Advertisements

Speaker विषयी संपूर्ण माहिती मराठीत

Advertisements

आपण सर्वांनी कधी ना कधी स्पीकर बघितलेला असतो व तो स्पीकर बघून आपल्या मनात कुतूहल जागृत होऊ शकते की स्पीकर विषयी माहिती जाणून घ्यावी. म्हणून आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेऊया स्पीकर म्हणजे काय ( what is speaker in Marathi ).

संगणकाचे विविध भाग मध्ये स्पीकर चा समावेश होतो.स्पीकर च्या मदतीने आपण संगणक तसेच साउंड बोर्ड मधील आवाज ऐकू शकतो. स्पीकर विविध उपकरणांमध्ये ध्वनी निर्मितीचे कार्य करतो म्हणून जवळपास सर्वच संगणकीय उपकरणांमध्ये स्पीकर चा समावेश केलेला असतो.

मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर उपलब्ध असतात त्यामुळे जेव्हा आपण स्पीकर खरेदी करण्यासाठी जातो तेव्हा जर आपल्याला स्पीकर विषयी माहिती नसेल तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. म्हणून आजच्या या लेखाद्वारे आपण स्पीकर विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Advertisements
अनुक्रमणिका ↕

स्पीकर म्हणजे काय ( what is speaker in Marathi )

स्पीकर हे output device आहे ज्याचा उपयोग विविध उपकरणांमध्ये ध्वनी निर्मितीसाठी केला जातो. काही विशेष प्रकारचे स्पीकर हे फक्त संगणकाला जोडण्यासाठी बनवलेले असतात तर काही स्पीकर ला आपण कोणत्याही sound system ला जोडू शकतो. 

what is speaker in marathi

संगणकामध्ये स्पीकर च्या माध्यमातून ध्वनी निर्मिती करण्यासाठी साऊंड कार्ड आणि सॉफ्टवेअर चा उपयोग केलेला असतो. साऊंड कार्ड च्या माध्यमातून विद्युत चुंबकीय तरंगांचे रूपांतर ध्वनी तरंगांमध्ये करण्यास मदत होते. स्पीकर संगणक किंवा साऊंड सिस्टिम कडून इनपुट च्या स्वरूपात डिजिटल अनलॉग सिग्नल घेतो व त्यावर प्रक्रिया करून ध्वनी निर्मितीचे कार्य करतो म्हणून स्पीकर ला transducer असे देखील संबोधले जाते.

प्रत्येक संगणकामध्ये अंतर्गत स्पीकर चा समावेश केलेला असतो परंतु आपण अधिक चांगल्या ध्वनी निर्मितीसाठी बाह्य Speaker संगणकाला जोडू शकतो.संगणकामध्ये अंतर्गत स्पीकर आणि बाह्य स्पीकर अशा दोन प्रकारचे स्पीकर उपलब्ध असतात.

स्पीकर ची काय गरज आहे

कोणत्याही प्रकारच्या साऊंड सिस्टिम तसेच संगणकीय उपकरणापासून ध्वनि निर्मिती साठी स्पीकर गरजेचा असतो. स्पीकर संगणक तसेच साऊंड सिस्टिम मध्ये साठवलेल्या डिजिटल स्वरूपातील ध्वनितरंगाचे रूपांतर आपल्याला समजण्यायोग्य आवाजामध्ये करतो.

स्पीकर चा उपयोग विविध ठिकाणी केला जातो जसे की सिनेमा ग्रह, रेल्वे स्थानक, बस स्थानक इत्यादी. स्पीकर चा उपयोग मोठ्या आवाजामध्ये लोकांना संबोधित करण्यासाठी केला जातो तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये देखील स्पीकर चा उपयोग केला जातो.

संगणकामध्ये अंतर्गत स्पीकर चा उपयोग केलेला असतो परंतु त्याचा आवाज कमी असतो त्यामुळे अनेक संगणक user बाह्य स्पीकर चा वापर करतात. ज्यामुळे मोठ्या आवाजाची निर्मिती होते व वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी निर्माण होतो.

बॅटरीवर चालणाऱ्या स्पीकर च्या मदतीने आपण कोणत्याही ठिकाणी गाण्यांचा तसेच वेगवेगळ्या आवाजांचा आनंद घेऊ शकतो. सर्व प्रकारचे ध्वनी निर्माण करणारे उपकरण जसे की रेडिओ, टीव्ही, लॅपटॉप इत्यादी मध्ये स्पीकर चा समावेश केलेला असतो

स्पीकरचे भाग

स्पीकर मध्ये विविध भागांचा उपयोग केलेला असतो जे वेगवेगळ्या प्रकारे ध्वनि निर्मिती साठी स्पीकर ला मदत करत असतात. स्पीकर चे भाग पुढीप्रमाणे –

Diaphragm –

पातळ पडद्या वाणी दिसणारा हा भाग पुढे मागे होऊन vibration चे निर्माण करतो व ध्वनी मिथुन निर्माण होतो.

•Basket –

Basket ही एक धातूची फ्रेम आहे जी स्पीकर चे भाग एकत्रित ठेवण्यासाठी मदत करते.

•Surround.

Basket आणि diaphragm ला जोडणारी रचना 

•magnet

स्पीकर मध्ये मुख्यता neodymium प्रकारच्या मॅग्नेट चा उपयोग होतो.

•top plate

Top plate लोखंडाची बनलेले असते.

• Dust cap

Voice coil ला धुळे पासून वाचवता येईल व लहान मुलांच्या पोहचण्यापासून दूर ठेवते.

•Spider

Voice coil मध्ये तणाव घडवून आणते.

•voice coil 

मॅग्नेटिक फिल्ड च्या मदतीने diaphragm ची हालचाल घडवून आणते.

•cable

bottom plate

स्पीकर कसे कार्य करते

स्पीकर चे मुख्य कार्य electric किंवा विद्युत चुंबकीय तरंगांचे रूपांतर ध्वनी मध्ये करण्यासाठी होतो. स्पीकर विषयी अधिक चांगल्या प्रकारे माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला स्पीकर कसे कार्य करते हे जाणून घ्यावे लागेल.

Sound हा Analog किंवा digital स्वरूपाच्या तरंगामध्ये साठवलेला असतो. जर स्पीकरला संगणक किंवा अन्य साऊंड सिस्टिम द्वारे Analog waves इनपुट च्या स्वरूपात प्राप्त झाले तर स्पीकर त्याचे रूपांतर sound wave मध्ये करून दोन्हीचे निर्माण करत असतो व जर स्पीकरला digital waves इनपुट च्या स्वरूपात प्राप्त झाले तर स्पीकर आधी त्याचे रूपांतर Analog waves मध्ये करते व नंतर त्यापासून ध्वनी निर्मिती करते. स्पीकर हा एक Output Transducer आहे जो Audio Signal चे रूपांतर Audio मध्ये करतो.

स्पीकर मध्ये मॅग्नेट आणि coil चा समावेश केलेला असतो. आपल्याला माहीत असेल की चुंबकाचे नॉर्थ आणि नॉर्थ पोल किंवा साउथ आणि साउथ पोल हे एकमेकापासून दूर जातात. जेव्हा स्पीकर मधील coil मधून electric signal पास केला जातो तेव्हा ती coil इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणून कार्य करते व स्पीकर मधील मॅग्नेट ला स्वतःपासून दूर लोटते. 

मॅग्नेट च्या पुढच्या भागाला diaphragm जोडलेला असतो जो मर्यादित अंतरापर्यंत magnet ला दूर जाऊन देतो. व जेव्हा coil मधून reverse current पास होतो तेव्हा मॅग्नेट परत coil जवळ येतो. ही प्रक्रिया अत्यंत वेगाने होऊन vibration निर्माण होते.

स्पिरक driver च्या मदतीने diaphragm ला vibrate केले जाते व या vibration ला diaphragm च्या मदतीने ध्वनीमध्ये रूपांतरित केले जाते. अशाच प्रकारे माइक मधून आपण बोललेला आवाज स्पीकर च्या माध्यमातून आपण ऐकू शकतो परंतु यामध्ये Amplifier चा उपयोग केलेला असतो जो आवाज वाढवण्यास मदत करतो.

स्पीकर प्रकारांचे वर्गीकरण

स्पीकर चे त्यामध्ये उपस्थित असलेल्या डिव्हाईस ड्रायव्हर आणि भाग यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार पडतात. मार्केटमध्ये खूप प्रकारचे स्पीकर उपलब्ध आहेत ज्यांच्यासाठी वेगवेगळ्या technical term वापरल्या जातात त्यामुळे स्पीकर चे मूलभूत प्रकार ओळखणे अवघड झाले आहे म्हणून सर्वात प्रथम आपल्याला स्पीकर प्रकारांचे वर्गीकरण करणे गरजेचे ठरते.

स्पीकर प्रकारांच्या वर्गीकरनाची माहिती पुढीलप्रमाणे –

1. Electrostatic स्पीकर

2. Dynamic स्पीकर

3. Planar-magnetic स्पीकर

4. हॉर्न

5. Subwoofer स्पीकर

1. Electrostatic स्पीकर

या स्पीकर मध्ये पातळ membrane चा उपयोग केलेला असतो. हे स्पीकर मुख्यता जास्त frequency साठी वापरले जातात व बाह्य पावर आउटलेट ला जोडलेले असतात.जर तुम्ही कमी frequency च्या स्पीकर चा शोध घेत असाल तर या प्रकारचे स्पीकर तुम्हाला निराश करू शकतात.

2. Dynamic स्पीकर

जो आपल्याला आपल्याला कमी क्षमतेच्या आवाजाचे निर्माण करायची असते तेव्हा आपण dynamic स्पीकर चा उपयोग करू शकतो.dynamic स्पीकर मध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त woofer ड्रायव्हर चा उपयोग केलेला असतो.

3. Planar-magnetic स्पीकर

Planar-magnetic स्पीकर मध्ये diaphragm ऐवजी पातळ धातूच्या membrane चा उपयोग केलेला असतो. planar-magnetic स्पीकर हे electrostatic स्पीकर पेक्षा वेगळे असतात कारण यांना वापरण्यासाठी आउटलेट पावर ची गरज असते.

4. हॉर्न

हॉर्न हे काही प्रमाणात डायनॅमिक स्पीकर सारखे असतात.हॉर्न मध्ये विद्युत तरंगासाठी जास्त संवेदना असतात त्यामुळे दूरपर्यंत हॉर्न च्या माध्यमातून आवाज जातो. जास्त मोठ्या भागात मोठ्या आवाजाचे निर्माण करण्यासाठी हॉर्न चा उपयोग होतो.

5. Subwoofer स्पीकर

Subwoofer स्पीकर मध्ये bass port चा समावेश केलेला असतो ज्यामुळे कमी frequency च्या ध्वनी चे निर्माण होते. Subwoofer स्पीकर मध्ये मोठ्या woofer ड्रायव्हर चा उपयोग केलेला असतो. आवाजाच्या गुणवत्तेवर तडजोड न करता जास्त bass निर्माण करण्याची क्षमता subwoofer स्पीकर मध्ये असते.

स्पीकर चे प्रकार

स्पीकर मधील तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. स्पीकर चे वेगवेगळे आकार आणि साइज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये आपल्याला स्पीकर निवडताना अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून आपल्याला स्पीकर चे प्रकार माहीत असणे गरजेचे ठरते.

स्पीकर चे त्यांच्या कार्यप्रणाली आणि उपयोगानुसार पुढील प्रकार आहेत –

1. कॉम्प्युटर स्पीकर

2. Subwoofers

3. Loudspeaker

4. स्टुडिओ मॉनिटर

5. Floor Standing स्पीकर

6. Ceiling स्पीकर

7. Bookshelf स्पीकर

8. Satellite स्पीकर

9. Outdoor स्पीकर

10. Bluetooth स्पीकर

1. कॉम्प्युटर स्पीकर

संगणकाच्या माध्यमातून आवाजाची निर्माण होण्यासाठी संगणकाच्या मदरबोर्ड मध्ये लहान स्पीकर चा उपयोग केला गेला होता. आताच्या आधुनिक संगणकांमध्ये मदरबोर्ड मध्ये साऊंड कार्ड चा उपयोग केला जातो व ध्वनि निर्मिती साठी दोन loudspeaker आणि subwoofer चा उपयोग केला जातो. Computer speaker स्पीकर संगणकाचे बाह्य स्पीकर असतात ज्यांना संगणकाला केबल किंवा वायरलेस पद्धतीने जोडलेले असते.

2. Subwoofers

Subwoofer स्पीकर चा उपयोग low-frequency च्या ध्वनी चे निर्माण करण्यासाठी होतो. या स्पीकर ची रेंज 20 ते 200Hz पर्यंत असते.या स्पीकर च्या मुख्य उपयोग bass वाढवण्यासाठी होतो. हे स्पीकर आपण कोठेही ठेऊ शकतो कारण 20 ते 200Hz पर्यंत मानवाला खूपच कमी ऐकू येते. Subwoofer स्पीकर चा उपयोग आपण संगणक, कारमध्ये तसेच होम थेटर मधे चांगल्या प्रकारे करू शकतो.

3. Loudspeaker

Loudspeaker हे सर्वोत्तम घरगुती उपयोगाचे स्पीकर आहेत. जुन्या काळातील टीव्ही चा आवाज ऐकण्यासाठी लाऊड स्पीकर चा उपयोग केला जायचा परंतु आताच्या आधुनिक काळामध्ये हे स्पीकर छोट्या आकारात उपलब्ध असतात व त्यांच्यापासून आपण चांगला आवाज ऐकू शकतो.

4. स्टुडिओ मॉनिटर

जर आपल्याला एखाद्या चांगल्या ऑडिओ फाईल किंवा पॉडकास्ट चे निर्माण करायचे असेल तर आपण स्टुडिओ मॉनिटर चा उपयोग करू शकतो. स्टुडिओ मॉनिटर स्पीकर च्या मदतीने आपण आवाज आणि संगीतातील बारकावे ऐकू शकतो.सध्या मार्केटमध्ये powered आणि unpowered प्रकारचे स्टुडिओ मॉनिटर उपलब्ध आहेत.

5. Floor Standing स्पीकर

जर आपल्याला आपल्या घरांमध्ये चांगल्या संगीताचा किंवा गाण्यांचा आनंद घ्यायचा असेल तर आपण floor standing स्पीकर चा उपयोग करू शकतो. या स्पीकर ची उंची जवळपास 4 फूट असते त्यामुळे ते सहज निदर्शनास येतात. Floor Standing स्पीकर वेगवेगळ्या प्रकारच्या आवाजाचे निर्माण करण्यासाठी सक्षम असतात.

6. Ceiling / inwall स्पीकर

जर आपल्याला घरामध्ये स्पीकर लावायचा असेल व Floor Standing स्पीकर त्याच्या आकारमानामुळे तर नसेल तर आपण Ceiling / inwall स्पीकर चा उपयोग करू शकतो. हे स्पीकर आकाराने लहान असतात. हे स्पीकर install करण्यासाठी आपल्याला तज्ञ व्यक्ती ची गरज लागू शकते.

7. Bookshelf स्पीकर

Bookshelf स्पीकर हे मीडियम आकाराचे स्पीकर आहेत जे आपण टीव्ही च्या मागे किंवा बाजूला surround स्पीकर म्हणून लावू शकतो. या स्पीकर चे face पुढच्या बाजूला असावे कारण हे directional speakers आहेत. या स्पीकर ची रेंज मध्यम असते.

8. Satellite स्पीकर

Floor Standing आणि bookshelf स्पीकर पेक्षा या स्पीकर चे आकारमान लहान असते. या स्पीकर मध्ये मध्यम baas असलेल्या स्पीकर चा समावेश होतो. सॅटॅलाइट स्पीकर मध्ये subwoofer ची भूमिका महत्त्वाची असते कारण हे पावर सोर्स म्हणून कार्य करते

9. Outdoor स्पीकर

जेव्हा आपल्याला घराबाहेर स्पीकर चा उपयोग करायचा असतो तेव्हा आपण आउटडोअर स्पीकर चा उपयोग करतो हे स्पीकर वॉटरप्रूफ असतात. Outdoor स्पीकर आपण सिस्टीम मध्ये किंवा सिंगल खरेदी करू शकतो.

10. Bluetooth स्पीकर

ब्लूटूथ स्पीकर वायरलेस पद्धतीने संगणक किंवा साऊंड सिस्टिम ला जोडलेले असतात. ब्लूटूथ स्पीकर आपण आपल्याबरोबर कोठेही घेऊन जाऊ शकतो.ब्लूटूथ स्पीकर वेगवेगळ्या आकारात आणि रंगांमध्ये उपलब्ध असतात.

स्पीकर कसे कनेक्ट करावे

आपण स्पीकर ला संगणक टीव्ही तसेच विविध साऊंड सिस्टिम बरोबर कनेक्ट करू शकतो. स्पीकर ला कनेक्ट करण्यासाठी आपण वायर चा तसेच वायरलेस पद्धतीचा उपयोग करू शकतो.

स्पीकर ला केबल च्या माध्यमातून कनेक्ट करण्यासाठी आपण RCA cable, HDMI, 3.5mm analogue cable, ARC केबल तसेच ऑप्टिकल केबल चा उपयोग करू शकतो.

काही स्पीकर मध्ये वायरलेस पद्धतीने जोडण्याची सुविधा उपलब्ध असते ज्यामध्ये आपण ब्लुटूथ च्या माध्यमातून स्पीकर कनेक्ट करू शकतो. ब्लूटूथ स्पीकर आपण मोबाईल ला देखील कनेक्ट करू शकतो.

स्पीकर चे फायदे (Use of speaker in Marathi)

• स्पीकर ला आपण विविध संगणकीय उपकरणे आणि साऊंड सिस्टिम ला सोप्या पद्धतीने जोडू शकतो.

• जर गर्दीच्या ठिकाणी विविध लोकांना सारखाच संदेश पाठवायचा असेल तर आपण स्पीकर ची मदत घेऊ शकतो.

• टीव्ही, वेगवेगळ्या व्हिडिओ बघताना आवाजाच्या निर्मितीचे कार्य स्पीकर करत असतो.

• काही स्पीकर आपण आपल्याबरोबर कुठेही घेऊन जाऊ शकतो.

• ब्लूटूथ स्पीकर ला जोडण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वायर ची गरज लागत नाही.

• चांगल्या प्रेझेंटेशन साठी व ऑनलाइन शिक्षणासाठी स्पीकर ची आपल्याला मदत होते.

• आवाजाच्या निर्मितीसाठी स्पीकर चा उपयोग रेडिओ, संगणकीय उपकरण, डीजे तसेच इलेक्ट्रॉनिक संगीत उपकरणांमध्ये केला जातो.

थोडक्यात सांगायचे झाले तर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणापासून आवाजाचे निर्माण करायचे असेल तर आपल्याला स्पीकरची मदत घ्यावी लागते.

स्पीकर चे तोटे

• स्पीकर मुळे ध्वनिप्रदूषण होते.

• स्पीकर चा जास्त मोठा आवाज त्रासदायक ठरू शकतो.

• ब्लूटूथ स्पीकर हे काही रेंज पर्यंत कार्य करू शकतात जर ते रेंजच्या बाहेर गेले तर ते अकार्यशील होतात.

• जास्त wavelength असलेले स्पीकर मानवामध्ये अस्वस्थता निर्माण करतात

• जास्त काळ जास्त आवाजाच्या स्पीकरच्या सानिध्यात राहिल्यामुळे आपल्याला कानाचे विकार जडू शकतात.

• काही स्पीकर हे काही विशिष्ट संगणकाला सपोर्ट करतात त्यामुळे आपल्याला समस्या होऊ शकते.

• खूप सारे स्पीकर हे dolby sounds किंवा HD sound चे निर्माण करण्यात अक्षम असतात.

• स्पीकर खराब झाल्यावर त्याच्या रिपेरिंग मध्ये जास्त पैसे लागू शकतात.

भारतातील सर्वोत्तम स्पीकर निर्माता कंपनी ( best speaker brands in India in Marathi )

स्पीकर च्या वाढत्या मागणीमुळे स्पीकर चे वेगवेगळे ब्रॅण्ड भारतामध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला चांगल्या ब्रॅण्ड चा स्पीकर निवडण्यासाठी अडचणी येऊ शकतात. म्हणूनच आपण भारतातील सर्वोत्तम स्पीकर निर्माता कंपनी ( best speaker brands in India in Marathi ) कोणत्या आहे हे जाणून घेऊया –

ब्रँड चे नाव किंमतीची रेंज ॲमेझॉन वर खरेदी करा
Bose 7000 रुपये + Click here
JBL 1500 रुपये + येथे क्लिक करा
boAt 1000 रुपये + Click here
marshall 13000 रुपये + Click here
ultimate ear (UE) 3000 रुपये + Click here
sony 2000 रुपये + Click here
zebronics 400 रुपये + Click here
philips 1000 रुपये + Click here
hammer 1000 रुपये + Click here

चांगला स्पीकर कसा निवडायचा

स्पीकर मुळे संपूर्ण साऊंड सिस्टिम च्या आवाजाची गुणवत्ता निर्धारित होते त्यामुळे आपण स्पीकर निवडताना काळजी घेतली पाहिजे स्पीकर निवडण्यासाठी आपण पुढील पाच गोष्टींचा विचार केला पाहिजे.

1. स्पीकर चा प्रकार

मार्केटमध्ये विविध प्रकारचे स्पीकर उपलब्ध आहे त्यामुळे आपण आपल्या गरजेनुसार स्पीकर निवडला पाहिजे. प्रत्येक प्रकारच्या प्रकारचे वेगवेगळे गुणधर्म असतात त्यामुळे आपल्याला स्पीकर निवडण्याआधी स्पीकर चे प्रकार माहिती असणे गरजेचे ठरते.

2. आवाजाची गुणवत्ता

प्रत्येक व्यक्तीची आवाजाचे टेस्ट वेगवेगळे असते काही लोकांना सायलेंट गाणी आवडतात काही लोकांना डीजेचे. त्यामुळे निवडण्याआधी आपण आपल्या आवश्यक असलेल्या आवाजाच्या गुणवत्तेचा तो स्पीकर आहे का नाही हे माहीत असणे गरजेचे ठरते.

3. गरज

आपल्याला स्पीकर खरेदी करायचा असतो तेव्हा आपल्याला स्पीकर ची काय गरज आहे हे माहित असणे गरजेचे असते. जर आपल्याला स्पीकर प्रवासादरम्यान वापरायचा असेल तर आपण ब्ल्यूटूथ स्पीकर चा उपयोग करू शकतो याउलट घरामध्ये वापरण्यासाठी देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्पीकर उपलब्ध आहेत.

4. उपलब्ध component बरोबर मॅचींग

जर आपल्याकडे साऊंड सिस्टिम असेल तर आपण त्या साऊंड सिस्टिमला अनुरूप स्पीकर खरेदी केला पाहिजे ज्यामुळे स्पीकरला आवश्यक असलेली पावर मिळेल व चांगल्या ध्वनी चे निर्माण होईल. जर आपल्याला आउटडोर स्पीकर बसवायचा असेल तर आपण एकाच ब्रॅण्डचा स्पीकर बसवणे आवश्यक ठरते.

5. बजेट

स्पीकर मध्ये तंत्रज्ञानानुसार स्पीकर च्या किंमती काही हजारांपासून ते काही लाखांपर्यंत असतात त्यामुळे आपण आपल्या बजेटनुसार स्पीकर निवडला व त्यानुसार सिस्टीम बनवली तर फायद्याचे ठरते.

सर्वात जास्त विचारले गेलेले प्रश्न ( FAQ )

स्पीकर कोणत्या प्रकारचे उपकरण आहे ?

उत्तर – स्पीकर हे हार्डवेयर आउटपुट प्रकारचे उपकरण आहे कारण स्पीकर च्या मदतीने संगणकामध्ये store केलेला ध्वनी आपण ऐकू शकतो. जे उपकरण संगणकातील क्रिया बाहेर दर्शविण्याचे कार्य करतात त्यांना आउटपुट उपकरण म्हणतात. 

स्पीकर चा शोध कोणी लावला ?

उत्तर – Alexander Graham Bell यांनी 1876 मध्ये टेलिफोन चा भाग म्हणून जगातील पहिल्या स्पीकर चे पेटंट घेतले.त्यानंतर काही वर्षांनी Ernst Siemens यांनी स्पीकर मध्ये सुधारणा केल्या.

स्पीकर संगणकाला जोडायला कोणत्या प्रकारच्या केबल लागतात ?

उत्तर – स्पीकर ला संगणकीय उपकरणे तसेच टीव्हीला जोडण्यासाठी पुढील केबल चा उपयोग केला 

• RCA cables

• HDMI cabel

• Analogue cables

• ARC cabel

• Optical cabel

स्पीकर ला मराठीत काय म्हणतात ?

उत्तर – स्पीकर ला मराठीत ध्वनी प्रक्षेपक यंत्र म्हणतात.

स्पीकर चा आवाज कसा वाढवायचा ?

उत्तर – आपण स्पीकरच्या स्थानानुसार स्पीकर निवडून स्पीकर च्या मोठ्या आवाजाचा आनंद घेऊ शकतो.तसेच आपण स्पीकर ला कॉर्नर ला ठेवून आवाजाचा गुणवत्तेत वाढ झालेली बघू शकतो. कधीकधी स्पीकर सपाट पृष्ठभागावर ठेवल्यावर चांगल्या आवाजाचे निर्माण करू शकतो.

आवाजाच्या तीव्रतेचे युनिट कोणते आहे ?

उत्तर – आवाजाच्या तीव्रतेचे युनिट decibels आहे. सामान्य व्यक्ती 0 ते 180 dB चा ध्वनी ऐकू शकतो ?

बाह्य स्पीकर ची काय आवश्यकता आहे ?

उत्तर – कधीकधी अंतर्गत स्पीकर खराब झाला किंवा तो कमी गुणवत्तेचे असेल तर आपण बाह्य स्पीकर ची मदत घेऊ शकतो. अंतर्गत स्पीकर हे वेगवेगळ्या गुणवत्तेचा चांगल्या स्वरूपाचा ध्वनी निर्माण करण्यास अक्षम असू शकतात त्यामुळे अशा वेळेस बाह्य स्पीकर उपयोगात येतो.

स्पीकर कायम बॉक्स मध्ये का ठेवतात ?

उत्तर – जेव्हा स्पीकर चा diaphragm vibrate होऊन हवेचे कॉम्प्रेशन करतो तेव्हा आपल्याला आवाज ऐकू येतो. जसा diaphragm पुढे जातो तसाच तो मागे देखील जातो व त्यामुळे पाठीमागील ध्वनी तरंग हे मूळ ध्वनी मध्ये अडथळा आणू शकतात त्यामुळे स्पीकर कायम बॉक्स ठेवतात.

सारांश / conclusion

मला आशा आहे तुम्हाला Speaker विषयी संपूर्ण माहिती मराठीत या लेखाद्वारे स्पीकर म्हणजे काय ( what is speaker in Marathi ) विषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल.

जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर हा लेख तुम्ही नक्कीच शेअर करा व या लेखामध्ये तुम्हाला काही doubt असतील किंवा एखादी माहिती चुकीची वाटत असेल तर तुम्ही comment द्वारे आम्हाला कळवू शकता.

आपला दिवस शुभ असो, धन्यवाद….

Advertisements

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *