासाठी आपण Device manager च्या मदतीने संगणकातील डिव्हाईस ड्रायव्हर चेक करू शकतो. संगणकामधील डिव्हाईस ड्रायव्हर चेक करण्यासाठी पुढील प्रोसेस चा उपयोग करा – 

1. सर्वप्रथम संगणकाच्या की-बोर्ड वर Windows key + R एकाच वेळेस press करा ज्यामुळे आपण संगणकामध्ये Run box चा उपयोग करू शकतो.

2. डिव्हाईस मॅनेजर ला ॲक्सेस करण्यासाठी बॉक्समध्ये devmgmt.msc टाईप करा व enter बटणावर क्लिक करा.

3. आता आपण विविध उपकरणांचे डिव्हाईस ड्रायव्हर चेक करू शकतो.

संगणकामध्ये डिव्हाईस ड्रायव्हर कसे इंस्टॉल करायचे ?

संगणकामध्ये विविध उपकरणे जसे की ग्राफिक्स कार्ड चे डिव्हाईस ड्रायव्हर इंस्टॉल करायचे असेल तर आपण संगणक निर्माता कंपनीच्या वेबसाईटवर जाऊन उपयुक्त मॉडेल आणि ऑपरेटिंग सिस्टिम सिलेक्ट करून डिवाइस ड्रायव्हर इन्स्टॉल करू शकतो. हे डिव्हाईस ड्रायव्हर .Zip किंवा.exe फाईल मध्ये उपस्थित असते.

जेव्हा आपल्याला आवश्यक असलेले डिव्हाईस ड्रायव्हर हे .zip फाईल मध्ये उपस्थित असते तेव्हा आपण त्याला आणखी unzip करून ते install करू शकतो तसेच .exe फाईल मध्ये असलेल्या डिवाइस ड्रायव्हरला आपण डबल क्लिक करून install करू शकतो.

डिव्हाईस ड्रायव्हर अपडेट कसे करायचे?

जेव्हा कोणत्याही उपकरणाचे डिव्हाईस ड्रायव्हर अपडेट नसेल तेव्हा संबंधित उपकरणाला संगणकाबरोबर कार्य करण्यासाठी अडचणी येऊ शकतात त्यामुळेच डिवाइस ड्रायव्हर अपडेट करण्यासाठी प्रोसेस चा वापर करा.

• सर्वप्रथम संगणकाच्या सर्च बार मध्ये Control panel लिहून सर्च करा व त्यानंतर साऊंड अँड हार्डवेअर या पर्यायावर क्लिक करा.

• आता आपल्याला Device manager या पर्यायावर क्लिक करायचे आहे.

• त्यानंतर आपल्यापुढे संगणकामध्ये नवीन विंडो ओपन होईल ज्यामध्ये सर्व डिव्हाईस ड्रायव्हर ची नावे उपस्थित असतील.

• आता जे device अपडेट नसेल त्याच्यावरती mark असेल आपण त्या डिवाइस वर राईट क्लिक करून properties हा पर्याय निवडायचा आहे.

• एक नवीन Pop-Up Window ओपन होईल यामध्ये आपल्याला ड्रायव्हर ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर अपडेट वर क्लिक करुन आपण डिव्हाईस ड्रायव्हर मदत करू शकतो.

डिवाइस ड्रायव्हर आणि सिस्टीम सॉफ्टवेअर मध्ये काय फरक आहे?

उत्तर – डिव्हाईस ड्रायव्हर आणि सिस्टम सॉफ्टवेअर मधील फरक जाणून घेण्यासाठी आपण एका उदाहरणाची मदत  घेऊया, समजा आपल्याला प्रिंटरच्या माध्यमातून प्रिंट काढायची असेल तर आपण संगणकाच्या कीबोर्ड वर CTRL + P टाईप करतो तेव्हा आपल्यापुढे एक नवीन pop up विंडो उघडते व वेगवेगळे ऑप्शन दिसतात ही नवीन विंडो उघडण्याचे व वेगवेगळे ऑप्शन दाखवण्याचे कार्य सिस्टिम सॉफ्टवेअर करते.

जेव्हा आपण प्रिंट ऑप्शनवर क्लिक करतो तेव्हाही कमांड प्रिंटर ड्रायव्हर कडे पाठवले जाते व प्रिंटर ड्रायव्हर च्या माध्यमातून ती कमांड प्रिंटर कडे त्याच्या readable फॉर्मेट मध्ये पाठवले जाते व प्रिंटर त्या कमांड वर ॲक्शन घेऊन वेगवेगळे डॉक्युमेंट प्रिंट करण्याचे कार्य करतो.

आज आपण काय शिकलो ?

मला आशा आहे तुम्हाला Device driver म्हणजे काय 【 Device driver in marathi 】हा लेख आवडला असेल. मी या लेखाद्वारे डिव्हाईस ड्रायव्हर विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आशा आहे या लेखाद्वारे तुम्हाला डिव्हाईस ड्रायव्हर विषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल.

Device ड्रायव्हर विषयी माहिती असलेला हा लेख लिहिताना कोणतीही चूक राहणार आहे या संदर्भात संपूर्ण काळजी घेतली केलेले आहे. परंतु तरीही कोणतीही चूक किंवा सुधारणा या लेखात आवश्यक असल्यास जरूर कमेंट द्वारे कळवा व तुम्हाला हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा.

तुमचा दिवस शुभ असो, धन्यवाद….

मदरबोर्ड

Advertisements

Leave a Comment